जिथे ' मी ' ची जाणीव आहे , तिथे ' अहंकार ' उपजतो .जिथे ' अहंकार ' उपजतो , तिथे ' भय ' उत्पन्न होते .जिथे ' भय ' असते , तिथे ' संदेह ' निर्माण होतो .जिथे ' संदेह ' असतो , तिथे 'अपयश ' हमखास येते .जिथे ' अपयश ' आहे , तिथे ' कष्ट ' कार्य्ण्याची तयारी असावी .जिथे ' कष्ट ' आहेत , तिथे ' प्रामाणिकपणा ' रुजतो .जिथे ' प्रामाणिकपणा ' आहे , तिथे ' आशा ' आहे .जिथे ' आशा ' आहे , तिथे ' प्रकाशाचे ' अस्तित्व आहे.जिथे ' प्रकाश ' आहे , तिथे ' श्रद्धा ' आहे.जिथे ' श्रद्धा ' आहे , तिथे ' विश्वास ' आहे.' विश्वास ' हा ' स्वानुभवातून ' निर्माण होतो .हाच 'स्वानुभव' , 'स्वानुभूति ' घडवतो .जिथे ' स्वानुभूति ' आहे , तिथेच ' सत चित आनंद ' किंवा 'शुद्ध परमानंद ' चा वास असतो . जिथे ' सत चित आनंद ' आहे , तिथे ' मी ' पणा नाही .जिथे ' मी ' नाही , तिथे अहंकार , भय , संदेह , यशापयश ,आशा निराशा , अंधार प्रकाश , श्रद्धा अश्रद्धा , विश्वास अविश्वास असे कोणतेच द्वैत नाही .
तिथे फक्त निरुगुन निराकार अद्वैत सत चित आनंदच असतो .हाच तो श्री कृष्णाने गीतेत वर्णन केलेला ‘ अति प्राचीन ’ .त्या निर्गुणाचे वर्णन करणे इथपर्यंतच शक्य आहे , कारण त्यापलीकडे फक्त ' असणे ' अस्तित्वात आहे आणि काही नाही .
हे 'असणे ' आपल्या मुळाचे मुळ , साराचे सार आहे . तेच अद्वैत आहे , अक्षर व अमृत आहे , त्याला न आदी न अंत . ते अजन्मा आहे . हे सर्व व्यापून काळालाही उलंघून तरी उरलेले असे हे एकमेवाद्वित्या आहे . ते अमर्याद आहे आणि ते अनेक रुपात स्वतःला प्रकट व व्यक्त करते .
हेच ते ब्रम्ह तत्व , परमात्मा , ॐ .
तोच मी .
दृष्टी , वाक , स्पर्श ,गंध , श्रोत्र , मन व बुद्धी यांच्या ही पलीकडचा .
Where There is 'I' there is 'Ego '
वाचने
7168
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओके.
ओके.
धन्यवाद
In reply to ओके. by प्रचेतस
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद
विश्वव्यापी
हे बरोबर नाय हां !
In reply to ओके. by प्रचेतस
हे बरोबर नाय हां ! प्रोत्साहाण कुठाय ?
इन ट्युन विथ द ट्युन वाचलंय
In reply to हे बरोबर नाय हां ! by सस्नेह
इन ट्युन विथ द ट्युन वाचलंय का?
नाही वाचलं. वाचायची गरज नाही,
In reply to इन ट्युन विथ द ट्युन वाचलंय by अजया
गरज नाही,
....कारण 'तोच मी' !
वाचलंय?
In reply to इन ट्युन विथ द ट्युन वाचलंय by अजया
वाचलंय?
हॅ हॅ हॅ ..
त्यांनीच लिहीलंय..
=))
In reply to वाचलंय? by गवि
=))
इन ट्युन विथ द ट्युन वाचलंय का?
In reply to इन ट्युन विथ द ट्युन वाचलंय by अजया
अजया जी,
इन ट्युन विथ द ट्युन मी वाचलेले नाही अजून .
पण गूगल वर मला ' इन ट्यून विथ द इंफायनाईट ' हे पुस्तक सापडले .
आपल्याला तेच म्हणायचे होते का ?
आपला आभारी आहे .
विश्वव्यापी
थोडे अधिक लिहिता येईल का?
याविषयी थोडे अधिक लिहिता येईल का? जिथे अहंकार असतो तिथे भय नक्की कसे उत्पन्न होते?
म्हणजे या सगळ्याचा सारांश--- 'मी' ची जाणीव असेल तर कष्ट करायची तयारी असावी. 'मी' ची जाणीव असणे आणि कष्ट करायची तयारी असणे या दोन गोष्टींचा अर्थाअर्थी संबंध समजला नाही. कष्ट करायची तयारी तशीही असलीच पाहिजे-- मग 'मी' पणा असला किंवा नसला तरी.
जिथे अहंकार आहे तिथे भय आहे
In reply to थोडे अधिक लिहिता येईल का? by गॅरी ट्रुमन
मला असे म्हणावेसे वाटले याचे कारण की ' मी ' पणा आला की माणसाचा ' अहंकार '
फोफावतो . मी कर्तृत्ववान , मी बुद्दीवान , मी मोठा , मी श्रीमंत , मी करता ! मग तो ' अहंकार ' टिकवण्यासाठी सतत धडपडत असतो . त्याला सतत स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याची गरज भासते .त्याला आपल्या पेक्षा कोणी वरचढ असेल ही कल्पना सुद्धा सहन होत नाही .आपल्या पेक्षा ही कोणी श्रेष्ट नाही ना ? याचे भय तो अजाणतेपणी का असेना सतत बाळगून असतो . म्हणून म्हंटले जिथे अहंकार आहे तिथे भय आहे.
.एकदा ट्रेन मधून प्रवास करत असताना हे विचार मला येत होते ते मी इंग्रजीत लिहून काढले .आमचे असे झाले आहे की धड ना इंग्रजी येत ना धड मराठी अशी माडली स्तिती .त्यामुळे शब्द नेमके सापडत नाहीत .खाली मुळ इंग्रजीत लिहिलेले देत आहे .
Where there is 'I' there is ‘Ego’.
Where there is 'Ego' there is 'Fear'.
Where there is ‘Fear’ there is ‘Doubt'.
Where there is 'Doubt' there is 'Failure'.
Where there is 'Failure' there 'Hard Work' is required.
Where there is ' Hard Work' there is 'Honesty'.
Where there is 'Honesty' there is 'Hope'.
Where there is 'Hope' there is 'Light'.
Where there is 'Light' there is 'Faith'.
Where there is 'Faith' there is 'Belief'.
Where there is 'Belief' it comes from 'Self Experience'.
This 'Self Experience' leads to 'Self Realization'.
Where there is ‘Self Realization’ there is ‘Sat Chit Anand or Pure Eternal Happiness’ .
Where there is ‘Sat Chit Anand’ there is no ‘I’.
Where there is no ‘I’
There is no ‘Ego’ ,’Fear’, ‘Doubt’ , ‘Failure’, ’Hard Work’, ‘Honesty’, ‘Hope’, ‘Light’, ‘Faith’, ‘Belief’ or the exact opposites of all these .
There is only ‘Sat Chit Anand’.
This is the closest any one can come to describing ‘HIM’ relatively,for further to this there is only ‘IS’ & nothing else !
This ‘IS’ is the ‘ROOT’ of our root .
The ‘ESSENSE’ of our essence .
The infinitesimal ‘BEGINNING’ of that ‘SINGULARITY’ which is unbegun .
It is Imperishable & Unborn,
It transcends ‘Time’ & ‘Space’.
It is ‘Infinite’ and manifests & expresses itself in infinite ways.
This is referred to as …..
‘Atman’,‘Paramatman’ , ‘Brahma’ ,’Parabrama’ , ’ॐ’,'Allah','Almighty'
अशी ही गम्मत आहे . असो .
आपल्या अभिप्राया बद्दल खूप आभारी आहे .
फिडबॅक लूप?
