Skip to main content

विरहाची कास

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी गुरुवार, 31/12/2015 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
देह फुलवात सांजेची ज्योत त्यागते कात नागिणीची माया ! अत्तराचे बंध वाहती सुगंध कपाळी गंध ओल्या चंदनाचा ! वाहता पान्हा कोरडा कान्हा जाहला गुन्हा देह बळजोरीचा ! अंतरात काटा फुटती लाटा जोगीयाच्या बटा कश्या विखुरल्या ! राऊळी नगारा राखेचा ढिगारा मोराचा पिसारा रानात गळाला ! सांगा साजणीस मनातले क्लेष उरात विष साठून ठेवले ! कुवार गर्भास पिशवीची आस विरहाची कास धरू नये ! सजली शेज वेगळाच बाज समुद्राची गाज ऐकू नये ! विजयकुमार......... 07 . 01 . 2010 , मुंबई
लेखनविषय:

वाचने 969
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया