✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका आधुनिक अमेरिकन हरिश्चंद्राची करुण कहाणी-पाकिस्तानी अणूबाँब कसा बनला?

स
सुधीर काळे यांनी
गुरुवार, 11/05/2009 - 08:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33703 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

चमचमीत लेख

सहज
गुरुवार, 11/05/2009 - 09:06 नवीन
लेख आवडला. बिचारा बार्लो! त्याला अजुन बुकडील, मुव्ही डील, सेमिनार्स मिळाले नाहीत याबद्दल वाईट वाटते. लवकर त्याचे दिवस पालटतील अशी आशा करु या.
  • Log in or register to post comments

खरेच

मिसळभोक्ता
गुरुवार, 11/05/2009 - 13:27 नवीन
बिचार्‍या बार्लोचे चांगले दिवस येतील, आणि त्याची मैत्रिण रोजमेरी मार्लो त्याच्याकडे परत येईल, अशी आपण प्रभू येशूच्या चरणी प्रार्थना करू या. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सुरेख

मदनबाण
गुरुवार, 11/05/2009 - 09:42 नवीन
फारच सुरेख लेख... :) मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे अ प्र ति म

मॅन्ड्रेक
गुरुवार, 11/05/2009 - 15:32 नवीन
at and post : Xanadu.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

तेन्नालीराम
Fri, 11/06/2009 - 07:57 नवीन
सुधीरभाऊ, लेख आवडला पण मधे-मधे डोक्यावरून गेल! ते. रा.
  • Log in or register to post comments

बार्लो

सुधीर काळे
Fri, 11/06/2009 - 11:15 नवीन
आधी म्हटल्याप्रमाणे मी सध्या Nuclear Deception हे Adrian Levy/Catherine Scott-Clarke या द्वयीने लिहिलेले पुस्तक वाचत आहे. मी जेंव्हां "उत्तम कथा"त प्रकाशित झालेला बार्लोवरचा लेख लिहिला तेंव्हां मी हें पुस्तक वाचले नव्हते. या ६०० पानी पुस्तकात बार्लोची माहिती फक्त दहा पानं आहे. बाकीची पानें झिया-उल-हक-बेनझीर-१-नवाज़ शरीफ-१-बेनझीर-२-नवाज़ शरीफ-२-मुशर्रफ या पाकिस्तानी मुखियांवर व कार्टर-रेगन-बुश-४१-क्लिंटन-बुश-४३ या पाच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर आहेत! अमेरिकन अध्यक्षांनी आधी अफगानिस्तानच्या निमित्ताने व नंतर War-on-terror च्या निमित्ताने पाकिस्तानचे अतोनात लाड केले व त्या 'pariah' राष्ट्राच्या "वाह्यात चाळ्यां"कडे जाणून-बुजून साफ दुर्लक्ष केले. आता जेंव्हा पाकिस्तान "तालीबान/अल-कायदा"च्या हातात पडू घातला आहे तेंव्हा कुठे अमेरिकेला या धोक्याची झळ लागू लागली आहे. पण पाकिस्तान तालीबान/अल-कायदाच्या हाती पडणार ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे! आज ना उद्या हे होणारच आहे! "अल् जझीरा" या अरबी वृत्तसंस्थेवर २१ जून ०९ला प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत अल्-कायदा या संघटनेचा ओसामा बिन लादेन व आयमान जवाहिरी यांच्यानंतरचा तिसर्‍या क्रमांकाचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद यांनी अल् जझीराला सांगितले कीं पकिस्तानी अण्वस्त्रे जर त्यांच्या संघटनेच्या हाती आली तर ते ती अण्वस्त्रे अमेरिकेच्याविरुद्ध वापरतील! अमेरिकेत रहाणारे असंख्य भारतीय व आपणा सर्वांचे असंख्य नातेवाईक यांच्यासाठी तरी देव करो व असे कधीही न होवो, पण असे कधी झालेच तर तो एक "कवीय न्यायच (poetic justice)" ठरावा इतकी पापें अमेरिकेच्या सरकारने केली आहेत असे या पुस्तकावरून वाटते. त्याआधी वाचलेल्या "How the neoconservatives took hold of White House and destroyed the Bush Presidency असा विषय असलेले व "The fall of House of Bush" या नावाच्या पुस्तकातही इराकवर वटारलेल्या डोळ्यात पाकिस्तानच्या कुरापतींमुळे सौम्यता येऊ नये म्हणून तिकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्यात आले होते. इराकमध्ये तर हाती धुपाटणे च आले, पण पाकिस्तानशी वेळेवरच दोन हात केले असते तर आज उत्तर कोरिया व इराणसारखे भावी व पाकिस्तानच्या ताब्यातील अण्वस्त्रे हाती घेतलेली अल-कायदा संघटनेसारखे उद्याच छातीवर बसणारे शत्रू निर्माण झाले नसते! मी या विषयावर लिखाण करणार आहे. वॉकर बुक्स कंपनीकडे कॉपीराईटची परवानगी मागितली आहे, बघू देते का! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments

उत्तम लेख..

