Skip to main content

बुलेट ट्रेनचा अट्टाहास का?

लेखक गॅरी ट्रुमन यांनी रविवार, 13/12/2015 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या भारत दौऱ्यात कालच ९८,८०५ कोटी रूपयांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बांधायच्या करारावर सही झाली. ९८,८०५ कोटी रूपये म्हणजे सध्याच्या भावाने सुमारे १५ बिलिअन डॉलर होतात. अन्य एका बातमीप्रमाणे बुलेट ट्रेनचा खर्च १५ बिलिअन डॉलर आहे. त्यापैकी ८०% म्हणजे १२ बिलिअन डॉलरचे कर्ज जपानची Japan International Co-operation Agency देणार आहे अशी बातमी आहे. हे कर्ज ०.१% व्याजाच्या दराने ५० वर्षे मुदतीचे असेल आणि मुद्दलाची परतफेड १५ वर्षांनंतर सुरू होणार अशी बातमी आहे. भारत सरकारला २०% म्हणजे सुमारे २० हजार कोटी रूपये या प्रकल्पात टाकावे लागतील आणि उरलेले सुमारे ८० हजार कोटी कर्जाऊ असतील. या कर्जाचे व्याज ०.१% आहे. सरकारच्या इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०.१% इतका कमी नक्कीच नसेल विशेषत: भारत सरकारच्या बॉंडवर ७-८% व्याजाचा दर आहे हे लक्षात घेता. तरीही आकडेमोडीच्या सोयीसाठी इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०% आहे आणि व्याजाचा दर ०.१% आहे असे समजू. या बातम्या वाचून काही प्रश्न माझ्यापुढे पडले आहेत. १. सुरवातीचे १५ वर्ष ८० हजार कोटींवरील व्याज म्हणजे ८० हजार कोटी गुणिले ०.१% = ८० कोटी रूपये द्यावे लागेल. ती रक्कम विशेष मोठी नाही. त्यानंतर कर्जाची एकूण ३५ वर्षात परतफेड करायची आहे. अशा पायाभूत सोयींसाठीच्या प्रकल्पावरील कर्जाची परतफेड बहुतांश वेळा बलूनिंग (सुरवातीला कमी आणि जशी वर्षे जातात त्याप्रमाणे जास्त) असते. या परतफेडीचे आकडे याक्षणी माझ्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी ३५ वार्षिक हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड होईल असे गृहित धरू. वार्षिक हप्ता सुमारे २,३२७ कोटी रूपये इतका येईल. प्रत्यक्ष हप्ता सुरवातीला २,३२७ कोटींपेक्षा कमी आणि नंतर जास्त असेल. म्हणजे बुलेट ट्रेनचे उत्पन्न दिवसाला २,३२७ कोटी भागिले ३६५ बरोबर ६.३८ कोटी रूपये असेल आणि बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तरच बुलेट ट्रेन वार्षिक हत्प्याला लागतील तितके पैसे उभे करू शकेल. २. आज मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुमारे २५ रेल्वेगाड्या दररोज धावतात. यात अहमदाबादपर्यंत जाणाऱ्या आणि अहमदाबादमार्गे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये जाणाऱ्या गाड्यांचा समावेश होतो. मुंबई-अहमदाबाद रेल्वे प्रवासाला आज ८-९ तास लागतात. तर त्याच प्रवासाला विमान सव्वा तास (आणि चेकीन टाईम इत्यादी धरून २ तास घेते). जर बुलेट ट्रेन दोन तासात अहमदाबादला पोहोचवणार असेल तर त्या ट्रेनचा Target Group सध्या विमानाने प्रवास करणारे प्रवासीच असतील-- सध्या ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी नव्हे. सध्या मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर २१ विनाथांबा विमाने दररोज उडतात. एका विमानात २०० प्रवासी असे धरले तर सगळी विमाने १००% भरली तर ४,२०० प्रवासी दररोज विमानाने मुंबई ते अहमदाबाद प्रवास करतात. अर्थातच दररोज सगळी विमाने १००% भरत नसतात. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी दररोज ४,००० प्रवासी प्रवास करतात असे समजू. इथे समजते की २०११-१२ ते २०१२-१३ या काळात देशातील सर्व विमानतळावर मिळून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सुमारे ४% ने घट झाली होती. AAI च्या संकेतस्थळावर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही मिळतील. ते करायला याक्षणी वेळ नाही. चर्चेत इतर मुद्दे आले आणि त्यामुळे गरज लागली तर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही तपासून सांगतो. संपूर्ण देशात त्या एका वर्षात डोमेस्टिक प्रवाशांच्या संख्येत ४% घट झाली असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा कमी असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा जास्त असेल. उदाहरणाच्या सोयीसाठी आपण असे समजू की पुढील १५ वर्षात मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पट होईल-- म्हणजे दर वर्षी सुमारे ४.७३% ने प्रवासी संख्या वाढेल. म्हणजे १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद प्रवास करू इच्छिणारे दररोज ८००० प्रवासी असतील. तितकेच प्रवासी उलट दिशेनेही प्रवास करतील असे गृहित धरू. म्हणजे दररोज १६,००० प्रवासी मुंबई-अहमदाबाद मार्गावर विमानाने प्रवास करू इच्छितील असे गृहित धरू. ३. आज प्रवासाच्या एक दिवस आधी विमानाचे तिकिट विकत घेतले तर ते ४,००० रूपयांपासून उपलब्ध आहे. पुढील १५ वर्षे दरवर्षी सुमारे ७.५% ने तिकिटांचे दर वाढतील असे गृहित धरले तर आणखी १५ वर्षांनी ते तिप्पट म्हणजे १२,००० रूपयांपासून तिकिटे उपलब्ध होतील. आणि अर्थातच तिकिटे १०-१५ दिवस आधी विकत घेतल्यास ती आणखी स्वस्तही मिळतीलच. आज १५ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास ते २,००० रूपयांना उपलब्ध आहे. म्हणजे १ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास जितके पैसे मोजावे लागतील त्याच्या अर्धी रक्कम!! हेच गुणोत्तर १५ वर्षांनीही राहिल असे गृहित धरले तर तिकिटे ६ ते १२ हजार रूपयांमध्ये मिळतील. सरासरी तिकिटाची किंमत १० हजार रूपये समजू. म्हणजेच आणखी १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद विमान प्रवासासाठी सर्व प्रवासी दररोज १६ हजार गुणिले १० हजार बरोबर १६ कोटी रूपये खर्च करतील. यातही किती गृहितके आहेत हे वर आपण बघितलेच. बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तर वार्षिक हप्त्याला लागतील तितके पैसे उभे करायला दररोज ६.३८ कोटी रूपये इतके उत्पन्न बुलेट ट्रेनला मिळायला हवे. आणि अर्थातच बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य नक्कीच नसणार. बुलेट ट्रेनला अगदी ४०% फायदा होणार (तिकिटांमधून मिळणारे उत्पन्न वजा Operating Costs) असे धरले तरी बुलेट ट्रेनचे दररोजचे उत्पन्न ६.३८ भागिले ४०% बरोबर १५.९५ कोटी रूपये हवे. याचाच अर्थ अन्यथा विमानाने प्रवास केला असता त्या सगळ्या प्रवाशांना बुलेट ट्रेनने आपल्याकडे आकर्षित करायला हवे. विमानापेक्षा जास्त तिकिट बुलेट ट्रेन ठेऊही शकणार नाही. आणि बुलेट ट्रेनला अंडरकट करायला विमानकंपन्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर तिकिट कमी ठेऊन प्रवासी बुलेट ट्रेनकडे वळणार नाहीत याची काळजी घेतीलच. या सगळ्या गणितामागे किती liberal गृहितके घेतली आहेत हे समजून येईलच. एक तर दरवर्षी ४.७३% ने पुढील १५ वर्षे प्रवासीसंख्या वाढेल हे प्रचंड धाडसी गृहितक आहे. तसेच प्रत्येक विमानात ४०००/४२०० = ९५% प्रवासी भरलेले असतात हे गृहित धरलेले आहे. प्रत्यक्षात हा आकडा सरासरी ८०% च्या आसपास असतो. आणि मुख्य म्हणजे Return on Equity ०% धरला आहे. प्रत्यक्षात तो ७-८% असेल. तेव्हा ही बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती तर होणार नाही ही शंका वाटते. अशाप्रकारच्या प्रकल्पात अनेक प्रकारचे इतर फायदे (externalities) असतात. प्रदूषण कदाचित काही प्रमाणात कमी होईल.त्या व्यतिरिक्त आणखी कुठले फायदे बुलेट ट्रेनने होतील यावर बराच विचार केला. पण ते फायदे सापडले नाहीत. मला वाटते की बुलेट ट्रेनवर खर्च करण्यापेक्षा प्राधान्याने हाती घेण्याजोगे इतर अनेक पायाभूत प्रकल्प आहेत. ५०० किलोमीटर अंतरासाठी सुमारे १ लाख कोटी म्हणजे किलोमीटरला २०० कोटी इतका प्रचंड खर्च या प्रकल्पात आहे. त्यामानाने रस्ते दर किलोमीटरमागे ६ ते ६.५ कोटी (आणि डोंगरदऱ्या असतील तर थोडे अधिक-- मुंबई ते अहमदाबाद मार्गावर तोपण प्रश्न नाही) इतका खर्च येतो. प्रवासासाठी वेळेची बचत म्हणाल तर ती पण फार होताना दिसत नाही. कदाचित विमानप्रवासाला लागणारा वेळ आणि बुलेट ट्रेनला लागणारा वेळ यात विशेष फरक असेल असे दिसतही नाही. वर्तमानपत्रातील सर्व बातम्या तरी मुंबई-अहमदाबाद प्रवासाचा वेळ २ तास होईल असेच म्हणत आहेत. विमानालाही (चेकीन टाईम वगैरे धरून) तितकाच वेळ लागतो की. बुलेट ट्रेनचा अट्टाहास का लावला जात आहे हेच अजून मला तरी समजलेले नाही. ज्या बी.के.सी मध्ये बुलेट ट्रेनचे स्टेशन होणार असे म्हटले जात आहे त्या बी.के.सी मध्येच संध्याकाळी वाहतुकीची किती कोंडी होते हे त्या भागात दररोज ऑफिसला जाणारा कोणीही सांगू शकेल. मग या समस्या आधी सोडविल्या जाणे अधिक महत्वाचे नाही का? मुंबईतील बंदरे (मुंबई आणि उरण) येथून मालगाड्यांना प्रवासी रेल्वेगाड्यांमुळे बाजूला टाकले जाते आणि त्यामुळे मुंबई ते दिल्ली या प्रवासासाठी मालगाड्यांना काही दिवस लागतात. त्यामुळे मुंबई ते दिल्ली या मार्गावर केवळ मालगाड्याच जाऊ शकतील असा Dedicated Freight Corridor करणे, Delhi-Mumbai Indistrial Corridor वगैरे कामांना प्राधान्य न देता बुलेट ट्रेनचा मुद्दा ऐरणीवर का आणला जात आहे हे समजण्यापलीकडचे आहे. माझ्या हातून काही मुद्दे निसटत आहेत का? या विषयावर साधकबाधक चर्चा व्हावी-- विशेषत: मोदीभक्त विरूध्द मोदीद्वेष्टे असे स्वरूप या चर्चेला न आले तर फारच उत्तम. मिपावरील जाणकारांचे याविषयी काय मत आहे?

