Skip to main content

खरीच गरज आहे का?

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 29/12/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदी समाधानी जीवन जगण्यासाठी.... पाच रूमचा वेल फर्निशर्ड फ्लॅट, महागडी कार, 40 इंची एलईडी टिव्ही, एेसी, मुलांना इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन. हे सगळे साध्य करण्यासाठी 8 ते 8 नौकरी. बायकोची नौकरी. एकत्र कुटुंब नसल्यामुळे मुलांना पाळणाघरात पाठविणे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची इच्छा नसणे. त्यामुळे नवरा बायकोत चिडचिड. मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे. काॅलेजात गेले की मुलांना आय फोन, स्कुटी किंवा बाईक. वयाच्या चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह हे आजार होणे. मग त्यावर डाॅक्टरी इलाज. प्रकाश आमटे व मदांकिनी आमटे हे डाॅक्टर दाम्पत्य हिमलकसा सारख्या जंगल भागात काही सुविधा नसतांना किती आनंदी जीवन जगतात. नाही तर आपण व आपली मुले सर्व सोयी सुविधा असूनही करमत नाही, बोअर होते म्हणून किरकिर करतो.

वाचने 26453
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

ह्या सर्व गोष्टींची खरच गरज नाही. पण म्हंटात ना स्वता: मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही. त्या साठीच कदाचित ही सर्व खटपट असावी. वर नमुद केलेल्या सर्व गोष्टींत सुख व समाधान असेलच हे बहुतेकांना वाटते. ते खरोखरच त्यात नाही हे कुणी सांगितले तर ते पटणार नाही. म्हणून स्वानुभूति साठी ही सर्वांची खटपट असावी.

हे एक सार्वत्रीकरण आहे कि माणसाकडे सुख सोयी असतील तर तो समाधानी नाही. खेड्यातील लोक जास्त आनंदात आहेत किंवा चाळी तच माणसामाणसात ओलावा असतो. हि जुना काळ चांगला होता सारखी म्हणण्याची एक पद्धत आहे. असे मुळीच नसते. गावात सर्व लोक समाधानी आहेत असे मुळीच नाही. किंवा सुखवस्तू लोकांना असे चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह सगळे आजार असतात हेही असत्य आहे. गावातील लोकांना तितकेच किंवा जास्त आजार असतात ( कुपोषण,पांडुरोग, तंबाखू जन्य आजार भयावह प्रमाणात आहेत). प्रकाश आमटे आणी कुटुंबीय हे "अपवाद"च आहेत. डॉ. अभय बंग यांचे माझा साक्षात्कारी हृदय विकार हे पुस्तक जरूर वाचा. माझ्या आसपासचे आणी माझे बरेचसे मित्र नक्कीच सुखी समाधानी आहेत. त्यांची मुले सुद्धा व्यवस्थित मार्गाला लागलेली आहेत. शेवटी आई वडिलांचे संस्कार महत्त्वाचे असतात मग ते खेड्यात असोत कि शहरात. मी स्वतः लष्करात राहून तंबूत किंवा समुद्रात किंवा अंदमान सारखी सुदूर असलेल्या ठिकाणी राहून आलेलो आहे. तेथील कष्ट हे कष्टच असतात. त्याचे उदात्तीकरण करून काही होत नाही. त्या कहाण्या "मिसळपाव" वर वाचायला छान असतात मुंबईत मिळणाऱ्या सुविधा कुठेही मिळत नाहीत हि मला आलेली अनुभूती आहे. आणी मनाची शांती तुम्ही काय आणी कुठे करता त्यावर अवलंबून असते. मनाची खोटी समजूत करणे सोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

खरं आहे ! आपल्याकडे गरीबीचे, खेड्याचे विनाकारण उदात्तीकरण केले जाते. याचा अर्थ असा नव्हे की शहरात वा श्रीमंतीतच सुख आहे. सुख ही संकल्पना व्यक्तीपरत्वे, स्थानपरत्वे , कालपरत्वे बदलू शकते . आपल्याकडे लोकांना वाईट सवय आहे , एखाद्याने गाडी घेतली की लगेच 'टेबलाखालून घ्यायला सुरूवात केली वाटते ! ' अशा चर्चा सुरू होतात . विशेषतः मध्यमवर्गीय समाजामध्ये आणी निमशहरी भागात. माझ्या मते भौतिक सुखाला वाईट म्हणन्याच्या उदात्तिकरणाचा हा परिणाम असेल ! असो. तुर्तास इतकेच.

