दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग २
भाग-१
मागच्या भागात आपण प्रेग्नंसीमध्ये आणि बाळाच्या दातांची काळजी कशी घ्यावी ते पाहिले.या भागात आपण ३ ते १२ वयोगटातील मुलांच्या दातांबद्दल जाणून घेऊ.
साधारण सहाव्या महिन्यापासून बाळाला दात यायला सुरुवात होते ते तीन वर्षापर्यंत प्रत्येक जबड्यात दुधाचे दहा दात येतात.यात समोरचे पटाशीचे दात,सुळे आणि दाढा असतात.हे सर्व दात निरनिराळ्या वयात पडतात.तरीही लोकांचा दुधाचे दात पडणारच आहेत तर का त्यांच्या किडण्याकडे फारसे लक्ष द्या असा दृष्टिकोन असतो. त्यामुळे या दातांचे महत्त्व लक्षात न घेता केवळ पालकांच्या गैरसमजूतीमुळे मुलांचे हाल होत असतात.बाळाला नीट बोलता येणे, चावणे यासाठी या दातांचा उपयोग असतोच तसाच नव्या येणार्या दातांसाठी जागा राखणे ,जबड्याच्या वाढीसाठीही हे दात अत्यंत आवश्यक असतात.नवे आलेले दुधाचे दात हे कमी मिनरलाइझ असणारे असतात.म्हणजेच कमकुवत असतात.त्यामुळे या दातांमध्ये पटकन किडायला सुरुवात होते.सुरुवातीलाच काळजी घेतल्यास हे किडणे टाळात येते.काळजी काय तर दात आल्या दिवसापासून तो पुसून घेणे,रात्री दूध पाजणे बाळ मोठे व्हायला लागले की बंद करणे हे आहेच.पण रोजचे दोन वेळा फ्लोराईड असणार्या पेस्टने घासणे अत्यंत आवश्यक आहे.याच तीन वर्षाच्या वयात मुलं हट्टी होऊ लागतात.पण मुलांचे लाड करणे म्हणजे त्यांनी मागताक्षणी चॉकलेटाचे तोबरे भरणे नव्हे हे मुलांना पालकांनी थोडे ठाम राहून ,किडलेल्या दाताची चित्रं दाखवून पटवून दिले पाहिजे.त्याच बरोबर चॉकलेट इतकेच हानीकारक पदार्थ म्हणजे बिस्किटं,पूडीतील वेफर्स्,चिटो आदी पदार्थ्,केकसारखे अती गोड मऊ पदार्थ हे सर्वच दात किडवण्यात सहभागी असतात हे जरूर लक्षात ठेवावे.पॅकमधे मिळणारे ज्यूस्,फ्रूटी तत्सम पेयदेखील तितकीच हानीकारक आहेत.
काय करतात हे पदार्थ? या पदार्थांची पातळ फिल्म दातावर बसून राहते.ती तोंडातल्या बॅक्टेरियांना आयतेच खाद्य मिळते.ते या खाद्यपदार्थांचे अॅसिडमध्ये रूपांतर करतात.आधीच कमी मिनरल्स असणारे दुधाचे दात मग या अॅसिड हल्ल्याने कमकुवत होऊन त्यांना भोक पडायला सुरुवात होते.अशा प्रकारे दात किडण्याची प्रक्रिया सुरू झाली की वेळेवर लक्ष न दिल्यास त्या भोकात अजून अजून अन्न साठून दाताचे तुकडे पडू लागतात.समोरचे काळे दात असलेली अनेक मुलं बघण्यात येतात.ती कीड ही अशी सुरू होते.एका दातात तयार झालेले अॅसिड शेजारच्या दाताला पण कमकूवत करून सोडतात.आणि मग अगदी लहान वयात अनेक दात किडलेली मुलं आमच्याकडे येतात.दाढाही किडल्याने या मुलांना चावायला खूप वेळ लागतो,बरेच पदार्थ ते खाऊ शकत नाहीत्,मग खाणे टाळणे,फक्त मऊच खाणे असे प्रकार मुलं करू लागलेली असतातच पण कुपोषित देखील होऊ लागतात.कारण न चावता गिळलेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही.बरेच पालक याही अवस्थेत मुलांकडे ते दुखतंय नाही सांगत तोवर लक्ष देत नाहीत.मग कधीतरी दाढ दुखायला लागते,मूल रात्रभर रडून जागवते आणि मग ते डेंटिस्टकडे आणले जाते!
हे टाळण्यासाठी मुलांना दर सहा महिन्यांनी डेंटिस्टकडे घेऊन जावे.ते त्याचे दात तपासतीलच पण कसे ब्रश करायची ही माहितीही देऊ शकतील.कीड अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात येऊन भरली जाईल आणि मुलाचे पुढे होणारे हाल वाचतील.काही महिन्यापूर्वी रूट कॅनाल करताना गेलेल्या लहान मुलाची बातमी वाचून अनेक लोक संतप्त झाले होते. त्यात काही लोकांना तर एवढ्या लहान मुलाची रूट कॅनल कशाला करतात प्रश्न पडला होता. त्यासाठी आपल्याला आधी मुलांचे कोणते दात कधी पडतात हे जाणून घेणे जरूरीचे आहे.
यात पाहिल्यावर कळते की दाढा साधारण ९ते १३ या वयात पडतात.मग एखाद्या मुलाची न हलणारी,खूप किडलेली दाढ पाचव्या वर्षीच खूप दुखायला लागली तर येणारा दात तिथे पाच ते सात वर्षानी येईल.मग जर फक्त या कारणासाठी दाढ काढली तर ते मूल नीट चावू शकेल का? तसेच सहाव्या वर्षी पहिली कायमची दाढ याच दातांच्या मागे येते.ती या रिकाम्या जागेत घुसून नव्या येणार्या दाताचा मार्ग बंद करून टाकू शकेल.मग नवा दात तिरपा,वाकडा जागा मिळेल तसा येऊन सर्व दातांच्या रचनेवर परिणाम होऊ लगतो.म्हणून अगदी लहान वयात किडलेली दाढ डेंटिस्ट वाचवायचा सल्ल्ला देतात.याकरीता लहान मुलांच्या स्पेशलिस्ट डेंटिस्टकडून या ट्रिटमेंट केल्या जातात.यात कोणताही धोका नाही.
नाइलाजाने दाढ काढावी लागल्यास त्या जागी हेच डॉक्टर स्पेस मेंटेनर बसवून देतात.यामुळे नव्या येणार्या दाताचा मार्ग मोकळा राहतो.त्याची जागा राखून ठेवायचं काम हे स्पेस मेंटेनर करतं.
साधारण सहाव्या वर्षी खालचे समोरचे दात पडायला सुरुवात होते. बर्याच मुलांना हे दात पडण्याआधीच नवे दात येऊ लागतात !
दुधाच्या दाताचे मूळ झिजायला लागते आणि मग तो हलून आपोआप पडतो आणि त्याच जागी नवा दात येतो.पण काही मुलांच्या दाताची मुलं झिजतच नाहीत्,पण आत कायमच्या दाताचे मूळ मात्र मोठे होते.तो दात आत मावेनासा होतो.मग तो जिथे सोयीने येता येईल असा मार्ग म्हणजे दुधाच्या दाताच्या मागे येऊन बसतो! अशा वेळी लवकरात लवकर डेंटिस्टकडे जाऊन दुधाचे दात काढून घ्यावे.म्हणजे नवा आलेला दात त्या जागी आपोआप येतो.काही करावे लागत नाही. दातांना अजिबात व्यायाम नसणे हेसुद्धा हा प्रकार घडण्याचे एक कारण आहे.म्हणूनच मुलांना तोडून फळं खाण्याची सवय लावावी.विशेषतः सफरचंद,गाजर अशी.त्यामुळे दातांना ,हिरड्यांना व्यायाम होतो,त्यांचे रक्ताभिसरण सुधारते आणि दात पडणे,नवे येणे सुकर होते.
