Skip to main content

संपादक मंडळ

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 29/12/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून मिसळपाववरील संपादक मंडळ विश्रांती अवस्थेत होते. मिपावरील वातावरण योग्य रहावे. मिपावरील चर्चा उत्तम व्हाव्यात आणि एकूणच मिपावरचा सर्व सदस्यांचा वावर सुलभ व्हावा यासाठी संपादक काम करीत असतात. यामुळे संपादक मंडळ हे मिपाच्या रचनेतील अतिशय महत्वाची पातळी आहे. आता पर्यंत अनेक मिपाकरांनी संपादक म्हणून उत्तम काम पाहिले आहे. मिसळपाव.कॉम त्यासाठी आभारी आहे. आज पासून पुढील सहा महिन्यांकरीता तीन सदस्यांना मिपा संपादक म्हणून अधिकार देत आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. १) डॉ. सुहास म्हात्रे २) गवि ३) गणपा यांच्या शिवाय प्रशांत यांचे कडे संपादकीय, तांत्रीक अधिकार आहेतच. तांत्रीक बाबतील नीलकांत किंवा प्रशांत यांचेशी संपर्क साधता येईल. धन्यवाद. - नीलकांत

वाचने 41507
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

नवीन संपादक मंडळाचे अभिनंदन. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा. वर या पदास काटेरी मुकूट असं म्हंटलंय. खरंतर ते काटेरी सिंहासन आहे. फरक उघड आहे ! ;-) -गा.पै.

गणपा गवि आणि डॉक्टर एक्का यांचे मन:पूर्वक अभिनंदन. आपलं मिपाला फुल सपोर्ट राहील. आपणही आम्हाला सदस्य म्हणून फुल सहकार्य कराल अशी अपेक्षा. :) -दिलीप बिरुटे

नव्या डाव्यासाठी संपादक त्रिमुर्तींना शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

>>>> डाव्यासाठी संपादक त्रिमुर्तींना डावे विचारांचे संपादक मलाही आवडतात. ;) (पळा, लागायची आमच्या प्रतिसादाला कात्री) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डावासाठी असे लिहायचे होते. इनिंग हा शब्द लिहिणार होतो पण इंग्रजीऐवजी मराठी प्रतिशव्द वापरायला गेलो अन घोळ झाला... :-( . क्षमा असावी.

In reply to by श्रीरंग_जोशी

चालायचच. जराशी गंमत. क्षमा कशाला. :( लिहा आता एखादा उजव्या विचाराचा लेख. -दिलीप बिरुटे

एक्का (इस्पिकचा), दुर्री (गवि), तिर्री (गणपा) यांना शुभेच्छा आणि त्यांचा कार्यकाल उत्तम जावो अशा सदिच्छा! :) -(गुलाम)रंगा

मला वाटतं "संपादन" बटण सर्व लेख/प्रतिसादांस सुरू केल्यास सुज्ञ मिसळपाव सभासदांस संपादकांची गरज भासणार नाही.लेखन चुका/आगाऊपणा झाल्यास ते स्वत:च दुरुस्त करतील.मागचे लेख उघडूनही त्यातील व्याकरण/टाइपो सुधारून टाकता येतील. एक तात्त्विक गरज म्हणून संपादक मंडळ असावे.

In reply to by कंजूस

+१/२, कारण लेखन हे साचा तयार करुन विषयाचा अभ्यास करुन केले गेले असते, त्यात ह्यूमन एरर चा चांस बराच असतो अन लेखकाला/लेखिकेला बरेचवेळी "अरेच्चा अजुन हा मुद्दा घातला असता तर जास्त उठावदार लेखन झाले असते" असे वाटू शकते, तस्मात् लेखांस स्वसंपादन सुविधा दिल्यास बरे पडेल, पण, प्रतिक्रिया ह्या उस्फुर्त असतात (बॅटु,वल्लीजी,डॉक्टर, बोकोबा, डांगेसाहेब असे काही सन्माननीय अपवाद सोडता) बरेचवेळी नेमकी मंडळी काड़ी टाकायला म्हणुन दोनोळी प्रतिक्रिया टंकतात (अन ती सक्सेस सुद्धा होते) म्हणुन "जो उस्फुर्तपणे जे बोलला त्याची जबाबदारी तीच" ह्या तत्वानुसार प्रतिक्रिया विभागाला संपादन हक्क देणे म्हणजे सावळा गोंधळ होईल असे भासते, शिवाय अतिशय आक्षेपार्ह किंवा वैयक्तिक असले काही प्रतिक्रियेस्वरुप आल्यास संपादक मंडळ त्याची नीट काळजी घेतात हे सर्वश्रुत आहेच. तीच सिस्टम बरी वाटते माफ़ करा अधिकार नसताना आगाऊ सल्ले देतोय (मिपा भक्त) बाप्या