In reply to by सुबोध खरे

असं कसं, असं कसं. गरीबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडवापेक्षा जास्त गोड असते, त्याचं काय मग ?! ;) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गरीबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडवापेक्षा जास्त गोड असत
मला गरीबी, गरीबीतच राहावे याचे समर्थन करायचे नाही. जास्तीचा हव्यास गरज आहे का. शेजार्याकडे कार, इंम्पोर्टेड सोफा, एसी, मोठा एलईडी टिव्ही, किचन ट्राॅली आहे मग माझ्याकडे पाहिजे. इंजिनिअर झाले की 50-60 ह. पगार असला की 1 लाख पगाराची पाहिजे, मग परदेशात जास्त पगाराची नौकरी. ही मनोवृत्ती चुकीची आहे.

मला येथे शहरातील लोक किंवा खेड्यातील लोक सुखी, गरीबीचे, खेड्याचे उदात्तिकरण करायचे नाही. काही जण वरील सर्व गोष्टीसाठी खुप आटापिटा करतात व यातच सुख मानतात. टुमदार घर, घरात आवश्यक साधने, एखादी बाईक. चार रूमचा फ्लॅट घरात आवश्यक गोष्टी असल्या तरी माणूस समाधानी राहू शकतो.

In reply to by हेमंत लाटकर

मग डॉ. प्रकाश आमटे यांचे उदाहरण का देताय? प्रकाश आमटे व मदांकिनी आमटे हे डाॅक्टर दाम्पत्य हिमलकसा सारख्या जंगल भागात काही सुविधा नसतांना किती आनंदी जीवन जगतात. नाही तर आपण व आपली मुले सर्व सोयी सुविधा असूनही करमत नाही, बोअर होते म्हणून किरकिर करतो. संपत्ती मिळवणे हा काही गुन्हा नाही. एखादा कलाकार त्याच्या कलेसाठी बारा तास मेहनत करत असेल तर त्यात तो आटापिटा/ मरमर करतो आहे असेच का म्हणायचे. त्याला जर सृजनाचा आनंद मिळत असेल तर काय वाईट आहे आणि त्यातून त्याला चार पैसे मिळत असतील तर सोन्याहून पिवळे. रच्याकने-- मी कलाकार नाही किंवा १२ तास कामहि करत नाही. आणि माझ्या दवाखान्याला मी मोटार सायकलनेच जातो.

In reply to by सुबोध खरे

टुमदार घर, घरात आवश्यक साधने, एखादी बाईक. चार रूमचा फ्लॅट घरात आवश्यक गोष्टी असल्या तरी माणूस समाधानी राहू शकतो
. नाही हो. एवढे झाले की मग बाजीरावने ड्यान्सच कसा केला, प्र्यांकाने साडी अशीच कशी नेसली अशी किरकीर चालू होते. चालायचेच. समाधान कशात मानावे हे कुठे कळलेय अजून? ;)

In reply to by अभ्या..

अभ्या प्रत्येक धाग्यावर खोचक, टवाळ, संदर्भहीन प्रतिसाद देण्यापेक्षा पटेल असा प्रतिसाद टंकावा. अंवातर: प्रियांका दुसर्या पिक्चर मध्ये अशी नाचली असती तर चालले असते. पण काशीबाईच्या रोलसाठी असे नाचणे चुकीचे आहे.

In reply to by हेमंत लाटकर

सॉरी हेलाकाका. तुम्ही दिलेला सल्ला अगदी रास्त आहे. ह्यापुढे मी अगदी सरळ, प्रेमळ अन संदर्भाने परिपूर्ण अशेच प्रतिसाद टंकेन. जाता जाता तुम्हाला पण एक सल्ला: (आता मी एकले किनै तुमचे, मग तुम्ही पण ऐकायचे माझे) खरोखर अभ्यास करुन, नेहमीच्या चाकोरीबाहेर, जातीच्या परिघाबाहेर येऊन तुम्ही कधी काही केलय/लिहिलय का? तुमच्या वयाचा मान राखतोय. तसे नसेल तर फुकाचे सल्ले देणे बंद करा.

