विसावे शतक हे इतर अनेक कारणांमुळे ओळखले जात असले तरी ‘स्त्री-पुरुष समानता' ह्या दृष्टीने त्याचे अनन्य साधारण महत्व आहे. ह्याच शतकात स्त्रिया पुरुषांसारखे वस्त्र परिधान करून पुरुषांच्या पावलांवर पाय ठेऊन, नंतर पायावर पाय ठेवून, पुढे खांद्याला खांदा लावून आणि कित्येक वेळा पुरुषांच्या डोक्यावर पाय ठेवून काम करू लागल्या. घरापासून बाजारापर्यंत, विनाकारणापासून राजकारणापर्यंत, दैन्यापासून सैन्यापर्यंत, चूली-मूलीपासून वैद्य-वकिलाच्या झुलीपर्यंत, शटल ट्रेनपासून स्पेस शटलपर्यंत, आज सर्वत्र स्त्रियांनी आपला ठसा उमटवला आहे. शाळा, कॉलेज,विज्ञान, कला, सौंदर्य, उद्योग, राजकारण, अर्थकारण, युध्द जेथे पाहावे तेथे स्त्रीयाच स्त्रिया दिसताहेत. “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धरी” हे वाक्य तिने अक्षरशः खरे करून दाखवले आहे. मात्र हे करताना तिने पुरुषवर्गावर मोठा अन्याय केला आहे, त्याला अज्ञानाच्या खाईत लोटले आहे, ‘स्त्री-पुरुष समानता’ ह्या तत्वाला काळीमा फासला आहे, पुरुषाला जिणे नकोसे करून सोडले आहे.
कैकयीच्या रुपात अचूक वेळी वर मागून घेऊन तिने रामायण रचले, मत्स्यगंधेच्या रुपात भीष्म प्रतिज्ञा घ्यायला लावून तिने महाभारत घडविले. कुंतीच्या रुपात योग्य वेळी सोयीस्कर वर मागून महाभारताच्या युद्धाचा शेवट बदलला, आनंदीबाईच्या रुपात तिने ‘ध’ चा ‘मा' केला, मुमताज होऊन मरणोत्तर ताजमहाल बांधवून घेतला, प्रसंगी गॉडफादरला नमवून गॉडमदर बनली, सर्वत्र दरारा पसरवला, देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती वगैरे होऊन राजकारण केले, समाजकारण केले, अर्थकारण केले, अर्थाचा अनर्थ केला, काय वाट्टेल ते केले पण पुरुषाला समानता मात्र मिळवू दिली नाही.
मात्र आजचा पुरुष जागृत झाला आहे, त्याला आपल्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव झाली आहे, त्याची चीड त्याच्या मनात धुमसत आहे. त्या अन्यायाविरुद्ध तो दंड थोपटून आज उभा राहू इच्छितो आहे. समानतेच्या ह्या युगातली ही असमानता त्याला सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. कारण हा अन्याय कोणी परक्यांनी केला नाही तर प्रत्यक्ष त्याच्या जन्मदात्या आईने, आजीने, बहिणीने, पत्नीने, मुलीने इत्यादी स्त्रियांनीच केला आहे.
आज काळाची गरज म्हणून स्त्रिया घराबाहेर पडून स्व:कर्तृत्व गाजवीत आहेत, आणि चतुर पुरुषाने ह्या चालून आलेल्या संधीचे सोने करण्याचे ठरवले आहे. ह्या असमानतेचे जोखड दूर सारून, समानता निर्माण करण्याची ही सुवर्णसंधी त्याने हातची जाऊ दिली नाही. संसारासाठी नोकरी करतानाच त्याने स्त्रीच्या प्रांतात प्रवेश केला. ज्याप्रमाणे कचाने, विद्या शिकण्यासाठी शुक्राचार्यांच्या आश्रमात प्रवेश मिळविला, त्याच प्रमाणे आद्य कचाने, सर्व प्रथम स्त्रीच्या अनभिषिक्त साम्राज्यात, तिच्याच स्वयंपाकघरात प्रवेश मिळविला. घरच्या सबलेला त्याने आधी टीव्हीवरील सास-बहुच्या सिरियल्सची भूल घातली. ही भूल यशस्वी होत आहे हे दिसल्यावर, तिला टीव्हीवरच्या स्त्रीच्याच इतर नातेसंबंधांच्या चक्रव्युहात गुंतवून टाकले, ‘सवत, विवाहबाह्य संबध’ सारख्या तिला अप्रिय असणाऱ्या गोष्टींची चटक लावून दिली, आणि आखिल पुरुष जातीचा, स्वयंपाकघराचा मार्ग खुला करून दिला.