योगी९००
Fri, 11/06/2009 - 19:16 नवीन
मस्त माहिती कळाली... ही बार्लोची कथा (की व्यथा ??) माहीत नव्हती..!!!! पकिस्तानी अण्वस्त्रे जर त्यांच्या संघटनेच्या हाती आली तर ते ती अण्वस्त्रे अमेरिकेच्याविरुद्ध वापरतील! आणि आधी प्रायोगिक तत्वावर भारताविरूद्ध वापरतील..!!!! अमेरिकेत रहाणारे असंख्य भारतीय व आपणा सर्वांचे असंख्य नातेवाईक यांच्यासाठी तरी देव करो व असे कधीही न होवो, हे मला आवडले नाही. फक्त भारतीय लोकांसाठी प्रार्थना करण्यापेक्षा सर्व जणांसाठी प्रार्थना करावी. मी सर्वांसाठी प्रार्थना करतो. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

अपना वो फिरभी अपना!

सुधीर काळे
Fri, 11/06/2009 - 20:22 नवीन
खादाडमाऊ-जी, माझी सख्खी धाकटी बहीण, दोन्ही मुले व एकुलती एक नात तिथं रहात असल्यामुळं मी असा जरासा स्वार्थी वागलो तर रागवू नये! तशी काळजी प्रत्येक व्यक्तीची आहेच, पण "अपना वो फिरभी अपना!" सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

नेमबाजीचा सराव (target practice)" आपल्यावर नक्कीच होईल!

सुधीर काळे
Fri, 11/06/2009 - 20:26 नवीन
आधी एकदा म्हटल्याप्रमाणे "नेमबाजीचा सराव (target practice)" आपल्यावर नक्कीच होईल असे वाटते. पण त्यांचे नेम चुकोत हीच परमेश्वराकडे प्रार्थना! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

छान लेख..

सुवर्णा
Fri, 11/06/2009 - 12:13 नवीन
बरीच महिती मिळाली.. अजुन असे लेख वाचायला आवडतील.. सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खरं तर.....

सुधीर काळे
Fri, 11/06/2009 - 14:11 नवीन
खरं तर मलाही असे लेख लिहायला आवडतं, पण मिपावरील लोकांना अशा लेखात फारशी गोडी दिसत नाहीं. कदाचित अतिरेकी, पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या विषायात मिपा वाचकांना रस नसेल किंवा त्यांना माझ्या लिखाणाची शैली आवडत नसेल किंवा आणखीही कांहीं अज्ञात कारण असेल. पण ६०० वेळा वाचूनही कुणा वाचकाला त्यांच्या स्वतःच्या वाचनावरून, अनुभवावरून माझ्या लेखात कांही भर घालावी, विरोध करावा किंवा मी लिहिलंय त्यापेक्षा वेगळे कांहीं त्यांच्या वाचनाच्या आधारे मांडावे वा कांहीं वेगळे विवेचन करावे असे वाटत नाहीं असे दिसते. असो. सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णा

नाही हो

गणपा
Fri, 11/06/2009 - 17:23 नवीन
नाही हो काळे काका तुम्ही लिहाच या विषयावर. आम्ही वाचतो आहोत, आपल वाचन अफाट आहे. या विषयांवर माझ्या सारख्या अडाण्याच ज्ञान तोकड असल्याने टिप्पणी करु शकत नाही पण आम्ही आवर्जुन आपले लेख वाचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

+१

अडाणि
Fri, 11/06/2009 - 22:05 नवीन
माझ्या सारख्या अडाण्याच ज्ञान तोकड असल्याने टिप्पणी करु शकत नाही
बाकी लेख जरूर वाचतो.... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

वाचकांची आवड

आनंद घारे
Fri, 11/06/2009 - 17:58 नवीन
पण ६०० वेळा वाचूनही फक्त दोन दिवसात इतकी वाचने झाली यावरून लोकांना असे लेख वाचायला आवडतात हे स्पष्ट आहे. कुणा वाचकाला त्यांच्या स्वतःच्या वाचनावरून, अनुभवावरून माझ्या लेखात कांही भर घालावी, विरोध करावा किंवा मी लिहिलंय त्यापेक्षा वेगळे कांहीं त्यांच्या वाचनाच्या आधारे मांडावे वा कांहीं वेगळे विवेचन करावे असे वाटत नाहीं असे दिसते. ते वाचकांच्या कुवतीवर अवलंबून आहे. या विशिष्ट विषयासंबंधी अवांतर वाचन केले असलेले आणि अशा चर्चेत भाग घेण्याएवढी क्षमता असलेले लोक दुर्मिळच असणार. मिपावरील लोकांना अशा लेखात फारशी गोडी दिसत नाहीं. मिसळपाव या नावाप्रमाणेच इथला वाचकवर्ग एकसंध नाही. भिन्न लोकांच्या आवडी भिन्न असणार. तिकडे लक्ष न देता स्वांतसुखाय लिहीत रहा. वाचणारे वाचतील. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

लेख वाचला.