In reply to by होबासराव

काय हे(१) लाकाका काय हेलाका(२) का? का(३) यहे लाकाका काय हेला काका(४) =============== शब्द तळटीपा.. १:कसली ही अत्मवंचना २:काथ्याकूट फसलेला ३.नक्की उद्देश काय? ४.बाजीरांवावर चांगला धागा काढणार्यांकडून जरा अपेक्षा वाढल्या तेच तुम्ही मनोभंग केलात

In reply to by हेमंत लाटकर

मी स्वतः बारा वर्षापुर्वी शेतीच्या ध्यासाने शहरातील नोकरी सोडून गावात नोकरी पकडली होती. शेतीकामाशी निगडित असलेली ही नोकरी जवळजवळ २४ तास चालायची. कारण शेतीशी निगडित कामे घड्याळ पाहून होत नाही. तीन वर्षे काम केल्यानंतर आम्ही बैक टू पैवेलियन! त्या वेळी अनिल अवचटाचे 'कार्यरत' हे पुस्तक व् त्यातील 'अरुण देशपांडे' हे व्यक्तिमत्व फारच प्रभाव टाकून गेले होते. वाचायला फार सोपे पण कृतिला फारच अवघड!

टुमदार घर, घरात आवश्यक गोष्टी.
म्हणजे छोटेसे घर/फ्लॅट, साधे फर्निचर, एखादा 21" टिव्ही, बजाज बाईक इ. गोष्टी.

हट्टीकट्टी दरिद्री अन लुळीपांगळी श्रीमंती .... या दरिद्री म्हणीने हिंदुस्तानचा घात केला आहे. तुमच्या घरा गाडीत सुख नसेल तर ते मला देउन तुम्ही एव्हरेस्टकडे जावे.

In reply to by मोगा

आपल्या सगळ्या कहाण्या पण अशाच - आटपाट नगरात एक गरीब ब्राम्हण राहात होता. रच्याकने एव्हरेस्टकडे जायला पण खर्च करावा लागतो. आजकाल हिमालयात जाणं अजिबात स्वस्त नाहीये.

In reply to by मोगा

तुम्हि सगळे दान करुन मक्केला जाणार होता !! काय झाले त्याचे? का परत धर्म बदलला? चिन्धिचोराचा फॅन होबासराव

In reply to by होबासराव

मक्केला जाताना सर्व दान देउन जात नाहीत. ती पद्धत तुमची ! पुर्वी काशीला jaataanà घरावर तुळशीपत्र ठेवुन जायचे.

In reply to by मोगा

मक्केला जाताना सर्व आप्तेष्टांना भेटून गळा मिठी मारून जायची पद्धत आहे कारण तेथून परत येऊ याची कोणतीही खात्री नसे( आजही नाही, चेंगरा चेंगरीत किती गचकतात दर वर्षी याचा हिशेब नाही). बाकी सर्व दान देण्याचे तर आपणच म्हणाला होतात.आता तोंड का फिरवताय?

In reply to by सुबोध खरे

अहो, मांढरदेवीलाही शेकड्यांनी मरतात. जिथेजिथे देवाच्या नावावर विनाकारण गर्दी करतात तिथे लोक मरतातच. काशीयात्रेचंही तेच आहे. इतकंच नाही खरे साहेब, घरून गाडीला किक/चावी मारून दुकानाकडे जायला निघताना परत येणारच याची तुमची/माझी ग्यारंटी असते का? बाकी "सर्व" दान देण्याचं त्यांनी "सर्वा"वर बळीराजास्टाईल तुळशीपत्र वगैरे ठेवून, झारीतल्या शुक्राचार्याचा डोळा फोडून, पाणी सोडून वगैरे वचन दिलेलं होतं का? :>

In reply to by आनंदी गोपाळ

जिथेजिथे देवाच्या नावावर .... गर्दी करतात तिथे लोक मरतातच. हे मात्र खरं. कारण असो व नसो पण आम्ही हिमालयात जातो असा म्हटलंच नव्हतं. ते मोगासाहेब म्हणाले मक्केला जातो म्हणून ते सुद्धा सर्व संग परित्याग करून पुण्य कमवायला. मग आम्ही म्हणालो जर दानच करायचं असेल तर आम्हाला करा. आमच्या इतक्या वर्षाच्या शोधानंतर आम्हाला एकच व्यक्ती दानास सर्वथैव सत्पात्र आढळली ती म्हणजे आम्ही स्वतः.

