२०१६ सुरु होते न होते तोच सौदी अरेबियाने ४७ लोकांचा एकाच दिवशी शिरच्छेद करुन त्यांना मृत्यूदंड दिल्याचे जाहीर केले. इतकी पराकोटीची रानटी शिक्षा जाहीरपणे चौकात देणारा आणि तरीही सुसंस्कृततेचा टेंभा मिरवणारा सौदी हा एकमेव देश असेल! कमालीची श्रीमंती असल्यामुळे त्यांची ही दादागिरी सगळे चुपचाप सहन करतात. तशात इस्लामचे हेडक्वार्टर असल्याचाही तोरा ते मिरवतात कारण मक्का आणि मदीना ही दोन इस्लामी तीर्थक्षेत्रे त्यांच्या ताब्यात आहेत. त्यातूनही ते भक्कम पैसे मिळवतात.
ह्या ४७ लोकांमधे एक शिया धर्मगुरू आहे ज्याला शिया लोकांमधे बराच आदर होता त्यामुळे त्या पंथाचे लोक आता आंदोलन करत आहेत. अर्थात ते चिरडून टाकले जाईलच. पण इराणसारखा शिया देश, तिथल्या लोकांनी सौदी अरेबियाच्या वकिलातीवर/दूतावासावर हल्ला केल्याच्या बातम्या आल्या आहेत.
सौदीच्या तुरुंगात अनेक राजकीय कैदी अनेक दिवस डांबलेले आहेत. राजकीय सोयीनुसार त्यातले अशा प्रकारे ठार केले जातात.
कदाचित ह्यामुळे शिया आणि सुन्नीमधील संघर्ष वाढेल. आयसिस शिया लोकांना धर्मभ्रष्ट मानते. सौदीही त्याच माळेतला मणी आहे. अशा प्रकारे वरिष्ठ शिया धार्मिक नेत्यांना संपवून अजून एक आग भडकवत आहे.
२०१६ च्या हिंसेची ही नांदी म्हणायची की काय?
वर्गीकरण
वाचने
8245
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिया-सुन्नी वादात सामंजस्याने
जाती आणि जमाती मधले भेदभाव ज्या दिवशी संपतील....
जाहीर शिरच्छेद?
सौदी हा देश नसून......
In reply to जाहीर शिरच्छेद? by हुप्प्या
जाहीर शिरच्छेद???
http://www.thenews.com.pk
सौदी अरेबिया युनायटेड
अमेरिकेला युद्ध फैलावायला हवंय
सौदी देशाच्या सहाय्याने
विवेकपटाईत
मानवाधिकार समिती म्हणजे खरेच
.
अन्य विषयाला प्रतिबंध नाही
In reply to . by मोगा
फोडा व शांत रहा.
कमी शक्यता,
In reply to फोडा व शांत रहा. by लिओ
गंमत आहे,
पाकिस्तान व सौदी संबंध
In reply to गंमत आहे, by भंकस बाबा
येमेनमधील बंडाळी
मला वाटते
आजच आलेल्या बातमीनुसार
In reply to मला वाटते by राही
अमेरिका दोन्ही बाजूंना सुसज्ज करतेय.
In reply to मला वाटते by राही
...
अमेरिका म्हणजे कृष्ण हाय बघा!!
मग आपण कोण?
In reply to अमेरिका म्हणजे कृष्ण हाय बघा!! by याॅर्कर
आपण ??
In reply to मग आपण कोण? by भंकस बाबा
खरे वाटणार नाही पण..