म्हणजे 'मी' ची जाणीव -> अहंकार -> भय -> संदेह -> अपयश -> कष्ट करायची तयारी* -> प्रामाणिकपणा -> आशा -> प्रकाश -> श्रध्दा -> विश्वास - स्वानुभव -> स्वानुभूति -> सत चित आनंद/शुध्द परमानंद -> 'मी पणा नसणे'
*: हा जरा फिडबॅक लूपसारखा प्रकार दिसत आहे.कष्ट करायची तयारी असली तर मग त्यातून 'मी' पणा नसण्यापर्यंत प्रगती होऊ शकते असे वरील आकृती दर्शविते. त्यातही स्वानुभव हा स्वतंत्र अस्तित्व असलेला प्रकार आहे का? कारण एकीकडे स्वानुभव विश्वास निर्माण करतो आणि दुसरीकडे स्वानुभवातून शुध्द परमानंदही मिळतो आणि त्यातून मीपणा नसणे ही पायरी गाठता येते.
याचा फ्लोचार्ट काढून बघणे खूपच रोचक ठरेल.
गॅरी भाऊ - तुम्ही फारच
In reply to फिडबॅक लूप? by गॅरी ट्रुमन
गॅरी भाऊ - तुम्ही फारच सिरीयसली घेतले आहे ह्या धाग्याला.
त्यामुळे माझ्या मनात हे 'भय' निर्माण झाले आहे की आपल्या धाग्याला गॅरी सारखे सिनियर मिपाकर सिरीयसली घेतात ह्या मुळे विश्वव्यापी यांच्या मनात 'अहंकार', 'दर्प' निर्माण होइल. आपण जे लिहीतो आहोत ते लोक वाचतात असा 'गैरसमज ' पण त्यांच्या मनात तयार होईल आणि ते सातत्यानी असले धागे पाडत रहातील.
गॅरी भाऊ - तुम्ही फारच सिरीयसली घेतले आहे ह्या धाग्याला.
In reply to गॅरी भाऊ - तुम्ही फारच by प्रसाद१९७१
प्रसाद जी ,
मी एक साधारण मुमुक्षु आहे . अध्यात्म हा विषय आवडतो पण पूर्ण कळतो असे अजिबात नाही .
समजून घेण्याचा हव्यास मात्र खूप आहे . वेळ मिळेल तसे वाचन करतो आणि मग विचार शृंखला सुरु होतात . या विचारांची देवेन घेवेन करण्यास मला कोणी जवळची व्यक्ती नाही .मित्र खूप आहेत पण त्यांना या विषयात रस नाही . मिपा हा एक असा सापडला की ज्यावर मी आपले विचार मांडू शकतो व त्यावर प्रतिसाद ही मिळतात . त्यातूनच नवे शिकायला मिळते . मला ठाऊक आहे मी माझे विचार अगदी वरवरचे आहेत खोल नाहीत पण जी माझी कुवत आहे तसेच मला सुचणार . पण इथे मिपावर मात्र मला प्रतिसाद मिळतात ज्यामुळे माझ्या विचारणा नवीन वाटा मिळतात . यातच मला आनंद आहे .
आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप धन्यवाद
सारांश
जे पिंडी ते ब्रह्मांडी!!
विकारांची निर्मीती कशी होते
विकारांची निर्मीती कशी होते ह्याचे सुंदर सार गीतेच्या ह्या दोन श्लोकात आहे. संजायते, उपजायते आणि अभिजायते ही विशेषण युक्त क्रीयापदांचा वापर पण विशेष लक्ष देऊन बघण्यासारखा आहे. मॉडर्न सायकॉलॉजी पेक्षा ही मुळातुन विचार आहे.
ध्यायतो विषयांपुंसः संगस्तेषूपजायते
संगात्संजायते काम: कामात्क्रोधोभिजायते
क्रोधात्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतीविभ्रमः
स्म्रूतिभ्रशाद बुद्धीनाशो बुद्धीनाशात प्रणश्यति
संजायते, उपजायते आणि अभिजायते
In reply to विकारांची निर्मीती कशी होते by प्रसाद१९७१
हे जरा समजावून सांगाल का?
