Skip to main content

पत्रं

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 12/01/2016 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
( काही वर्षांपूर्वी लिहिलेली आहे ... आत्ता आठवली ) पत्रं लिहिण्यास कारण कि ... आजची सकाळ खूप छान होती कसलीच मला घाई नव्हती घड्याळाचा बंद करून गजर ठरवले लवकर उठायचेच नाही | रोजची धावपळ , गोंधळ गडबड ऑफिसची वेळ गाठायची धडपड त्यातच सतत वाजणारा फोन माझ्यासाठी अजिबात नसते सवड | संध्याकाळची ही न्यारी तऱ्हा सगळेच प्लान्स - तीन - तेरा अर्जंट मिटींग , कॉन्फरन्स, कॉल्स संपता संपता रात्रीचे बारा | आज मात्रं तसे काहीच नाही कारण तुझी ती अमेरिकावारी .. स्वैपाकाला सुट्टी, शाळेला बुट्टी आनंदी आनंद - घरी अन दारी | पण माहीत नाही असं का ? वाटतय काही चुकतंय का ? मोकळी सकाळ नकोशी भासते तुझं नसणं असं खुपतंय का ? मग म्हणलं , करूया थोडी कामं - वेळ तरी जाईल पॉटलक - भिशी ? आज तरी नकोच बाई मुलाचा आभ्यास राहील मग शॉपिंग ची नको इतक्यात घाई | असं का होतय समजत नाही वाटलं तुलाच विचारावं काही संसारी होऊन मी विसरले का ? काय आवडतं मला अन काय नाही ? तर पत्रं लिहिण्यास कारण की ... विचारायचे आहे तुला काही कळते आहे का तुला कारण सारं का आणि कशासाठी ? हसून म्हणशील - हे सारं घरासाठीच मी करतोय ना ? सुखासाठी तुमच्याच तर घड्या ळा मागे मी धावतोय ना ? पटतंय मला सारं सारं तरीही काही चुकतंय का ? सारं काही मिळतंय पण .. तू तर कधीच नसतोयस ना ? समजले आहे बहुदा काही नसण्याची तुझ्या मला सवय नाही असतील काही फायदे आणि तोटे तुझ्याशिवाय जगणे , मला जमत नाही |
लेखनविषय:

वाचने 3511
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

साधे सरळ शब्द असलेली पण खोलवर भाव असणारी कविता भावली.

छान

पटतंय मला सारं सारं तरीही काही चुकतंय का ? सारं काही मिळतंय पण .. तू तर कधीच नसतोयस ना ? समजले आहे बहुदा काही नसण्याची तुझ्या मला सवय नाही असतील काही फायदे आणि तोटे तुझ्याशिवाय जगणे , मला जमत नाही |
हम्म ...काहीसं असंच वाटतं खरं.

मस्त पत्र, अशी पत्र एकमेकांना देत राहिलं की संसार सुखाचा होतो.

छान लिहिलंय पत्र..

कविता आवडली गो माय!! :-) राघव

@ तुझ्याशिवाय जगणे , मला जमत नाही, इथेच सारं सार दडलय👌