वाचने 116564
प्रतिक्रिया 254

प्रतिक्रिया

In reply to by लॉरी टांगटूंगकर

मंद्या साहेब, तुमच्या वरच्या प्रतिसादाबद्दल एक शंका. इधे अवंातर असली तरी कृपया उत्तर द्याच. अमेरीका, जपान, चीन, जर्मनी, द. कोरीया, फ्रान्स या सर्व ‘प्रगत’ समजल्या जाणार्या देशांवर त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या पटीत कर्ज अाहे म्हणता, तर या प्रत्येकाला कर्ज देतं कोण? भारत, अफगाणीस्तान, बांगलादेश यांसारखे गरीब देश? मला अर्थशास्त्र समजत नाही, त्यामुळे अगदीच प्राथमिक असली तरी शंका अाहे, कृपया उत्तर दयावे.

In reply to by स्वधर्म

डेफिसीट कव्हर करायला बहुतांश वेळा वल्ड ब्यान्केकडून किंवा बॉन्ड इश्यू करून सरकार कर्ज उचलते.

मला लोकांना एकाच सांगावेसे वाटते कि शौचालये किंवा शाळा बांधण्यासाठी जपान तुम्हाला पैसा देणार नाही तो तुम्हाला स्वताच्या खाराचानेच बांधायला लागणार आहेत. तेंव्हा तुमच्या खिशातील पैसे देऊन या गोष्टी तुम्ही करा आणी श्री मंद्या यांनी लिहिल्याप्रमाणे जेंव्हा तुम्ही हे पैसे परतफेड करायला लागल तेंव्हा त्याचे नक्त मुल्य बरेच कमी असेल. उदा. मी जेंव्हा माझ्या घराचे कर्ज घेतले तेंव्हा त्याचा हप्ता महिन्याच्या पगाराच्या ४० % होता तोच हप्ता आता ( मी जर लष्करात राहिलो असतो तर) माझ्या पगाराच्या १० % इतका कमी झालेला आहे. तेंव्हा पैशाचे मुल्य कमी होते हे लक्षात असावे

In reply to by सुबोध खरे

तेंव्हा पैशाचे मुल्य कमी होते हे लक्षात असावे जी माणसे व राष्ट्रे ही "टाईम व्हॅल्यु ऑफ मनी" संकल्पना जाणून त्यावर आपले निर्णय घेतात, तीच सधन बनतात असा इतिहास आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जी माणसे व राष्ट्रे ही "टाईम व्हॅल्यु ऑफ मनी" संकल्पना जाणून त्यावर आपले निर्णय घेतात, तीच सधन बनतात असा इतिहास आहे.
डॉक्टरसाहेब, मी सध्या अन्य क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी मी हाडाचा फायनान्सवाला आहे. टाईम व्हॅल्यु ऑफ मनीच्याच तत्वावरून मी या सगळ्या शंका उभ्या केल्या आहेत. सर्व चर्चेस मी आणखी एक अ‍ॅन्करींग पॉईंट देतो. १ लाख कोटी रूपयांमधून सुमारे १५,००० मेगावॉटचे वीजप्रकल्प उभे करता येतील. प्रकल्प १००% Plant Load Factor वर चालत असेल तर दरवर्षी १ मेगावॉटमधून ८७.६ लाख युनिट वीज निर्माण करता येते. कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पांचा Plant Load Factor कोळसा उपलब्ध असेल तर ९०-९२% असतो. आकडेमोडीच्या सोईसाठी तो ८०% धरू. म्हणजे १ मेगावॉटमधून ७० लाख युनिट निर्माण करता येईल. एक युनिट अगदी ३ रूपयांना जरी म्हटले तरी १ मेगावॉटमधून सुमारे २ कोटी रूपये टॉपलाईन होते. म्हणजे १५००० मेगावॉट प्रकल्पातून दरवर्षी ३०,००० कोटी रूपयांची वीजविक्री करता येईल. वर्षाला ३०,००० कोटी म्हणजे दिवसाला ८२ कोटी रूपये झाले. हे सगळे आकडे १५ वर्षांनंतरचे नाहीत तर ते आजचे २०१५ मधले आहेत. आणखी १५ वर्षांनंतर हे आकडे त्याच प्रमाणात वाढतील. आज २०१५ मध्ये बुलेटची तिकिटे अगदी २०,००० रूपये जरी ठेवली तरी आज दिवसाला ८२ कोटी रूपयांचा revenue मिळवायला ४१,००० प्रवासी दररोज लागतील. जर तिकिटांचे दरही Time Value of Money प्रमाणे वाढतील असा दावा असेल तर त्याचप्रमाणे आजची दिवसाची ८२ कोटी रूपयांची frame २०३० मध्ये त्याच Time Value of Money प्रमाणे वाढणारच आहे. मान्य आहे की टॉपलाईनपेक्षा नफा हे तुलना करायला अधिक योग्य प्रमाण ठरेल. मी जितके वीजप्रकल्प बघितले आहेत त्यावरून सांगतो की वीजप्रकल्पांचा नफा १०-१५% पर्यंत असतो. कुठलीही Transport System तितका फायदा करते का? तिकिट २०,००० रूपये हा आकडा मोठा वाटत असेल आणि तो समजा ५,००० केला तर प्रवाशांची संख्या दररोज ४१,००० वरून १,६४,००० वर जाईल. सध्या तरी एक बुलेट ट्रेन जास्तीत जास्त १६३४ प्रवासी वाहून नेऊ शकते. म्हणजे दिवसाला १००-- मुंबईहून सुटणाऱ्या दिवसाला ५० म्हणजे प्रॅक्टिकली दर अर्ध्या तासाला एक बुलेट सोडावी लागेल. आज अहमदाबादला जाणाऱ्या दिवसाला सुमारे २५ रेल्वेगाड्या आहेत--म्हणजे तासाला एक रेल्वेगाडी सुटते. त्याच्या दुप्पट फ्रिक्वेन्सीने बुलेट सोडाव्या लागतील. हे realistic वाटते का? तेव्हा इतके तिकिट भरून प्रवास करायला तयार होणारे इतक्या मोठ्या प्रमाणावरील प्रवासी हे मार्केट पुढील १५ वर्षात विकसित होईल हे नक्की कोणत्या आधारावर?

