Skip to main content

तगमग....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 11/12/2015 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगू हल्ली काही सुचतच नाही ह्या बोथट मनाला हल्ली काही बोचतच नाही ह्या शहरात राहून संवेदना झाल्यात बधीर इथे जो तो नुसतेच फोटो काढायला अधीर पडणारा कोणीतरी आकांताने हात मागतोय बघणारा मोबाईलमध्ये त्याचाच फोटो काढतोय तो पलीकडे लटकतोय… मला काय त्याचे ?? आपण तिथे नाही ना मग आपल्याला काय करायचे ? तोही कोणाचा कोणीतरी असेल … मग असू देत …. उद्या त्याच्यासाठी कोणीतरी रडेल … रडू देत …. मी माझ्याच कोशात सुरक्षित आहे ना…. मग बाकीच्यांना काहीही करू देत …. गीतेत वाचलं की शरीर मरतं…आत्मा अमर ! इथे आत्माच मेलाय,फक्त शरीरांची भर वाचलं ते बरोबर की पाहतोय ते…. काही कळतच नाही म्हणूनच खरं सांगू मला हल्ली काही सुचतच नाही
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1409
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सुंदर लिहिलंय.
गीतेत वाचलं की शरीर मरतं…आत्मा अमर ! इथे आत्माच मेलाय,फक्त शरीरांची भर
....सुपर्ब