पर्सनल कूकिंग ब्लॉग
सकाळी उठून शीतकपाटातील भाज्यांकडे 'आज काय गिळावं' असा विचार करत तुम्ही बराच वेळ उभे राहिले आहात? काही गोष्टी बाहेर काढून न आवडल्याने ३-४ वेळा बदलाबदली केली आहे? मी असं बऱ्याच वेळा केलं आहे. माझ्या मते तुमच्या पैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असणार आहे.
पर्सनल कूकिंग ब्लॉग काय असतो?
लोक स्वयंपाकप्रयोगांचे फोटो ब्लॉगवर पोस्ट करून त्या पाककृती कुणाला खपवल्या आहेत ह्याची माहिती पुरवतात, ही माहिती मग इतर चौकस मंडळी वापरू शकतात. कूकिंग ब्लॉग्स खाणे पिणे वगैरे अश्या अचूक खपवल्या जाणाऱ्या धूर्त गोष्टींबद्दल असतात.
आपण काय गिळतो ह्याने कोणालाही फरक पडत नाही, मग त्याकरता वेळ का घालवा?
टेबलक्लॉथ, बश्या, नवीन चमचे, बाऊल्स ह्या तर फार क्षुल्लक गोष्टी आहेत, खरे बघता त्याने आयुष्यात काहीच फरक पडायला नको कारण लोक म्हणतात करंजीच्या बाह्य आवरणास नव्हे तर तिच्या आतील बाखरास जास्त महत्त्व असते. पण आपली सजावटसुध्दा आपली एकाप्रकारे ओळख देत नसते का?
प्रामाणिकपणे सांगायचं झाल तर प्रत्येक मुलीला क्रॉकरी, कूकिंग टूल्स ह्यात नेहमीच रस असतो!
मी कूकिंग ब्लॉग का वाचायला लागले?
उपरोधिक वाटेल पण कुठल्याही दिवशी स्वयंपाकावर विचार वा वेळ दवडण्याची मला काडीमात्र इच्छा नसते. खादाड नसले तरी नीटनेटके व जगण्यापुरते खायला मात्र मला नक्कीच आवडते. असे अनेक वेळा घडले आहे की नवर्याने आणलेल्या भाज्या तशाच सडून गेल्यात कारण कधी त्या माझ्याकडील असलेल्या कुठल्याच मसाल्यांबरोबर चांगल्या लागल्या नाहीत किंवा बऱ्याचदा त्या कुणाला चांगल्या खपतील हे मला कळाले नाही. तेव्हा मला वाटले की किती बरे होईल जर मला कोणी कशाबरोबर काय चांगलं लागतं, ते कुठून आणायचं, किती निरनिराळ्या प्रकारे खपवायचं अश्या युक्त्या रोज दिल्यातर. म्हणून मग मी कूकिंगची पुस्तके व ब्लॉग्स बघायला सुरुवात केली.
मी कूकिंग ब्लॉग का सुरु केला?
निर्मितीमधून मला जास्त आनंद मिळत असल्याने माझ्या घरच्यांनी काय सहन केलं त्यावर एक ब्लॉग सुरु केला! मला वाटल माझ्यासारखे अजून बरेच जण 'काय खावं, काय खाऊ घालावं' अश्या गोंधळातून गेले असतील.
मी तो दीपक नाही जी पनीर घालते, सानिका-स्पून्स बाळगून मी विधानं करत नाही, मी स्वातीदिनेश नाही किंवा माझ्या ब्लॉगकरता मला पैसेही मिळत नाही, मग माझा कूकिंग ब्लॉग तुम्ही का बघावा? कारण मग मी तुमच्यासारखीच आहे म्हणून…
माझ्या कूकिंग ब्लॉग मधे वेगळं काय आहे?
