कालचीच गोष्ट, संध्याकाळी, सीपी वरून उत्तम नगर साठी मेट्रो घेतली. नेहमीप्रमाणे भयंकर भीड होती. बसायला जागा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. गाडीत आमच्या सारखे पांढरे केसवाल्यांसाठी काही जागा आरक्षित असल्यामुळे, सामान्य जागेवर बसलेला माणूस, सहजासहजी पांढरे केसवाल्याना बसायला जागा देत नाही. काही कारणाने सौ.ने फोन केला. तिच्या सोबत मराठीत बोललो. अचानक समोर बसलेल्या एका तरुणाने अंकलजी, आप बैठिये. म्हणत मला बसण्यासाठी जागा दिली. थोड्यावेळाने तो म्हणाला, आप महाराष्ट्रीयन हो क्या? मी हो म्हणालो. तो पुढे म्हणाला आपके सुरेश प्रभुजी बहुत संवेदनशील और अच्छे इन्सान है. रेल का सफर करने वाले आम आदमी का ख्याल रखते हैं. फक्त टयूटर वर संदेश पाठविण्याची गरज. मग लहान मुलाला दूध पाहिजे असेल किंवा कुण्या तरुणीची गुंड मुले छेड़ काढीत असेल. संकटात सापडलेल्या प्रवासाच्या समस्या ते चुटकीसरशी दूर करतात.
या आधी दिल्लीत मराठी नेत्यांची प्रशंसा मी क्वचितच ऐकली असेल. काही मुंबईकर नेत्यांमुळे, मराठी माणूस म्हणजे परप्रांतीय लोकांशी द्वेष करणारा, या ना त्या कारणाने सतत राडा करणारा. अशी मराठी माणसाची प्रतिमा. पण आज प्रभु साहेबांची प्रशंसा ऐकून माझी छाती चौडी झालीच. एकमात्र खरे, त्यांच्या चांगल्या कार्यामुळे एका अनोळखी तरुणाने, मला बसायला जागा दिली. मी त्याच तरुणाचे आभार मानले. पण मला यात काहीच आश्चर्य वाटले नाही. श्री सुरेश प्रभू प्रधानमंत्री कार्यालयात इंडियन शेरपा म्हणून कार्यरत असताना, मी त्यांच्या अखत्यारीत पीएस जवळपास दीड एक महिना काम केले आहे. त्याच वेळी मला त्यांच्या मानवीय भावनेने परिपूर्ण अश्या संवेदनशील मनाचा अनुभव आला होता.
जुलै, 2014 महिन्यात माझी हृदयाची बाईपास सर्जरी झाली होती. ३ महिन्याची सख्तीची रजा मिळाली. बहुधा वीस-एक सप्टेंबरची तारीख असेल, ऑफिस मधून एका अधिकार्याचा फोन आला. प्रथम शिष्टाचार म्हणून त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. नंतर फोन करण्याचे खरे कारण - अर्थात पटाईतजी आप कब दफ्तर जॉईन कर रहे हो. मी उत्तर दिले, तीन महिन्याची रजा आहे, पूर्ण होताच जॉईन करेल. थोडा जल्दी जॉईन कर सकते हो क्या? मी विचारले, का? माननीय सुरेश प्रभुजी की जी-२० के लिए इंडियन शेरपा के पद पर नियुक्ति हुई है. वह प्रधान मंत्री कार्यालय जॉईन कर रहें हैं. (श्री सुरेश प्रभूंची इंडियन शेरपा या पदावर नियुक्ति झाली आहे, ते शीघ्र कार्यालय ज्वाइन करणार आहेत). अधिकारी पुढे म्हणाले, ते काही रोज कार्यालयात येणार नाही, आले तरी जास्ती वेळ बसणार ही नाहीत. फक्त जी-२०च्या संदर्भात काही मीटिंग्स, चर्चा, मुलाकाती वैगरेह होतील. तुम्हाला सहज जमेल. दोन एक महीने तुमचे आरामात निघून जातील. (दिल्लीच्या सरकारी भाषेत याला चारा फेंकना, असे ही म्हणतात). प्रधानमंत्री कार्यालयात २-३ महीने आरामात निघून जातील, हे काही थोड़े-थोडके नव्हे. मासा गळाला लागला. दुसर्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो. फिटनेस सर्टिफिकेट घेतले आणि कार्यालयात रुजू झालो.
प्रधानमंत्री कार्यालयाचे नाव किती ही मोठे असले तरी इतर सरकारी कार्यालयांप्रमाणे इथे हि जागेची समस्या आहेच . दुसर्या माल्यावर कॅन्टीन आणि किचन(स्वैपाकघर) आहे. किचनच्या उजव्या बाजूचा एक मोठा रूम श्री सुरेश प्रभु साहेबांच्या बसण्यासाठी तैयार केला. शिवाजी महाराजांचे एक मोठे तैलचित्र हि त्यांच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लावण्यात आले. त्यांना केबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला असला तरी स्टाफमध्ये पीएस म्हणून मी आणि एक सिपाही, असे आम्ही दोघेच होतो. एकट्यानेच सर्व काम करायचे होते. तरीही त्यांच्या सोबत काम करताना मला कधीच दडपण जाणविले नाही. इतके सहज होते ते.
एक दिवस दुपारी सव्वादोन वाजता श्री सुरेश प्रभु साहेब कार्यालयात आले. आल्यावर नेहमीप्रमाणे मी त्यांच्या कक्षात गेलो. ते म्हणाले मला भूक लागली आहे, काही मिळेल का? मी म्हणलो साहेब जेवणात काय मागवू. तैयार करायला जास्तीस्जास्त १०-१५ मिनिटे लागतील. साहेब म्हणाले, किचनमध्ये सध्या कुक आणि वेटर जेवतात आहेत, त्यांना त्रास देऊ नका. फक्त चहा आणि ब्रेड सेंडविच मागवा. दुसर्या माल्यावर लिफ्टमधून बाहेर आल्यावर समोरच किचन दिसते. रोज २ वाजता कॅन्टीन बंद होते. दोन ते अडीच या वेळात किचन आणि कॅन्टीनमध्ये काम करणारे कुक आणि वेटर इत्यादी जेवतात. फक्त चहा आणि ब्रेड सेंडविच बनविणारा कॅाउन्टर उघडा असतो. बहुधा साहेबांनी त्यांना जेवताना बघितले असेल. आपण जर जेवणाचा ऑर्डर दिला तर तो पूर्ण करण्यासाठी त्यांना अर्धवट जेवण सोडून उठावे लागेल. साहेबांच्या संवेदनशील मनाला हे पटले नसेल. साहेबांनी केवळ ब्रेड सेंडविचवर आपली भूक भागवली. मला नाही वाटत या आधी वेटर- कुक सारख्या लहान लोकांचा विचार कुणी मंत्री- अधिकारी यांनी केला असेल. त्याच दिवशी त्यांच्या संवेदनशील मनाचा ओलावा मला हि जाणविला.
वाचने
11818
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखन आवडले. छान अनुभव.
लेख आवडला.. पण फारच थोडक्यात लिहिला आहे
हो
In reply to लेख आवडला.. पण फारच थोडक्यात लिहिला आहे by ज्ञानोबाचे पैजार
हेच बोल्तो. शिवसेनेच्या
In reply to लेख आवडला.. पण फारच थोडक्यात लिहिला आहे by ज्ञानोबाचे पैजार
छान अनुभव!
छान अनुभव ! धन्यवाद
वाचनीय
छान अनुभव
सुंदर अनुभव ..
In reply to छान अनुभव by कुसुमिता१
लेखन आवडले
हे खरं आहे का?
मध्यंतरी सुरेश प्रभु यांनी
In reply to हे खरं आहे का? by एक सामान्य मानव
मध्यंतरी सुरेश प्रभु यांनी प्रवाशांच्या अशा वैयक्तिक समस्या स्वतः लक्ष घालून सोडवल्याचे ऐकले होते. सुरेश प्रभु यांच्याबद्दल आदर असुनही स्वतः केंद्रीय मंत्री इतक्या छोट्या बाबतीत स्वतः लक्ष घालतील हे जरा जास्तच वाटलं. कदाचित "अच्छे दिन" वाल्या लोकांची कुजबुज आघाडी असेल असा अंदाज होता. पण खरच ह्या घटना खर्या आहेत का?अश्या गोष्टीत मंत्र्याने अथवा वरिष्ठ अधिकार्याने स्वतः सतत लक्ष घालणे हे शक्य नसते किंवा तसे करणे उत्तम व्यवस्थापक असण्याचे लक्षणही नाही. आपल्या अधिकारातील लोकांच्या सतत डोक्यावर बसून आपल्या विभागाचे काम उत्तम ठेवणे हे कनिष्ठ प्रतीचे व्यवस्थापकीय कौशल्य (स्किल) झाले. "साहेब खुर्चीत अनेक दिवस नाहीत, पण तरीही योग्य प्रणाली कार्यरत असल्याने विभागाचे काम उत्तमपणे चालू आहे", हे उच्च दर्जाचे कौशल्य असलेला व्यवस्थापकच करू शकतो.खुद्द सुरेश प्रभुना सगळि कामे
In reply to मध्यंतरी सुरेश प्रभु यांनी by डॉ सुहास म्हात्रे
हेच मी वर जरा टेक्नीकल भाषेत
In reply to खुद्द सुरेश प्रभुना सगळि कामे by संजय पाटिल
"स्वतः लक्ष घालून" असं स्पष्ट
In reply to हेच मी वर जरा टेक्नीकल भाषेत by डॉ सुहास म्हात्रे
वॉत्सअॅप वर टाइप करत असतील
In reply to "स्वतः लक्ष घालून" असं स्पष्ट by असंका
वॉत्सअॅप वर टाइप करत असतील असं नाही, पण उत्तर किंवा मत त्यांचं स्वतःचं असतं असं वाटतं.हे व्यवहारात "व्यवस्थापकाने मान्यता दिलेले लिखीत धोरण व प्रक्रिया (अप्रूव्ह्ड पॉलिसी अँड प्रोसिजर)" असण्याने व त्याची उत्तम अंमलबजावणी करण्याने साध्य होते. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी सतत हजर असणे गरजेचे नसते. लिखित मान्यताप्राप्त धोरणाबाहेर काही झाले/गेले तरच वरिष्ठ अधिकार्याला संपर्क करून त्याचे मत घ्यावे लागते. उच्च प्रतिचे व्यवस्थापन असलेल्या सर्व खाजगी संस्था हे तत्व वापरतात... भारतातील सरकारी खात्यांत ते अभावानेच आढळते. याचा अर्थ ही बर्याचदा प्रणाली नसते असे नाही, पण स्वतःचे हितसंबंध राखण्यासाठी प्रणाली बासनात गुंडाळून स्वतःची मनमानी केली तरी चालते हे त्यांना अनुभवाने माहीत झालेले असते. असो. तुमचा अनुभव वेगळा असू शकतो.असेच झाले आहे.
In reply to हेच मी वर जरा टेक्नीकल भाषेत by डॉ सुहास म्हात्रे
टीम ट्विट
In reply to खुद्द सुरेश प्रभुना सगळि कामे by संजय पाटिल
सुंदर अनुभव !
+१
In reply to सुंदर अनुभव ! by डॉ सुहास म्हात्रे
असं अपवादाने का होईना चांगलं
शेरपा ?
शेर्पा म्हणजे जी२० मध्ये
In reply to शेरपा ? by रमेश आठवले
उत्तम ओळख
फक्त ट्विटरच का?
In reply to उत्तम ओळख by कपिलमुनी
उत्तम ओळख
कार्यक्षमता
एक छोटीशी सुधारणा...
In reply to कार्यक्षमता by राही
शिवराजजी पाटील चाकूरकर हे
In reply to एक छोटीशी सुधारणा... by ज्ञानोबाचे पैजार
होय
In reply to एक छोटीशी सुधारणा... by ज्ञानोबाचे पैजार
शंकरराव चव्हाण, शिवाजीरव
In reply to कार्यक्षमता by राही
सहमत.
In reply to शंकरराव चव्हाण, शिवाजीरव by प्रसाद१९७१
राम नाईक ,कापसे,
In reply to सहमत. by अभ्या..
प्रा० राम कापसे अंदमानचे नायब
In reply to राम नाईक ,कापसे, by निनाद मुक्काम …
नाथ पै, मधु दंडवते
In reply to राम नाईक ,कापसे, by निनाद मुक्काम …
आणखी काही
In reply to कार्यक्षमता by राही
अगदी अगदी
In reply to आणखी काही by श्रीरंग_जोशी
किस्सा आवडला.
कारण
In reply to किस्सा आवडला. by नगरीनिरंजन
म्हणूनच निराशा वाटते.
In reply to कारण by प्रसाद१९७१
प्रभुंनी कँटीन च्या
In reply to कारण by प्रसाद१९७१
प्रसाद साहेब
In reply to प्रभुंनी कँटीन च्या by सुबोध खरे
+१
In reply to कारण by प्रसाद१९७१
माझ्या ऐकीव माहितीप्रमाने..
असूही शकेल
In reply to माझ्या ऐकीव माहितीप्रमाने.. by मी-सौरभ
असेलच.
In reply to माझ्या ऐकीव माहितीप्रमाने.. by मी-सौरभ
ट्विटर वरुन माननीय
चार लाथा हाणायला हव्यात अशा
In reply to ट्विटर वरुन माननीय by मंदार कात्रे
चार लाथा हाणायला हव्यात अशा दीडशाहाण्यांच्या पार्श्वभागातअसहिष्णुता असहिष्णुता म्हणतात ती हीच..!हा हा हा
In reply to चार लाथा हाणायला हव्यात अशा by मोदक
अनुभव कथन आवडले ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhimmathirigae... ;) :- Srimanthuduढोल
उत्तम लेख