Skip to main content

म्यानमार मधील कारवाई - काय सत्य काय खोटे?

लेखक सखारामगटणे यांनी शनिवार, 13/06/2015 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडे म्यानमार मध्ये झालेल्या कारवाईनंतर वेगवेगळे मतप्रवाह काही समर्थनार्थ काही विरोधात सुरू झालेत.त्यातच खालील लेख वाचनात आला: #56InchRocks becomes 50 Shades of Red: Modi's Obama moment in Myanmar unravels ह्या लेखामध्ये त्यानी खालील मुद्द्यांवर म्यानमार कारवाईची चिरफाड केली आहे
  1. आर्मी प्रोब्लेम: मोदी सरकार सैन्याच्या यशाला encash करत आहे
  2. Diplomacy प्रोब्लेम: म्यानमार ला आता सध्या मोदींच्या सार्क मधे चालू असलेल्या दौर्यांमध्ये पुरेसे फुटेज मिळाले नसल्याने किंवा अजून काही कारणांमुळे म्यानमार कारवाईबद्दल भारत आणि म्यानमार ह्यांनी परस्पर विरोधी स्पष्टीकरणं दिली आहेत
  3. फोटो प्रोब्लेम: म्यानमार कारवाईनंतरच्या जल्लोषाचा helicopter समोर बसलेल्या जवानांचा जो फोटो सोशल मिडीयावर फिरत आहे तो जुना आहे, त्याचा ह्या कारवाईशी काही संबंध नाहीये.
  4. मृतदेहांची संख्या: ही कारवाईच्या दिवसापासून रोज बदलत आहे..१०० पासून आता ७-१० दरम्यान कुठेतरी आहे..
माझा ह्या विषयातला काही अभ्यास नाही पण ह्या कारवाईबद्दल वर्तमानपत्रात वाचल्यानंतर एक अभिमान वाटला होता सध्याच्या सरकारच्या कडक भुमिकांबद्दल पण वरील विविध मुद्द्यामुळे हे सरकार फक्त raising the eyeballs पुरतेच मर्यादीत आहे का ही शंका येते.. मिपावर ह्या विषयाचा अभ्यास असणारे काही ह्या शंकांचे निरसन करतील ह्या हेतूने हा धागा टाकत आहे..

वाचने 17886
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

@स्पंदना तुम्हि जी प्रतिक्रिया हितेशला दिली आहे त्यावर काहि बोलु ईच्छीतो आपली प्रतिक्रिया होती "" या सरकारान्नी शिरच्छेद करुन पाथवलेल्या सैनिकांबद्दल काय भुमिका घेतली होती हे जरा आठवा बघू हितेस? साधे श्बदसुद्धा कडक नव्हते विरोधाचे "" येथे म्यानमार मधील कारवाई वर चर्चा सुरु आहे इतर संबधित मुद्दे पण चर्चिले गेले. शिरच्छेद करुन पाथवलेल्या सैनिकांबद्दल तत्कालीन सरकारने काय भुमिका घेतली हे तुम्ही सांगितले , तत्कालीन विरोधी पक्षाने / पक्षाच्या नेत्यांनी सरकारकडे काय मागणी केली ? हे शोधा. व येथे सांगा. आपण अथवा कोणीहि म. टा. दिनाक २६ जुलै २०१४ (link : http://maharashtratimes.indiatimes.com/archivelist.cms?year=2014&month=…) उघडुन " संजय राऊत " यांच्याविषयी एक बातमी आहे ती वाचा. (संबधित बातमीविषयी धागा करण्याची बिलकुल इच्छा नाही. ) आपण कितीही वादविवाद केले तर कोणतेही सत्ताधीश मनासारखे व तत्कालीन परिस्थितीनुसार वागतात. म. टा. बातमी हास्यास्पद होती वगैरे बोलले तरी नाकारु शकत नाहि.

चर्चा येथुन सुरु व्हावी का / नवीन धागा निघावा ???

In reply to by लिओ

या दोन्ही घटना पूर्णपणे वेगळ्या असल्याने पठाणकोट एअरबेसवरील अतिरेकी हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी नवा धागा योग्य राहील. धाग्यातला मजकूर त्रोटक नसावा ही अपेक्षा.