स्वाती२
Fri, 11/06/2009 - 19:48 नवीन
लेख वाचला. परंतु या विषयावर काही अधिकाराने बोलावे एवढा माझा अभ्यास नाही. आंतरराष्ट्रीय राजकारण, पेंटॅगॉन वगैरे गोष्टी हिमनगासारख्या. जे 'बातमी' म्हणून दिसते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पडद्यामागचे नाटक चालते. एवढ्या गुंतागुंतीच्या विषयावरच्या लेखाला 'छान! माहितीपूर्ण ' वगैरे एक दोन शब्दांचा प्रतिसाद देण्यापेक्षा रोमात राहाणे मी तरी पसंत करते. प्रतिसादांची संख्या कमी म्हणून लिहायचे थांबवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

वाचने आणि

अवलिया
Fri, 11/06/2009 - 18:11 नवीन
वाचने आणि प्रतिसादाची सांगड घालुन लिहाल तर तुमचा विनायक पाचलग होईल. लिहायचे वाटते ते लिहा, प्रतिसाद येवो न येवो ! काही विषयांवर लोकांना वाचायला आवडते, लिहायला नाही (मीही त्यातलाच एक) लिहा ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

कधी-कधी आपण भिंतीशी तर बोलत नाहीय ना असं मनात येतं हे मात्र खरं!

सुधीर काळे
Fri, 11/06/2009 - 20:32 नवीन
आपले म्हणणे पटते व ते कांहीं अंशी खरेही असेल. पण कधी-कधी आपण भिंतीशी तर बोलत नाहीय ना असं मनात येतं हे मात्र खरं! यायला नाहीं पाहिजे हे पटत असूनही.....! पण सल्ल्याबद्दल मनापासून धन्यू! आणि मी हा प्रतिसाद यॉर्कर मानत नाहीं व माझी दांडीही तुम्ही शाबूत ठेवली आहे. पुनश्च धन्यवाद. (धन्यवाद या शब्दाची व्युत्पत्ती कुणी सांगू शकेल कां? धन्यवादात "धन्य"ही कांहीं नाहीं व "वाद"ही! हाहाहा!!) सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

लेख,

हरकाम्या
Fri, 11/06/2009 - 20:33 नवीन
काळे तुम्ही जरुर लिहा कोणी वाचो अथवा न वाचो मी मात्र तुमच्या लेखांची आतुरतेने वाट पहात असतो.
  • Log in or register to post comments

हौसलाअफजाईबद्दल आभार!

सुधीर काळे
Fri, 11/06/2009 - 20:40 नवीन
माझा "हौसला" वाढविल्याबद्दल सर्वांचे आभार! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या

अतिशय

यशोधरा
Fri, 11/06/2009 - 20:48 नवीन
अतिशय सुरेख लेख! हे असले काही जनतेसमोर फारसे येतच नसावे, कोणता का देश असेना... असे किती तरी लोक पडद्याआड असतील.. बार्लोविषयी वाईट वाटले पण त्याच्या हिमतीची दादही द्यावीशी वाटते! काय अफाट मानसिक ताकद, स्वतःच्या कामावर श्रद्धा, विश्वास आणि आत्मविश्वास असेल ह्या माणसाकडे!
  • Log in or register to post comments

अगदी खरं!

सुधीर काळे
Fri, 11/06/2009 - 21:06 नवीन
अगदी खरं आहे! You said it, Ma'am! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

!