In reply to by गॅरी ट्रुमन

तुमचे लेखन अभ्यासपूर्ण असते याबाबत शंका नाहीच. तसे या अगोदरही मी लिहीले आहे. मात्र याबाबतीत माझे म्हणणे काय हे या वरच्या एका प्रतिसादावर अवलंबून न ठेवता, माझ्या इथल्याच सर्व प्रतिसादांचा एकत्रित विचार केल्यास ते जास्त स्पष्ट होईल. त्या प्रतिसादांची पुनरुक्ती न करता, सोईसाठी त्यांचे दुवे खाली देत आहे... http://www.misalpav.com/comment/784010#comment-784010 http://www.misalpav.com/comment/784029#comment-784029 http://www.misalpav.com/comment/783956#comment-783956 माझ्या मते या प्रकल्पाने होणार्‍या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभावाची सीमा (आणि म्हणूनच फायदेही) केवळ रेल्वे उद्योग/सेवेपेक्षा खूप जास्त विस्तारीत व दूरगामी असेल. म्हणून, ते सर्व (प्रभाव व फायदे) विचारात घेतल्याशिवाय या प्रकल्पाच्या उपयोगितेचे अंदाज (केवळ रेल्वे सेवेच्या रुपाने होणारा फायदा-तोटा पाहून) करणे ठीक होणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा प्रतिसाद क्लिंटन यांच्या वरच्या प्रतिसादाला होता. चूकून इथे पडला.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हो तुमच्या प्रतिसादालाही उत्तर लिहिणारच आहे. मी तीन दिवस बाहेरगावी असल्यामुळे अनेक प्रतिसादांवर काही लिहिता आलेले नाही. ते पुढील दोनेक दिवसात लिहितो.

In reply to by गॅरी ट्रुमन

क्लिंटन भाऊ, मुद्देसूद मांडणी नेहमी प्रमाणे - धाग्याच्या मूळ लेखात आणि प्रतिसादांत १. Fermi's question approach - Case solving approach (उदा.: शिकागो / न्यूयॉर्क मध्ये पियानो टयुन करणारे किती जण असतील. यात काही माहिती घेऊन, assumptions करत एक लॉजिक तयार करायचं अशी पद्धत असते. तुम्ही या पद्धतीच्या केस मध्ये वाकबगार आहात हे बर्याच प्रतिसादातून दिसलं आहे. या अत्यंत नीट मांडणी मुळे त्यातील assumptions पूर्णतः validate होत नाहीत (अवघड आहे. मराठी शब्दरचना आठवत नाहीये) २. उदाहरणः १५००० मेगावॅट प्रकल्प.. Ultra Mega Power Plant in India are of 4000 MW या आकडे मोडी मध्ये प्रकल्पाबरोबर वितरणाची कॉस्ट धरायला हवी. वितरणात होणारे मोठ्या प्रमाणातले लॉसेस विचारात घेऊन प्रत्यक्ष उत्पन्न कमी करायला लागेल. आणि १६७४ सीट च्या बारकाव्या प्रमाणे वीज प्रकल्पाची आकडे मोड करायला लागेल. तेव्हा ते कमी lucrative वाटू शकतं ३. मान्य आहे की टॉपलाईनपेक्षा नफा हे तुलना करायला अधिक योग्य प्रमाण ठरेल. मी जितके वीजप्रकल्प बघितले आहेत त्यावरून सांगतो की वीजप्रकल्पांचा नफा १०-१५% पर्यंत असतो. कुठलीही Transport System तितका फायदा करते का? सरकारची योजना ही पूर्णतः बॉटम लाईन वर अवलंबून असू शकत नाही. रेल्वे मध्ये सुचवलेल्या आणि उपयुक्त अशा अनेक गोष्टींनी लगेच रेल्वेला निव्वळ नफा होईल काय? तो होणार नसेल तर सुधारणा करू नयेत का लोकांच्या सोयी आणि गरजेसाठी कराव्यात? तरीही हे मान्य की रेल्वे सारख्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या खाजगी प्रमाणे काटेकोर पणे चालवल्या नाहीत तर डबघाईला येतात. पण सार्वजनिक सुविधांना सर्वच्या सर्व नियम नफा किंवा त्याहून महत्त्वाच्या - परतावा किंवा ROI वर आधारित करता येतील का? ३. या वीज प्रकल्पांसाठी लागणारे १ लाख कोटी रुपये किती व्याज दराने आणि किती कालावधीसाठी कोणाकडून मिळणार आहेत - cost of finance - ०.१% व्याज आणि ५० वर्षांशी तुलना करता. ५. बुलेट ट्रेन पेक्षा इतर सुधारणा कराव्यात - ट्रॅक्स, विदयुतिकरण, सुरक्षा वगैरे २०१५ रेल्वे बजेट - फेब्रुवारी २०१५ मध्ये सादर केलेले. http://www.indianrailways.gov.in/railwayboard/uploads/directorate/finan… PROPOSED INVESTMENT PLAN (2015-2019) Item Amount (Rs in crore) Network Decongestion (including DFC, Electrification, Doubling including electrification and traffic facilities) 199320 Network Expansion (including electrification) 193000 National Projects (North Eastern & Kashmir connectivity projects) 39000 Safety (Track renewal, bridge works, ROB, RUB and Signalling & Telecom) 127000 Information Technology / Research 5000 Rolling Stock (Locomotives, coaches, wagons – production & maintenance) 102000 Passenger Amenities 12500 High Speed Rail & Elevated corridor 65000 Station redevelopment and logistic parks 100000 Others 13200 TOTAL 8,56,020 वरचे आकडे पाहिले तर लक्षात येईल की या बुलेट ट्रेन पथदर्शी प्रकल्पाच्या तुलने इतके किंवा त्याहून मोठे आकडे मूलभूत गोष्टीं मध्ये गुंतवले जात आहेत आणि तेही ५ वर्षाच्या कालावधीत. ५० वर्षांच्या मुदती साठी नव्हे. त्यामूळे चर्चेतले बुलेट ट्रेन विरोधातील इतर मुद्दे यात बरखास्त होतात. बुलेट ट्रेन तरीही पांढरा हत्ती ठरू शकतो. विकत घ्यायला परवडला पण पोसायला नाही असा. पण असाच विचार राजधानी / शताब्दी च्या वेळीही झाला होता. मुंबई अहमदाबाद हा पथदर्शी प्रकल्प असावा. ज्यावरून भविष्यातील प्रकल्पांसाठी खर्च, परतावा, रचना, भारतीय परिस्थितीनुसार बदल, सुधारित प्लॅनिंग किंवा चक्क "नो गो" निर्णय याचा प्लॅन करता यावा.

In reply to by मैत्र

यु.एम.पी.पी चा मुद्दा कोणीतरी काढेल ही अपेक्षा होतीच. त्यामुळे मुद्दामून मी १५,००० मेगावॉट प्रकल्पाचा उल्लेख केला. यु.एम.पी.पी चे बिडिंग झाले होते त्यात अगदी १.१९ रूपये पर युनिटने वीज विकायला तयार असलेल्या कंपन्या होत्या. त्याचे कारण काय? नव्या सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानामुळे वीज बनवायचा खर्च इतका कमी झाला का? तो खर्च काही प्रमाणात जरूर कमी झाला आहे पण तो खर्च अर्ध्यावर आलेला नाही. जेव्हा कुठलीही गोष्ट बाल्यावस्थेत असताना नवे तंत्रज्ञान येते तेव्हा खर्च असा झपाट्याने कमी होतो. कोळशावर आधारीत वीजनिर्मिती या त्या मानाने मॅच्युअर्ड गोष्टीमध्ये नवे तंत्रज्ञान आले म्हणून खर्च कमी झाला तरी तो कमी होणारा खर्च इन्क्रिमेन्टल असतो. तो इतका झपाट्याने कमी होत नाही. मग यु.एम.पी.पी मध्ये १.१९ रूपये पर युनिटने वीज विकायला कंपन्या कशा तयार झाल्या? त्याचे कारण यु.एम.पी.पी मध्ये या कंपन्यांना कोळशाचा कॅप्टिव्ह ब्लॉक देण्यात येणार होता. म्हणजे कोळशाचा खर्च या कंपन्यांना नव्हता. वीज निर्मितीमध्ये सुमारे ७०% खर्च कोळशाचाच असतो. तो खर्च नाही म्हटल्यावर १.१९ ने वीज द्यायला कंपन्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. दुसरे म्हणजे जेव्हा कंपनी ३ रूपये पर युनिट या दराने वीज विकेल असे म्हणते तेव्हा पुढे किती लॉसेस होतील वगैरे याचा अंदाज घेऊनच विकत असते. म्हणजे १०० युनिट जनरेट केले पण त्यातले ९८ च ट्रान्स्मिशन कंपनीला विकता आले तर ज्या २ युनिटचा लॉस झाला आहे त्याचा अंतर्भाव ३ रूपये प्रतियुनिट या भावात असतो. तीच गोष्ट ट्रान्स्मिशन कंपनी डिस्ट्रीब्युशन कंपनीला आणि डिस्ट्रीब्युशन कंपनी ग्राहकांना वीज विकते तेव्हा मध्ये किती लॉसेस होतील हे बघून त्याप्रमाणेच बील आकारणी केली जाते.
सरकारची योजना ही पूर्णतः बॉटम लाईन वर अवलंबून असू शकत नाही. रेल्वे मध्ये सुचवलेल्या आणि उपयुक्त अशा अनेक गोष्टींनी लगेच रेल्वेला निव्वळ नफा होईल काय? तो होणार नसेल तर सुधारणा करू नयेत का लोकांच्या सोयी आणि गरजेसाठी कराव्यात?
अगदी १००% मान्य. नाही १०००% मान्य. अशा प्रकल्पांमध्ये Positive Externalities असतात. त्यामुळे पूर्ण बॉटमलाईनवर विसंबून राहणे योग्य नाही.मुद्दा हा की बुलेटपेक्षा कमी खर्चात त्याच Positive Externalities देणारे अन्य प्रकल्प आहेत का? आणि ते असल्यास बुलेट हे दिसायला भव्यदिव्य असणारे काम आताच का घेण्यात येत आहे? जर सरकारने पूर्ण फुकटात क्वालिटी शिक्षण दिले तर त्याला मी अगदी हिरीरीनेच समर्थन देईन (जर का ती क्वालिटी राहणार असेल तर). कारण हेच. असा खर्च केला तर त्यामुळे प्रचंड Positive Externalities भविष्यात होतील आणि तेच समाजाच्या हिताचे असेल. पण सरकारने एखाद लाख कोटी रूपये खर्च करून ऑलिम्पिकमध्ये ५० सुवर्णपदके यावीत यासाठी सोयीसुविधा निर्माण केल्या तर त्या गोष्टीला मी विरोधच करेन. कारण हेच. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके मिळणे चांगलेच आहे.पण त्यासाठी पेकिंग ऑर्डरमध्ये इतर बर्‍याच वर असलेल्या गोष्टींपेक्षा ऑलिम्पिकमधल्या सुवर्णपदके मिळविणे इतके महत्वाचे आहे का? तेव्हा माझा मुद्दा त्याच पेकिंग ऑर्डरशी संबंधित आहे असे समजा.
वरचे आकडे पाहिले तर लक्षात येईल की या बुलेट ट्रेन पथदर्शी प्रकल्पाच्या तुलने इतके किंवा त्याहून मोठे आकडे मूलभूत गोष्टीं मध्ये गुंतवले जात आहेत आणि तेही ५ वर्षाच्या कालावधीत. ५० वर्षांच्या मुदती साठी नव्हे. त्यामूळे चर्चेतले बुलेट ट्रेन विरोधातील इतर मुद्दे यात बरखास्त होतात.
ही ८ लाख ५६ हजार कोटींची गुंतवणुक प्रस्तावित म्हणून पुढील पाच वर्षात करायची आहे असे म्हटले आहे. अशा प्रस्तावित गुंतवणुकीपैकी नक्की किती टक्के गुंतवणुक प्रत्यक्षात उतरते याचा काही विदा वगैरे आहे का? म्हणजे ८ लाख ५६ हजार कोटींची जी गुंतवणुक प्रस्तावित अशी म्हटली आहे त्यापैकी सगळी गुंतवणुक प्रत्यक्षात थोडीच उतरणार आहे? दुसरे म्हणजे भारतातील प्रकल्पांमध्ये वेळेत पूर्ण न होणे आणि त्यामुळे आणि अन्यथाही आधी जितका खर्च अपेक्षित होता त्यापेक्षा खर्च प्रत्यक्षात जास्त होणे हे प्रकार अगदी सर्रास घडतात. मुळात लाख कोटींचा प्रकल्प असेल तर त्यावरील खर्च लाख कोटीच राहिल की वाढेल? तो वाढल्यास जपानी संस्था वाढीव कर्ज का देईल? म्हणजे तो पैसा करदात्यांनाच द्यावा लागणार. तिसरे म्हणजे ही लाख कोटींची गुंतवणुक ५० वर्षांसाठी असली तरी त्यात चलनातील विनिमय दरांची रिस्क असणार आहे. गेल्या २५ वर्षात भारतीय रूपयाचे किमान चार पटींनी अवमूल्यन झाले आहे. याच वेगाने रूपया पडत राहिला तर कर्ज परत करायची वेळ येईल तेव्हा कर्ज ८० हजार कोटी नाही तर त्यापेक्षा ३-४ पटींनी जास्तही असेल. त्यातून भारताला निर्याताभिमुख अर्थव्यवस्था बनवायचा सरकारचा इरादा असेल तर रूपया नाजूकच ठेवण्याकडे कल असणार. मान्य आहे की या कर्जाच्या रकमेचे हेजिंग होईल. पण असे कुठलेही हेजिंग (विशेषतः जेव्हा रक्कम बिलिअन डॉलर्समधेय जाते तेव्हा) फुकटात होत नसते. हेजिंगसाठीही आपल्यालाच खर्च येणार आहे. त्यामुळे वरकरणी ०.१% इतकाच व्याजाचा दर दिसत असला तरी हेजिंगवरील खर्च लक्षात घेता तो वाढेलही. तेव्हा आजचे ८० हजार कोटी १५ वर्षांनंतर विशेष वाटणार नाहीत असे म्हणणार्‍या सर्वांनाच मला हा एक प्रश्न विचारायचा आहे. ८० हजार कोटींचे कर्ज तेवढेच राहिल असे एक implicit assumption त्यात आहे. ते विनिमय दरांमुळे वाढेल ही शक्यता ध्यानात घेतली आहे का?

In reply to by गॅरी ट्रुमन

ट्रुमन साहेब मी अभियंता नाही अर्थतज्ञ तर नाहीच नाही. परंतु आपली काही गृहीतके चुकीची आहेत १) जपान आपल्याला कर्ज सध्याची रेल्वे सुधारण्यासाठी देणार नाही. तेंव्हा त्या पैशात कोणता प्रकल्प उभा रहल आणि त्याचा किती नफा निघेल हा हिशेब येथे गैरलागू आहे २) पैशाची कालानुरूप किंमत(time value) हि मला गणितात मांडता आली नाही तरी ती काय असते हे समजू शकते. सरकारी नोकरी करत असताना १९८९ साली मला जो पगार होता तो पगार १५ वर्षांनी म्हणजे २००४ साली १० पट ( दहा पट) झाला होता. हे सर्व एक वित्त आयोग आणि दोन कालानुरूप बढत्या ( TIME SCALE PROMOTION) गृहीत धरले तरीही सरकार मला जर दहा पट पगार देते याचा अर्थच पैशाची किंमत १० पटीने कमी झाली असा होतो. कारण सरकार महागाई भत्ता हा महागाईच्या सम प्रमाणात देत नाही तर कमीच देते.(हि तुलना मुद्दाम १९८९ ते २००४ धरली आहे कारण २००६ ला सहावा वेतन आयोग आला आणी त्यानंतर हा फरक अजूनच जास्त (१५ पटीपेक्षा जास्त) वाढला असता) ३) याचा अर्थ असा कि पंधरा वर्षांनी जेंव्हा आपण हे कर्ज फेडायला सुरुवात करू तेंव्हा त्याची प्रत्यक्ष(EFFECTIVE) किंमत १०, ००० (दहा हजार) कोटी एवढीच असेल. कृष्णा खोर्यातील पाण्यात ४०, ०००/- कोटी ते सुद्धा महाराष्ट्र सरकारचे जिरून गेले हे लक्षात घेतले तर हि किंमत फार नाही. ४) श्री रमेश प्रभू हे स्वतः चार्टर्ड अकाउंटण्ट आहेत तेंव्हा अशा मुलभूत गोष्टी गृहीत धरूनच हा प्रकल्प पथदर्शी म्हणून त्यांनी स्वीकारला आहे. कारण तो जर बुडीत गेला तर त्यांचे स्वतःचे नाव यात काळ्या अक्षरांनी लिहून ठेवले जाईल याची त्यांना कल्पना नक्की असेल. ५) तेव्हा इतके तिकिट भरून प्रवास करायला तयार होणारे इतक्या मोठ्या प्रमाणावरील प्रवासी हे मार्केट पुढील १५ वर्षात विकसित होईल हे नक्की कोणत्या आधारावर? पंधरा वर्षापूर्वी भारतात विमानाने जाणारे प्रवासी किती होते? किंवा १५ वर्षापूर्वी किती मोटारी विकत घेतली गेल्या आणी आता किती याची जर आज तुलना केलीत तर हे आपल्याला लक्षात य़ेईल कि येणाऱ्या काळात भारतात वाहतुकीची गरज हि अजूनच जास्त वाढणार आहे.