“अहो, जरा चहा ठेवता का ?” ह्या वरवर प्रेमळ आणि लाडिक दिसणार्या प्रश्नातील छुप्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून पुरुषाने, स्त्री-पुरुष समानतेच्या युगात पहिले पाउल ठेवले ते चहा बनवून. “मेला भात करणं का अवघड आहे ? तांदूळ धुवून, त्यात पाणी घालून गॅसवर शिजत ठेवला की झाला मेला भात तयार ? त्यात काय वेद बोलावे लागतात की काय ?” ह्या प्रश्नवजा आज्ञेला देखील त्याने शिरसावंद्य मानले, आणि समानतेची आणखी एक पायरी तो चढला. पुढे पोळ्या, भाज्या, आमट्या, कोशिंबिरी बनवणे त्याच्या डाव्या हातचा मळ ठरू लागले. आज घरोघरी काय चित्र दिसते ? घरची गृहिणी, संसार रथाचा भार उचलून संध्याकाळी थकून-भागून घरी येते आणि तिच्या हातात गरमागरम वाफाळत्या चहाचा प्याला दिला जातो, सोबत उपमा अथवा पोह्याची बशी दिली जाते. ती टीव्ही समोर स्थानापन्न होते न होते तोच भात आधणाला पडतो. पोळ्या लाटल्या जातात, तुरीच्या डाळीचे वरण, वांग्याची भाजी, कोशिंबीर, जमल्यास कांद्याच्या भज्या असा रात्रीच्या जेवणाचा बेत अमलात आणला जाऊ लागतो. इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचा डबा देखील तयार होऊ लागतो. “नाहीतरी ह्यांना ऑफिसात मेलं काम ते काय असते ? जरा संसाराला हातभार लावला तर काही कमीपणा येतो का ?” असे काहीतरी सौ तिच्या मैत्रिणीशी अथवा माहेरच्यांशी, ‘ब्रेक के दौरान’, बोलताना पुरुषाच्या कानावर पडतं पण तो तिकडे कानाडोळा करतो. कारण त्याला स्त्री-पुरुष समानता हे ध्येय गाठायचे असते. हळूहळू तो स्वयंपाक शास्त्रात निपुण होतो. त्याचे दाखले, इतर स्त्रिया आपापल्या घरी देऊ लागतात. “माझ्या मैत्रिणीचा नवरा, डायरेक्टर आहे मोठ्ठ्या कंपनीत. तरी घरी आल्यावर संपूर्ण स्वयंपाक तो स्व:ताच बनवतो. त्याला जेवण बनवून खाऊ घालण्याचा छंदच आहे असे ती सांगत होती, नाहीतरी तुम्ही ? इकडची काडी तिकडे करायला नको ! मी म्हणून राब राब राबते आहे तुमच्या संसारात, दुसरी असती तर कधीच गेली असती सोडून. जरा कुठे करमणूक म्हणून टीव्ही बघायला बसावे तर आहेच तुमची मेली ती म्याच सुरु. काय करणार ? मेलं नशीबच फुटकं, दुसरे काय ?” हे ऐकावे लागलेला नवरा आपल्या पत्नीकडे पूर्वी ‘खाऊ की गिळू' नजरेने पाहायचा पण आज मात्र तो ही संधी न दवडता, खायचे आणि गिळायचे बनवायला सरळ स्वयंपाक घराकडे धाव घेतो.
ह्याच्या पुढच्या पायऱ्या मात्र त्याने आपल्या अंगभूत हुशारीमुळे सहजच पादक्रांत केल्या. “एखाद दिवशी कामवाली आली नाही तर भांड्यांचा ढिगारा तसाच नव्हते ना मी ठेवंत, वन्सं सारखा ? घासून टाकायची ना मी लगेच ? मग पुरुषासारखे पुरुष असून, असे हात पाय गाळून काय बसलात ? “जो दुसऱ्यावारी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला” असे तुमच्याच तुकारामांनी म्हंटले आहे ना ? मग ? इनमिन चार जणांच्या संसाराची भांडी ती काय असायची ? माझी ही सिरीयल चालू आहे म्हणून नाहीतर कधीच फडशा पाडला असत्या त्या भांड्यांचा.” बायकोच्या तोंडची ही वाक्ये संपतात न संपतात तोच तो पहिले भांडे समोर ओढून घेतो. तीच कथा धुण्याची, केरकचरा काढण्याची आणि जमीन पुसण्याची. कुठ्ठे कुठ्ठे म्हणून तो कमी पडत नाही. इतकेच नव्हे तर बिछाने घालणे, चादरी, उश्यांची कव्हर्स बदलणे, फुलदाणीतील फुले बदलणे, नित्य नियमाने मनीप्लँटला पाणी घालणे, मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना गोष्टी सांगून झोपवणे, ह्या सर्व शास्त्रांत तो पारंगत झाला आहे. मुलांना झोपवताना अंगाई गीत म्हणण्याचा सराव अजून थोडा व्हायला हवा आहे, हे त्याला जाणवते कारण मुले त्याचे अंगाई गीत संपेपर्यंत विचित्र नजरेने त्याच्याकडे बघतच राहतात असे त्याने अनुभवले आहे.