In reply to by सुबोध खरे

मी सर्व दान देऊन मक्केला जाणार असे बोललो / लिहिलो नव्हते... त्याची लिंक द्या असे तुम्हाला सांगितले की तुम्हीच शेपुट घालता. मक्केच्या चेंगराचेम्गरीची चिंता करु नये... करोडोत भरपाई मिळते , गुगलवर शोधुन पहावे. तुम्हीच हिमालयात वगैरे जाणार असाल तर काळजी घ्यावी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

"वर्जीना" फक्त जिहाद मध्ये मेल्यावर मिळतात. असं कुणाच्या पायाखाली चेंगरून मेल्यास फक्त थडगं मिळतं.

खुप जास्त नसल्या तरी थोड्याफार सोयीसुविधा घरात असणे आवश्यकच आहे..... मात्र.... काम/नोकरी आणि कौटुंबिक जीवन यामध्ये समन्वय साधने अतिशय गरजेचे आहे!!

खरीच गरज आहे का?
धाग्याचे शीर्षक आणि त्याचे प्रयोजन यांच्यातले अद्वैतात्मक अभिन्नत्व अंमळ हळवे करून गेले.
पाच रूमचा वेल फर्निशर्ड फ्लॅट, महागडी कार, 40 इंची एलईडी टिव्ही, एेसी, मुलांना इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन.
इथे एका शब्दावर 'मात्रा' लागू पडत नाही म्हणावं तरी पंचाईत, लागू पडते म्हणावं तरी!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बघ की. जरा कुठे निवांतपणे वरवर नजर फिरवायची सोय नाही. पण मी नाही हो सगळा धागाबिगा परत वाचला. प्रतिसादापुरतं ठीकाय.

मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे. यासाठी घर मोठे आहे की झोपडी आहे याचा संबंध नाही.

In reply to by रेवती

माझा मुलगा नववीत असताना त्याला पाच हजाराची सायकल घेण्यासाठी मी सहा महिने विचार करत होते, आणि एका खोलीत राहणाऱ्या माझ्या कामावलीने आपल्या चौथीतल्या मुलाला कालच चार हजाराची सायकल झटक्यात खरेदी करून दिली.

गरज ही शोधाची जननी आहॆ. जर गरजा कमी ठेवल्या तर शोध कमी लागतील, शोध कमी त्यामुळे काम कमी, त्यामुळे रोजगार कमी, त्यामुळे बाजारातील पैसा कमी, त्यामुळे समाधानी लोक कमी. त्यामुळे गरजा जास्त ठेवल्यास, जास्तीत जास्त समाजातील लोक समाधानी राहतील.

काही जण घरासाठी पाॅश पाॅश म्हणून इतका खर्च करतात की बघून वाटते खरेच इतकी गरज आहे का? बैठकीत इम्पोर्टेड सोफा, मोठ्या स्क्रिनचा टिव्ही, प्रत्येक रूम मध्ये एसी, स्वयंपाक घरात किचन ट्राॅली, फुड प्रोसेसर, मायक्रोआेव्हन, अजून बरेच काही.....

काही जण घरासाठी पाॅश पाॅश म्हणून इतका खर्च करतात की बघून वाटते खरेच इतकी गरज आहे का? बैठकीत इम्पोर्टेड सोफा, मोठ्या स्क्रिनचा टिव्ही, प्रत्येक रूम मध्ये एसी, स्वयंपाक घरात किचन ट्राॅली, फुड प्रोसेसर, मायक्रोआेव्हन, अजून बरेच काही.....

