पर्सनल कूकिंग ब्लॉग
लेखनप्रकार
सकाळी उठून शीतकपाटातील भाज्यांकडे 'आज काय गिळावं' असा विचार करत तुम्ही बराच वेळ उभे राहिले आहात? काही गोष्टी बाहेर काढून न आवडल्याने ३-४ वेळा बदलाबदली केली आहे? मी असं बऱ्याच वेळा केलं आहे. माझ्या मते तुमच्या पैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असणार आहे.
पर्सनल कूकिंग ब्लॉग काय असतो?
लोक स्वयंपाकप्रयोगांचे फोटो ब्लॉगवर पोस्ट करून त्या पाककृती कुणाला खपवल्या आहेत ह्याची माहिती पुरवतात, ही माहिती मग इतर चौकस मंडळी वापरू शकतात. कूकिंग ब्लॉग्स खाणे पिणे वगैरे अश्या अचूक खपवल्या जाणाऱ्या धूर्त गोष्टींबद्दल असतात.
आपण काय गिळतो ह्याने कोणालाही फरक पडत नाही, मग त्याकरता वेळ का घालवा?
टेबलक्लॉथ, बश्या, नवीन चमचे, बाऊल्स ह्या तर फार क्षुल्लक गोष्टी आहेत, खरे बघता त्याने आयुष्यात काहीच फरक पडायला नको कारण लोक म्हणतात करंजीच्या बाह्य आवरणास नव्हे तर तिच्या आतील बाखरास जास्त महत्त्व असते. पण आपली सजावटसुध्दा आपली एकाप्रकारे ओळख देत नसते का?
प्रामाणिकपणे सांगायचं झाल तर प्रत्येक मुलीला क्रॉकरी, कूकिंग टूल्स ह्यात नेहमीच रस असतो!
मी कूकिंग ब्लॉग का वाचायला लागले?
उपरोधिक वाटेल पण कुठल्याही दिवशी स्वयंपाकावर विचार वा वेळ दवडण्याची मला काडीमात्र इच्छा नसते. खादाड नसले तरी नीटनेटके व जगण्यापुरते खायला मात्र मला नक्कीच आवडते. असे अनेक वेळा घडले आहे की नवर्याने आणलेल्या भाज्या तशाच सडून गेल्यात कारण कधी त्या माझ्याकडील असलेल्या कुठल्याच मसाल्यांबरोबर चांगल्या लागल्या नाहीत किंवा बऱ्याचदा त्या कुणाला चांगल्या खपतील हे मला कळाले नाही. तेव्हा मला वाटले की किती बरे होईल जर मला कोणी कशाबरोबर काय चांगलं लागतं, ते कुठून आणायचं, किती निरनिराळ्या प्रकारे खपवायचं अश्या युक्त्या रोज दिल्यातर. म्हणून मग मी कूकिंगची पुस्तके व ब्लॉग्स बघायला सुरुवात केली.
मी कूकिंग ब्लॉग का सुरु केला?
निर्मितीमधून मला जास्त आनंद मिळत असल्याने माझ्या घरच्यांनी काय सहन केलं त्यावर एक ब्लॉग सुरु केला! मला वाटल माझ्यासारखे अजून बरेच जण 'काय खावं, काय खाऊ घालावं' अश्या गोंधळातून गेले असतील.
मी तो दीपक नाही जी पनीर घालते, सानिका-स्पून्स बाळगून मी विधानं करत नाही, मी स्वातीदिनेश नाही किंवा माझ्या ब्लॉगकरता मला पैसेही मिळत नाही, मग माझा कूकिंग ब्लॉग तुम्ही का बघावा? कारण मग मी तुमच्यासारखीच आहे म्हणून…
माझ्या कूकिंग ब्लॉग मधे वेगळं काय आहे?
माझी कूकिंग खूप साधी आहे, मला खूप चमचे, पनीर किंवा एअरफ्रायर आवडत नाही. रोज दोन मिनिटात पदार्थ तयार करता येतील अश्या आइडियाज मी ब्लॉगवर शेअर करते. माझ्या ब्लॉग मधून मला लोकांना नवीन पाककृती करण्यास मला प्रवृत्त करायचे नसून एकाच गोष्टीचा किती विविध प्रकारे खप करता येतो व पॅन्ट्रीमध्ये कुठल्या वस्तूंचा समावेश आवर्जून करावा ते दाखवायचं आहे.
