✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्लमडॉग मिलिनेअर

अ
अनामिक यांनी
Wed, 12/31/2008 - 01:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6314 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

प
प्राजु Wed, 12/31/2008 - 01:18 नवीन

छान परिक्षण लिहिलं आहेस..

मिळाला तर नक्कीच बघेन हा चित्रपट. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 12/31/2008 - 17:47 नवीन

कोलबेरा

कोलबेरा साठी आपल्या टाळ्या !! लै भारी लिहीलंय परिक्षण ........ फुकट टोरंट मिळाला तर णक्की पाहिन - टारझन फुकटे (सर्वांणा णववर्षाच्या तशेच वाढदिवसाच्या हार्डिक शुभेच्छा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
घ
घाटावरचे भट Wed, 12/31/2008 - 01:25 नवीन

खरोखर

खरोखर चांगला आहे चित्रपट. लैच ग्रेट वगैरे नाही पण.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 12/31/2008 - 01:27 नवीन

धमाल चित्रपट

स्लमडॉग मिलनिअर धमाल चित्रपट आहे. एका टिपीकल बॉलीवुड फॉरम्युला कथेला हॉलीवुडच्या बाटलीत घालुन अजब रसायन बनवले आहे. तांत्रिक दृष्ट्या चित्रपट +१०० बनला आहे. छायाचित्रीकरण आणि संकलन अतीशय वेगवान असल्याने छोटीशी असली तरी कथा कंटाळवाणी वाटत नाही. आणि सगळ्यात प्रभाव पाडते ते रेहमनाचे अप्रतिम पार्श्वसंगीत. ह्यावेळेस आपल्या भातात्यातील सगळी शस्त्रे वापरुन रेहमानने अप्रतिम पार्श्वसंगीत दिले आहे. फिरंगी लोकांनी भरलेले थिएटर शेवटच्या पाट्या जाईपर्यंत उठले नव्हते. चित्रपट संपल्या नंतरचे गाणे देखिल गोर्‍यांना भयंकर आवडल्याची ही पावती. मुंबईच्या झोपडपट्टीचे अतिरंजीत चित्रीकरण आहे पण ते अवास्तव नाही. आणि कुठेही कसल्याही संदेशांचा उपदेशांचा डोस नसल्याने त्याच त्याच साचेबद्ध चित्रपटांप्रमाणे वाटत नाही. जरुर पाहण्यासारखा चित्रपट. (अवांतर: परिक्षणात कथेतले काही दुवे उलगडाताना 'स्पॉइलर अलर्ट' टाकायला हवा होता)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 01/12/2009 - 16:53 नवीन

पार्श्वसंगीत

चित्रपट एकंदर बरा वाटला. अनेक गोष्टी फारच अतार्किक वाटल्या. पार्श्वसंगीत मात्र फारच फ्रेश आणि छान आहे. सुरुवातीचा ट्रेनच्या ठोक्यावर धरलेला ताल अतिशय सुरेख. आपला (संगीतकार) ए. आर. आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ध
धनंजय Wed, 12/31/2008 - 01:30 नवीन

परीक्षण छान झाले आहे

अनामिक तर चित्रपट आवडीने बघणारे दिसतात. अशीच आणखी परीक्षणे येऊ द्या. हा चित्रपट मी दोन-तीन आठवड्यांपूर्वी बघितला. मला बर्‍यापैकी आवडला. चित्रपटाचे लक्ष्य-प्रेक्षक कोण होते, ते कळावेसे वाटते. भारताबद्दल फारशी माहिती नसलेले परदेशातले प्रेक्षक, की भारतातले प्रेक्षक?
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 12/31/2008 - 01:43 नवीन

भारतात हा

भारतात हा चित्रपट अजून प्रदर्शित झाला की नाही ते माहीत नाही (कारण मी माझ्या भावाला विचारले असता त्याला या चित्रपटाबद्दल माहीत नव्हते). पण लक्ष्य-प्रेक्षक परदेशातलेच असावे असे वाटते. बऱ्याचदा वाईट याचेच वाटते की भारतावरील दाखवण्यात येणाऱ्या डॉक्युमेंट्रीज किंवा अश्या चित्रपटात 'स्लम' हा प्रकार जास्त दाखवण्यात येतो. त्यामुळे भारताबद्दलचा बऱ्याच परदेशस्थांचा दृष्टिकोन स्लम आणि गरिबी यापुढे जातच नाही. भारतात अजूनही लोक हत्ती/घोड्यांवर प्रवास करतात का असे विचारणारे बरेच नग मला भेटलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
क
कोलबेर Wed, 12/31/2008 - 01:50 नवीन