#ह्या तत्वानुसार प्रतिक्रिया विभागाला संपादन हक्क देणे म्हणजे सावळा गोंधळ होईल असे भासते, शिवाय अतिशय------" केवळ स्वप्रकाशन करू शकतो म्हणून काहीही लिहायचं नाही हे 'लेखक' होऊ इच्छिणाय्रांनी संयम पाळायवाच हवा.दोन अथवा दोनशे ओळींचे लेखन असो.लेखन चौर्य /राजकीय चिखलफेक हे करायचं नाही हे कोणास समजले नाही तरच लक्ष घालावे लागेल.उगाचच जागता पहारा कशाला?शिवाय कॅापीराइटचं उल्लंघन वगैरे जबाबदारी लिहिणाय्रांवरच आहे.एखादा लेख कोणी खोडला तर जाऊ दे काय मोठेसे नुकसान होणार या क्षणभंगूर डिजिटल विश्वात?दुसरा कोणी लिहिलंच. आता मी थांबतो.

बॅटमॅन ह्या आयडी वर प्रतिबंध का घालण्यात आले? एखाद्या सदस्यावर प्रतिबंध घातले की ते इतर सदस्यांना कारणा सहीत कळवणे हे संपादक मंडळाची जबाबदारी आहे असं नाही वाटत का?

In reply to by जिन्क्स

नमस्कार, मूळात मिपा चालवण्याची प्रेरणा अशी आहे की मराठी लोकांनी एकत्रीत यावं आणि मराठीत व्यक्त व्हावं. त्यासाठी लागणारं व्यासपीठ मिपा आहे. आता मिपा जसजसं मोठं होत गेलं तसतशी येथे काहीतरी व्यवस्थापन असावं असा विचार आला. मग ते कसं असावं? व्यवस्थापनात किती स्तर असावेत? ते कसे असावेत असे अनेक प्रश्न पडले व ते मिपाकरांनी आपल्यापरीने सोडवले आहेत. हे सर्वोत्तम आहे असा मिपाचा दावा कधीच नव्हता तर हे आमच्या परीने आम्ही उत्तम करतो आहोत ही भूमीका आहे. त्यामुळे मर्यादांचे भान आहे व सूचना व तक्रारांचे स्वागतही आहे. वर तुम्ही जे म्हणताय त्याबाबत नकारात्मक भूमीकेमागे एक संदर्भ आहे. काय आहे की हे पहिल्यांदा घडत नाहीये की कुणा एका सदस्याला नाईलाजाने बंदी घातली आहे. एखाद्या सदस्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा तो गैरफायदा घेत आहे किंवा त्याच्या एका विशिष्ट वागण्याने किंवा एखादी भूमिका लावून धरण्याने मिपावरील वातावरण बदलतंय हे लक्षात आल्यावर व्यवस्थापनाद्वारे बहुतांशवेळा त्या सदस्याशी संवाद साधल्या जातो त्यांना व्यवस्थापनाची भूमीका समजावून सांगीतल्या जाते. कित्येकवेळा प्रतिसाद सकारात्मक असतो तर काही वेळा असहकार्याचा सुध्दा असतो. अश्या वेळी शेवटचा उपाय म्हणजे त्या सदस्यावर बंदी घालणे. बंदी ही कारवाई असते मात्र ती अंतीम आहे असा सुध्दा व्यवस्थापनाचा आग्रह नाही. कारण लोकांनी एकत्र यावे ही मूळ प्रेरणा आहे ती विसरता येत नाही. आणि बंदी म्हणजे कुणाला तरी एकत्र येण्यापासून थांबवणेच आहे. पण कुणा एकाच्या चुकीच्या वागण्याने वातावरण बिघडत असेल तर असा निर्णय घ्यावा लागतो. मागे अशी घोषणा केल्यावर त्या सदस्यांने असा आक्षेप घेतला होता की अशी घोषणा करणे योग्य नाही. त्यामुळे उगाच विषय वाढतो. आधीच कारवाई हा वाढीव विषय आहे, त्याची पुढे घोषणा व त्याचे आक्षेप आणि निराकरण हे सगळे नकारात्मक आणि विसंवाद वाढवणारे आहे. कारवाई पुर्वी संवाद साधला जातो - याचा अर्थ आहे की मिपावरील वातावरण तुम्ही बिघडवताय. कारवाई केली जाते - याचा अर्थ असा आहे की तुम्ही सध्या जसे वागता तसे वागू नये अशी अपेक्षा आहे. तुमच्यावरील कारवाई परत घेतली आहे - याचा अर्थ असा आहे की तूमची केवळ एखादी भूमीका व्यवस्थापनाला चुकीची वाटते. तो आग्रह तूम्ही सोडून द्यावा अशी अपेक्षा आहे. बाकी तुमचे स्वागत आहे. धन्यवाद.