काय चांगलं लागतं हे पूर्णपणे माझं मत आहे आणि अर्थातच ती काही आदर्श वगैरे चव नाहीये. पण तरीदेखील तुम्हाला त्यामधील काहीतरी आवडू शकेल व तुमच्या कूकिंगच्या व्याख्येप्रमाणे तुम्ही त्याला गिळू शकाल. कूकिंग ही एक आब्स्ट्रॅक्ट आर्ट आहे आणि कला नेहमीच व्यक्तिनिष्ठ असते. मला कूकिंग खूपसं व्हेंटिंग सारखं वाटतं जिथे मला सुरी व लाटण्यासोबत खेळता येतं.
फ्रीजमधे अगदी थोड्या साहित्यातून निर्माण होणाऱ्या अनेक शक्यता मला ब्लॉगमधून दाखवायच्या आहेत.
माझ्या ब्लॉगची लिंक आहे - पण मी ती मिपाच्या धोरणात बसत नसल्याने येथे देणार नाही. तुम्हाला हवी असल्यास जरूर व्यनी करा. तुमचा अभिप्राय जाणायला मला निश्चितच आवडेल!
(प्रेरणा)
थेट ब्लॉग लिंक ला क्लीक...
थेट ब्लॉग लिंक ला क्लीक करायला गेलो पण लिंकच नाय...
प्रा.डॉ.फिलिप मिरुटे
(प्रेरणा)
ब्लॉग आवडला. फोटो कुणी काढले
ब्लॉग आवडला. फोटो कुणी काढले आहेत?
काय खाऊ हा प्रश्न निदान सहा महिने येणार नाही इतके पदार्थ (शीतकपाटात) आहेत. तरी जागा बदलताना कितीतरी दान केले, आठवत पण नाही आता. कपाट उघडले की अंगावर धबाधबा कोसळणार्या पदार्थांचे काय करू हा खरा मोठा यक्षप्रश्न आहे. तरी गेल्या आठ दिवसात तीन डिशेस ऑनलाईन घेतल्यात. सध्या मी आजारी असल्याने अजून कोणी शिव्या दिल्या नाहीयेत इतकंच काय ते.
स्टाईल वगैरे बघायला छान वाटते. पण ते बघून सगळ्यांनी एकाच स्टाईलचे पदार्थ खायला सुरुवात केली की ते फारसं छान वाटत नाहीसे होतात.
धन्यवाद गं!
धन्यवाद गं!
तुझ्या लेखामुळे शेवटी साडेपाच वर्षांनी मी लेखन केले :)
#हे एअरफ्रायर काय असतं?
#हे एअरफ्रायर काय असतं?
# ब्लॅागची लिंकसाठी व्य सं कशाला? तुमच्या अकाउंटला "अनुदिनी"त देऊ शकता.
#एक सांपल इथे टाकून { जाहिरात?}पुढे ब्लॅागला भेटा असे लिहिता येईल.
#एखादा दूरचा कट्टा लिहून दुरान्वये आपलं कुकिंग आणि टाइम मॅनिजमंट उघड करता येईल.
#बाखराइतकीच करंजीची पारी महत्त्वाची असते.आमची आत्या रंगीत सात पाय्रांच्या करंज्या दिवाळीत करत असे.
#असले ब्लॅाग कधीकधी कुकींगचे रहस्य सांगतात पण एरवी ललित/व्यंग लेखन म्हणून वाचण्याकडे कल असतो.
ब्लॅागला भरपूर विचक मिळोत.
आमचे 'हे'पण असलं काय काय करत
आमचे 'हे'पण असलं काय काय करत असतात. रोजचा आॅफिसचा डबा,पार्टी ,सणवार ,पर्यटन वगैरे सगळीकडे खाण्याचे पदार्थ ठरवायला आम्ही एक कुकिंग एक्स्पर्ट हायर केलाय (फुकट ;).त्याची फी इतर मार्गाने वसूल करता येते म्हणा(त्याला आज मी बनवलेले जेवण करायचे का विचारुन.मग तो बाहेर नेतो;)दर हप्त्याला किरकोळीत तेवढेच घाबरवायचे कुकिंग)
तुम्ही शेफ आहात का?? कारण
तुम्ही शेफ आहात का?? कारण सर्व डीशचे प्रेझेन्टेशन अगदी एखाद्या प्रोफेशनल शेफने केल्यासारखे दिसतेय.
