सिंहलव्दीपाची सहल : १८ : कोलंबो (समाप्त)
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================हा दोन-अडीच तासांचा रस्ताही निसर्गाचे रूप पाहत पाहत सहज संपला. मोठ्या शहराच्या खाणाखुणा दिसू लागल्या आणि कोलंबोत पोहोचल्याची जाणीव झाली.
कोलंबो
मुख्य शहरात ७.५ लाख व उपनगरे धरून ५६ लाख वस्ती असलेले कोलंबो हे श्रीलंकेतले सर्वात मोठे शहर आहे. हे शहर आधुनिक श्रीलंकेची सद्य राजधानी आहे असा समज असला तरी ते सर्व शहर फक्त १९८२ पर्यंतच राजधानी होते. १९८२ नंतर श्रीलंकेची खरी संवैधानिक राजधानी (लेजिस्लेटिव्ह कॅपिटल) "श्री जयवर्दनेपुरा कोट्टे" (किंवा स्थानिक लोकांत संक्षिप्तपणे, कोट्टे) या कोलंबोच्या एका उपनगरापुरतीच मर्यादित आहे. या शहराच्या नावाचा उच्चार स्थानिक लोक कलांबो असा करतात, पण तुम्ही कोलंबो म्हणालात तर त्यांचा आक्षेप नसतो. या शहराचे कोलंबो हे नाव सर्वप्रथम पोर्तुगीजांनी १५०५ मध्ये ठेवले. हे नाव का ठेवले गेले याबद्दल अनेक वदंता आहेत. सिंहलीमध्ये कोलन थोटा म्हणजे केलानी नदीवरचे बंदर; सिंहलीमध्येच कोला अंबा थोटा म्हणजे आंब्याची झाडी असलेले बंदर; जुन्या सिंहलामध्ये कोलांबा म्हणजे बंदर; असे अनेक पर्याय आहेत, तुम्हाला हवा तो उचला. पण, पोर्तुगीजांनी कोलंबोसाठी बनवलेल्या राजचिन्हातील (कोट ऑफ आर्म्स) आंब्याच्या झाडामुळे कोलंबो या नावाचा आंब्याशी संबंध असावा असेच वाटते...
कोलंबो ०१ : आंब्याच्या झाडाचे चित्र असलेले पोर्तुगीज कोलंबोचे राजचिन्ह (कोट ऑफ आर्म्स) (जालावरून साभार)
कोलंबो ०२
कोलंबो ०३
कोलंबो ०४
कोलंबो ०५
कोलंबो ०६ : कोलंबो काऊंन्सिल बिल्डिंग
कोलंबो ०७ : नेलुम पोकुना (कमलकुंड) रंगमंदिर
गालं फेस ग्रीन
गालं फेस ग्रीनला धावती भेट दिली. या परिसराची सुरुवात डचांनी पोर्तुगीज आक्रमणापासून बचाव करण्यासाठी किनारासंरक्षक तोफा ठेवण्यास केली. नंतर १८५९ साली ब्रिटिशांनी त्याचा विकास केला. सुरुवातीला हा हिरवळीने भरलेला जमिनीचा पट्टा बराच मोठा होता व तेथे गोल्फ, क्रिकेट, पोलो, फुटबॉल, टेनिस, रग्बी असे अनेक खेळ खेळले जात होते. त्यामधल्या जमिनीचा वेळोवेळी इतर कारणांसाठी उपयोग झाल्याने आता तो पट्टा बराच अरुंद झाला आहे. कोलंबोच्या अर्थ व व्यापार उपनगराला (financial and business district) लागून असलेल्या समुद्रकिनार्याजवळ असलेला ५ हेक्टर क्षेत्रफळाचा व अर्धा किमी लांबीचा हिरवळीचा पट्टा असे त्याचे आजचे स्वरूप आहे. त्याचा उपयोग कोलंबोकर चौपाटीसारखा फिरायला जाण्यासाठी व संध्याकाळची हवा खाण्यासाठी करतात. आम्ही गेलो तेव्हा तेथे बरेच कोलंबोकर पतंग उडवताना दिसले.
गालं फेस ग्रीन ०१
गालं फेस ग्रीन ०२ (जालावरून साभार)
पिल्लायार कोविल
कोलंबोतील तीन मोठ्या हिंदू मंदिरांपैकी (श्रीकैलाशनादार कोविल, पिल्लायार कोविल आणि पोन्नमबालावनेश्वरम कोविल) एक पिल्लायार कोविल किंवा सहल कंपनीच्या माहितीपत्रकाप्रमाणे केवळ "हिंदू टेंपल" याचा आमच्या सफरीत समावेश होता. तमिळमध्ये गणेशाला पिल्लायार म्हणतात, म्हणजे हे गणेशमंदिर आहे. मात्र या मंदिरात अनेक देवदेवतांच्या आणि असुर वाटणार्याही अनेक मूर्ती आहेत. मंदिराचे स्थापत्य, मूर्ती व रंगसंगती दक्षिण भारतीय शैलीतली आहे. या मंदिराचे काही फोटो...
