फ्री बेसीक्स - फेसबुकने भारतात पुकारलेले खुले युद्ध ? (विषय नेट न्युट्रॅलिटी)
आजच्या टाइम्स ऑफ इंडीयामध्ये फेसबुकने दोन फूलपेज भरुन फ्री बेसीक्सची जाहीरात केली, खासगी कंपन्यांच्या जाहीराती नेहमीच येतात, फेसबुक या कंपनीने नेटन्युट्रॅलिटी बाबत टाइम्स ऑफ इंडीयातील एडीटोरीयल विरोधात टाइम्स ऑफ इंडीयातूनच जाहीरात दिलीच आहे, टाइम्स ऑफ इंडीया अग्रलेखाने त्यांच्या फेसबुकचे फ्री बेसीक्स मागच्या दाराने नेट न्युट्रॅलिटीवर आघात करत असल्याची आणि त्यासाठी अनसस्पेक्टींग उपयोगकर्त्यांच्या माध्यमातून फ्री बेसीक्स प्रकरण गव्हर्नमेटवर लादण्यावर आक्षेप घेतला त्याला आप्रत्यक्ष जाहीर आव्हान त्यांच्या आजच्या जाहीरातीतून दिले आहे.
भारतीयांसाठी आंतरजालाची मुक्त उपलब्धतेत (Net neutrality) TRAI कडून प्रस्तावित बदल? भूमिका घेण्याचे आवाहन (दुवा:http://www.misalpav.com/node/30953) या धागा चर्चेच्या माध्यमातून आपण सर्वांनी नेट न्युटृएलिटी बाबत मागे चर्चा केली. एखादी गोष्ट विस्मरणात गेली की त्या विषयाची सद्य स्थिती काय आहे हे माहित राहणे दुरापास्त राहते, जाणकारांनी यावर या चर्चेत प्रकाश टाकावाच.
या फेसबुक कँपेन बद्दल मला सर्वाधीक खटकलेली गोष्ट म्हणजे फेसबुक सारखं - अभारतीय मालकीच परकीय माध्यम त्यांचा त्यांच्या भारतातील मोठ्या उपयोगकर्त्या संख्येचा लाभ उठवत भारतसरकारच्या निर्णय प्रक्रीयेवर त्यांना हवा तसा प्रभाव गाजवण्याचा प्रयत्न करते आहे. परकीय कंपन्या सरकार दरबारी टेबला वरून खालून आपला प्रभाव दाखवत नाहीत असे नाही, पण भारत सरकारचे निर्णय फिरवले जावेत म्हणून भारत सरकारवर दबाव आणण्यासाठी स्वतःच माध्यम सर्वसामान्य जनतेला एकच बाजू दाखवून वापरुन घेते, हे आज खुप गंभीर वाटत नाही, फ्रीबेसीक्सच्या माध्यमातून फारतर फार फेसबुकची जाहीरात होईल त्यांचा कस्टमरबेस आणि बिझनेस वाढेल समजा नेटन्युट्रॅलिटी नाही राहीली आणि फेसबुकने बिझनेस वाढवला यात तेवढेही खटकण्यासारखे नाही, सर्वाधिक खटकण्यासारखी बाब ही आहे की एक परदेशी माध्यम तुमच्या देशाच्या सर्वसामान्य जनतेने कशा प्रकारे विचारकेला पाहीजे आणि तुमच्या देशाच्या सरकारने अमुक एकच वागले पाहीजे असा प्रभाव देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने खरेच स्विकार्य आहे का ? फेसबुकच्या स्पर्धेत ट्विटर व्हॉट्स अॅप आदी माध्यमे सुद्धा जॉईन होतील यातील कोणतेही माध्यम उद्या उठून तुम्ही कोणते सरकार निवडून द्यावे आणि कोणते नाही किंवा तुमच्या देशाच्या इतरही निर्णयांवर प्रभाव गाजवण्याचा प्रयत्न करतील, भारतात आलेल्या युरोपीय वसाहतवादाच्यावेळी देशपरत्वे कंपन्या होत्या आता या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, त्यांच्या जाहीरातीकरण्याच्या क्षमतेतून आमाच्या देशातील सर्वसामान्य जनतेची विचारशक्ती ते विकत घेण्याचा प्रयास करत आहेत का आणि त्यात ते यशस्वी होतील का हा अधिक चिताजनक प्रश्न वाटतो. माझी या धागा लेखातील चिंता म्हातारी (नेट न्युट्रॅलिटी) मरण्याची नाही जेवढी काळ (मल्टिनॅशनल कंपन्या) सोकावण्याची आणि परकीय माध्यमांचा प्रभाव भारतीय विचारशक्तीवर वाढेल का याची अधिक आहे.
टाइम्स ऑफ इंडीया एडीटोरीयल
http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/Facebook-is-selling-old-wine-Internet-org-in-a-new-bottle-Free-Basicsusers-be-aware/articleshow/50219009.cms
फेसबुकचा टाईम्स ऑफ इंडीयाने छापलेला रिस्पॉन्स
http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/Facebooks-response-to-Times-of-India-on-Free-Basics/articleshow/50276634.cms
फेसबुकच्या टाइम्स मधील जाहीरातीचा दुवा कसा द्यावा हे माहीत नाही, जाणकारांनी मदत करावी.
धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
फेसबुक या कंपनीने
यातली खरी परिस्थिती काय आहे
१) मेक अन इंडिया म्हणजे काय?
खटकण्यासारखी बाब ही आहे की एक
सध्या काही न्यूज च्यनेल्स ही
एक परदेशी माध्यम तुमच्या
फ्री बेसिक्स का ? इंटरनेट अ
आजची स्वाक्षरी आवडली!
आमचं आम्ही बघून घेऊ!
"हे फ्री इंटरनेट
दुवा
नेट न्युट्रॅलिटी" चा धागा
हहपुवा.
हहपुवा.
दुवा आता अद्ययावत केला.
AIB : Save The Internet 3
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- श्री गुरु दत्ता,जय भगवंता... :- Ajit Kadkadeफ्री बेसिक्स काय भानगड आहे?
फ्री बेसिक्स =
धन्यावाद !!!
अपडेट्स
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ला.ला.ला... :) :- PoiWhat Facebook is doing to
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कितना मुश्किल है देखो,इस दुनिया में दिल लगाना... ;) :- Agni Sakshiफेसबुक आणि व्हॉटस अप
स्वत:च्या अपत्यापेक्षा
आजच्या मटामध्ये आलेला लेख
ह्या जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही........