१९८२ मुंबई गिरणी संप आणि गिरणी कामगाराचे पर्याय
मुबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी कारणीभूत ठरलेला आणि अडीच लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या १० लाख कुटुंबियांना देशोधडीला लावणारा हा संप मानला जातो. डॉ. दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखालील या संपाने जसे कामगारांच्या अभूतपूर्व एकीचे दर्शन घडवले तसेच सरकार,नोकरशाही,उद्योगपतीच्या अमानवी वृत्तीचे देखिल.तसेच गिरणी कामगाराची अधिकृत संघटना मानल्या गेलेल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाची भूमिका देखील संपाच्या बाबत संशयास्पद मानली जाते. १८५४ मध्ये सुरु झालेल्या ताडदेव च्या कावसजी नानाभाई दावर यांच्या बॉम्बे स्पिंनिंग अंड वेंविंग मिल पासून सुरु झालेला आणि मुंबईला तीच सिटी ऑफ गोल्ड किताब मिळून दिलेला कापड उद्योग कालौघात कधी नामशेष झाला हे जनसामान्यांना कळलच नाही .
मुंबई गिरणी संपाविषयी वाचताना मला एक गोष्ट निदर्शनास आली कि जेव्हा संप अयशस्वी होतोय याची चिन्ह दिसताना गिरणी कामगारांनी textile industry व्यतिरिक्त इतर पर्याय शोधायचा प्रयत्न का केला नाही?किंवा केला असेल तर की आणि तो का यशस्वी झाला नाही?
म्हणजे आपण म्हण तो कि मराठी जनसंख्येच मोठ स्थलांतर या संपामुळे घडून आल. मध्य मुंबईतून उपनगरमध्ये सरकवा लागल .पन त्याच वेळी मराठी मानसा व्यातिरिक्त पूर्ण भारतातून मात्र लोकसंख्या मुंबई मध्ये येत होती आणि स्थिरस्थावर होत होति. त्यांनी अस की केल कि ते मुंबईत तगून राहिले आणि प्रगती पण केली.इथे मराठी अमराठी हा मुद्दा इथे नाहीय पण कपडा उद्योग व्यतिरिक्त दुसरा सक्षम पर्याय शोधण्यात मध्ये मराठी कामगार कमी पडले का?किवा जे लोक एवढ्या दुरून येउन इथे यशस्वी झाले त्यांनी कुठल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलं?
अडीच लाख गिरणी कामगारांपैकी निदान निम्म्या कामगारांना तरी रोजगार मिळवून देण्यासाठी काही प्रयत्न केले गेले का(इतर उद्योगांमध्ये). कारण जर माझ्या तर्काप्रमाणे मला माझ्या क्षेत्रात रोजगार संधी नसतील तर मी नक्कीच पर्याय शोधेन किवा त्यासाठी लागणारे कौशल्य मिळवायचा प्रयत्न करेन. संप हा योग्य मागण्यासाठीच केला गेलेला होता अस माझ मत आहे जे चुकीच देखील असू शकेल.(माहितगार त्या विषयातील जास्त माहिती देऊ शकतील) त्या संपाची अखेर दुर्दैवी झाली हे शेवटी वास्तव आहे. पण राहून राहून हाच विचार सारखा त्रास देत राहतो जेव्हा गिरणगावातील बंद गेट्स आणि राहिलेले गिरण्याचे अवशेष मी बघतो. का दुसरा पर्याय शोधायचा प्रयत्न आपल्या लाखो कामगार बांधवांनी केला नाही?
मला कल्पना आहे कि लेख एकदम छोटा झालाय .पन जेवढ आणि जस सुचाल ते जमेल त्या शब्दात मांडायचा प्रयत्न केलय. मिपाकार समजून घेतील हि आशा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मला वाटते
सहमत !पण तरीही
एवढ्या manpower चा खूप विधायक
हागदी बरोबर. सहमत.
बरोबर आहे
यावर फारपुर्वी मिपावर एक लेख
१९८२ च्या गिरणीकामगार
लस्ट फॅार लालबाग- विश्वास
धन्यवाद
रंजक मांडणीसाठी "चंद्रमुखी"
अगदी अगदी...
या कादंबरीवरच महेश
पुस्तकही आहे
https://m.youtube.com/watch?v