Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पालीचा खंडोबा १ on Wed, 01/06/2016 - 13:16
रोज शरीराची मशाल पेटवावीच लागते, इच्छा असो वा नसो तसे फारसे पर्यायही उपलब्ध नसतात मग उगाचच वाटत राहतं आपण नाझींच्या छळछांवणीतले ज्यू आहोत म्हणून ...... यातनागृहे सर्वत्रच आहेत तक्रार करण्यात हशील ते काय ? जे भोगायचे ते निमुटपणे फक्त आरश्याला सांगायचे तेही डोळे मिटून कारण उघड्या डोळ्यांनी आरसा बघवत नाही अन त्यात दडले नापाक असे हे शरीर.... कत्तली, बॉम्बस्फोट रोजच होत असतात पण दूरवर, तसा संबंध येत नाही पण उगाचच वाटत राहतं इथेही व्हावा माझ्या जवळ त्यात मी असताना तसे होत नाही मग षंढपणा वाढतच जातो पेटती काडी अंतापर्यंत हाती धरूच शकत नाही मग फोलपणाही जाणवतो आपल्याला ते जमणार नाही .... क्रूर एकांतवास हा पाचवीला पुजलेला तो तरी कसा ! आजूबाजूला सारेच आहेत पण साले मुके कि मी बहिरा ह्याचा शोध घेण्यातच सारा वेळ जातो उबग यावा असा दिवस अन शहारे आणणारी रात्र काट्यांवर झोपल्यासारखे वाटते निलाजरी झोप डोळ्यापर्यंत येते पण आत शिरत नाही मग घुटमाळणा-या झोपेकडे फक्त अनिमिष नेत्राने बघायचे, जमलेच तर थोडी नशा अन चवीला वासना आणायची घृणास्पद आहे सारे पण चालवून घ्यायचे... आता मी हिशोब मांडत नाही पण पापे नाचत असतात अवतीभोवती त्यांचे तळतळाट, कोवळ्या कळ्या फुंकर घालून उमलवल्या त्याचे भीतीदायक आक्रोश, कानाचे पडदे फाडतात, काळीज फाटत नाही निगरगट्ट आहे ना ! मग प्रश्न पडतो तेव्हा मी नाझी होतो? आता मी ज्यू आहे का? आळीपाळीने मी दोन्हीही भूमिका उत्तम वठवल्या आहेत बहुतेक नाझी असण्याची सर्वोत्तम भूमिका होती त्यासाठी तरी कोणी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक द्यायलाच हवे ! अश्या बेशरम विचारांनी रात्र संथ होते दिवस ढालगज बाईसारखा उभा राहतो आणि मी मानेवर पुन्हा जू घेतो ज्यू असण्याचे ...... विजयकुमार......... ०७/१०/२०१०,मुंबई
Profile picture for user नितीनचंद्र

Submitted by नितीनचंद्र on Wed, 01/06/2016 - 15:03

Permalink

क्या बात है !

शब्द नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 01/06/2016 - 16:12

Permalink

तुमची शब्दांवर जबरदस्त हुकूमत

तुमची शब्दांवर जबरदस्त हुकूमत आहे, हे नेहमी जाणवतेच. या रचने साठी __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Wed, 01/06/2016 - 17:48

Permalink

काय अफाट सुंदर कविता आहे!

काय अफाट सुंदर कविता आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 01/06/2016 - 18:14

Permalink

जबरदस्त खंडोबा!

एकदम चाबुक ओढलेला आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Wed, 01/06/2016 - 20:50

Permalink

अफाट! बेफाम! _/\_

अफाट! बेफाम! _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 01/06/2016 - 21:04

Permalink

!

!!
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 01/06/2016 - 21:05

Permalink

जबरदस्त!

जबरदस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by gsjendra on गुरुवार, 01/14/2016 - 18:36

Permalink

जू

वैताग वैताग वैताग
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 01/14/2016 - 19:40

Permalink

__/\__

__/\__
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2372 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com