Skip to main content

टेकडी आणि तो..........

लेखक एक एकटा एकटाच यांनी रविवार, 13/12/2015 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
आजही तो जात होता त्या टेकडीवर अर्धवट धुंदीत, शरिराला झोकांड्या देत पाउलवाटेची कोडी अंदाजाने सोडवत सरळसोट रस्त्यावरही उगाचची वळणं घेत लहानपणापासून यायचा तो तिथे जणू ती टेकडी त्याची सर्वस्व होती जिवनातल्या सगळ्या चढ-उतारांची त्याच्या ती एकमेव साक्षीदार होती आयुष्यातली प्रत्येक आनंदाची बातमी त्याने सर्वप्रथम तिलाच तर सांगितली होती आजवरच्या भांडणातली आपली बाजू फक्त तिच्याकडेच मोठ्या उमेदीने मांडली होती सगळे डाव मनासारखे जुळून आलेले समृध्दी प्रतिष्ठाही हातांत हात घालुन मिरवीत आली पण ........ अचानक फासे पलटले, दैवाने खो घातला आपलं म्हणवणाऱ्यानीही, आपली खरी ओळख दाखवली त्यानंतर तो वरचेवर तिच्याकडे येउ लागला त्याच्या मनातला आक्रोश, ती शांतपणे ऐकू लागली आयुष्याच्या उतरणीवरचा सुरू झालेला त्याचा जिवघेणा प्रवास, ती हताशपणे पाहु लागली आजही तो परत आला होता तिच्याकडे तहांत स्वतःलाही गमावलेल्या महाराजासारखा पहात होता दूर क्षितिजाला, तिच्या डोक्यावरून वाटत होता बेफिकीर तरी आतुन खचल्यासारखा दुसऱ्याच क्षणाला तो तिथुन गायब झाला तिच्याशिवाय त्यानंतर तो कुणालाच गवसला नाही आताही येतो तो नेमाने, दर पुनव - अवसेला बाकी कुणी आता तिच्याकडे चुकूनही फिरकत नाही
लेखनविषय:

वाचने 2231
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

सुरेख.

आवडलं

...