हे मन का अधीर होते
स्पर्शाने मोहून जाते..
कधी पावलात अडखळते
कधी चांदण्यात उलघडते
प्रेमात हे असेच घडते
प्रेमात हे असेच घडते .....।।
हे स्वप्न असे की भास असे
तुझी आस लागे मनाला
स्वच्छंद नवा सहवास तुझा
मग वेड लावी जीवाला
असे मन हे माझे भुलते
अन् पाखरू होऊन उडते
स्वप्नात तुझ्या हे वेडे
दूर आभाळाला भिडते....
प्रेमात हे असेच घडते
प्रेमात हे असेच घडते .....।।
हा दिवस असो वा रात्र असो
मी मात्र तुझ्या भोवताली
स्वप्नात तुझ्या बैभान असा मी
जाण न उरते काही
असे रोजच का हे घडते
मन तडफडते धडपडते
अन् ओल्या याच क्षणाला
मन तुझ्याचसाठी झुरते. .
प्रेमात हे असेच घडते
प्रेमात हे असेच घडते .....।।
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1626
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिहित राहा अन प्रेम करत राहा. :)
अजून चांगलं प्रेम करा. आणि अनुभव जरा जबरा येऊ द्या.
धडधडणे, झुरणे, रडणे, पडणे, इ.इ. सर्व प्रेमात होतं.
पण, अनुभव कसा थेट भिडला पाहिजे. कविता भिडत नै.
आज फिर बैठे है एक हिचकी के इंतजार मे
पता तो चले वो कब हमे याद करते है
-दिलीप बिरुटे
(उचकीची वाट पाहणारा)
वाह ।।
वाह ।।
छान लिहिले आहे.... वेडं प्रेम
छान लिहिले आहे.... वेडं प्रेम....
चार दिन की चांदनी
चार दिन की चांदनी. बहुधा प्रेमकथांचा शेवट लग्नात होतो.