आशिष सुर्वे
Fri, 11/06/2009 - 21:20 नवीन
लेख खरेच वाचनीय आहे.. पण हा लेख वाचल्यावर जेव्हा 'प्रस्तावना' वाचली, तेव्हा प्रतिसाद द्यायला अंमळ घाबरलो.. का? वाचा.. >> शेवटी क्लिक केल्यावर दिसेल कीं नाहीं कुणास ठाऊक. जर भलतेच चौकोन वगैरे दिसल्यास तात्यासाहेबांना 'उडवायची' विनंती! >> - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

चांगली माहिती

अक्षय पुर्णपात्रे
Fri, 11/06/2009 - 21:29 नवीन
श्री काळे, लेखातून चांगली माहिती मिळाली. 'मिळणार्‍या'तील 'र' 'मिळणार्या' असा दिसतो. जमल्यास त्यात सुधारणा करावी. आंतरजालावरील माहिती असल्यास जमल्यास दुवे द्यावे. उदाहरणार्थ, रिचर्ड बार्लो (विकिदुवा).
  • Log in or register to post comments

'भार्‍या'ची 'भार्या' अज्ञानापोटी नव्हे तर नजरचुकीने झाली!

सुधीर काळे
Fri, 11/06/2009 - 21:41 नवीन
'भार्‍या'ची 'भार्या' अज्ञानापोटी नव्हे तर नजरचुकीने झाली. क्षमस्व. सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

एकदा झाले ते झाले

अक्षय पुर्णपात्रे
Fri, 11/06/2009 - 21:47 नवीन
'भार्‍या'ची 'भार्या' अज्ञानापोटी नव्हे तर नजरचुकीने झाली.
नीट पाहीले असते तर असे झाले नसते. असो. संसार सुखाचा होवो.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

नीट पाहिलेल्या लिखाणात "नजरचूक" कशी होईल पूर्णपात्रेसाहेब!

सुधीर काळे
Fri, 11/06/2009 - 21:55 नवीन
नीट पाहिलेल्या लिखाणात "नजरचूक" कशी होईल पूर्णपात्रेसाहेब! वाईच इच्चार करा की राव! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

विचार केला

अक्षय पुर्णपात्रे
Fri, 11/06/2009 - 21:59 नवीन
श्री काळे, बरोबर आहे. हलके घेतल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

खरं सांगायचं तर.....

सुधीर काळे
Sat, 11/07/2009 - 15:42 नवीन
पूर्णपात्रे-जी, खरं सांगायचं तर हा लेख मी मुळात लोकसत्ता-फ्रीडम हे सॉफ्टवेअर वापरून लिहिला होता. साधारणपणे या सॉफ्टवेअरने लिहिलेले लेख कॉपी-पेस्ट केल्यास फक्त चौकोन-चौकोन दिसतात. अपलोडिंग करेपर्यंत काय दिसेल याची खात्री नव्हती! (पहा ९६-मराठा यांचा या संदर्भात तात्यासाहेबांना लिहिलेल्या 'उडविण्याच्या' बाबतीतला प्रतिसाद). मला वाटते कीं लिप्यंतर झाल्यामुळे 'र्‍या' व 'र्या' यांची अदलाबदल झाली असावी. पण सॉफ्टवेअर या प्रांतात आपल्याला गती शून्य असल्यामुळे नक्की हा चमत्कार का झाला हे माहीत नाहीं. मी जेंव्हा बरहा किंवा गमभन वापरतो तेंव्हा अशी चूक सहसा होत नाहीं. असो. इतक्या बारकाईने लेख वाचल्याबद्दल मनापासून धन्यू! सुधीर ------------------------ असेल हिंमत व आवड, तर ऐका हे मुळात पंकज उधासने गायलेले गीत! http://www.youtube.com/watch?v=4HUwuNk0Tc4
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

सुधीरजी काळेजी

परिकथेतील राजकुमार
Sat, 11/07/2009 - 16:14 नवीन
अपलोडिंग करेपर्यंत काय दिसेल याची खात्री नव्हती! आपल्याला लेख लिहुन / डकवुन झाला की 'पुर्वदृश्य' ह्या सेवेचा लाभ मिळत नाही का ? ती सेवा वापरल्यानंतर लेख जसा दिसतो तसाच्या तसाच मिपावर उमटतो. (माझी हि प्रतिक्रीया आधी कुठेतरी प्रसिद्ध झाली होती, कुठे ते आठवत नाही पण आता) असो.... लेख वाचला, खुप माहिती मिळाली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

आपल्याला

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 11/07/2009 - 16:25 नवीन
आपल्याला स्वत: चढवलेला लेख उडवण्याची सेवा मिळत नाही काय? (ही प्रतिक्रिया आधी एका टॅब्लॉईडमधे प्रसिद्ध झाली होती, नस्त्या आरोपांना वैतागून आता नाव सांगत नाही.) अदिती (अधिक माहितीसाठी इजाभुंना भेटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नसावी!

