Skip to main content

CTRL + C, CTRL + V

लेखक हर_हुन्नरी यांनी शुक्रवार, 25/12/2015 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
CTRL + C, CTRL + V कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट करत राहणाऱ्या आपल्या बोटांना , मनाला , शरीराला कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट ची वाळवी लागून बोटं आणि मन सडून -झाडून जाण्यापूर्वी जवळच्या किंवा लांबच्या समुद्र किनाऱ्यावर जावं अथांग समुद्र किनाऱ्यावर आपला तुकडा शोधून वाळू हातात घ्यावी आणि बांधायला घ्यावा वाळूचा किल्ला किल्ला छोटा की मोठा सहज ठरवावं , किंवा ठरवू ही नये होऊ द्यावा आपणहून बनला तर छोटा , बनला तर मोठा एकासारखा दुसरा बुरुज बनवता येतो का ते पाहावं इथे कॉपी पेस्ट तंत्रज्ञान काम करीत नाही आदिम व्हावं लागतं रेतीचे सूक्ष्म ओले कोरडे चिखलाळलेले कण बनून जावं लागतं खालून वर जाण्यासाठी पायऱ्या बनवाव्यात आता बनल्या पायऱ्या असं वाटून आनंदून जाऊ नये कुठलीशी बारीक चूक होतेच आणि निगुतीनं बनवत आलेल्या पायऱ्या आपसूक कोसळतात आवाज न करता वाळूच्या किल्ल्याची कॉपी करता येत नाही ते ऐतिहासिक , राजकीय दृष्टीने मह्त्वाचे नसतात वाळूच्या किल्ल्याची आवर्जून दखल घेणारे शक्यतो दोनच घटक , वारा आणि पाणी खरा इतिहास लिहिणारे खोटा इतिहास लिहिणारे वाचणारे , अभ्यासणारे कधी वाळूचे किल्ले बनवतात का ? माहित नाही. कणाकणा नं उभे राहून कणाकणा नं विरघळून जातात पुन्हा वाळूचे किल्ले!! विनातक्रार !!
लेखनविषय:

वाचने 2450
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

छान .

मस्तच

आवडली.
खालून वर जाण्यासाठी पायऱ्या बनवाव्यात आता बनल्या पायऱ्या असं वाटून आनंदून जाऊ नये कुठलीशी बारीक चूक होतेच आणि निगुतीनं बनवत आलेल्या पायऱ्या आपसूक कोसळतात आवाज न करता
हे क्लासच. मात्र सुरुवातीचं "CTRL + C, CTRL + V" हे पिवळं का केलं आहे हे कळलं नाही. "आपण ग्रेट, आपले विचार ग्रेट" अशा भ्रमात असणार्‍यांना वाक्ये पिवळी करण्याची गरज भासते. ईतक्या सुंदर कवितेला त्याची गरज नाही. :)

In reply to by सतिश गावडे

नमस्कार ! मी 'मिपा' वर तसा नवीन आहे. कविता लिहित असताना शीर्षक उठावदार दिसावं यासाठी मी काहीतरी निवडलं होतं, मला वास्तविक ते underline करायचं होतं, पण ते असं पिवळ्या रंगाचं दिसेल याची कल्पना नव्हती !! पुढल्या वेळी हे नक्की टाळेन ! कविता लोकांना आवडते आहे हे पाहून आनंद वाटला !

In reply to by हर_हुन्नरी

मलाही याआधी काही वेळेला काही अक्षरे ठळक दिसावी म्हणून बोल्ड करावी लागली तर ती पिवळी झाली होती, असे का? आता नाही होत! :)

इथे कॉपी पेस्ट तंत्रज्ञान काम करीत नाही आदिम व्हावं लागतं रेतीचे सूक्ष्म ओले कोरडे चिखलाळलेले कण बनून जावं लागतं
हे फार आवडलं!