Jordan Belfort: Let me tell you something. There's no nobility in poverty. I've been a poor man, and I've been a rich man. And I choose rich every fucking time. लहानपणी मी चपलेशिवायही कित्येक दिवस राहिलोय, उपासही घडलेत, साधी सायकलही धड मिळाली नाही. पण स्वतःचं पहिलं वाहन विकत घेतलं ते ड्रीम कार तीही लग्जरी. त्यानंतर श्रीमंतीतला अर्थ कळला... 'फोलपणा' नाही. लग्जरी ही एक गरज आहे, हवा-पाणी-भाकरीसारखी. जे तिच्याकडे शो-बाजी, उधळपट्टी म्हणून बघतात त्यांना ती कधीच कळणार नाही. लॅपटॉप हे बोजड पीसींच्या काळात लग्जरी वाटायची," कसलं भारी वाटतं यार दिसायला, एकदम हाय-फाय..." असे काहीसे वाटायचे. जेव्हा लॅपटॉप घेतला आणि कामं सुरु झाली तेव्हा ती लग्जरी नव्हती, गरज होती हे कळले. एकेकाळी ते बोजड पीसीही लग्जरी वाटायचे. तेच मोबाईल इत्यादींबद्दल. तस्मात् पाच रुमचा फ्लॅट घेतल्याखेरीज 'स्व' गवसत नाही. स्व गवसला की ती 'शोबाजी की गरज' याचा उलगडा होतो. तोपर्यंत धावणे हा पर्याय उत्तमच आहे. 'कुठे ना कुठे पोचणे' ही खरी गरज आहे. बाकी राहता आलं तर रस्त्यावरही राहता येतं आणि म्हटलं तर राजमहालही तोकडा पडतो, त्यामुळे कशाची 'खरीच गरज' आहे काय हा प्रश्न अप्रस्तुत आहे. (ज्यांना आयुष्यात स्वतः हे सगळे मिळवता आले नाही, व इतरांशी तुलना झाल्याने न्यूनगंड आलाय त्यांना मानसिक समाधानासाठी लेखातले विचार पटू शकतात. *हे लेखकासाठी नाही*)

In reply to by संदीप डांगे

जियो मेरे लाल! _/!\_ _/!\_ _/!\_ संपूर्ण प्रतिसादाशी शत प्रतिशत सहमत. - (स्व गवसण्यासाठी धावणारा) सोकाजी

मागे एका धाग्यावर डॉ.सुबोध खरे यांचा एक क्वोट वाचला तो मला भलताच आवडला होता. "A rich is not the person who earns more, or spends more. But rich is the person who does not need anything anymore." बस्स याच्या पलीकडे कशाला विचार करा.

In reply to by जेपी

जेपी साहेब RICH IS NOT A PERSON WHO EARNS MORE OR SPENDS MORE RICH IS A PERSON WHO NEEDS NO MORE मी असे म्हटले आहे याचे एक कारण असे आहे. आपल्याकडे चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते? जेंव्हा तुमचा शेजारी घेतो तेंव्हा. जेंव्हा माझ्या गरजेच्या सर्व वस्तू मिळून माझ्या कडे चार पैसे उरले तर मला "अजून आणि अधिक" हवे हि हाव नसली पाहिजे. दुर्दैवाने अनेक लोकांना गरज केंव्हा संपली आणी चैन कुठे सुरु झाली हेच कळत नाही.म्हणून ते मृगजळाच्या मागे धावत राहतात. हेवा आणि मत्सर यातील फरक काय ? हेवा करण्यात कोणताही नकारात्मक भाव नसून जर अमुक तम्मुक माणूस करू शकत असेल तर मला का करता येऊ नये म्हणून माणूस काही भरीव कार्य करण्यास उद्युक्त होतो मत्सर म्हणजे काय? -- एक तर मी वर चढू शकत नसेन तर त्याला खाली खेचा. किंवा इतकी मरमर करून कसेही करून त्याचे नाक खाली करण्यासाठी मी त्याच्या वर जाण्याचा प्रयत्न करणे.यात भाव मुळातच नकारात्मक आहे. हा नकारात्मक भाव तुम्हाला असमाधानी करू शकतो. उदा. मी (रामदास साहेबांसारखा किंवा इतर सिद्धहस्त लेखकांसारखा) लेखक नसलो तरी शब्द् बंबाळ लेखन करून मोठे मोठे प्रतिसाद देउन स्वतःला लेखक सिद्ध करण्याचा आटापिटा करणे आणि अशा लेखकांच्या लेखांवर कारण पिंका टाकणे हे आपल्याला मिसळपाव वर दिसून येणारे मत्सराचे उदाहरण.

In reply to by सुबोध खरे

हेवा वाटणं स्वच्छपणे दाद दिल्यासारखं कबुल करता येतं, मिरवता येतं. ज्याचा हेवा वाटतो त्याला ते कॉम्प्लीमेण्टसारखं वाटतं. त्याउलट मत्सराचं.

हेला काका - चला आधी स्वतापासुन सुरुवात करा. फ्लॅट, गाडी वगैरे विकुन विदर्भात शेती आणि छोटे घर विकत घ्या.

