नमस्कार मंडळी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून म्हणजे दि.१५ जानेवारी २०१६ पासून सुरुवात होत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीपासून माध्यमांना खाद्य मिळायला सुरुवात झालेली असते आणि पुढे जे काही सुरु झालेले असते, होत असते, ते आपण सर्वच वाचत असतो. डॉ. श्रीपाल सबनीस हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आता त्यांच्या निवडीला आव्हान देणे, नाराज साहित्यिकांनी निवडणूक कशी अवैध आहे वगैरेसाठी पोलीसात तक्रार देणे इथपर्यंत आपण सर्वांनी माध्यमातून वाचलं आहे. आता या सर्व गोष्टींच्या पुढे साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज दुपारी ग्रंथदिंडी निघाली होती, त्यास काही जाता आले नाही, नंतर ध्वजवंदन झाले व त्यापाठोपाठ ५ वाजण्याच्या सुमारास ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्याला मात्र वेळेत पोचलो. ग्रंथप्रदर्शन प्रचंड मोठे आहे. जवळपास ४०० स्टॉल्स आहेत.
नंतर एका मंडपात काही ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार मा. सुशिलकुमार शिंदे ह्यांच्या हस्ते झाला. मधु मंगेश कर्णिक, रा. ग. जाधव आदि साहित्यिकांना प्रत्यक्ष बघता आले. तिथे मात्र जास्त न थांबत ग्रंथप्रदर्शन बघण्यास प्राधान्य दिले.
आता उद्यापासून परिसंवाद, निमंत्रितांचे कवीसंमेलन, बहुभाषिक कविसंमेलन, मुलाखती, अभिजात कथावाचन, कथाकथन, असा भरगच्च कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे.
स्वागताध्यक्ष पी डी पाटील ह्यांनी प्रचंड खर्च केल्याचे जाणवते आहे. संमेलनस्थळाचे प्रवेशद्वार, मुख्यमंडप, उपमंडप, ग्रंथदालन, भोजनगृह सारेच काही नेत्रदीपक झाले आहे.
मराठी साहित्यप्रेमीसाठी हा एक मोठा सोहळा असतो. आता अनेकांना अशा सोहळ्याबद्दल आक्षेप असेलही तो आपण सोडून देऊ. मिपाकरांसाठी हा सोहळा तितकाच मोठा असेल असे मला वाटते. अनेक मिपाकर या साहित्य संमेलनाला हजेरी लावतील. अनेक कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. दैनिकातून बर्याच गोष्टी वाचायला मिळतीलच परंतु थेट कार्यक्रमाला उपस्थित राहुन कोणता परिसंवाद चांगला झाला ? कोणाची कविता कशी होती ? मुलाखत कोणाची रंगली ? मराठी साहित्यातील विविध प्रवाहांची चर्चा कशी झडली ? अध्यक्षीय भाषण कसं होतं ? या आणि विविध साहित्यिक गोष्टींची चर्चा या निमित्ताने मिपावर व्हावी, श्रोता म्हणुन आपला अनुभव मिपाकर इथे लिहितील म्हणुन हा काथ्याकूट प्रपंच. तेव्हा उद्यापासून सुरु होणार्या सांस्कृतिक सोहळ्याबद्दल आपण या धाग्यावर लिहित राहू सर्वांना मकर संक्रातीच्या खुप खुप शुभेच्छा.
अ.भा.साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळावर कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे.
सोहळ्याची आज मी घेतलेली काही छायाचित्रे (भ्रमणध्वनीद्वारे घेतलेली असल्याने स्पष्टतेच्या मर्यादा आहेत)
१. संमेलनस्थळाचा प्रमुख मार्ग
२. रसिकजनांची गर्दी
३. ही दोन्ही ग्रंथदालने आहेत.
४. बोधचिन्ह
५. एक प्रतीकृती
६. ज्ञानबा
७. तुकाराम
८. माझी ग्रंथप्रदर्शनातली आजची किरकोळ खरेदी

२. रसिकजनांची गर्दी
३. ही दोन्ही ग्रंथदालने आहेत.
४. बोधचिन्ह
५. एक प्रतीकृती
६. ज्ञानबा
७. तुकाराम
८. माझी ग्रंथप्रदर्शनातली आजची किरकोळ खरेदी

वाचने
40705
प्रतिक्रिया
95
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
जरा जळजळ होतेय वाचून.फार
खूपच छान आणि खूपच भव्य आहे.
In reply to जरा जळजळ होतेय वाचून.फार by अजया
अरे वा.. मी ९वीत की १० वीत
In reply to खूपच छान आणि खूपच भव्य आहे. by प्रचेतस
माहितीबद्दल धन्यवाद....
