Skip to main content

मदत

लेखक मयुरMK यांनी मंगळवार, 22/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मला मिसळपाव वरील नवीन लेखन वाचण्यास अडचणी येत आहे एरर आसे दिसत आहे मदत पानावर सुद्धा प्रतिसाद जाऊ शकत नाही मदत हवी Error The website encountered an unexpected error. Please try again later.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3746
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

सध्या ही अडचण सर्वांनाच जाणवते आहे. लवकरच ही तृटी दूर करतो.

In reply to by मयुरMK

जमलं तर कृपया इत्यादी विनंती वाचक शब्दांचा वापर करायची सवय करा. पुणेरी भाषेत स्पष्टच सांगायचं झालं तर इथे कुणी तुमच्या घरचे नोकर नाहीत. कधीकधी गैरसोय होते त्याची मानसिक तयारी ठेवा.

In reply to by रामपुरी

हा प्रतिसाद म्हणजे खाजवून खरूज काढण्याचे उत्तम उदाहरण आहे. 'मदत हवी' ह्या शब्दात ते मदतीची याचना करत आहेत. त्यांनी कुणालाही कुठेही आदेश दिल्याचे धाग्यात दिसले नाही. केवळ समस्या नमूद केली आहे. . 'हे कॄपावंता, दीनशीला मला जगात भारी मराठी संस्थाळ मिपा वापरण्यास अडचण येत आहे, ती कॄपया दूर करावी अशी मी विनंती करतो. असं झाल्यास मी आपला सात जन्मासाठी ॠणी राहीन आणि माझ्या कातड्याचे जोडे करून चरणकमलांशी वाहीन' असा धागा काढायला हवा होता का?

In reply to by आदिजोशी

" ही अड़चण लवकर दूर करा :)" याला आमच्या भाषेत सौजन्य म्हणत नाहीत. तुमच्यात म्हणत असतील. असो तुमची खरूज खाजविल्या बद्दल क्षमस्व..

In reply to by आदिजोशी

रच्याकने "विनंती" आणि "आदेश" यात फरक असतो. जमल्यास समजून घेणे. तेवढंही झेपलं नाही तर सोडून दिलं तरी चालेल.. :) :)

In reply to by रामपुरी

ओ रामपुरी भौ, भौ आहेत का आणखी कोणी कुणास ठाऊक! थोड़ी भेलपुरी पाठवून देता का? बा द वे , त्या रामपुरीने बटाटे चिरता का दाढ़ी करता? आजच्यापुरते सौजन्य बस्स!

In reply to by रामपुरी

'पुणेरी भाषेत' स्पष्टच सांगायचं झालं तर इथे कुणी तुमच्या घरचे नोकर नाहीत.>>>>>>>>>>>>> सॉरी हं! आजपर्यंत मी या भाषेला मराठी भाषाच समजत होतो!

कोण म्हणत असहिष्णुता वाढलीये ?? इथे फाटेल एर्रोर वरही धागे निघताहेत!