Skip to main content

साधना कालवश

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शुक्रवार, 25/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
साधना कालवश १९६० -१९७० च्या दशकातली त्यावेळच्या तरुणाची धडकन साधना काळाच्या पडद्याआड गेली. १९६० ते ९४ च्या दरम्यान ३०हून अधिक सिनेमातून चमकलेली साधना आज आपल्यात नाही आहे. लव्ह इन सिमला ,एक मुसाफिर एक हसीना,हम दोनो ,वक्त,मेरा साया,वह कौन थी?,मेरे मेहबूब,असली नकली ,प्रेमपत्र, परख ,राजकुमार अशा अनेक गाजलेल्या सिनेमातून त्या वेळच्या बहुतेक आघाडीच्या नायका बरोबर ती चमकली होती . आॅड्रि हेपबर्न च्या धर्तीवर बेतलेला हेअर कट साधना कट म्हणून तरुणाईत एकदम फेमस झाला होता. अनेकाना आपली प्रेयसी साधना कट मध्ये बघणे,आवडे . आमच्या पिढीचं तारुण्य बहरवणार्या त्या मोहक अभिनेत्रीला अखेरचा सलाम !
लेखनविषय:

वाचने 4364
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

अरे... :( वाईट बातमी. मन:पूर्वक आदरांजली. मला साधना कट नसतांनाची साधना जास्ती आवडायची. असली नकली, हम दोनो मधे फारच गोड दिसलीय.

In reply to by पद्मावति

मला साधना कट नसतांनाची साधना जास्ती आवडायची. असली नकली, हम दोनो मधे फारच गोड दिसलीय. तसेच 'परख'मधेही. बाकी गोड दिसण्यापलिकडे ती फारशी अभिनयाच्या भानगडीत पडायची नाही, ते काम तिच्या काळात वहिदा, मधुबाला, मीनाकुमारी ह्यांनी अत्यंत समर्थपणे पेलले, व नंतर मुमताजने. पण त्यावेळच्या इतर अनेक अभिनेते- अभिनेत्र्यांप्रमाणे तिच्या वाट्यास अतिशय सुंदर गाणी आली.

In reply to by प्रदीप

बाकी गोड दिसण्यापलिकडे ती फारशी अभिनयाच्या भानगडीत पडायची नाही
हेहेहेहे बादवे साधना शिवदासानी आपल्या आफताब शिवदासानीची कोण? आडनावाबरोबर गुण ही जुळताहेत. ;)

In reply to by अभ्या..

आफताब शिवदासानी कोण आहेत, ह्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी,'आमच्यावेळी, बरं का मुलांनो' असे आता जे उठताबसता म्हणतात, त्यांच्या जमान्यातील आहे.

In reply to by प्रदीप

प्रदिपराव माफ करा पुण्यात रस्तोरस्ती एका ज्वेलरीशॉपच्या होर्डिंगावर हे महाशय सपत्निक झळकतात म्हणून म्हणले माहित असेल. असो.

In reply to by नाखु

असली नकली, हम दोनो, मेरा साया, एक मुसाफिर एक हसीना, राजकुमार, मेरे मेहबूब, आरजू - असे अनेक आहेत. साधनाची कारकीर्द हिंदी चित्रपटसंगीतच्या सुवर्णकाळाला समांतर असल्यामुळे तिच्या अभिनयापेक्षा गाणी जास्त लक्षात राहात असतील, पण तिच्याकडे अभिनय होता. सायरा बानू, आशा पारेख, बबिता - या तिच्या समकालीन अभिनेत्रींपेक्षा (?) साधना नक्कीच सरस होती. तिच्या आत्म्यास शांती मिळो ही प्रार्थना!

In reply to by बोका-ए-आझम

तुम्हा सर्वांच्या मतांचा आदर आहेच. पण "सायरा बानू, आशा पारेख, बबिता - या तिच्या समकालीन अभिनेत्रींपेक्षा (?) साधना नक्कीच सरस होती". काय बेंचमार्क्स आहेत! माझे मी वर सांगितलेच-- मीनाकुमारी, वहिदा, मधुबाल), मुमताज (आणि नूतन)! असो.

In reply to by प्रदीप

मीनाकुमारी, नूतन, वहीदा, नर्गिस, मधुबाला, वैजयंतीमाला या category मध्ये साधना नव्हतीच. या सर्व अभिजात होत्या.मुमताजही चांगली अभिनेत्री होती. साधनापेक्षा चांगली.

In reply to by अभ्या..

बादवे साधना शिवदासानी आपल्या आफताब शिवदासानीची कोण?
:) ते माहिती नाही पण साधना ही करीना कपूरची आजी होती ( बबीता ही साधनाची भाची) हे माहितेय.

In reply to by पद्मावति

बबिता साधनाची कझिन असा उल्लेख आहे. (आपल्या माहितगारांच्या विकीवर हो) कझिन म्हणजे?????

In reply to by अभ्या..

या चुलतबहिणी होत्या. बबिताचे वडील हरी शिवदासानी हेही चरित्र अभिनेते होते. लव्ह इन सिमला हा बहुतेक १९५५-५६ मध्ये आलेला चित्रपट साधनाचा पहिला हिंदी चित्रपट. अब्बाना या सिंधी चित्रपटात ती पहिल्यांदा पडद्यावर आली.

:(

दोन मुलांची आई वाटावी असा मध्यम (किंवा सुदृढ बांधा) असणार्या नट्यांच्या काळात( मीना कुमारी, वैजयंती माला इ) साधना हि चवळीची शेंग म्हणावी अशी नाजूक आणि मोहक चेहऱ्याची नटी होती.

In reply to by सुबोध खरे

जसे आज काल पन्नाशीचे तीन खान आणी एक अक्षय कुमार हिरो म्हणून पाहवत नाहीत तशीच परिस्थिती तेंव्हा नट्यान्बद्दल होती.

साधना ह्यांना आदरांजली! पडद्यावरील आपल्या प्रतिमेच्या परिघात राहणे मंजूर करून पुन्हा सार्वजनिक आयुष्यात शेवटशेवटपर्यंत पाऊल न टाकलेल्या या अभिनेत्रीला सलाम!

https://youtu.be/VXbJwAstSR4 त्या वेळच्या अनेक गाण्यांच्या बाबतीत ऐकायला अप्रतिम आणि पाहायला धन्यवाद अशी परिस्थिती असायची.पण अपवादात्मक असलेल्या गाण्यांमध्ये हे एक आहे.

ती दिसायला सुंदरच होती. तिला अगदी उच्च प्रतीचा अभिनय येत नसला तरी, चित्रपटांत, विशेषतः, गाण्यांमधल्या अदाकारीत, आपला ठसा उमटवला होता. वाईट वाटले.