'मी' च !
लेखनविषय:
काव्यरस
कविवर्य विंदा करंदीकर यांची क्षमा मागून त्यांच्या ' मी ' या कवितेचे विडंबन ..
मी'च !
कधी येत अस्वस्थता अंतरीची
कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो बार गाठावयाला
कधी मद्य प्याला स्वहस्तेच चापी
कधी याचितो रम कधी स्वप्नी व्हिस्की
कधी धावतो जीन टाकून थोडी
कधी प्राशितो जॅक डॅनियल भारी
कधी गावठी हातभट्टीच मागे
कधी दिनवाणा 'निरा'मय होई
कधी क्षुब्ध, आतुर , आत्मविलासी
कधी गर्जतो वोडकेच्या बळाने;
कधी कापतो बोलता पालकांशी !
कधी चाखणा रिक्त थाळ्यांत शोधी;
कधी पाहतो शुभ्र लवणात सारे;
कधी मोजीतो टेबलाला स्वहस्ते
अनुकूल होती मित्र-दोस्त सारे
सरेना अंधकार डोळ्यासमोरी
मिळेना अंत्यपुच्छ धुम्रपट्टीकेचे;
कधी घेतसे सोंग ते सावधाचे
कधी स्थीर ध्यानही सोंग वाटे !
कधी संयमी, मद्यपी, मी जुगारी
कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी... तसा मी... कसा मी कळेना;
परमिटरूमचा सदा पाहुणा मी !
विशल्या विडंबनकर
वाचने
1618
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
मुळ कविता
मदमस्त विडंबन रे!!!
In reply to मदमस्त विडंबन रे!!! by कैलासवासी सोन्याबापु
प्लस वन!