माझी कूकिंग खूप साधी आहे, मला खूप चमचे, पनीर किंवा एअरफ्रायर आवडत नाही. रोज दोन मिनिटात पदार्थ तयार करता येतील अश्या आइडियाज मी ब्लॉगवर शेअर करते. माझ्या ब्लॉग मधून मला लोकांना नवीन पाककृती करण्यास मला प्रवृत्त करायचे नसून एकाच गोष्टीचा किती विविध प्रकारे खप करता येतो व पॅन्ट्रीमध्ये कुठल्या वस्तूंचा समावेश आवर्जून करावा ते दाखवायचं आहे.
काय चांगलं लागतं हे पूर्णपणे माझं मत आहे आणि अर्थातच ती काही आदर्श वगैरे चव नाहीये. पण तरीदेखील तुम्हाला त्यामधील काहीतरी आवडू शकेल व तुमच्या कूकिंगच्या व्याख्येप्रमाणे तुम्ही त्याला गिळू शकाल. कूकिंग ही एक आब्स्ट्रॅक्ट आर्ट आहे आणि कला नेहमीच व्यक्तिनिष्ठ असते. मला कूकिंग खूपसं व्हेंटिंग सारखं वाटतं जिथे मला सुरी व लाटण्यासोबत खेळता येतं.
फ्रीजमधे अगदी थोड्या साहित्यातून निर्माण होणाऱ्या अनेक शक्यता मला ब्लॉगमधून दाखवायच्या आहेत.
माझ्या ब्लॉगची लिंक आहे - पण मी ती मिपाच्या धोरणात बसत नसल्याने येथे देणार नाही. तुम्हाला हवी असल्यास जरूर व्यनी करा. तुमचा अभिप्राय जाणायला मला निश्चितच आवडेल!
(प्रेरणा)
वर्गीकरण
आवडेश!!!
थेट ब्लॉग लिंक ला क्लीक...
In reply to थेट ब्लॉग लिंक ला क्लीक... by श्रीरंग_जोशी
हा हा हा
ब्लॉग आवडला. फोटो कुणी काढले
;-)
In reply to ;-) by रसिकामहाबळ
धन्यवाद गं!
#हे एअरफ्रायर काय असतं?
*वाचक*
आमचे 'हे'पण असलं काय काय करत
तुम्ही शेफ आहात का?? कारण
मस्त जमलंय.
एव्ह्ढा क्विक रिस्पॉन्स?
In reply to एव्ह्ढा क्विक रिस्पॉन्स? by तुषार काळभोर
जबरदस्त निरीक्षण
तुमचा ब्लॉग आवडला!
In reply to तुमचा ब्लॉग आवडला! by पैसा
भले शाब्बास!
वा!! :))
भारी विडंबन.
विडंबन आहे कां?
In reply to विडंबन आहे कां? by अरुण मनोहर
मथुरेत?
सुरेख जिलबि
मला ब्लॉगची लिंक दिसत नाहीये.
तुमचा ब्लाॅगपण सुंदर आहे.
मला ब्लॉगची लिंक दिसत नाहीये.
In reply to मला ब्लॉगची लिंक दिसत नाहीये. by रीत२००८
त्यांना व्यनि करा. मग देतील.
प्रतिसाद देणार्या सर्वांचे
:) छान जमलंय.
आंदो
अरे वा, वेगळ्याच विषयावर ओळख
रुपीतैंनी दहा किलोचा लाल
In reply to रुपीतैंनी दहा किलोचा लाल by सतिश गावडे
पुढचे प्रतिसाद पाहता तिखटाचं
ब्लॉगची लिंक दिसत नाहीये.
बाप्यांच्या कुकिंगबद्दल चकार
In reply to बाप्यांच्या कुकिंगबद्दल चकार by एस
"हापूस आंब्याच्या फोडी घातलेले आम्रखंड"
In reply to बाप्यांच्या कुकिंगबद्दल चकार by एस
करा लव्कर! फक्त अगदी
बाई तुम्ही सुंदर पदार्थ करता.
ब्लॉग