पिल्लायार कोविल ०१ : दर्शनी भाग
पिल्लायार कोविल ०२
पिल्लायार कोविल ०३
पिल्लायार कोविल ०४
पिल्लायार कोविल ०५
पिल्लायार कोविल ०६
स्वातंत्र्य स्मारक (Independence Memorial Hall, Independence Commemoration Hall)
आमचा पुढचा थांबा होता कोलंबोतले स्वातंत्र्य स्मारक. श्रीलंकेला ज्या जागेवर विशेष सभा घेऊन ब्रिटिशांनी स्वातंत्र्य प्रदान केले त्याच जागेवर हे स्मारक उभे केलेले आहे. कँडी येथील ज्या राजसभागृहातील कराराने श्रीलंकेतील ब्रिटिश वसाहतवादाला सुरुवात झाली होती त्याची कँडी स्थापत्यशैली डोळ्यासमोर ठेवून या स्मारकाची बांधणी केलेली आहे. सुंदर कोरीवकाम केलेले खांब असलेल्या या जागेवर श्रीलंकेच्या स्वातंत्र्यदिनाचा समारंभ साजरा केला जातो. स्वातंत्र्य स्मारकाचे काही फोटो...
स्वातंत्र्य स्मारक ०१
स्वातंत्र्य स्मारक ०२
स्वातंत्र्य स्मारक ०३
स्वातंत्र्य स्मारक ०४ : खांबांवरचे कोरीवकाम
गंगारामाया बौद्धमंदिर (Gangaramaya Temple)
हे प्राचीन व आधुनिक श्रीलंकन, भारतीय, थाई, व चिनी स्थापत्याचा संगम असलेले कोलंबोतले सर्वात जुने बौद्धमंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात विहार, सेतिया (पॅगोडा), सीमा मालका (सभागृह), अवशेषकक्ष, संग्रहालय, ग्रंथालय, वसतिगृह, शाळा, भिक्षाकक्ष अश्या अनेक इमारती आणि एक बोधीवृक्ष आहे. या एकमेकाला लागून असलेल्या इमारतींच्या संकुलातून फिरताना आपण कोठून कोठे जात आहोत याबाबत बर्याचदा गोंधळ उडतो. पण इथे बघण्यासारख्या इतक्या गोष्टी खच्चून भरलेल्या आहेत की वस्तू बघताना त्या कोणत्या जागी आहेत हे समजले नाही तरी फारसा फरक पडत नाही. या परिसरातून फिरताना काढलेले हे फोटो... मंदिराच्या सुरुवातीलाच एक गणेशमूर्ती होती. पहिल्याच वेळेस हिंदू देवतेची मूर्ती बौद्धमंदिरात पाहून जरासे आश्चर्य वाटले.
गंगारामाया बौद्धमंदिर ०१ : गणेशमूर्ती
गंगारामाया बौद्धमंदिर ०२ : मुख्य बुद्धमूर्ती
गंगारामाया बौद्धमंदिर ०३ : मुख्य मूर्तीमागील आरास
गंगारामाया बौद्धमंदिर ०४ : मंदिराचे वादक
गंगारामाया बौद्धमंदिर ०५
गंगारामाया बौद्धमंदिर ०६ : भेट मिळालेली चिनी मातीची पात्रे
गंगारामाया बौद्धमंदिर ०७ : चीनमधून भेट मिळालेल्या मूर्ती ०१
गंगारामाया बौद्धमंदिर ०८ : चीनमधून भेट मिळालेली एक खास मूर्ती ०२
गंगारामाया बौद्धमंदिर ०९ : पूर्वी मंदिराने वापरलेले छपाईयंत्र
...
गंगारामाया बौद्धमंदिर १० व ११ : मंदिरात वाहिलेले परदेशी चलन
...
गंगारामाया बौद्धमंदिर १२ व १३ : जुने ग्रंथ आणि भूर्जपत्रे
गंगारामाया बौद्धमंदिर १४ : मंदिर परिसरात पूजाअर्चा करणारे भाविक
गंगारामाया बौद्धमंदिर १५ : मूर्ती, भित्तिचित्रे व भिंतीवरची नक्षी
मस्त झाली सहल
अप्रतिम!
संपली सहल:(
सुन्दर प्रवास वर्णन !
हा भागही खूप आवडला.
मस्त सफर
सगळी मालिकाच खूप सुंदर होती.
श्रीलंका भेट छान झाली. या
In reply to श्रीलंका भेट छान झाली. या by रेवती
धन्यवाद !
या सुंदर सहलीबद्दल धन्यवाद.
उत्तम सफर घडवलीत! धन्यवाद.
धन्यवाद!!!
उत्तम
सर्वच लेख .........
धन्यवाद !
खुप सुंदर
In reply to खुप सुंदर by रवीराज
उत्तम ! तुमच्या सफरीसाठी अनेक