अल्टिमेट्स !!! लेखणस्टाईल अगदी अगदी ओघावती आहे :)
बायकी गप्पा तर लै भारी ... ल्हाण असतांना आई बरोबर काकुंकडे आलो की असलंच काही ऐकायला मिळायचं !! हॅहॅहॅ एकेक फॅण्सी आयटम ठेवतात म्हणे :) हे हळदीकुंकवा बरोबर लग्नातले आहेर इकचे तिकडे फिरवायची पण एक परंपरा आहे. आमच्या आईच्या कपाटात ब्लाऊजपिसांचा एक मोठ्ठा रकाणा भरला होता :) तो फक्त चालवण्याकरता असे :)
>> वेळेवर आवरल्याचा अभिमान आमच्या चेहर्यावर चमकत होता>> =))
>>'हे कमी करा' किंवा 'ते कमी करा' अस>> =))
.... हे असं खोटं म्हणावच लागतं :( .... इच्छा असते तुटून पडण्याची =))
लेख आवडला.रेवती अजून येऊ द्या.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
हाहाहा..मस्तच
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
ज्या स्त्रिया आणि पुरूष साटप असतात त्यांचे अंदाज चुकले की त्यांना असे खूप चुकल्यासारखे वाटत असावे. मला काहीच वाटत नाही, कारण माझे अंदाज कायम चुकतात! बर्याचदा केलेले उरते, किंवा आणलेले पडून राहते, आणि मग त्याची उस्तवार मला करायला लागते. :(
पण किस्सा वाचून पूर्वी अनुभवलेल्या हळदी-कुंकवांची आठवण झाली.
छान किस्स्सा... दर वेळेला नविन काय लुटायचे (लुटणे हा शब्दप्रयोग का आला असावा ? :?) हा देखील मोठा प्रश्न असावा !!! ;)
मदनबाण.....
तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
सर्व वाचकांचे व प्रतिसादकर्त्यांचे आभार!
सर्व ढोकळे व जिलेब्या फ्रिजमध्ये ठेवून दुसर्या दिवशी जवळच्या आश्रमात नेऊन दिले. काय करणार?
माझ्याकडे असलेल्या धार्मिक मार्गदर्शनाच्या पुस्तकात दिल्यानुसार संक्रांतीनंतर थंडी कमी होवू लागते (सूर्याचा मकर राशीतील प्रवेश वगैरे सांगत बसत नाही.;)) भाज्या, फुले, फळे छान मिळत असतात म्हणून सुवासिनींना पूर्वी भाज्या व फळेच देत असत. नंतर कालानुरूप बदल होत जावून भेटवस्तू देण्याचा पद्धत पडली. तरीही बर्याच वर्षांपूर्वी आईच्या मैत्रिणीने मेथीच्या जुड्या लुटल्याचे अंधूकसे आठवते आहे. लुटण्याचा अर्थ 'आपल्याकडे भरपूर असलेली गोष्ट सढळ हस्ते सुवासिनींना देणे' असा घेतला जाणे अपेक्षित आहे.:) ज्यांना ष्टोरी प्रत्यक्ष ऐकायची आहे त्यांना घरी येण्याचे आमंत्रण आहे.:)
दरवर्षी काय लुटायचे? हा प्रश्न कधीकधी पडतो. लग्न झाल्यावर पहिली काही वर्षे या सगळ्याचा उत्साह खूप असतो. आता पूर्वीइतका नाही कारण परदेशात प्रत्येकाला सूर्याचा मकर राशीतील प्रवेश सांगत बसायचा म्हणजे त्रासाचे होइल.;)
आपणासर्वांचे पुन्हा एकदा आभार!:)
रेवती
हीहीही, खास रेवाक्का किस्सा. अगं जाळीचं कपाट हा शब्द कित्ती वर्षांनी ऐकला !! आमच्याकडे होतं असं कपाट. मज्जा असते हळदीकुंकु. म्हणजे लग्नानंतर मज्जा वाटायला लागली. लग्ना आधी आईबरोबर कधी ही जायचे नाही. रादर , मी निमंत्रण पण द्यायचे नाही. धाकट्या बहिणीला फार प्रॉब्लेम नसायचा निमंत्रणं करण्यात पण "ही करत नाही म्हणजे काही तरी गडबड आहे आणि आपल्याला अजुन ती कळलेली नाही त्यामुळे सेफर साईड आपण पण अडुन राहिलेलं बरं" असा विचार असायचा तिचा. त्यामुळे आईची फार पंचाईत व्हायची. ती अर्थात च आमचा विरोध मोडुन काढुन आम्हाला पिटाळायचीच. मग अर्धी कॉलनी मी आणि अर्धी कॉलनी बहिण असं मीच वाटप करायचे, त्यात पण मी कॉलनीचा असा भाग घ्यायचे जिथल्या बायका दुपारच्या वेळी घरी असण्याची शक्यता कमी असायची. एक तर निमंत्रणं लवकर उरकायची आणि वर बोलत बसायची झंझट नाही. येऊन जाऊन अभ्यास कसा चाललाय वगैरे सारख्या लीस्ट प्रॉडक्टीव प्रश्नांची उत्तरं कोण देत बसणार? लवकर आल्यावर किती वेळ लावतेस असं बहिणीला चिडवता पण यायचं ;)
पण लग्नानंतर लोकं एकदम भारी ट्रीटमेंट देतात राव. साडीची दखल घ्या, गाडीची दखल घ्या, एकुण च आपल्याला निमंत्रण असतं, आईचं शेपुट म्हणुन जावं लागत नाही ;) मग आवडायला लागली हळदीकुंकवं. तो पर्यंत बहिणीला आईबरोबर जायला भाग पाडायचे मी :P
प्रतिक्रिया
ही ही
जबरी... मग
अल्टिमेट्
मस्त
मस्त वर्णन
दुकान!
-
परवा हा
हाहाहा..मस्
छान
मस्तच किस्सा
असेच म्हणतो
वाहवा वाहवा!!!!
खुलवून सांगितलेला गमतीदार किस्सा !!
धन्य आहेस !
साटपपणा
छान
लय भारी!!! ह
सर्व
रेवतीवैनी,
सहि किस्सा!!!
हीहीही, खास रेवाक्का किस्सा.
मस्त! खुसखुशीत लेख!
मस्तं आहे लेख. आवडला.
अस्सा किस्सा आहे होय
मस्त…. अरे थोडा ढोकळा आम्हाला