In reply to by सुबोध खरे

१) जपान आपल्याला कर्ज सध्याची रेल्वे सुधारण्यासाठी देणार नाही. तेंव्हा त्या पैशात कोणता प्रकल्प उभा रहल आणि त्याचा किती नफा निघेल हा हिशेब येथे गैरलागू आहे
का बरं? इथून कळते की प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी जी जपानी संस्था कर्ज देणार आहे त्याच संस्थेने भारतातील अनेक प्रकल्पांसाठी कर्ज दिले आहे. त्यात अगदी Water Supply, Sewerage And Sanitation अशा प्रकारच्या कुठलेही भव्यदिव्य तंत्रज्ञान गरजेचे नसलेल्या प्रकल्पांचाही समावेश आहे.
१९८९ साली मला जो पगार होता तो पगार १५ वर्षांनी म्हणजे २००४ साली १० पट ( दहा पट) झाला होता.
१५ वर्षात १० पट पगार म्हणजे दर वर्षी १६.६% सी.ए.जी.आर ने पगारवाढ झाली. तुम्हाला या वेगाने पगारवाढ झाली असली तरी त्या वेगाने किती लोकांचे पगार वाढतात? दरवर्षी अगदी १०% ने पगार वाढले तरी १५ वर्षात ४.२ पट इतकीच पगारवाढ होते.१५ वर्षात रॅग्स टू रिचेस पोहोचलेले अनेक लोक दिसतील.त्यांच्या बाबतीत ही वाढ दरवर्षी ७०-८०% सुध्दा असेल.पण असे लोक खूपच थोडे. बहुसंख्य जनता त्यामध्ये सामील होत नाही.
याचा अर्थ असा कि पंधरा वर्षांनी जेंव्हा आपण हे कर्ज फेडायला सुरुवात करू तेंव्हा त्याची प्रत्यक्ष(EFFECTIVE) किंमत १०, ००० (दहा हजार) कोटी एवढीच असेल. कृष्णा खोर्यातील पाण्यात ४०, ०००/- कोटी ते सुद्धा महाराष्ट्र सरकारचे जिरून गेले हे लक्षात घेतले तर हि किंमत फार नाही.
जपान हे कर्ज Official Development Assistance (ODA) अंतर्गत देत आहे. विकसनशील देशांमधील या ना त्या प्रकल्पांना कर्ज देणे हेच काम ही संस्था करत असते. अशा मिळणार्‍या कर्जाचा वापर प्राथमिकतेच्या पेकींग ऑर्डरमध्ये त्या मानाने खाली असलेल्या प्रकल्पासाठी का केला जात आहे? त्यापेक्षा संपूर्ण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, मार्गांचे चौपदरीकरण-सहापदरीकरण, ताशी १५० किमीने रेल्वे जाईल इतके रूळ सक्षम करणे अशी कामे प्राधान्याने केली तर संपूर्ण देशातील रेल्वेचा सरासरी वेग दुपटीने वाढणार नाही का? जपानच्या त्याच संस्थेने अगदी मेट्रो प्रकल्पांसह इतर रेल्वे प्रकल्पांसाठीही कर्ज दिले आहे.मग ती संस्था या कामासाठी कशावरून कर्ज देणार नाही? बुलेटमधून जितका अर्थव्यवस्थेला हातभार लागेल त्यापेक्षा जास्त हातभार अशा कामांमुळे लागेल (कारण एकाच मार्गावरील कामांपेक्षा देशातील बर्‍याच मोठ्या भागातील कामे पार पाडता येतील) असे म्हटले तर त्यात काय चुकले?
४) श्री रमेश प्रभू हे स्वतः चार्टर्ड अकाउंटण्ट आहेत तेंव्हा अशा मुलभूत गोष्टी गृहीत धरूनच हा प्रकल्प पथदर्शी म्हणून त्यांनी स्वीकारला आहे. कारण तो जर बुडीत गेला तर त्यांचे स्वतःचे नाव यात काळ्या अक्षरांनी लिहून ठेवले जाईल याची त्यांना कल्पना नक्की असेल.
बरोबर आहे ना. म्हणूनच माझ्या हातून कुठचे मुद्दे निसटत आहेत किंवा या प्रकल्पातून नक्की किती आणि कोणत्या Positive Externalities होतील हाच प्रश्न मुळात विचारला होता. माझा विरोध प्राधान्याच्या क्रमात त्या मानाने खाली असलेल्या प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करण्याला आणि इतर अनेक अधिक महत्वाच्या प्रकल्पांना जो पैसा देता आला असता तो तिथे न देता बुलेटवर जाणार आहे त्याला आहे.
पंधरा वर्षापूर्वी भारतात विमानाने जाणारे प्रवासी किती होते? किंवा १५ वर्षापूर्वी किती मोटारी विकत घेतली गेल्या आणी आता किती याची जर आज तुलना केलीत तर हे आपल्याला लक्षात य़ेईल कि येणाऱ्या काळात भारतात वाहतुकीची गरज हि अजूनच जास्त वाढणार आहे.
हो वाहतुकीची गरज वाढणार आहे हे नक्कीच. फक्त मुद्दा हाच की ती गरज पूर्ण करायला बुलेटपेक्षा अन्य मार्ग खर्च वगैरेचा विचार करता अधिक योग्य आहेत का.

भारतात २०१३ साली एक कॉन्फरन्स झाली होती याविषयावर. इथे त्याबद्दल माहिती आहे. त्यातला बुलेट ट्रेनचा एक फायदा कमी एमिशन्स. बुलेट ट्रेन्स विजेवर चालतात आणि विमान आणि रस्त्यावरच्या वाहतुकीपेक्षा खूप कमी एमिशन्स करतात. अजून एक म्हणजे
जर बुलेट ट्रेन दोन तासात अहमदाबादला पोहोचवणार असेल तर त्या ट्रेनचा Target Group सध्या विमानाने प्रवास करणारे प्रवासीच असतील-- सध्या ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी नव्हे.
हे गृहितक जरा डायसी आहे. सध्या मुंबै-अहमदाबाद फक्त ट्रेन वा विमान हेच पर्याय नाहीत. बस/कारने जाणारे देखील खूप लोक असतील. ते लोकपण बुलेट ट्रेनचे टार्गेट असतील. इथे २६००० प्रवासी प्रतिदिन असा आकडा पकडलेला आहे. अर्थात त्याला काय बेसिस आहे माहिती नाही. त्यांनी फस्ट क्लास ट्रेनच्या तिकीटाच्या दीडपट रेट पकडला आहे बुलेट ट्रेनसाठी.
त्यामुळे मुंबई ते दिल्ली या मार्गावर केवळ मालगाड्याच जाऊ शकतील असा Dedicated Freight Corridor करणे, Delhi-Mumbai Indistrial Corridor वगैरे कामांना प्राधान्य न देता बुलेट ट्रेनचा मुद्दा ऐरणीवर का आणला जात आहे हे समजण्यापलीकडचे आहे.
दिल्ली - मुंबै फ्रेट कॉरिडॉरवर देखील काम चालू आहे. दुर्लक्ष केलं जातय हे बरोबर नाही. संदर्भ

लोकलची व्हेंटिलेटर्स बंद , घुसमटीचे शेकडो बळी Maharashtra Times| Dec 16, 2015, 12.20 PM IST http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/ventilators-o… लोकल गाड्यांमधील किमान ८० टक्के व्हेंटिलेटर्स कामच करत नाहीए. यामुळे गर्दीत घुसमटून आणि श्वास कोंडल्यामुळे प्रवाशांना ह्रदयविकाराचे झटके आलेत. अशा घटनांमध्ये या वर्षात ४०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. सर्वाधिक मृत्यू हे पिक अवर्समध्ये झालेत. पण या मृत्यूंची नोंद रेल्वेच्या दफ्तरी 'इतर' मृत्यू म्हणून लिहिली जाते.

भारतातले सर्व बालमृत्यु थांबवले जात नाहीत, जो पर्यंत प्रत्येक कुटुंबाला ३ वेळ पुरेसे सकस अन्न मिळत नाही, जोपर्यंत या देशातील प्रत्येक शेतकरी पावासावर अवलंबून राहायचं सोडून (१० गुंठे शेती असली तरी) लाखभराचं उत्पन्ना खात्रीशीर पद्धतीने मिळवीत नाही, जोपर्यंत आहे त्याच रुळांवर आणि डब्यांमध्ये ठाणे-डोंबिवली-दादर टप्प्यांमध्ये सर्वांना हवेशीर व बसायला गुबगुबीत आसनव्यवस्था मिळत नाही, जोपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात दर एका तासाला एशियाड/शीतल/शिवनेरी जात नाही, जोपर्यंत प्रत्येक घरात ४ एम्बीपीएस अनलिमिटेड इंटरनेट व २४ तास समान दाबाची वीज पोचत नाही, जोपर्यंत भारतातील प्रत्येक मूल महाविद्यालयीन शिक्षण घेत नाही, तोपर्यंत..... . . . . . . . . . आपण सर्वजण हाताची घडी घालून बसू. कशाला पाहिजे संरक्षणावर खर्च? कशाला पाहिजे बुलेट ट्रेन? कशाला पाहिजे चंद्र अन् मंगलयान? कशाला पाहिजेत ८-१० पदरी एक्स्प्रेसवे? कशाला पाहिजेत अणुचाचण्या?