सुधीर काळे
Sat, 11/07/2009 - 23:18 नवीन
अदिती,श्रीती,श्रदिती,शदिती,सराजे व अदिती, मागे एकदा श्री बिपिन कार्यकर्ते यांना मी फोनवर विचारले असता त्यांनी सांगितले होते कीं एकदा पोस्ट केलेला लेख वा प्रतिक्रिया फक्त संपादक मंडळच उडवू शकते. लिहिणारा त्यात बदल करू शकतो, पण erase करू शकत नाहीं. माझा एक छोटासा piece उडवण्यासाठी मला त्यांना विनंती करायला लागली होती. कशामुळे कुणास ठाऊक पण कधी-कधी एकदा अपलोड केलेली पोस्ट किंवा प्रतिक्रिया दोनदा पोस्ट होतात. श्री आनंद घारे यांची एक प्रतिक्रिया तर ७ वेळा चढली होती. का ते त्यानाही कळलं नाहीं व मलाही कधी कळलं नाहीं. गमभन वापरताना तर काय-काय व का distortions होतात ते मला अजून कळले नाहींय. उदाहरणार्थ या लेखाची सुरुवात पहा. आधी "राजे व आदिती" असे लिहिले होते. राजे यांचे आडनाव वापरल्यामुळे त्यामागे श्री लिहायला गेलो तर काय झाले ते तसेच ठेवले आहे व मुद्दाम बोल्ड केले आहे. असे फक्त गमभनवरच होते. लोकसत्ता फ्रीडम व बरहात होत नाहीं. गमभनवाल्यांना मी याबद्दल लिहिले पण त्यांचे अद्याप उत्तर आलेले नाहीं) मिपावरचे असे अनेक Dark corners मला भेडसावतात, पण मी ते माझ्या stride मध्ये घेतो. माझ्यासारख्या "non-IT"वाल्याला समजेल अशा भाषेत (in layman's language) जर कुणी सांगितले तर मी ऋणी होईन. धन्यवाद सुधीर ------------------------ असेल हिंमत व आवड, तर ऐका हे मुळात पंकज उधासने गायलेले गीत! http://www.youtube.com/watch?v=4HUwuNk0Tc4
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रयोगातून विज्ञान

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 11/08/2009 - 00:00 नवीन
हा प्रतिसाद माझ्यासाठी नसून कुणा आदितीसाठी असावा, तरीही उत्तर देत आहे.
माझ्यासारख्या "non-IT"वाल्याला समजेल अशा भाषेत (in layman's language) जर कुणी सांगितले तर मी ऋणी होईन.
माझ्यासारखे "non-IT"वाले प्रयोगातून विज्ञान शिकतात. असो. प्रश्न माझ्या पेशाबद्दलचा नसावा. मी नेहेमीच गमभन वापरते, अगदी मिपाबाहेरही मराठी लिहायचं असेल तर गमभनवर लिहून दुसरीकडे चिकटवते आणि ते व्यवस्थित चालतं. आत्ताच 'श्री.राजे आणि अदिती' लिहिलं आणि आहे तसंच दिसत आहे, किमान मलातरी. ज्यांना वेगळं काही दिसत असेल त्यांनी श्री. येडा खवीस यांच्याशी संपर्क साधावा; विण्डोज वापरत असाल तर गमभनऐवजी मायक्रोसॉफ्टच येडं झालं असण्याची शक्यता आहे. अनेकदा माझ्याही प्रतिक्रीया एकापेक्षा जास्त वेळा प्रकाशित होतात. याचं कारण प्रतिक्रीया प्रकाशित होण्याआधीच 'प्रकाशित करा' या बटणावर टिचकी मारणे. मिपाचा सर्व्हर जेव्हा प्रचंड बिझी होतो तेव्हा बर्‍याचदा अशा अनेक प्रतिक्रिया दिसतात. कोणत्याही सदस्याला स्वतःचाच धागा काढता / उडवता येतो. त्यासाठी धागा उघडा, 'संपादन' या टॅबवर क्लिक करा आणि पानाच्या खालपर्यंत जाऊन 'काढून टाका' या बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे स्वतःचेच प्रतिसाद मात्र उडवता येत नाहीत. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

प्रॉब्लेम तर आहेच.

सुधीर काळे
Sun, 11/08/2009 - 00:11 नवीन
त्यासाठी धागा उघडा, 'संपादन' या टॅबवर क्लिक करा आणि पानाच्या खालपर्यंत जाऊन 'काढून टाका' या बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे स्वतःचेच प्रतिसाद मात्र उडवता येत नाहीत. (मी फक्त स्वतःच्या लेखांबद्दल बोलत होतो! मला तरी 'काढून टाका' हे बटणच दिसत नाहीं.) श्री.राजे आणि अदिती' लिहिलं आणि आहे तसंच दिसत आहे. (आधी नुसतं 'राजे व अदिती' लिही व मग कर्सर 'रा'च्या डावीकडे नेऊन श्री टाईप करून पहा. कदाचित तुलाही असा प्रत्यय येईल. मला नेहमीच distortion मिळतं. कसं टाळायचं तेही तुझ्यासारखे प्रयोगातून शिकलो आहे. पण ते करायला विसरलो कीं distortion होतेच व पुनर्टंकन करावे लागते. आता हा मायक्रोसॉफ्टचा की 'गमभन'चा प्रॉब्लेम आहे हे कळण्याइतके माझे यातले ज्ञान प्रगल्भ नाहीं.) तू जे सांगितलेस ते करून पाहिले आहे. यापुढे कांहीं सांगण्यासारखं असेल तर स्वागत आहे. सुधीर ------------------------ http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