पाश्चात्य

पाश्चात्य चित्रपटात भारत म्हणजे 'स्लम' हा प्रकार जास्त दाखवला जातो.
जसे बॉलीवुडच्या चित्रपटांमध्ये अमेरिका म्हणजे फक्त चकचकीत स्काय स्क्रेपर्स, गाड्या आणि रोषणाई हाच प्रकार जास्त दाखवला जातो तसेच पाश्चात्य चित्रपटात भारत म्हणजे 'स्लम' हा प्रकार जास्त दाखवला जातो. कारण प्रेक्षकांना जे आपल्या इथे सहजी पाहयला मिळात नाही ते परदेशात पहायला हवे असते. तसे पाहिले तर अमेरिकेत देखिल झोपडपट्ट्या आहेत आणि भारतात देखिल चकचकीत गाड्या आणि टॉलेजंग इमारती आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
श
शितल Wed, 12/31/2008 - 01:45 नवीन

वा.

परीक्षण छान लिहिले आहे. :)
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 12/31/2008 - 01:49 नवीन

उत्तम

परीक्षण. वरील प्रतिसादांशी सहमत आहे. सुरूवातीला परदेशातील प्रेक्षकांना लक्ष्य ठेवून बनवल्यासारखा वाटला, पण नंतर कोलबेररावांनी म्हटल्याप्रमाणे गतिमानता आणि हॉलिवूड + बॉलिवूड मिश्रणाची चांगली जमलेली भट्टी यामुळे आवडला. स्वतः अंध असणार्‍या सूरदासांच्या 'दर्शन दो घनश्याम' या गाण्याचा डोळे काढण्याच्या प्रसंगात केलेला वापर यासाठ्या बारीकसारीक गोष्टींकडेही लक्ष दिले आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 12/31/2008 - 07:46 नवीन

मस्त

परिक्षण छान. हा सिनेमा पाहीला. आवडला.
  • Log in or register to post comments
म
मीनल Wed, 12/31/2008 - 08:29 नवीन

नाव कथेला अनुरूप

डॉग म्हणजे प्रामाणिक प्राणी त्याच प्रमाणे या चित्रपटातील हिरो प्रामाणिक दाखवला आहे.तो झोपडपट्टीतला म्हणून स्लम डॉग. तो करोड्पती होतो म्हणून मिलिनेअर. नाव कथेला अनुरूप आहे पण फार एक्झेगरेशन दाखवले आहे. मी धारावीच्या आत कधीही गेले नाही. म्हणजे बाहेरूनच दर्शन फार झाले, ते आतून घ्यायची हिम्मत नाही.त्यामुळे नक्की माहित नाही. पण तरीही जरा जास्तच दाखवले आहे.परदेशी प्रेक्षक नक्कीच टार्गेट केला आहे. यातील हा हिरो सोडाला तर बाकी बरेचसे अप्रामाणिक ,दगाबाज दाखवले आहेत. खर दाखवता दाखवता अती झाल आहे अस मला वाटल. मला आवडला किंवा न आवडला यावर भाष्य करण्यापेक्षा तो परदेशीं साठी माहितीपूर्ण ठरेल. त्यांना फारेशी कल्पना नसते. हे असच आहे ह्यावर ते सहजी विश्वास ठेवतील. मला एक प्रेक्षक म्हणाली -- मला इंडियाला जावस वाटतय.पण हिंम्मत नाही . तिला सिनेमात दाखवले सर्व भारतात आहे,म्हणजे भारतात असच आहे सर्व ठिकाणी असा समज झाला आहे. मीनल.
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Wed, 12/31/2008 - 14:04 नवीन

माझ्या

माझ्या माहितीनुसार हा चित्रपट भारतात यायचा आहे तसा उल्लेख २ आठवद्यापुर्वीचा लोकप्रभात होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
क
कोलबेर Tue, 02/17/2009 - 03:57 नवीन

डॉग म्हणजे

डॉग म्हणजे प्रामाणिक प्राणी त्याच प्रमाणे या चित्रपटातील हिरो प्रामाणिक दाखवला आहे.तो झोपडपट्टीतला म्हणून स्लम डॉग.
डॉग म्हणजे कुत्रा ह्या अर्थाने डॅनी बॉयलना दाखवायचे नाही आहे. इथे डॉग हे 'अंडरडॉग' ह्या अर्थाने वापरले आहे. जमाल हा केबीसी स्पर्धेमधे अंडरडॉग असतो. तो जिंकणार असे कुणालाच वाटत नसते म्हणून तो अंडरडॉग. आणि अंडरडॉग असणारा हा स्पर्धक जिंकणार असे वाटत नसले तरी जिंकावा असे नेहमीच प्रेक्षकांना वाटत असते. म्हणून त्याला इतका पाठींबा/लोकप्रियता मिळतो. थोडक्यात झोपडपट्टीतला अंडरडॉग म्हणून स्लमडॉग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
म
मदनबाण Wed, 12/31/2008 - 14:27 नवीन

छान..