In reply to by तुषार काळभोर

या सगळ्यापेक्षा सोप्पे: "जो पर्यंत संसदेत सुरळीत काम होत नाही पर्यंत" इतके म्हणले तरी चालेल ;)

In reply to by तुषार काळभोर

नाही पैलवान - असे कहिही म्हणे नाही. माझे म्हणणे अगदी साधे आहे. आधी लोकल ट्रेन सुधारा. मग बुलेट ची स्वप्ने बघा. अख्खा देश जोडा बुलेट ट्रेन. आनंद वाटेल. पण आधी रोज अपघात आणि गुदमरून लोक मारत आहेत ट्रेन मध्ये, त्यांना वाचवा. जास्त आहे का हे मागणे ?

In reply to by अभिजित - १

साहेब आपल्याला हे समजत नाही का कि जपानला तुमच्या असलेल्या लोकल सुधारण्यासाठी काय रस आहे? ते तुम्हाला नगण्य दरावर व्याज देत आहेत ते दोघांना फायदा असलेल्या प्रकल्पावर केवळ तुम्हाला फायदा असलेल्या प्रकल्पावर नव्हे. तेंव्हा पहिल्यांदा हे करा आणि मग ते करा याचा काही संबंध नाही. आपली लोकल सुधारायचे प्रयत्न आपली रेल्वे करीतच आहे. तो प्रयत्न बंद झालेला नाही किंवा तो पैसा तिकडे वळवलेलाही नाही. गुगलून पहा काय प्रयत्न चालू आहेत त्याचे भरपूर दुवे सापडतील. उदा फलाटाची उंची वाढवणे, जास्त १५ डब्यांच्या लोकल चालवणे इ.

In reply to by सुबोध खरे

कर्ज घ्यायची जबरदस्ती नाही न भारत सरकार वर ? आणि लोकल ट्रेन सुधारायला पण कर्ज मिळू शकतेच ना ? कि बंदी आहे कोणाची ? clinton साहेबांनी वरती तेच सांगितले आहे कि. कर्जाबाबत. बाकी सरकारचे लोकल सुधारायचे प्रयत्न हे कागदावर शोभून दिसतात. परिस्थितीत काही फरक पडला नाहीये. esakal.com वर वाचा. बुलेट ट्रेनच्या बाता, सीसी टीव्हीला नकार - हायकोर्ट गुरुवार, 17 डिसेंबर 2015 - 03:15 AM IST

In reply to by सुबोध खरे

जपानला तुमच्या असलेल्या लोकल सुधारण्यासाठी काय रस आहे?
जपानच्या त्याच संस्थेला गुवाहाटीतील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा आणि आग्र्यामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा यात जर रस असेल तर मुंबईतील लोकल सुधारण्यासाठी कर्ज का मिळू शकणार नाही हेच समजत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

या स्वरुपाच्या रकमा किरकोळ आहेत. Guwahati Sewerage Project 15,620 मिलियन येन - १५६२ कोटी येन - सुमारे ७५० कोटी रुपये ०.३ + ०.१ दराने Agra Water Supply Project (II) 16,279 मिलियन येन - १६२७ कोटी येन - सुमारे ८१० कोटी रुपये 1.40 Delhi Mass Rapid Transport System Project Phase 3 (II) 140,000 मिलियन येन - १४००० कोटी येन - सुमारे ७००० कोटी रुपये - १.४ दराने दोन्हीची थेट तुलना करण्यात अर्थ नाही.

In reply to by मैत्र

आधी म्हणायचे कि इतर कशाला कर्ज देणारच नव्हते. आता सत्य दाखवल्यावर , म्हणायचे प्रकल्प किरकोळ. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/seventh-pay-commission-ra… सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात भारतीय रेल्वे असमर्थ. भारतीय रेल्वेच्या १४ लाख कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यासाठी लागणाऱ्या ३० हजार कोटी रु.चा अतिरिक्त भार सोसण्याची रेल्वेची क्षमताच नसल्याचे प्रभू यांनी निदर्शनास आणून दिले आहे. परत हा भार एकदाच नाही , दर वर्षी असणार आहे. कपडे फेडायची वेळ आलीय तरी मौज मस्ती कडे धावणारे लोक आणि सरकार !! एकंदरीत कशातच अर्थ नाही. बहुतेक लवकरच जनतेची जबरदस्त लुटमार चालू होणार आहे, हि सगळी सोंगे नाचवायची म्हणून.

In reply to by अभिजित - १

जाता जाता -- हीच परिस्थिती बहुसंख्य राज्य सरकारांची आहे. कारण पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाने सुचवलेली फक्त पगारवाढ अगोदरच्या सरकारांनी अमलात आणली पण त्यांनी सुचवलेले इतर पोट आवळण्याचे उपाय लोकप्रियतेच्या हव्यासापायी( पुढच्या निवडणुकांवर डोळा ठेवून) बासनात गुंडाळून ठेवल्याने सरकारची आज ही परिस्थिती आलेली आहे. रेल्वेच्या अगोदरच्या मंत्र्यांनी सवंग लोकप्रियतेपायी दिलेल्या सवलतींमुळे रेल्वे सुद्धा डबघाईला आलेली आहे. बहुतेक लवकरच जनतेची जबरदस्त लुटमार चालू होणार आहे, हि सगळी सोंगे नाचवायची म्हणून. बुलेट ट्रेन आली/ नाही आली तरी रेल्वेची भाडेवाढ आणि कर्मचारी कपात अटळ आहे. अगोदरच्या सरकारांनी केलेली घाण निस्तरण्याचा प्रयत्न या सरकारने केला तर "जनतेची जबरदस्त लुटमार" अशी विशेषणे आणि शिव्या त्यांना खायला लागणार. नाही केले तर रेल्वे अजून डबघाईला येणार. मुंबईत ठाणे ते सी एस टी तिकीट ३४ किमीला फक्त १० रुपये आहे. ते वाढवले तर बोंबाबोंब होते. पण मोबाईलचे ३०० रुपये बिल भरताना लोक जराही कुरकुर करीत नाहीत. उद्या भारताचा ग्रीस झाला नाही म्हणजे मिळवले. पण लक्षात कोण घेतो?

मला वाटतय कि बरेच जण बुलेट ट्रेन म्हणजे Magnetic Levitation वर चालणारी ट्रेन समजताय. पण बुलेट ट्रेन संबोधल्या जाणार्‍या जापान च्या "Shinkansen" या Magnetic Levitation ट्रेन्स नाहित. Shinkansen या रेल ट्रॅक वरच चालतात. या ट्रॅक वरुन साध्या ट्रेन्स सुद्धा चालु शकतात. या प्रकारच्या ट्रेन्स युरोपमधे आता कॉमन आहेत (फ्रांस : TGV, जर्मनी : ICE, etc). बरेच जण विमानापेक्षा या ट्रेन ला (बर्‍याच वेळा महाग पडत असेल तरी) पसंती देतात. कारणे: १. थेट शहराच्या मधुन निघतात आणि शहरामधे सोडतात. २. चेक-ईन, चेक-आउट, सुरक्षा तपासणी, वगैरे नसते. ३. विमानापेक्षा प्रचंड आरामदायक प्रवास. जास्त खर्च हा ट्रॅक उभारणीचा आहे. तेच ट्रॅक ईतर ट्रेन्स साठी सुद्धा वापरले जातील. --- कानडा

In reply to by कानडा

मला वाटतय कि बरेच जण बुलेट ट्रेन म्हणजे Magnetic Levitation वर चालणारी ट्रेन समजताय.
नाही हो. माझा मुद्दा बुलेट ट्रेनविषयीच आहे मॅगलेव्हविषयी नाही कारण प्रस्ताव बुलेट ट्रेन आणायचा आहे मॅगलेव्ह आणायचा नाही.
१. थेट शहराच्या मधुन निघतात आणि शहरामधे सोडतात.
मुंबईत विमानतळ शहरामध्येच आहे. अहमदाबादमध्ये शहरापासून ते थोडे दूर आहे हे नक्कीच. पण अहमदाबादमध्येही बुलेट स्टेशन होईल ते पण अगदी शहरातच होईल याची खात्री आहे का? नाहीतर अहमदाबाद विमानतळावर पोहोचणे ही कटकटी गोष्ट असते तशीच कटकटी गोष्ट बुलेट स्टेशनवर पोहोचणे होईल. दुसरे म्हणजे बुलेट ट्रेनचे स्टेशन मुंबईत बी.के.सी मध्ये होणार आहे असा प्रस्ताव आहे. हे ठिकाण मुंबई विमानतळापासून फार दूर नाही. आणि त्या ठिकाणी पोहोचायला विमानतळावर पोहोचायला होतो तितकाच (कदाचित जास्तही) त्रास होईल-- जोपर्यंत एका बाजूला कलानगर आणि दुसर्‍या बाजूला कपाडिया नगर इत्यादी भागातील प्रचंड ट्रॅफिक कमी होत नाही.
२. चेक-ईन, चेक-आउट, सुरक्षा तपासणी, वगैरे नसते.
भारतातली परिस्थिती लक्षात घेता किमान सुरक्षा तपासणी तरी नक्कीच असेल असे म्हणायला नक्कीच आधार आहे.
३. विमानापेक्षा प्रचंड आरामदायक प्रवास.
याविषयी कल्पना नाही.
तेच ट्रॅक ईतर ट्रेन्स साठी सुद्धा वापरले जातील.
नाही. बुलेट ट्रेन स्टॅन्डर्ड गेजवर चालणार आहे. म्हणजे बुलेटवरील दोन रूळांमधील (आणि म्हणून रेल्वेच्या दोन बाजूच्या चाकांमधील) अंतर १.४३५ मीटर असणार आहे. तर भारतातील इतर ट्रेन ब्रॉड गेजवर म्हणजे दोन बाजूच्या रूळांमधील अंतर १.६७६ मीटर असलेल्या गेजवर चालतात. त्यामुळे इतर रेल्वेगाड्या या रूळांवरून जाऊ शकणार नाहीत.