याला उत्तर म्हणून तुलाच मी संबोधित कले होते!

सुधीर काळे
Sun, 11/08/2009 - 00:13 नवीन
याला उत्तर म्हणून तुलाच मी संबोधित कले होते! सुधीर ------------------------ http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मी खरंच फार अनभिज्ञ आहे या बाबत

सुधीर काळे
Sun, 11/08/2009 - 00:17 नवीन
प.रा.साहेब, मी खरंच फार अनभिज्ञ आहे या बाबतहोईलमिपावर कधी काय होईल हे सांगता येत नाहीं. पहा पुन्हा झाले distortion. होईल हा शब्द तिथे कसा आला ते कळत नाहीं. मुद्दाम करेक्ट केलेले नाहीं. ------------------------ http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पाकिस्तानला दिलेल्या ११ बिलियन डॉ. मदतीपैकी ३० टक्के पैसे गुल?

सुधीर काळे
Sun, 11/08/2009 - 00:01 नवीन
Nuclear Deception या पुस्तकात एक उल्लेख आहे की बुश-४३ यांच्या कारकीर्दीत अमेरिकेने "War on terror" लढण्यासाठी पाकिस्तानला ११ बिलियन डॉलर्स मदत दिली, त्यातले ३० टक्के पैसे लष्करी अधिकार्‍यांनी खाल्ले. माझ्या मनात आले: पैसे खाताहेत वरिष्ठ अधिकारी व वजीरिस्तानमध्ये मरताहेत मात्र शिपुरडे! असं किती दिवस चालणार? पाकिस्तान "या बोटावरची थुंकी त्या बोटावर करत" जगत आहे, अमेरिका पहात आहे पण मूग गिळून गप्प का बसते व मलिदा देतच का रहाते हे अजून कळत नाहीं. "आपल्याला काय घेणं आहे?" अशा तर्‍हेची उदासीनता ठेवणेही बरोबर नाहीं. कारण आपण आज उदासीन राहिलो तर उद्या पाणी डोक्यावरून जाईल. अमेरिकन नागरिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांनी तर अजीबात उदासीन राहू नये. ते मतदाते आहेत व ते आपल्या सेनेटर्सना व काँग्रेसमेनना जाब विचारू शकतात. वेळात वेळ काढून असली पुस्तके त्यांनी वाचावीत अशी माझी त्यांना विनंती आहे. सुधीर ------------------------ http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!
  • Log in or register to post comments

अमेरीकचे परराष्ट्र धोरण

अजय भागवत
Sun, 11/08/2009 - 11:31 नवीन
काळेसर, तुमचे अमेरीकेच्या परराष्ट्र धोरणावरील अभ्यासाच्या सखोलतेचे प्रभुत्व वादातीत आहे. तुमचे आधीचेही लेख वाचले आहेत; वरील लेखही खूप मोलाची माहिती देतो. लेखातून वाक्या-वाक्यातून दिसणारा अमेरीकन परराष्ट्र धोरणातील कावेबाजपणा काही चित्रपट, पुस्तके व काही घटना दखवून देतातच. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर एक पुस्तक मी वाचले होते (नाव आठवत नाही)- त्यात रोश व इतर कार्पोरेटने आपले धोकादायक प्रकल्प तिसऱ्या जगात कसे हलवले व स्थानिक सरकारांनी त्याला कशी व का मदत केली ह्याची नमुनेदार माहिती होती. ऎव्हढेच म्हणता येईल की टाळी एका हाताने वाजत नाही. तरीही, असे वागण्याचे अमेरीकेचे जे कारण आहे, त्याबद्दल अनेक वाद-प्रतिवाद असतील (एक ढोबळ कारण मांडले जाते ते म्हणजे, जागतिक वर्चस्व, पण ते मनापासून पटत नाही). तुमचे ह्याबद्दल काय मत आहे?
  • Log in or register to post comments

"steelmaking" हा माझा मुख्य पेशा, journalism नव्हे!