आपल्या सुखाची याख्या आपण करावी. त्याच सरसकटीकरण होउ शकत नाही. कुणाला तुम्ही म्हणत असलेला हव्यास म्हणजे महत्वाकांक्षा, प्रगती वाटत असेल तर कमी साधनात राहणे हे कर्तव्यशून्यतेचे वाटेल - ही 'ठेवीले अनंते' भावना वाटेल. 'जीवनशैली आणि व्याधी' अशा आशयाच्या एका कार्यक्रमात एका डॉक्टरने सांगितले होते प्रगतीची आस, स्पर्धा, उत्कर्षचे ध्येय, सतत जिंकण्याचा ध्यास यामुळे अनेक रोग जडु शकतात. ऐकायला हे बरे वाटते पण प्रत्यक्षात असं न वागणारे कर्मचारी कोणत्याही आस्थापनेला परवड्त नाहीत.

एका कार्यक्रमात एका डॉक्टरने सांगितले होते प्रगतीची आस, स्पर्धा, उत्कर्षचे ध्येय, सतत जिंकण्याचा ध्यास यामुळे अनेक रोग जडु शकतात
ह्याला कुठलाही विदा नाहीये. हेला काकांसारखे हट्टीकट्टी गरीबी आणि रोगट श्रीमंती असले विचार असलेले खूप लोक भारतात आहेत आणि ते डॉक्टर पण त्यातलेच असतील. गम्मत म्हणजे असले विचार असले तरी त्यांची कृती मात्र ह्या विचारांच्या अगदी विरुद्ध असते.

"हट्टीकट्टी गरीबी आणि रोगट श्रीमंती" या सारखे फालतू विचार ठेऊन मागच्या २ पिढ्या शक्य असून सुद्धा काहीच न कमावता बसल्या . आणि नंतर माझ्या आधीच्या पिढीला गेली ३०-४० वर्षे जो त्रास सहन करावा लागतोय तो बघतोय . यापेक्षा जमेल तेवढे पैसे कमावणे कधीही प्रिफर करेन . . बाकी . असेल विचार मांडायला आधी करोडपती व्हावं लागतं हे हि खरं . (आमटे इत्यादी मंडळी अति दुर्मिळ अपवाद आहेत )

In reply to by अद्द्या

त्यांनी त्यांची श्रीमंती कमवायला अपार कष्ट उपसलेत, ध्यास घेतला. त्यांची श्रीमंतीची व्याख्या इतरांपेक्षा वेगळी होती हे मात्र खरं.

लाटकर साहेब आपले उदाहरण मुदलातच गंडलेले आहे. मुंबईत माझा ५६० चौ फुटाचा एक बेड रूम चा (तीनच खोल्यांचा) फ़्लैटच एक कोटी रुपयांचा आहे. या रकमेच्या दोन महिन्यांच्या व्याजातच ( दीड लाखात) आपण म्हणता त्या सर्व "बैठकीत इम्पोर्टेड सोफा, मोठ्या स्क्रिनचा टिव्ही, प्रत्येक रूम मध्ये एसी, स्वयंपाक घरात किचन ट्राॅली, फुड प्रोसेसर, मायक्रोआेव्हन" वस्तू येतात. मग या गोष्टीवर आपण म्हणता तसा "इतका खर्च" कसे म्हणता येईल.आपल्या वरील प्रतिसादाप्रमाणे "चार रूमचा फ्लॅट घरात आवश्यक गोष्टी असल्या तरी माणूस समाधानी राहू शकतो." यातील चौथी रूम विकत घ्यायला ( माझ्या तीन रुमच्या घरा ऐवजी) मला २५ लाख रुपये अतिरिक्त खर्च येईल त्यापेक्षा त्या रकमेच्या व्याजात मी घरातील सुखसोयीच्या वस्तू घेऊ शकतो. म्हणून मुंबईतील माणूस मोठे घर घेण्यापेक्षा आपण म्हणता तशा चैनीच्या वस्तू घेताना दिसतो. विश्वास बसत नसेल तर गिरगाव येथे चाळीच्या दोन्ही खोल्यांना लावलेली वातानुकूलन यंत्रे पाहून घ्या.

In reply to by सुबोध खरे

त्यांचा वन बी एचके का उल्लेख तुलनात्मक असावा. तीन खोल्यांच्या घरातही मानूस सुखाने राहू शकतो तर चार किंवा पाच खोल्यांच्या घराचा हव्यास कशाला अशा अर्थी असावे ते.

In reply to by सतिश गावडे

सुखाने तर माणूस दोन खोल्यांच्या घरातही राहु शकतो, एका खोलीतही राहु शकतो. मला वाटते "गरज" शब्दाची व्याख्या प्रत्येक माणसाप्रमाणे बदलत असते आणि प्रत्येकाने स्वतःच्या उत्पन्नानुसार त्याचा विचार करावा

In reply to by विवेक ठाकूर

शब्दांच्या निवडीबद्दल तुमच्याकडून चूक व्हावी...? सुविधा-साधनांतून मिळते ते 'सुख', पजेशन-मालकीहक्कातून येते ते 'सुख'. दुसर्‍यावर अवलंबून असतं ते 'सुख'. सुख हे परिस्थितीवर अवलंबून असतं. तुम्ही सुख हा शब्द आनंद ह्या अर्थी वापरला आहे. 'आनंद' मनःस्थितीवर अवलंबून असतो.

In reply to by संदीप डांगे

सुख आणि आनंद हे समानार्थी शब्द आहेत आणि लेखातल्या मुद्याबद्दल मला जे म्हणायचंय ते एकदम सोपं आहे. दुसर्‍या बाजूनं पाहा, दु:खाचं कारण वस्तूचा आभाव किंवा परिस्थिती आहे असं वरकरणी वाटत असलं तरी खरं कारण `स्वतःचा स्वतःशी होणारा वियोग' (गेटींग डिसकनेक्टेड विथ सेल्फ) आहे. जर तुम्ही कायम स्वतःशी कनेक्टेड असाल तर मनःस्थिती प्रसन्न राहाते आणि परिस्थितीचा तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही.

In reply to by विवेक ठाकूर

जर तुम्ही कायम स्वतःशी कनेक्टेड असाल तर मनःस्थिती प्रसन्न राहाते आणि परिस्थितीचा तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही.
क्या बात

In reply to by विवेक ठाकूर

समानार्थी नाहीत. आनंद आतून येतो, तर सुख कोणत्यातरी बाह्य गोष्टीसोबत येतं. म्हणूनच "तुम्ही सुखं विकत घेऊ शकता पण आनंद नाही" असं म्हटलं जातं. सुख आणि दु:ख हे दुसर्‍या कोणत्यातरी गोष्टीचे, वस्तूचे, व्यक्तीचे बोट धरून येतात मात्र आनंदात रहाणे हा प्रत्येकाचा चॉईस असतो.

In reply to by पैसा

छान प्रतिसाद नेमका असाच फरक किंमत आणि मुल्य ह्या मधे आहे... एव्हढे बोलुन मि माझे २ शब्द संपवितो ;)

In reply to by विवेक ठाकूर

ठाकूर साहेब खरी समाजसेवा हि मुळात रक्तात असावी लागते. उगाच डॉ. प्रकाश आमटे करतात म्हणून मी सर्वसंग परित्याग करून समाजसेवा करण्यास गेलो तर मला ते झेपणार नाही. आणी मी कितीही उदात्त विचार ठेवले तरी आतून मनस्थिती प्रसन्न राहणार नाही. डॉ. प्रकाश आमटे यांच्या विचाराची बैठक फार उच्च पातळीवर आहे.त्यांची जागा दीपस्तंभासारखी आहे. त्यांच्या प्रकाशात वाट काढणारी जहाजे आहोत आम्ही. मला ती विचारसरणी झेपणार नाही. वीरेंदर सेहवाग पहिल्या बॉलवर षटकार मारतो म्हणून मी मारायला गेलो तर मागून स्टम्पिंग होऊन बाद होण्यात काय हशील आहे? आम्ही दहावे अकरावे फलंदाज म्हणून वीस धावा दहा षटकात काढल्या तर संघाला तेवढीच मदत इतका साधा विचार आहे. तेंव्हा मला "सोसंल" तेवढीच "सोशल" सर्व्हिस मी करतो. त्यांनी हजारो आदिवासींचे कल्याण केले. मी माझ्या कुटुंबाबद्दलची कर्तव्ये पार पडून सुखासमाधानाने जगून दोनच माणसांचे थोडे फार कल्याण करू शकलो तरी मी समाधानी राहू शकेन अशी माझी विचारसरणी आहे.