छान वृत्तांत
मस्तं वृत्तांत.
वाह , मस्त
:)
ग्रेट.
In reply to :) by चांदणे संदीप
काय म्हण्ता ?
In reply to :) by चांदणे संदीप
तुम्ही सम्मेलनात सादर केलेली
In reply to :) by चांदणे संदीप
अंबाडा
In reply to तुम्ही सम्मेलनात सादर केलेली by यशोधरा
मुनिवर...
In reply to अंबाडा by कपिलमुनी
अरे वाह
काय सांगताय सर, जबरीच.
In reply to अरे वाह by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला मुख्य फोकस संमेलनात काय घडलं त्यावर ठेवू.
In reply to काय सांगताय सर, जबरीच. by प्रचेतस
वाह !! तुमचे मतदान पद्धती
In reply to अरे वाह by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to वाह !! तुमचे मतदान पद्धती by स्रुजा
संदीप भौ अभिनंदन. रेकाॅर्ड
मस्त धागा!
भाव्यांचं नाही. मला वाटते
In reply to मस्त धागा! by बोका-ए-आझम
इस्लामिक मराठी पब्लिकेशन
In reply to भाव्यांचं नाही. मला वाटते by प्रचेतस
खूप इच्छा असूनही कुठेहि येता
नक्की कुठे आहे?पिंपरी/चिंचवड?
पिंपरी. एचए मैदान.
In reply to नक्की कुठे आहे?पिंपरी/चिंचवड? by कंजूस
गुलजारसाहेबांचे भाषण सुरू आहे
आचार्य अत्रे नाट्यगृहात
छान
आज नेमके ऑफिसमध्ये महत्वाचे
In reply to छान by प्रदीप साळुंखे
श्रीपाल सबनीस यांची साहित्यिक
सबनीसांच एकच पुस्तक माहीत आहे
In reply to श्रीपाल सबनीस यांची साहित्यिक by अजया
http://www.aisiakshare.com
In reply to सबनीसांच एकच पुस्तक माहीत आहे by मारवा
भाषण भारी होते, पहिल्यांदाच
पुणेकरांचा नेहमी हेवा वाटतो
प्रचेतस सरांच्या धाग्याने
In reply to पुणेकरांचा नेहमी हेवा वाटतो by सस्नेह
धन्यवाद
धन्यवाद..
साहित्य संमेलनाविषयी अजून
आजची हजेरी!
मस्त वृत्तांत.
In reply to आजची हजेरी! by चांदणे संदीप
नाय ओ मालक!
In reply to मस्त वृत्तांत. by प्रचेतस
मस्त लिहिलाय वृ.
In reply to आजची हजेरी! by चांदणे संदीप
किती वाजता आहे तुमचे
In reply to आजची हजेरी! by चांदणे संदीप
सुंदर वृतांत ! अजून पुढचे भाग
आज गर्दी फार होणार
चंदने Sandy वृ मस्त.मी असल्या
:)
In reply to चंदने Sandy वृ मस्त.मी असल्या by कंजूस
लै डयांजर किस्सा झाला आत्ता.
होता वल्य्या म्हणून वाचला धन्या
In reply to लै डयांजर किस्सा झाला आत्ता. by प्रचेतस
:)
In reply to लै डयांजर किस्सा झाला आत्ता. by प्रचेतस
अरे, लवकर सांग. आपले धनाजीराव
In reply to लै डयांजर किस्सा झाला आत्ता. by प्रचेतस
आमचीही क्षणचित्रे!
जाताना वाटेत आम्ही मिपावरील
In reply to आमचीही क्षणचित्रे! by अजया
:) हो की!
In reply to जाताना वाटेत आम्ही मिपावरील by माहितगार
मस्त
लय भारी
संमेलनाला अफाट गर्दी होती.
कट्यार ...आणि नटसम्राट या दोन
हम्म
In reply to कट्यार ...आणि नटसम्राट या दोन by प्रसाद भागवत
अवांतर
In reply to कट्यार ...आणि नटसम्राट या दोन by प्रसाद भागवत
..............ही भावना प्रबळ
दोन ड्यान्जर किश्शांच्या
मित्रा , पुरोगामी खरेदीबद्दल
पत्रे उडाले आकाशी
बापरे!
In reply to पत्रे उडाले आकाशी by प्रचेतस
आता गोव्याच्या स्टॉलचा किसा
In reply to पत्रे उडाले आकाशी by प्रचेतस
हाहा.
In reply to आता गोव्याच्या स्टॉलचा किसा by यशोधरा
हेहे!
In reply to हाहा. by प्रचेतस
=))
In reply to हेहे! by पैसा