वरच्या तक्त्यावरून लक्षात येईल की सहाव्या वर्षापासून मुलांना कायमचे दात येऊ लागतात.आधीचे दुधाचे दात किडके असल्यास हे दात किडायला वेळ लागत नाही.म्हणून या वयातल्या मुलांना दात किडू नये यासाठी प्रतिबंध करणारे उपचार आता करता येतात .ते आहेत फ्लोराइड लावणे आणि सिलंट्स.
फ्लोराइड उपचार- नवा आलेला दात हा एखाद्या चाळणीसारखा कॅल्शियमच्या तंतूंनी बनलेला असतो.या चाळणीची भोकं जितकी मोठी दात किडायची शक्यता जास्त.इथे फ्लोराइड काम करते.ते या चाळणीच्या भोकांमध्ये जाऊन बसते.त्यामुळे दाताचे एनॅमलचे आवरण मजबूत बनते.असा दात पटकन किडून त्यात छिद्र पडत नाही.यासाठीच फ्लोराइडची टूथपेस्ट वापरायचा सल्ला नेहमी दिला जातो.
साधारण सहाव्या सातव्या वर्षी फ्लोराइड दातांना लावायचे उपचार करून घेता येतात.यासाठी आम्ही मुलांना जेवून आणायला सांगतो.म्हणजे फ्लोराइड लावल्यानंतर लगेच ते निघून जाऊ नये.मुलांच्या तोंडात फ्लोराइड जेल भरलेले मऊ ट्रे दोन ते तीन मिनिटे ठेवले जातात.ते फ्लोराइड दातामध्ये शोषले जाण्यासाठी एवढा वेळ द्यावा लागतो.
मग हा ट्रे कढून मुलांना जास्तीचे तोंडात आलेले जेल थुंकून टाकायला लावले जाते.दुसर्या जबड्यातल्या दातांनाही याच पद्धतीने फ्लोराइड लावले जाते.
यानंतर अर्धा तास तरी मुलांना पाणी देऊ नये.बरेच दात किडके असणार्या मुलांना परत सहा महिन्यांनी तसेच दोन वर्षानी हीच प्रोसिजर करायला सांगितले जाते.६-७ आणि १०-११ वयाच्या मुलांची ही ट्रिटमेंट जरूर करून घ्यावी.
सिलंट्स- आपल्या कायमच्या दाढा आणि उपदाढा या गुळ्गुळीत नसतात.त्यांच्यावर खडबडीत भाग असतो.या भागात अन्न साचलेले राहून दाढा किडायला सुरुवात होते.म्हणून ही,सिलंट्स वापरली जातात.ही रेझीन प्रकारातली पातळ सिमेंट्स असतात.ती प्रवाही असल्याने दात स्वछ धुवून,त्यावर ही सिरिंजने सोडली जातात.ती दाताच्या भेगा,छिद्रांमध्ये जाऊन बसतात.मग विशिष्ट प्रकारच्या लाइटने त्यांना कडक केले जाते.यात अजिबात दुखत नाही.दाताचा पृष्ठभाग गुळगुळीत झाल्याने त्यात अडकून दात किडणे बंद होते.सहाव्या आणि बाराव्या वर्षी दोन्ही कायमच्या दाढा आल्या की हा उपचार जरूर करून घ्यावा.दात किडणे प्रकार नक्कीच कमी होईल.
. या वयातल्या मुलांचा अजून एक प्राॅब्लेम म्हणजे अंगठा किंवा बोट चोखायची सवय असणे.पाच वर्षानंतरही हे सुरु राहिल्यास अंगठ्याचा प्रेशरमुळे टाळुचा भाग खोल जाऊ लागतो आणि समोरचे दात पुढे येऊ लागतात. पाचव्या वर्षानंतरही सवय सुरु राहिल्यास डेन्टिस्टकडे जरुर घेऊन जावे.ते यासाठी एक सवय मोडणारे अॅप्लायन्स बनवून देतात.ज्यामुळे मुलांना अंगठा तोंडात घालता येत नाही. नंतर दात पुढे आल्यावर करायच्या मोठ्या ट्रीटमेंट टाळता येतात.