छान परिक्षण.. जमल्यास नक्की पाहावयास आवडेल... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/01/2009 - 09:04 नवीन

हेच

हेच म्हणतो..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
S
shweta Wed, 12/31/2008 - 14:32 नवीन

हा सिनेमा

हा सिनेमा कोणी हि बघु नये. अतिशय कृत्रिम वाटतो. पैसे वाया घालवु नका. जास्त झाले असतील तर खरया गरीबांना वाटा येवढ्च सांगावे से वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Wed, 12/31/2008 - 17:31 नवीन

२००% असहमत

जरूर पहावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shweta
अ
अनामिक Wed, 12/31/2008 - 19:20 नवीन

तुम्हाला

तुम्हाला चित्रपट कुठे कुठे कृत्रिम वाटला ते कळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shweta
प
पक्या Mon, 01/12/2009 - 13:58 नवीन

अभिनंदन..तीन "गोल्डन ग्लोब' पुरस्कार

स्लमडॉग मिलेनिअरला तीन "गोल्डन ग्लोब' पुरस्कार . सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक , सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट संगीत (ए. आर. रेहमान) . स्लमडॉग च्या सर्व कलाकारांचे अभिनंदन. पुरस्कार सोहळ्याला अनिल कपूर उपस्थित असलेला पाहिला.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 01/12/2009 - 15:39 नवीन

आवडला...

आताच हा चित्रपट पाहिला आणि तो आवडला. चित्रपटाला छान गती आहे. हॉलीवूड आणि बॉलीवूडचं छान मिश्रण आहे. गाण्यांसाठी कथा थांबत नाही हे पाहून किती बरं वाटतं ! नीलकांत
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 01/12/2009 - 17:08 नवीन

दर्शन दो घनश्याम !!!

अनामिक राव /ताई.. लयं भारी चित्रपट हाय हा... छुवा छुवा हे छोट गाणं आणि त्याच संगीत तर जबराटच.. (जमालचा पंखा) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं गुरुवार, 01/22/2009 - 09:37 नवीन

छान आहे पण

छान आहे पण सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळावा एवढा काही भारी नाही. मला जमाल, सलीम आणि लतिकाचं बालपण पहाताना परिंदाची खूप आठवण येत होती. (सलाम बॉंम्बे पाहिला नाही त्यामुळे त्याच्याशी किती साम्य आहे ते माहिती नाही.) हा चित्रपट क्यू & ए ह्या विकास स्वरूप ह्यांच्या कादंबरीवर आधारीत असला तरी चित्रपट बनवताना कथेत काही ठळक बदल केले गेले आहेत. उदा: कादंबरीमधे अनिल कपूर हा बॉलिवूड अभिनेता दाखवला असून जमाल (कादंबरीतला राम मोहम्मद थॉमस) त्याच्याकडे कामाला असतो. सलीम हा त्याचा मित्र असून तो पुढे बॉलिवूड मधे जातो. जमालला विचारलेल्या प्रश्नातला फक्त पहिला प्रश्न (अमिताभ वाला) कादंबरीत आहे. बाकी सगळे प्रश्न बदलले आहेत. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
ज
जनोबा रेगे गुरुवार, 01/22/2009 - 11:58 नवीन

मागच्याच

मागच्याच आठवड्यात पाहिला. चा॑गला आहे पण थोडे एक्झॅजरेशन वाटते.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 01/28/2009 - 23:34 नवीन

चांगला

चांगला सिनेमा आहे... आवडला... पण दहा ऑस्कर नामांकने म्हणजे अति वाटते... उदा. गुलझार आणि रहमान यांचे हे बेस्ट वर्क मानायला काय हिंमत होत नाही... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 01/29/2009 - 00:14 नवीन

यंदाच्या

यंदाच्या ऑस्कर नामांकन मिळालेल्या इतर चित्रपटापैकी अजून एकही बघून झाला नाही, त्यामूळे स्लमडॉगला मिळालेले १० नामांकनं योग्य आहेत की नाही ते माहीत नाही, तरीही स्लमडॉगचा समावेश त्यात असणार या बद्दल थोडीशी खात्री होती. बॉलीवूड मसाला घालून तयार केलेला हा चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत (जरी अपेक्षीत शेवट असला तरी) आपण काय होणार हे बघण्यास उत्सुक असतो (निदान मी तरी होतो). भारतियांना बॉलीवूड मसाल्यामूळे चित्रपट नेहमीचाच वाटण्याची शक्यता आहे... पण परदेशस्थांसाठी हा एक 'हटके' प्रकार आहे/होता. एका गेम-शो वर झळकणार्‍या साध्या चहावाल्याची कथा रंगवण्यात दिग्दर्शक कुठे कमी पडला असे वाटले नाही. सोबतीला रेहमानचं संगीतही जबरा आहे. तेव्हा या चित्रपटाला आणि विशेषतः रेहमानला ऑस्कर मिळावं हि मनापासून इच्छा, आणि शुभेच्छा! (रेहमानच बेस्ट वर्क नाही म्हणनार, पण माझ्या हापीसातल्या लोकांना तरी गाणी आवडलीत. आणि त्यांना रेहमानची अजून गाणी ऐकायची आहेत. मागे बहुतेक 'इनसाईड मॅन' मधे 'चल छय्या छय्या' बॅकग्राऊंडला वापरलं होतं, तेही या लोकांना आवडलं होतं.) परिक्षण वाचणार्‍या सगळ्यांचे आभार! अनामिक
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Sun, 02/01/2009 - 09:41 नवीन