एव्ह्ढा क्विक रिस्पॉन्स?
अतीशीघ्र प्रतिक्रिया!!
प्रेरणा=३४४७१
विडंबन=३४४७२
तुमचा ब्लॉग आवडला!
तुमचा ब्लॉग आवडला!
स्वगत- माझ्याकडे असलेल्या चार प्रकारचे मसाले आणि तीन प्रकारच्या डाळी वापरून किती नीटनेटके कुकिंग करता येईल असा प्रश्न मलातरी कधीच पडत नाही. ;-) आणि नव्रा काय म्हणत असतो त्याकडे बाय डिफॉल्ट लक्ष जातच नाही! :-)
भले शाब्बास!
धाग्याचेच विडंबन करुन थांबले नाहीत तर वाचक धाग्यावरील प्रतिक्रियांचेही विडंबन करत आहेत.. धन्य धन्य!!
भारी विडंबन.
आणखी मज्जा आणता आली असती. कुकिंग हा विषय कितीतरी ताणता येतो. असो.
मला ब्लॉगची लिंक दिसत नाहीये.
मला ब्लॉगची लिंक दिसत नाहीये. प्लिज देता का?
मला ब्लॉगची लिंक दिसत नाहीये.
मला ब्लॉगची लिंक दिसत नाहीये. प्लिज देता का?
प्रतिसाद देणार्या सर्वांचे
प्रतिसाद देणार्या सर्वांचे धन्यवाद!
मिपावरची ही माझी पहिलीच जिलबी गोड मानून खाण्याबद्दल आभार ;) पैलवान यांच्या निरीक्षणाप्रमाणे अतिशीघ्र विडंबन करण्याच्या घाईत थोडी गडबड झाली.
आणि हो, ते कंसही राहिलेच :)
अरे वा, वेगळ्याच विषयावर ओळख
अरे वा, वेगळ्याच विषयावर ओळख करुन दिलीत. ब्लॉग आधी पाहिला नव्हता पण आता पाहतो.
रुपीतैंनी दहा किलोचा लाल
रुपीतैंनी दहा किलोचा लाल तिखटाचा डबा इथे उपडी केला आहे असे मला राहून राहून वाटते.
पुढचे प्रतिसाद पाहता तिखटाचं
पुढचे प्रतिसाद पाहता तिखटाचं प्रमाण कमी असून सोबत हळद-हिंग-मिरी या मसाल्याच्या पदार्थांचं प्रमाणही व्यवस्थित जमल्याचं दिसतंय.
ब्लॉगची लिंक दिसत नाहीये.
ब्लॉगची लिंक दिसत नाहीये. प्लिज देता का?
बाप्यांच्या कुकिंगबद्दल चकार
बाप्यांच्या कुकिंगबद्दल चकार शब्द नाही? छे छे!! किती ती असमानता, आता मीच एक ब्लॉग सुरु करावा म्हणतो.
"हापूस आंब्याच्या फोडी घातलेले आम्रखंड"
"हापूस आंब्याच्या फोडी घातलेले आम्रखंड"वाल्या देसाईबंधूंची स्पॉन्सरशिपही मिळू शकते.
करा लव्कर! फक्त अगदी
करा लव्कर! फक्त अगदी काटेकोर्पणे पर्सनल ठेउ नका. माझ्या पण एक दोन पाक्रु तैयार आहेत अगदी फटुंसकट.
बाई तुम्ही सुंदर पदार्थ करता.
बाई, तुम्ही संदर पदार्थ करता.
ब्लोग पाहिला. शुभेच्छा.
माझ्या बायकोने हा ब्लोग पाहिला तर हॉस्पिटलाची बीले भरून ,जगायलाही पैसे उरणार नाहीत.
-- पप्पा जोगळेकर.
प्रतिसाद द्या