रोचक चर्चा... :) मध्यंतरी आपल्या देशातली मिडाया मधली मंडळी चीनच्या बुलेट ट्रेन मधे प्रवास करुन आली तेव्हा हा प्रवास त्यांच्या नजरेतुन पाहिला होता. मला बाँ तर बाँ असा प्रवास करायला मिळाला तर लयं आवडेल... :) :- मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- "Chickens will come home to roost."

आणखी किती वर्ष आपण पायाभूत सुविधांसाठी रडत बसणार? बुलेट ट्रेनचे हे सगळे पैसे पायाभूत सुविधांसाठी जर खर्च करायचे ठरवले तरी त्या सुधारणार नाहीत. ६० वर्षे झाली तरी आपले तेच रडगाणे चालू आहे. येउदे बुलेट ट्रेन. आपल्याला तेवढीच भारतात बुलेट ट्रेनने फिरायला मज्जा येईल.

In reply to by मोग्याम्बो

कॉमिक्स बुकचे चाहते खूप कमी आहेत हो... त्यामुळे लिहायला इंटरेस्ट येत नाही. अहो,लिहा हो... इथे वाचकांची कमी नाही इतके नक्की सांगु शकतो... { कोणे एके काळी डायमंड कॉमिक्स वाचणारा } :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- "Chickens will come home to roost."

In reply to by मोग्याम्बो

हा आकडा आला कुठून ? मन कि बात / बाता आहेत या. आणि हो २८०० कशाला मोदी ना वाटले तर १४०० पण ठेवतील तिकीट . गोविदा चे गाणे आठवले - मेरी मर्जी !!

त्या पेक्षा हा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट सरळ - अंबानी ला द्या चालवायला. पब्लिक private नाही. सरळ private . पण तसे करणार नाही सरकार कारण हा प्रोजेक्ट कधीच profit मध्ये येणार नाहीये. मुळात सुरु पण होणार नाही काही.

मुंबईतला कुलाबा-सीप्झ हा प्रस्तावित मेट्रोमार्गही पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता आहे. ३४ कि.मी. साठी २३ हजार कोटी रुपये इतका त्याचा सध्याचा खर्च आहे. टॉवरमधल्या फ्लॅट्सच्या अव्वाच्या सव्वा किंमतीमुळे मध्य आणि दक्षिण मुंबईत वस्ती कधीचीच कमी होत चालली आहे. ती मुंबईपलीकडच्या स्वस्त अश्या उत्तर भागाकडे (पालघर ते कर्जत पट्टा) आणि खाडीपल्याडच्या पूर्व भागाकडे वळली आहे. याचा विचार करण्याऐवजी तुलनात्मक विरळ वस्तीच्या दक्षिण आणि मध्य मुंबईला आणखी एक रेलसेवा (सध्या तीन मार्ग उपलब्ध आहेत) कशाला हवी आहे? या रेल वेच्या कडेकडेने चार एफ.एस. आय. उपलब्ध करून दिला जाणार आहे म्हणतात. पण दर इतका महाग असेल की निवासासाठी किंवा कचेर्‍यांसाठीसुद्धा तो फारच थोड्यांना परवडेल. बांधकाम क्षेत्रात सध्यातरी मंदी आहे. प्रकल्प लोकाभिमुख करायचे तर बोरिवली-ठाणे, विरार-कल्याण या भागात अधिक सोयी त्वरित निर्माण होणे आत्यंतिक गरजेचे आहे, हे काम अगदी प्रथम प्राधान्याचे असायला हवे.

In reply to by राही

मला प्रश्न पडला आहे कि बुलेट ट्रेन चा मार्ग बांधण्यासाठी मुंबईमध्ये जागा कुठे आहे. किती लोकांना विस्थापित व्हावे लागेल. त्यांच्या पुनर्वसनाची किंमत या ९८००० कोटी रुपयांमध्ये मोजली गेली आहे का?

In reply to by सतीश कुडतरकर

ठाणे पर्यंत underground चालवायचा विचार आहे !! पावसाळ्यात ४ महिने बंद किवा मग पंप लावणार पाणी उपसायला !! आता कसे ते विचारू नका .

In reply to by अभिजित - १

च्यायला, ठाण्यापर्यंत भुयारी असणार तर भुयार थोड रुंदीला वाढवा की, म्हणजे आमच्या मरे ला पण एखादी गाडी चालवता येईल.

In reply to by राही

मला प्रश्न पडला आहे कि बुलेट ट्रेन चा मार्ग बांधण्यासाठी मुंबईमध्ये जागा कुठे आहे. किती लोकांना विस्थापित व्हावे लागेल. त्यांच्या पुनर्वसनाची किंमत या ९८००० कोटी रुपयांमध्ये मोजली गेली आहे का?

In reply to by सतीश कुडतरकर

त्यांच्या पुनर्वसनाची किंमत या ९८००० कोटी रुपयांमध्ये मोजली गेली आहे का?
हो. जमीन अधिग्रहणाची किंमत यात पकडली आहे.

In reply to by अनुप ढेरे

मजा आहे ना सरकारी जमिनींवर बिनधास्त अनधिकृत झोपडया बांधायच्या मग मायबाप सरकार व्होटबॅंकच्या लाचारीमुळे त्याच पुर्नवसन करणार याच कारणामुळे चर्चगेट विरार, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, कसारा आणि आता नवी मुबई पट्टयात पाचवा आणि साहवा लोहमार्ग टाकता येत नाही वा त्या बजेट वाढत.

एखाद्या गरीब मुलाने ब्रॅन्डेड कपडे घातले कि तो श्रीमंत दिसतो, पण...........असो . . पण बुलेट ट्रेनला विरोध नाही.

http://www.dnaindia.com/money/report-mumbai-ahmedabad-bullet-train-may-… Mumbai-Ahmedabad bullet train elevated corridor to increase cost by Rs 10,000 crore Date published: Friday, 8 January 2016 - 11:10am IST | Place: Mumbai | Agency: PTI फक्त १० हजार कोटी ना ? हुं .. काय फरक पडतो ? अशाच बातम्या , बुलेट ट्रेन खर्च वाढीच्या , वेळो वेळी वाचायची सवय लावून घेऊया !! मैने एक बार ठाण लि तो फिर मै खुद कि भी नाही सुनता !! - ओळख पाहू कोण ?

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सोबत रेल्वेच्या इतर प्रकल्प जसे सेमी फास्ट ट्रेन्स म्हणजे १५० च्या स्पीड ने जाणार्या आणि इतर प्रकल्पांना कोणी आडकाठी आणली नाही आहे ते सुद्धा होतच आहे. बुलेट ट्रेन साठी चीनी तंत्राञान स्वस्त होते पण भारताने एवढी मोठी गुंतवणूक चीन च्या घश्यात घालू नये ह्या साठीच जपान ने तंत्राञान सोबत कर्ज अशी अभिनव योजना भारतापुढे ठेवली व भारताने ती मान्य केली ह्याचा अर्थ असा कि एवढे मोठे कर्ज जपान ने भारताला बुलेट ट्रेन्स साठीच दिले.

बुलेट ट्रेन सध्या नको, ‘मेट्रो मॅन’ डॉ. ई.श्रीधरन ‘मेट्रो मॅन’ डॉ. ई.श्रीधरन यांचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी सध्या त्याची गरज नाही. उलट, भारतीय रेल्वेला तंत्रज्ञान, प्रवाशांची सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या पातळीवर सक्षम करावे. कालांतराने बुलेट ट्रेनचा विचार करावा, असे मत ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांनी व्यक्त केले. खास प्रतिनिधी, नागपूर | February 19, 2016 1:04 AM

रिअल इस्टेट मात्र वरती येईल खूप. या नवीन स्टेशन च्या जवळ. लोढा ने एव्हाना जागा घेऊन पण ठेवल्या असतील. काय माहित ? आणि मुंबई ला खाली दाबण्याची संधी गुज्जू लोकांना. इथले शेअर मार्केट, हिरे , आणि इतर मोठे धंदे तिकडे नेउन.

