Skip to main content

तुझ्यासाठी..........

लेखक एक एकटा एकटाच यांनी शनिवार, 19/12/2015 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
तु सोडुन गेलेल्या वाटांवरती, आता मी देखिल फिरकत नाही तुला सोबत न घेउन आलेलं, बहुदा त्यांनाही ते आवडत नाही अशी आल्यापावली माझी कितीदा परत पाठवणी केलीय त्यांनी.................तुझ्यासाठी तु दिसत नसलेल्या सांजेपासून, बेलगाम उधळलाय तो प्रत्येक ओहोटीशी झुंज देत, तुझ्या शोधात निघालाय तो हर भरतीला वेड्यापरी सगळे किनारे पिंजुन काढलेत त्याने....................तुझ्यासाठी आजकाल तु या गावात नसतेस, हे बहुदा कळलयं आहे त्याला खुणेच्या सगळ्या जागांवर अडला, तरी भेटली नाहीस त्याला आजही तुझ्या आठवसरीं डोळ्यांत साठवुन पुन्हा पुन्हा दाटुन येतो तो............तुझ्यासाठी तुला काही फरक पडला नसला, तरी तो खरचं उध्वस्त झालाय खिडकीत तुझी वाट पाहुन, कित्येकदा ओसरीवरुनच परत गेलाय जाताना मात्र सवयीने अंगणात पारिजातकाचा सडा सांडत जातो तो...........तुझ्यासाठी हे सगळे माझ्याकडे "तुला" मागतात्, पण मी दाद देत नाही तुला गमावल्याचा दोष मला लावतात्, तरी मी काहीच बोलत नाही तुझ्या प्रतारणेच्या जखमा उरात दडवून आता कायमचा शांत झालोय मी..........तुझ्यासाठी
लेखनविषय:

वाचने 2144
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by एक एकटा एकटाच

अशी मैफल जमवावी किंवा त्यात सहभागी व्हावे असे खूप आधीपासून वाटते आहे पण कधी योग जुळालाच नाही. मिपावरच किंवा मिपाकरांसोबत बाहेर कुठेही काव्यकट्टा करायला आवडेल. सध्यातरी पिं.चिं. मध्ये भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि संमेलनपूर्व संमेलनात भाग घेणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे! तिथेही कदाचित मिपाकरांपैकी कोणाला भेटता येईल. Sandy

अजून टोकदार होऊ देत हाच आशय. दिल का हर घाव भरने लगता है तेरी आवाज है की मरहम. -दिलीप बिरुटे

हे खूप आवड्ले.... खासच .. तुला काही फरक पडला नसला, तरी तो खरचं उध्वस्त झालाय खिडकीत तुझी वाट पाहुन, कित्येकदा ओसरीवरुनच परत गेलाय जाताना मात्र सवयीने अंगणात पारिजातकाचा सडा सांडत जातो तो...........तुझ्यासाठी