ही सर्व समानता साधताना, त्याने एकलव्याच्या कुशलतेने, सहनशीलतेने आणि मेहनतीने स्त्रीच्या सर्व विद्या शिकून घेतल्या आहेत. आजच्या आधुनिक नारीला ह्याची जाणीव झालेली दिसत नाही, आणि त्यातच त्याचे यश सामावले आहे. आजची आधुनिक नारी, ह्या समानतेच्या युगात, पुरुषांची कामे करतानाच आता, टीव्हीवरील सिरियल्स बघण्यात, शॉपिंग करण्यात, ब्युटीपार्लरमध्ये जाऊन आपले वय थोपवण्याच्या प्रयत्नात गुंतली आहे, आणि पुरुषाने आजतागायत फक्त तिच्या आणि फक्त तिच्याचसाठी राखीव असलेल्या क्षेत्रात चंचुप्रवेश करून, प्राविण्य मिळविले आहे. आज एकही क्षेत्र असे उरले नाही की ज्यात पुरुषाने स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून आणि गरज पडल्यास तिला बाजूला सारून तिच्याच क्षेत्रात तिला नामोहरम करायचे बाकी ठेवले आहे.
आजचा पुरुष हा, स्वयंपाक, धुणी-भांडी, केर-कचरा, जमीन पुसणे, पोराबाळांना आंघोळी घालणे, त्यांना भरवणे, निजवणे, त्यांचा अभ्यास घेणे इत्यादी सर्व शास्त्रांत निपुण झाला आहे.
पण तरी देखील तो समाधानी नाही –
“आता बाळंत कसे व्हायचे ?” ह्या एकाच चिंतेने त्याला पोखरून टाकले आहे.
मिसळपाव
जमलंय, जमलंय! पॉपकॉर्न घेऊन
In reply to जमलंय, जमलंय! पॉपकॉर्न घेऊन by एस
+१ ;)
In reply to +१ ;) by अत्रुप्त आत्मा
थंड करून माराल हो
मस्त ! एकदम झक्कास लेख .
होईल बाळंतपण पण. चिंता करु
तेवढं लग्न झाल्यावर सासरी
In reply to तेवढं लग्न झाल्यावर सासरी by स्रुजा
घर जावई बनून !
In reply to घर जावई बनून ! by सौन्दर्य
लोल.. लवकर गाठा हो. किती वेळ
'होणार जावई मी त्या घरचा'
वा वा !
घरची गृहिणी, संसार रथाचा भार
In reply to घरची गृहिणी, संसार रथाचा भार by पिलीयन रायडर
भरून आलं !
In reply to घरची गृहिणी, संसार रथाचा भार by पिलीयन रायडर
+१००० परीकथा
In reply to +१००० परीकथा by Maharani
अपमान !
कसली चिंता ???!!!
“आता बाळंत कसे व्हायचे ?” ह्या एकाच चिंतेने त्याला पोखरून टाकले आहे.आँ, चिंता ??? कसली चिंता ???!!! हे तर फार अगोदर अनेक पुरुषांनी करून दाखवले आहे... १. गरोदर राहिलेला पहिला पुरुष २. 'Male pregnancy' figures reveal how 54 MEN gave birth in Australia in the past 12 months ३. इथे अनेक संदर्भ मिळतील : https://www.google.co.in/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=UTF-8#q=man%20gives%20birth%20to%20babyIn reply to कसली चिंता ???!!! by डॉ सुहास म्हात्रे
चला, अंतिम ध्येय देखील गाठले तर !
सर्वांचे आभार.
छानच
In reply to छानच by प्रदीप साळुंखे
अहो
In reply to अहो by सुबोध खरे
आपल्याशी एकमत होत आहे . डोळे पाणावले.
In reply to आपल्याशी एकमत होत आहे . डोळे पाणावले. by मोगा
ह्यॅ
In reply to अहो by सुबोध खरे
अगदी अगदी!!!
शपथ! एवढे गुणी आहेत हल्लीचे
कुठे नेउन ठेवलाय कोनाडा आमचा
व्वा !
खूप मनमोकळे हसू.... सुंदर