याच प्रकारची अजून एक सवय म्हणजे रात्री मुलांच्या तोंडात पॅसीफायर द्यायची.त्यानेही दातांमध्ये रचनाबदल होऊ शकतात.या सवयी वेळीच मोडलेल्या चांगल्या.
.दात ब्रश करणे-या सर्व प्रतिबंधात्मक उपचारांबरोबरच रोज दोन वेळा दात घासणे अत्यंत जरूरी आहे.यासाठी सर्व कुटुंबाने डेंटिस्टची भेट घेऊन आपापल्या दंतरचनेप्रमाणे दात कसे घासावे हे जरूर शिकून घ्यावे.
एक सर्वसधाराण पद्धत म्हणजे दात हिरडीपासून जिथे सुरू होतो तिथे ४५ अंशाच्या कोनात पकडून खालीवर असे घासत जाणे.आतल्या बाजू न विसरता घासणे.
दातात फटी असल्यास इंटरडेंटल ब्रश डॉक्टरी सल्ल्याने वापरणे.फट नसलेल्या दातांना डेंटल फ्लॉसने दोन दाताच्या मधला भाग साफ करणे.कोणताही सरळ मऊ ब्रिसल्स असणारा ब्रश वापरणे योग्य.कारण पेस्टच्या वापराने ब्रश कडक होत जातो.तो चार महिन्याने बदलावा.अती जोरात भांडी घसल्यासारखे दात कधीही घासू नयेत!जर फार लवकर आपला ब्रश झिजतोय तर तुम्ही दाताला चरे पाडताय.मुलांना आपल्याबरोबर ब्रश करायची सवय लावावी. नेहमी मुलांना माझ्यासमोर हा रात्री दात घासत नाही म्हणून ओरडणार्या पालकांना तुम्ही घासता का विचारल्यावर त्यांची पंचाईत होते ! मुलांना सवय लावण्यासाठी ती सवय स्वतःत मुरणे आधी आवश्यक नाही का!!
हे झाले मुलांसाठी प्रतिबंधात्मक उपाय.पुढच्या भागात प्रौढांच्या दातांसंबधी जाणून घेऊ.
( सर्व चित्रे व तक्ते आंतरजालावरून साभार )

Book traversal links for दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग २
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
दुधाचे दात न पडणं आणि तिथेच
:)
हम्म......आज सकाळी मुलाची सहा
वाचतेय. मस्त लेख :)
अतिशय उपयुक्त माहिती! वाखुसाआ
अतिशय माहितीपूर्ण आणि उपयुक्त
अतिशय उत्तम माहिती
नेहमी प्रमाणे लेख आवडला.
अजया
मुलांना दाढ आल्या आल्याच
अतिशय उत्तम माहिती!
सिलंट किती दिवस टिकतो ? अन्न
चांगला सिलंट आठ ते दहा वर्ष
उद्देश तुम्ही सांगता तोच आहे
छान लेख
१४ वर्षाच्या मुलाची दाढ
सुंदर माहिती. ही लेखमाला
हा ही भाग उत्तम
पॅसिफायरबद्दल दोन्ही प्रकारची
धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती.
छान
ही माहितीहि अतीशय
छान महितीपूर्ण लेख
+ १
आमच्या मुलाला "ब्रशला पेस्ट
पिरा,ब्रशला वरुन पेस्ट न
काती वर्षाच्या मुलांसाठी वापरावा?
अगदी लहान बाळ सोडून कोणीही
दोन्ही भाग आवडले
माहितीपुर्ण लेखमाला
माझ्या वडिलांना (५४) जरा
चांगलंच आहे चुळा भरणं.जरा
धन्यवाद!
मना पासुन धन्यवाद
टूथ पावडर हाताला कितीही
उत्तम लेख.
उत्तम माहितीपूर्ण लेखमाला!
छान लिहिलय..माझ्या लहानपणी
Pediflor
सिलंट, ईंटरडेंटल ब्रश
माझाहि एक दात रांगेत न येता
टायमिंग