ठीक वाटला..

ठीक वाटला.. पण जेवढं दोक्यावर घेतलंय तेवढा ही काही 'भारी' वाटला नाही. असो...हल्ली एलेक्ट्रॉनीक मीडिआ मुळे एकदम डोक्यावर घ्यायचं नाहीतर एकदम जमीनीवर आपटायचं हे नेहमीचंच झालंय.. जय हो पेक्षा ही अनेक उत्तम गाणी रेहमानने दिली आहेत. असो..या गाण्याला तरी मिळतोय ना ऍवॉर्ड्..स्वानन्द आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 02/02/2009 - 03:57 नवीन

ठीक वाटला...

चित्रपट ठीक वाटला. (आपल्याला हिन्दी चित्रपटातील अविश्वसनीय गोष्टींवर विश्वास ठेवायची सवयच लागली आहे म्हणून.) पण आंतरराष्ट्रीय पातळीवर दिग्दर्शनाला मिळालेले पारितोषिक पाहून आश्चर्यच वाटाले. अमिताभचे हॅलीकॉप्टर येते म्हणून जमाल संडासातल्या मैल्यात डोक्यापर्यंत बुडून संडासाबाहेर पडतो ह्या सिनचे प्रयोजन कळले नाही. संडास वरून उघडा (छप्पर नसलेला) असताना जमाल खालच्या मैल्यात का उडी मारतो कळत नाही. लाकडी फळ्यांच्या भींतींवर आडव्या फळ्याही ठोकलेल्या असल्याने ६-७ फूट उंचीच्या भींतींवरून बाहेर पडणे सहज शक्य होते. ( रन-वे वरून पोलिसांचा पाठलाग चुकविताना त्याहून उंचावरून उड्यामारून, चढून तो पळू शकत असतो. ) तो घाणेरडा प्रकार फारच अनाकलनीय आहे. रोजच्या जीवनात येणार्‍या प्रसंगांमधून जमालला उत्तरे सुचत जातात आणि तो कॉन्टेस्ट जिंकतो असे दाखवले आहे. १०० डॉलरच्या नोटेवरील चित्र, रिव्हॉल्व्हरचा जनक, कवी सूरदासचे नांव इत्यादी गोष्टी त्याच्या आयुष्यात कधी न कधी येऊन गेल्या होत्या पण त्या त्या काळात त्यांचे त्याला काहीच महत्त्व नव्हते. त्यामुळे त्या लक्षात राहणे अगदिच असंभव आहे. तरी पण आठव्या - नवव्या वर्षी फक्त एकदाच ऐकलेली नांवे (ज्यांचे त्या वयात त्याला काहीच महत्त्व नव्हते) लक्षात ठेवून १८ - १९व्या वर्षी तो सर्व उत्तरे बरोबर देतो ह्यावर विश्वास ठेवणे जरा कठीणच आहे. असे वाटते की १०-१२ वर्षांनंतर येणार्‍या 'कौन बनेगा करोडपती' स्पर्धेतील प्रश्न त्याला आधीच ठावूक होते आणि त्याने उत्तरे पाठ करून ठेवलेली होती. (तरीही ऐनवेळी आठविणे असंभवच). इतक्या कुशाग्र बुद्धीचा, इंग्रजी भाषेचा जाणकार, कॉलसेंटरच्या मुलांपेक्षाही अधिक माहिती असणारा जमाल चहावाल्या पोर्‍याचे काम करीत असतो, ह्यावरही दिग्दर्शक म्हणतो म्हणून विश्वास ठेवायचा. अशा बर्‍याच गोष्टी आहेत जिथे दिग्दर्शकाचे वाभाडे काढता येतील. चित्रपट गतीमान ठेवण्याच्या आणि झोपडपट्टीतील जीवन अधोरेखित करण्याच्या नादात चित्रपट वास्तवापासून दूर जातो. त्यामुळेच चित्रपट संपल्यावर मनामध्ये 'ठीऽऽक आहे' अशीच प्रतिक्रिया उमटते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा