Skip to main content

ओपिनियन फॉर्मेशन (माहिती हवी आहे)

लेखक आबा यांनी सोमवार, 28/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि माझा मित्र नेटवर्क सायन्स मधील एका समस्येवर काम करीत आहोत. सामुहीक मत तयार होण्याच्या प्रक्रीयेचा अभ्यास करण्याचा आमचा उद्देश्य आहे. यासाठी काही माहिती जमा करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही एक लहान प्रश्नावली तयार केलेली आहे. या प्रश्नावलीमध्ये राजकीय मुद्यांवरची तुमची मते, फक्त १० वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात मागवलेली आहेत. ही माहीती भरून आम्हाला अभ्यासासाठी मदत करावी अशी आमची विनंती आहे, ही उत्तरे देण्यासाठी स्वत:चे नाव देण्याची गरज नसल्याने इथे व्यक्त केलेली मते पूर्णत: सुरक्षित असतील याची आम्ही हमी देतो. तसेच अर्ध्या सोडवलेल्या प्रश्नावलीचा उपयोग अभ्यासासाठी होणार नसल्याने, सर्व (१०) प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी विनंती करतो. खाली प्रश्नावलीच्या मराठी व इंग्रजी अश्या दोन्ही लिंक्स दिलेल्या आहेत. यापैकी कोणतीही एकच लिंक वापरावी. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याच्या निष्कर्षांची माहिती मी इथे लिहीन. धन्यवाद. मराठी लिंक : https://www.surveymonkey.com/r/SQ5CVJS इंग्रजी लिंक : https://www.surveymonkey.com/r/WBVHBWK

वाचने 4686
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

ह्यातल्या एकेक प्रश्नावर इथे टेराबायटी चर्चा झडल्या असल्याने उत्तरे देणे बरेचसे सुसह्य झाले. ;) निष्कर्षांच्या प्रतिक्षेत.

दिली उत्तरे

मिपावर नक्षलवादावर चर्चा झाली असल्यास कोणी दुवे देउन दुवा घेइल काय ?

रोचक प्रश्नावलीची उत्तरे दिली आहेत. या अभ्यासाचे निष्कर्ष मिपावर प्रकाशित करावे.