उत्तम !!!! नव्या संपादकांचे अभिनंदन :)

तीनही संपादकांचे अभिनंदन! आणि हा निर्णय घेतल्याबद्दल नीलकान्ताला विशेष शाबासकी!!!

In reply to by पिवळा डांबिस

बाकी त्या गणपाला कामाला जुंपला हे लई ब्येष्ट केलं. शिंचं गेली कितीक वर्षं कुठं दडून बसलं होतं देव जाणे!!!! :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बाकी, सध्या तुम्ही कुठे असता?
ईऽऽश्य! असं काय एकदम मोठ्याने विचारतात होय भर कट्ट्यावर? बिका, तुम्हाला किनई, अगदी हेच्च नाही बघा!!!! ;)

अशांसाठी काही स्पष्टीकरण न देता पंधरा दिवस/ तीन महिन्यांसाठी निलंबन वगैरे करता येईल का?ज्या तिघांबद्दल बोलत आहोत त्यांनी कमीतकमी इतर ठिकाणी जाऊन अपप्रचारतरी केलेला नाही मिपाचा.जसे या हट्टी माणसाने केलाय.- शेजारी पाजारी इथे 24 November, 2015 - 19:46 पोस्ट मध्ये आहेत मुक्ताफळं

In reply to by कंजूस

निलंबन हे केवळ अपवादात्मक परिस्थितीतच व्हावे अशी अपेक्षा असल्यामुळे अशी काही रचना कायम करावी असे वाटत नाही. प्रत्येक सदस्याचा स्वभाव वेगळा असतो. त्या त्या वेळची परिस्थिती वेगळी असते. सब घोडे १२ टक्के असे काही करावेसे वाटत नाही. सध्या तरी जमेतोवर असे करण्याचे टाळतोय, पुढे नाहीच जमले तर अशी रचना करता येईल. या तिघांच्याबाबत तुम्ही वरकेलेल्या उल्लेखाबाबत सहमत आहे. इतरांना शुभेच्छा :)

कसलेले, जाणते आणि समतोल संपादक निवडल्याबद्दल आणि काही कायम ठेवल्याबद्दल नीलकान्त यांचे अभिनंदन. तीनही संपादकांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. संपादक म्हणून पुढील अर्धे वर्ष (कारण ही नेमणूक सध्या सहा महिन्यांसाठी आहे असे जाहीर झाले आहे,) आणि वैयक्तिकरीत्या येते संपूर्ण वर्ष त्यांना सुखशान्तीपूर्ण आणि आनंदाचे जावो ही इच्छा

इथल्या प्रतिसादकांच्या शुभेछांसाठी अनेकानेक धन्यवाद ! सर्व सभासदांचे संपादनाच्या कामात (म्हणजे संपादनाची कमीत कमी गरज पडावी असे ;) ) पूर्ण सहकार्य असेल याची मिपाचा पूर्वानुभव पाहून खात्री आहेच. त्यासाठी आगाऊ धन्यवाद !

हे नववर्ष सर्व सभासद व वाचकांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि सुहृदांना प्रगतीचे, सुखाचे, आयुरारोग्याचे आणि समृद्धीचे जावे हीच शुभेछा !


नविन संपादकांचे अभिनंदन!

तिन्ही संपादकांचे अभिनंदन आणि त्याहूनही महत्वाचे.... शुभेच्छा! :) बाकी याच निमित्ताने समस्त मिपा परीवारास नववर्षाच्या शुभेच्छा!