In reply to by अभिजित - १

हे कुणी सांगितल हि नेहमीची बोंब आणि गुज्जु गेलेतर जाउदे तुम्हीकरा नवीन चालु हाकानाका आणि करा प्रगती का आपण फक्त मुजरा,माज, छाती,मनगट एवढच करायच ती व्यापारी लोक फायदा असेल तिकडेच जाणार

In reply to by धनावडे

मग कायमचे तिकडे जा ना . इथे थांबूच नका. पण धंदा करायला गुजरात आणि मौज मज करायला मुंबई हा प्रकार नको. जो मोदी करू बघत आहेत. भारतीय रेल्वेचा बळी देऊन.

In reply to by अभिजित - १

पण धंदा करायला गुजरात आणि मौज मज करायला मुंबई हा प्रकार नको. जो मोदी करू बघत आहेत. भारतीय रेल्वेचा बळी देऊन.
विनोद करत नसाल तर हे बळी प्रकरण समजवुन सांगा ना प्लीज. प्रपोज्ड बुलेट ट्रेनमुळे रेल्वेचा बळी नेमका कसा घेणार आहेत मोदि?

In reply to by अर्धवटराव

अर्धवट राव तुमच्या आकलन शक्तीच्या बाहेरचे आहे ते. सोडून द्या. जर का हि ट्रेन झालीच तर ( खूप कठीण आहे ते म्हणा ) .. पण समजू या झाली .. तर तिचा तोटा भरून काढायला लोकल चे भाडे .. ठाणे - CST - २१५ रु. वन वे फक्त , बाकी सगळी पण याच स्तरावर , भरायची तयारी ठेवा. नक्की बळी कोण ? बाकी भारतीय ट्रेन का उपनगरी ट्रेन का फक्त ट्रेन प्रवासी . इ. इ. फालतू काथ्याकुट करायची माझी इच्छा नाही. तुम्ही करा.

In reply to by अभिजित - १

विनोद धड नाहि करता आला तर आपण विनोद करतोय असं बोंबलायचं तरी. काथ्याकुट करायला आड्यात नसेल काहि, निदान पोहर्‍यातलं तरी वापरा. कळु दे कि तुमची आकलनशक्ती (असेल तर)

मेट्रो मॅन ई श्रीधरन यांचं मत वाचलं आणि या चर्चेत टाकावं असं वाटलं पण धागा शोधून शिळ्या कढीला उत कशाला असा विचार केला. बाकी मुंबई आणि उपनगरी रेल्वे पलिकडे भारत आणि प्रचंड मोठी भारतीय रेल आहे. http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Railways-to-… http://www.thebetterindia.com/46805/indian-railways-projects/ http://www.financialexpress.com/article/budget-2016/indian-railways-com… मुख्यतः मार्ग वाढवण्याचे / अतिरिक्त ट्रॅक टाकण्याचे / अद्ययावत सिग्नल यंत्रणा इ. स्वरुपाच्या प्रोजेक्टवर भर दिसतो आहे. हे नक्कीच चांगले आहे. या वेळी स्वस्त कर्ज मिळते आहे म्हणून बुलेट ट्रेन करावी का हा मुद्दा ओपन आहे.

In reply to by मैत्र

एकदम मान्य. पण बुलेट ट्रेन मुंबई मध्ये करायचे स्वप्न आहे मोदी साहेबांचे. हे म्हणजे भुके कंगाल माणसाला ३०३ / विटा एक्स जबरदस्तीने देण्या सारखे आहे हो. इथे मुंबई मध्ये रोज ट्रेन किती लोकांचे बळी घेते ते माहित आहे ना ? कि मला काय त्याचे ?

In reply to by अभिजित - १

याचं कारण म्हणजे अशा प्रयोगांना मुंबईशिवाय पर्याय नाहि.
हे म्हणजे भुके कंगाल माणसाला ३०३ / विटा एक्स जबरदस्तीने देण्या सारखे आहे हो.
अजीबात नाहि. बुलेट ट्रेन जर फायद्याचा धंदा करु शकेल तर ते केवळ मुंबईत.
इथे मुंबई मध्ये रोज ट्रेन किती लोकांचे बळी घेते ते माहित आहे ना ? कि मला काय त्याचे ?
बुलेट ट्रेन प्रॉजेक्टचा झालाच तर फायदाच होईल उर्वरीत रेल्वे सिस्टीमला... नुकसान तर नक्कीच होणार नाहि.

In reply to by अर्धवटराव

बुलेट ट्रेन प्रॉजेक्टचा झालाच तर फायदाच होईल उर्वरीत रेल्वे सिस्टीमला... नुकसान तर नक्कीच होणार नाहि. कसे काय???

In reply to by नाना स्कॉच

कशाबद्दल विचारताय? नुकसान न होण्याबद्दल कि फायद्याबद्दल? फायदा म्हणाल तर शक्य तितक्या लवकर रेल्वेला तिचा २जी-३जी-४जी उत्कर्ष साधायचाच असेल तर शुभस्य शीघ्रम. नुकसान होणार नाहि कारण बुलेट ट्रेन उर्वरीत रेल्वेच्या ताटातलं अन्न स्वतःकडे वळवत नाहि (थोडंफार शफलींग होईल, एक्स्पेक्टेड आहे)

In reply to by अभिजित - १

पण बुलेट ट्रेन मुंबई मध्ये करायचे स्वप्न आहे मोदी साहेबांचे.
मुंबै-अहमदाबाद बुलेट ट्रेनची आयडीआ कोणी आणि कधी आणली ते गूगल करा.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/mumbai-ahmedabad-bullet-train-… दिवसाला १०० फेऱ्या झाल्या तरच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन व्यवहार्य. भारताला हे कर्ज ५० वर्षात फेडायचे आहे. पीटीआय, अहमदाबाद | April 18, 2016 11:32 AM - नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला व्यवहार्यतेच्या मुद्द्यावरून ब्रेक लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुलेट ट्रेनला फायद्यात चालवायचे असेल तर भारतीय व्यवस्थापन संस्थेने (आयआयएम) काही पर्याय अहवालाद्वारे रेल्वेसमोर ठेवले आहेत. हे पर्याय पाहता बुलेट ट्रेन रूळांवरून धावणे कितपत व्यवहार्य ठरेल, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या अहवालानुसार रेल्वेला बुलेट ट्रेन फायद्यात चालवायची असेल तर दिवसाला किमान ८८ हजार प्रवासी वाहून न्यावे लागतील अथवा बुलेट ट्रेनने दिवसाला १०० फेऱ्या मारल्या पाहिजेत. ‘डेडिकेटेड हायस्पीड रेल्वे नेटवर्कस इन इंडिया: इश्यूज इन डेव्हलपमेंट’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

In reply to by मराठी कथालेखक

१५ वर्षांनी तिकीटाचा दर १५०० रूपये ?? इतका कमी दर गृहीत का धरलाय ?
तो दर म्हणजे फक्त गाजर आहे लोकांना भूलवायला ,लोकांचा ह्या प्रोजेक्टला विरोध होऊ नये म्हणून , सरकारवर कधी विश्वास ठेवायचा असतो का ? फारच भाबडे बुवा तुम्ही . समजा ती ट्रेन झालीच तर त्यावेळी तिचे वेगळे महामंडळ वगैरे करतील दर ठरवण्याचा अधिकार त्यांचा असेल .सरकार हात झटकून मोकळे होईल . तसं तर मुंबई मेट्रोत पण १० रु.त प्रवास करता येईल असे गाजर दाखवलं होते, किती दिवस १० रु. मध्ये प्रवास केला लोकांनी?

In reply to by रॉजरमूर

मेट्रो व्यवहार्य नाही. तितक्याच पैशात विमानप्रवास होइइल. नवे रूळ , नवे रेल्वेचे धूड यावर खर्च न करता विमानप्रवास सुरु करावेत.

In reply to by mugdhagode

मोगा खान जुलै १६ मधल्या बुधवारी सर्वात स्वस्त विमानाचे तिकीट १५९० रुपये जालावर आहे त्यात अजून २०० रुपये CONVENEINCE CHARGES आहेत ( कसले ते माहित नाही) तरीही जेंव्हा कच्च्या तेलाचे दर निम्न असताना हे दर आहेत तर १५ वर्षांनी विमानाचे हेच दर असतील हे म्हणणे चूक आहे. शिवाय तेवढ्याच वेळात तुम्ही पोहोचत असलात तर विमानाने एवढेच सामान घ्या, ते सुद्धा १ तास अगोदर चेक इन करा, स्वतःची पूर्ण तपासणी करा हि कटकट आहेच तेंव्हा मेट्रो व्यवहार्य नाही असे म्हणणे बरोबर नाही. दिल्लीत सुद्धा मेट्रो हे श्रीमंतांचे चोचले आहेत असे म्हणणार्या कम्युनिस्ट लोकांची आता दातखीळ बसली आहे याची आठवण झाली.