सुधीर काळे
Sun, 11/08/2009 - 16:07 नवीन
भागवत-जी, वाचनाची मला खूप आवड आहे ती एक छंद म्हणून (किंवा व्यसन म्हटले तरी चालेल). "लोहारकी (steelmaking)" हा माझा मुख्य पेशा, पत्रकारिता (journalism) नव्हे. केवळ सध्या पाकिस्तानमधील खतरनाक घटना व त्यांचा सरतेशेवटी आपल्यावर होणारा भयंकर परिणाम या विषयाने माझे मन व्यापून टाकले आहे (obsession म्हटलं तरी चालेल). पाकिस्तानबद्दल माहिती व्हावी म्हणून पाकिस्तान डेली टाइम्स, डॉनसारखी वृत्तपत्रे नेटवर वाचू लागलो व ती वाचता-वाचता "House of Bush, House of Saud" ("Fahrenheit 9/11" हा चित्रपट बराचसा या पुस्तकावर आधारित आहे), "The Fall of House of Bush" व Nuclear Deception" ही पुस्तकं हाताला लागली व पाकिस्तानावरच्या वाचनाची गोडी वाढली. पण वाचून मन खरं तर कासावीसच झालं! पकिस्तानबद्दलचे बोटचेपे धोरण हा अमेरिकन सरकारचा स्वार्थीपणा की भोळेपणा की मूर्खपणा की अदूरदर्शीपणा कीं केवळ स्वतःपुरते राबवायचे "कातडीबचाऊ" धोरण यातलं काय हे ठरविणं फार अवघड आहे. पाकिस्तानवर कायमच लष्कराने राज्य केले आहे, पण त्यातले अयूब जुन्या पठडीतले व कमी आग्रही हुकुमशहा होते, याह्याखान मूर्ख होते पण झिया व मुशर्रफ हे दोघे मात्र 'कोल्हे' होते. त्यांनी इतके परिणामकारकरीत्या अमेरिकेला बुद्दू बनविले कीं अमेरिकेला आपले वस्त्रहरण कधी झालं हे कळलंच नाहीं. आधी रशियाचे अफगाणिस्तानवरचे आक्रमण झियाला जीवदान (व नंतर इतिहासात एक स्थान) देऊन गेले. झियाने आपली खुर्ची सलामत ठेवण्यासाठी अतिरेकी बनवण्याची फॅक्टरीच काढली! मुशर्रफ तर संपलाच होता पण दैवी चमत्कार झाला व ९/११ घडले व 'मुश'ला 'बुश'कडून 'जीवदान'च मिळाले. आजही ओबामासारख्या मुस्लिम राष्ट्रांशी न भांडायचे धोरण ठेऊ पहाणार्‍या राष्ट्रपतीचे हातच बांधले गेले आहेत. आज पाकिस्तानची मदत थांबवावी तर ते राष्ट्र 'उद्या' संपायच्या ऐवजी 'आज'च संपेल. त्यांची अण्वस्त्रे (जी बनवायला अमेरिकेनेच अदूरदृष्टीपणाने मदत केली) जर अल-कायदासारख्या संघटनेच्या हातात पडली तर काय हाहाकार होईल याची कल्पनाच करवत नाहीं. सध्या वजीरिस्तानमध्ये पाकिस्तानी सेना व तालीबान (पाकिस्तान शाखा) यांच्यात जे युद्ध चालू आहे ते तर मला लुटुपुटीचेच वाटते. ते अमेरिकन सरकारसाठी सादर केले जाणारे एक रंगभूमीवरील नाट्यच (stage show) आहे असे वाटते. थोडे दिवस युद्ध जुंपते, मग एक तह होतो, तो दुसर्‍या दिवशीच कचर्‍याच्या टोपलीत जातो, या तहाच्या निमित्ताने जी तात्पुरती शांतता होते त्यात तालीबानी पुन्हा शक्तिसंचय करतात, नवे व्युह आखतात, 'स्वात' भागात 'शारिया' कायदा लागू करण्यासारख्या नव्या मागण्या सादर करतात, त्या नामंजूर होतात, पुन्हा युद्ध पेटते व कालचक्र असेच सातत्याने चालूच रहाते. पाकिस्तानी लष्कराचे पैसेखाऊ वरिष्ठ अधिकारी आता खाऊन-खाऊन मुजोर व सुखवस्तू झालेले आहेत. त्यांचे जवान लढतील तेवढे लढतील मग पुन्हा तह! (फक्त भारताबरोबरच्या युद्धात खुन्नस म्हणून मन लावून लढतील!) या व अशा घटनांमुळे मला फार राग येतो, आपल्या सरकारचे प्रथमदर्शनी "ठेवले अनंते" धोरण पाहून आणखीच राग येतो, पण त्या रागाला तसा कांहींच अर्थ नाहीं. मग मी मला जे करता येण्यासारखे आहे ते करतो, म्हणजे मला जे समजले आहे असे वाटते ते चार जणात वाटतो. कोण जाणे आपल्या "मिपा" सभासदांतला कोणी सभासद भारताचे धोरण आखू शकणार्‍या व निर्णय घेऊ शकणार्‍या संघटनेच्या उच्च पदापर्यंत पोचेल व त्याला हे सर्व आठवेल. मला ओबामांनाही लिहावेसे वाटते, पण माझे पत्र त्यांच्या टेबलापर्यंत तरी पोचेल कां? नाहीं! असो. सध्या मी 'हतबलाचा राग' काय असतो याचा अनुभव घेतोय! सुधीर ------------------------ http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत

एकादी घटना अधिकृतपणे नाकारली गेली कीं तिच्यावर विश्वास ठेवावा!

सुधीर काळे
Mon, 11/09/2009 - 08:56 नवीन
अशी एक म्हण आहे की राजकारणात एकादी घटना अधिकृतपणे नाकारली गेली कीं तिच्यावर जरूर विश्वास ठेवावा. पाकिस्तानचे अण्वस्त्रसाठे किती सुरक्षित आहेत याबद्दल पाकिस्तानच्या आजच्या "डेली टाइम्स"मधे आलेल्या बातम्या इथे वाचा! http://tinyurl.com/ylgas9v http://tinyurl.com/ylmvmtm http://tinyurl.com/yzkggev http://tinyurl.com/yzcwfw6 http://tinyurl.com/yj59nde तसेच डॉनमधेही ती बातमी आली आहे व त्यांचं coverage जास्त चांगलं आहे! http://tinyurl.com/yzluu4c सुधीर ------------------------ http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­
  • Log in or register to post comments

लेख वर आणतोय

होबासराव
Wed, 01/13/2016 - 13:19 नवीन
.
  • Log in or register to post comments

1

सन्दीप
Wed, 01/13/2016 - 14:52 नवीन
1
  • Log in or register to post comments

वाखुसाआ.

एस
Wed, 01/13/2016 - 14:59 नवीन
वाखुसाआ.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

भंकस बाबा
Wed, 01/13/2016 - 16:06 नवीन
वाचनीय
  • Log in or register to post comments

एक विनंती

भंकस बाबा
Wed, 01/13/2016 - 16:12 नवीन
मी नुकताच मिपावर आलेला एक वाचनवेडा आहे. कृपया अशे अप्रतिम लेख जे सामान्य ज्ञानात भर टाकतात, वर आणण्याची कृपा करावी. माझ्यासारख्या असंख्य वाचकाचा दुवा मिळेल. (दुवा उर्दू घ्यावा)
  • Log in or register to post comments

अमेरिका

तिमा
Wed, 01/13/2016 - 16:31 नवीन
अमेरिकेला असे भस्मासूर तयार करण्याची संवयच आहे. खरंच, जुने चांगले लेख वर येऊ द्या.
  • Log in or register to post comments

वाचनाची पोच, सविस्तर

माहितगार
Wed, 01/13/2016 - 19:33 नवीन
वाचनाची पोच, सविस्तर प्रतिसादास केव्हा वेळ होईल माहित नाही. विवीध शक्यतांचा आढावा जरुरी असतोच,अर्थात कॉन्स्पीरसी थेअरीज अधिकृत थेअरीची जागाही घेऊ शकत नाहीत म्हणून कोणत्याही कॉन्स्पीरसी शक्यता अभ्यासतानाही शक्य तेवढा संदर्भांचा उपयोग करावा असे वाटते.
  • Log in or register to post comments

मसुद अझर

राही
Wed, 01/13/2016 - 19:51 नवीन
मौलन मसूद अझरला पाकिस्तानने पकडलंय ही एक अत्यानंदाची आणि क्षणभर अविश्वसनीय अशी बातमी आहे.
  • Log in or register to post comments

नवाज़ शरीफची उचलबांगड़ी झाली नाही म्हणजे मिळवली.

भंकस बाबा
गुरुवार, 01/14/2016 - 00:34 नवीन
अमेरिकन गुप्तहेर खात्याने दिलेल्या माहितीनुसार अतिरेक्यांना ट्रेनिंग पाकिस्तानी लश्करी तळावर मिळाली होती. म्हणजे लश्कराचा खुला पाठिंबा. शरीफ साहेब धोतर सांभाळा आता, नाहीतर वस्त्रहरण होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

https://www.pogo.org/richard

हस्तर
Tue, 11/02/2021 - 01:52 नवीन
https://www.pogo.org/richard-barlow-resource-page/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा