सूर्यसावलीत अडकले रथचक्र
वटवृक्षाच्या सावलीत
खुरटी झालेली झुडपे
बघताना
उगाचच
हरीलाल समोर येतो
अन
सुर्वेमास्तरांच्या सावलीत
कोमेजलेली नासकी
फळे आठवतात.
जगणं हे असचं
असतं का ?
एक सूर्य
अन त्याचे ग्रह
त्यांचे असंख्य उपग्रह
काही शोधलेले तर
काही काळकुपीच्या
मागे दडलेले
पुढे कधीतरी
परप्रकाशित उजेडात
सामोरे येणारे.
संभाजीही असाच
होता का ?
सूर्याचा ग्रह
काहीच माहिती नाही
पण
सूर्यापासून सूर्यप्रकाश
घेवूनही
स्वप्रकाश पसरवून गेला,
काय वाटले असेल त्याला ?
मयूर सिंहासनाची
धूळदाण बघताना
कधीतरी सूर्यापोटी जन्म
घेतल्याचा त्यास
पश्चाताप झाला असेल का ?
सूर्यपुत्र कर्णही तसाच
दुर्दैवी
कवचकुंडलासह जन्माला
येवूनही त्याचे रथचक्र
धरणीत धासावे
काय हे
दुर्दैवविलास कि प्राक्तन ?
शाप आहे का हा
जगण्याच्या
सूर्याच्या सावलीत ?
विजयकुमार.........
१८/१०/२०१०, मुंबई
सुरेख लिहिलंय. आवडली.
सुरेख लिहिलंय. आवडली.
+१
पद्मवति जी
पद्मवति जी
ओह..ओके. हरीलाल...बरोबर,
वा वा खूपच छान!!
सुर्य
तुमच्या सर्व कविता छान असतात
आवडली...