तू म्हणतेस कवितेतल, तुला काही कळत नाही
पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही
हलकी हसतेस नजरेतून, अदा जीव घेवून जाते
मतल्यासह एक सुंदर, गझल सहज होवून जाते
ही बेहोशी सखे, कुठल्या मैफीलीत मिळत नाही,
अन म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही..
मुक्तछंदात बोलताना, गुंफून घेतेस सहज आर्या ,
तुझ्या मात्रा मोजताना, गाते अभंग माझी चर्या,
काय लघु, काय गुरु, हिशोब काही जुळत नाही,
पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही..
कविता म्हणजे काय ग, शहाण्यासारख वागायचं,
थोडं जगात सांगायचं , अन बराच मनात भोगायचं,
आपली कविताही कधी, आपल्यालाच कळत नाही,
पण म्हणून काही आपल, कविता होण टळत नाही..
- शैलेंद्र
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5840
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख. खूप दिवसांनी आलास रे.
सुरेख.
खूप दिवसांनी आलास रे.
धन्यवाद,
In reply to सुरेख. खूप दिवसांनी आलास रे. by प्रचेतस
धन्यवाद,
अरे mac वर टाईप नाही करता येत मराठी
(हा जाहिरातीचा प्रयत्न नव्हे ;) )
छान!
छान!
बर्याच दिवसांनी दिसलास
बर्याच दिवसांनी दिसलास मित्रा. कविता आवडली.
वाचनमात्र होतो, आभार
In reply to बर्याच दिवसांनी दिसलास by किसन शिंदे
वाचनमात्र होतो, आभार
अहाहा.
अहाहा.
ह्याला म्हणायचे काव्य.
अप्रतिम शैलेन्द्रा
सुरेख कविता.
सुरेख कविता.
क्या बात शेलेन्द्र भाई
क्या बात शेलेन्द्र भाई
मजा आली
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
सुंदर कविता !
सुंदर कविता !
धन्यवाद, डेडपूल, एकटा, स्पा,
धन्यवाद, डेडपूल, एकटा, स्पा, मनीषा, पद्मावती, अभ्या
आपली कविताही कधी, आपल्यालाच
आपली कविताही कधी, आपल्यालाच कळत नाही,
सुंदर. :-)
सुरेख.
सुरेख.
सुंदर !
सुंदर !
क्या बात !
हीच हीच कविता !
वा!
खूप छान लिहिलंस!
जबरदस्त
एक तो विशाल्या आणि दुसरा तू....
हाडाचे कवी ( नाहीतर आम्च्या कवीतांनाच हाड हाड म्हणतात)
प्रतिसाद मात्र नाखु
अतिशय सुंदर कविता!
अतिशय सुंदर कविता!
सुरेख ...
पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही...
फारच सुरेख. अप्रतिम काव्य.
एकदम ग्रेट.
कविता फार आवडली. मोजक्या शब्दात खूप सांगून गेली. मस्तच.
खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे
खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे
सुरेख...
सुरेख...
धन्यवाद विशाल
In reply to सुरेख... by विशाल कुलकर्णी
धन्यवाद विशाल
अर्रर्र कवितेवर दाद द्यायची राहीली.
आवडलीय कविता. शेवटच्या चार ओळी तर खासच.
-दिलीप बिरुटे
तुम्ही दाद दिलीय असं समजूनच
तुम्ही दाद दिलीय असं समजूनच
In reply to तुम्ही दाद दिलीय असं समजूनच by शैलेन्द्र
तुम्ही दाद दिलीय असं समजूनच मी प्रवास चालू ठेवतो सर :) :)
सुंदर कविता
सुंदर कविता
मस्त कविता कविराज ...
मस्त कविता कविराज ...