मला फार वर्षापूर्वी एका
In reply to संजायते, उपजायते आणि अभिजायते by सतिश गावडे
मला फार वर्षापूर्वी एका विद्वान माणसानी सांगितले होते ते जेव्हडे आठवते आहे ते सांगतो ( चु भु क्षमा असावी )
उपजायते : म्हणजे बायप्रॉडक्ट म्हणुन बरोबरीने जन्म घेणे. एखाद्या गोष्टीबद्दल चा सतत विचार ( ध्यास ) चालू झाला की त्या बरोबर अॅटॅचमेंट आपोआप बायप्रॉडक्ट म्ह्णुन जन्म घेते.
संजायते : जन्म देणे, काम ( आपल्या स्वार्थासाठी/ सुखासाठी एखादी गोष्ट वापरुन घेण्याची इच्छा ) जन्मतो संगती पासुन.
अभिजायते : जन्म घेणेच, पण हा जन्म असा की तो थांबवता येत नाही. काम निर्माण झाला की क्रोध निर्माण होणारच, तो थांबवू शकत नाही.
अतिशय सुंदर लिहिलं आहे.
अतिशय सुंदर लिहिलं आहे.
संसार दु:खानी त्रासलेल्या मर्त्य मानवांना भवसागरातून तरून जाण्यासाठी ही अमृतवाणी दिशा दर्शनाचे काम करेल याबद्दल माझ्या मनी संदेह नाही.
हा भवसागर म्हणजे काय? तो कुठे
In reply to अतिशय सुंदर लिहिलं आहे. by सतिश गावडे
हा भवसागर म्हणजे काय? तो कुठे असतो? मर्त्य मानव ह्यातून तरून जाण्यासाठी कुठली नौका वापरतात?
भव = संसार
In reply to हा भवसागर म्हणजे काय? तो कुठे by प्रचेतस
भव = संसार
भवसागर = संसाररूपी सागर
मानवाचे जीवन हा भवसागर आहे
मर्त्य मानव ह्यातून तरून जाण्यासाठी ईश्वर भक्तीची नौका वापरतात.
ओके.
In reply to भव = संसार by सतिश गावडे
ओके.
डेव्ही जोन्स नामक एक नावाड्यांचा कप्तान 'फ्लाईंग डचमन' नामक नौका ह्याच कारणासाठी वापरत होता म्हणे.
मग
In reply to भव = संसार by सतिश गावडे
नास्तिक हे 'मर्त्य' नसतात का ?
असतील तर ते कोणती नौका वापरतात ?
(अज्ञानी)
स्नेहांकिता
नास्तिक विज्ञानरूपी लाइफ
In reply to मग by सस्नेह
नास्तिक विज्ञानरूपी लाइफ जॅकेट घेऊन पोहत पार करतात. दमणार्याला शेजारची एखांदी नौका उचलते.
नास्तिकाश्रमाचे बुकिंग चालू
In reply to नास्तिक विज्ञानरूपी लाइफ by अभ्या..
नास्तिकाश्रमाचे बुकिंग चालू आहे.
.
.
संपर्क : श्री श्री श्री अभ्यानंदजी
स्वतः सश्रद्ध असताना
In reply to नास्तिकाश्रमाचे बुकिंग चालू by अभ्या..
स्वतः सश्रद्ध असताना नास्तिकाश्रमाचे बुकिंग चालू योग्य नव्हे. देव तुम्हाला पाप करेल.
आता यात नास्तिक कुठून आले? :(
In reply to मग by सस्नेह
आता यात नास्तिक कुठून आले? :(
येणार कुठून ?
In reply to आता यात नास्तिक कुठून आले? :( by सतिश गावडे
ऑल्रेडी आहेत ना येथे !
माझ्या अल्पशा ज्ञानानुसार
In reply to येणार कुठून ? by सस्नेह
माझ्या अल्पशा ज्ञानानुसार नास्तिकांना नौकेची गरज नसते. त्यांच्या म्हणण्यानूसार एकदा आयुष्य संपले की मृत देहाची माती/राख होते. ती इथेच मातीत मिसळून जाते. त्यास नौका वगैरे लागत नाही.
साधू -->लंगोट--> उंदीर--
साधू -->लंगोट--> उंदीर-->मांजर-->दूध--> गाय--> चारा--> जमीन--> हिशोब--> पसारा--> बायको--> साधू ...
Where There is 'I' there is 'Ego '
हे बाकी खर आहे,जे लोक ipad, iphone वापरतात त्या लोकां मध्ये ego असतो
Where There is 'I' there is 'Ego '
हे बाकी खर आहे,जे लोक ipad, iphone वापरतात त्या लोकां मध्ये ego असतो
अक्षरश: सहमत. आयफोन वापरणारे
In reply to Where There is 'I' there is 'Ego ' by आरोह
अक्षरश: सहमत. आयफोन वापरणारे अशा अविर्भावात वागत असतात तो फोन नसून त्यांच्या समृद्धीचे, उच्च अभिरुचीचे प्रतिक आहे.
त्या साधनांत "i" (मी)
In reply to Where There is 'I' there is 'Ego ' by आरोह
त्या साधनांत "i" (मी) असल्याने "ego" (अहं) आपोआपच त्यांच्याबरोबर येत असेल ;) :)
I see ;)
I see ;)
I GO , I GOING , I GONE !
I GO , I GOING , I GONE !
Where there is EGO........
Where there is EGO........ There are achievements.
Where there is EGO........ There are achievements. प्रतिसाद द्य
Viju Bhau,
Konachya achievements?
You will find achievers who have done better than others. Does the world change from personal achievements?
What did Alexander achieve.
I don't deny materialistic pleasures as they are part and parcel of this life. They should be necessarily enjoyed but nothing to be boasted about. It is because of one's circumstances these achievements happen.
One should not forget the real goal of one's life. That is one real & only achievement one should dream to achieve & ego is a big hurdle in it. Infact it is impossible to concur one's ego. May be one in a million may be able to do this. Concuring our ego I feel would be the 2nd best achievement of our life.
Warm Regards
Vishvavyapi
शब्द, शब्द, शब्द
शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द, शब्द,
बापुडे, केवळ वारा.
In reply to शब्द, शब्द, शब्द by पैसा
बापुडे, केवळ वारा.
अहंकाराला नको थारा
In reply to बापुडे, केवळ वारा. by यशोधरा
अहंकाराला नको थारा
निरर्थक पसारा सारा!
In reply to अहंकाराला नको थारा by सतिश गावडे
निरर्थक पसारा सारा!
निरर्थक पसारा सारा!
In reply to निरर्थक पसारा सारा! by यशोधरा
कस अगदी बरोब्बर म्हणालात.
आणि याच पसारयात आपण सर्व राहतो
आपापल्या धारणां सकट, आपआपले अहंकार जोपासत,अपयशाचे भय बाळगुन, श्रद्धे व साधने अभावी.
हा पसाराच जणू परम सुख व हेतू बनलाय आपला.
प्रत्येका च्या अंतरमनात, अंतरंगात जणू एकच विचार!
" कहीं उसकी कमिज मेरे कमिज से सफैद तो नही? "
अरे मग Tide वापरा न, तुमची कमिज सुद्धा सफेद होईल की,उगाच त्याची कमिज काळी करण्या मागे का लागला आहात तुम्ही.
पण हा Tide वेगळा आहे बरका! आपण TV वर बघतो तो नव्हे. हा साधनेचा Tide(भरती) आहे. तो आपल्या पसार्यातला अहंकार नष्ट करतो व सारे स्वच्छ करतो.
:-)
तुम्हीही या मायेत अडकून हा
In reply to निरर्थक पसारा सारा! by विश्वव्यापी
तुम्हीही या मायेत अडकून हा लेख टाकलातच की.
तुम्हीही या मायेत अडकून हा लेख टाकलातच की.
In reply to तुम्हीही या मायेत अडकून हा by सतिश गावडे
मी हे मान्य केलेच आहे की. मी ही ह्या मायेच्या पसार्यातला एक हिस्सा आहेच. नाही असे कुठे म्हणालो मी. ही सर्व मायाच आहे ह्यात राहूनच तिच्या पासुन अलिप्त रहाण्याची शिकवण आपल्याला संत जनांनी दिली आहे. त्यांनी स्वानुभवातून सांगितलेल्या गोष्ठी चूक नसणारच.
मी Tide वापरायला सुरूवात केली आहे,एवढेच. हळू हळू का होईना माझा पसारा स्वच्छ होवो ही प्रार्थना आहे.
नमस्कार
पण आपली कमीज काळी आहे असे का
In reply to निरर्थक पसारा सारा! by विश्वव्यापी
पण आपली कमीज काळी आहे असे का मानायचे म्हणे?
प्रत्येका च्या अंतरमनात,
In reply to पण आपली कमीज काळी आहे असे का by यशोधरा
असे लिहिले आहे.
:-)
म्हणजे कंपॅरिटिव्हली
In reply to प्रत्येका च्या अंतरमनात, by विश्वव्यापी
म्हणजे कंपॅरिटिव्हली उसकीस्कमीजसे काळीच की नाही? किंवा कमी सफेद असे म्हणू फारतर. तसे तरी का समजायचे?
शब्द
In reply to शब्द, शब्द, शब्द by पैसा
शब्दांच्या दुनियेत शब्दांचा बाजार , शब्दांचे मनोरे शब्दांचेच मिनार
शब्दांनी केले शब्दांना साकार , शब्दांनीच दिला शब्दांना आकार
शब्दांची घरटी , शब्दांचा संसार , शब्दांनीच केला शब्दांचा संहार
शब्दांनी घातला शब्द शब्दांच्या पोटी ,शब्दांची ओहटी.. कधी शब्दांची कोटी
शब्दांचा आभास , निश्वास शब्दांचा , शब्दांचेच प्रेम , दुस्वास शब्दांचा
शब्दांनीच घातल्या आहेत टोप्या शब्दांना ,शब्दांचीच मात्रा लागू पडली शब्दांना
शब्दांनीच केले आहेत शब्द व्यक्त ,शब्दांचेच मींधे आहेत शब्द अव्यक्त
भ्रम शब्दांचा शब्दांची माया , शब्दांनीच पालटते शब्दांची काया
शब्द गोड नी कटू शब्द ,शब्द खरे नी खोटे शब्द
शब्दांची किमया आहे ही फक्त शब्दांची !
शब्द ..पुढे , शब्द मध्ये नी मागे ... शब्द
:-)
Kharech Aahe ki!
शब्द
In reply to शब्द, शब्द, शब्द by पैसा
शब्दांच्या दुनियेत शब्दांचा बाजार , शब्दांचे मनोरे शब्दांचेच मिनार
शब्दांनी केले शब्दांना साकार , शब्दांनीच दिला शब्दांना आकार
शब्दांची घरटी , शब्दांचा संसार , शब्दांनीच केला शब्दांचा संहार
शब्दांनी घातला शब्द शब्दांच्या पोटी ,शब्दांची ओहटी.. कधी शब्दांची कोटी
शब्दांचा आभास , निश्वास शब्दांचा , शब्दांचेच प्रेम , दुस्वास शब्दांचा
शब्दांनीच घातल्या आहेत टोप्या शब्दांना ,शब्दांचीच मात्रा लागू पडली शब्दांना
शब्दांनीच केले आहेत शब्द व्यक्त ,शब्दांचेच मींधे आहेत शब्द अव्यक्त
भ्रम शब्दांचा शब्दांची माया , शब्दांनीच पालटते शब्दांची काया
शब्द गोड नी कटू शब्द ,शब्द खरे नी खोटे शब्द
शब्दांची किमया आहे ही फक्त शब्दांची !
शब्द ..पुढे , शब्द मध्ये नी मागे ... शब्द
:-)
Kharech Aahe ki!
बास आता. लैच बोअर
In reply to शब्द by विश्वव्यापी
बास आता. लैच बोअर
बास आता. लैच बोअर
In reply to बास आता. लैच बोअर by अभ्या..
:-)