असलो जरी मी नास्तिक तरी
देवालाच दोष देत मी रडतो
कुणासोबत मंदिरात जाता
विश्वास नसून पाया पडतो....
नाही विश्वास भूता-खेतावर
म्हणत मी टेम्भा मिरावतो
ऐकट पडलो की मात्र
अंधाराला खुप घाबरतो...
खर खोट सिद्ध करायला
मीही शप्पत घेतो
नजर लावली कुणी म्हणून
मीही दूषण देतो...
स्वतावर आहे भरोसा तरी
शिंक आली की थांबतो
नस्तिक्तेच व्याख्यान मात्र
अभिमानाने सांगतो...
सण संपता निरोप घेता
मीही होतो बर भाऊक
आहेच खर का मी नास्तिक
ते त्या इश्वरालाच ठाउक...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3195
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
आवडली कविता.
छाण !
धन्स प्रगो!!! स्वयंघोषित
In reply to छाण ! by प्रसाद गोडबोले
'नास्तिक' या शब्दाचा खरा अर्थ
In reply to छाण ! by प्रसाद गोडबोले
मस्त कविता आहे आवडली
आवडली
छान काव्य
खूप छान . नास्तिकतेच ढोंग
आभारी आहे
नास्तिक
मत अगदी रास्त आहे तुमच
In reply to नास्तिक by तिमा
कविता आवडली
हे असेही
हे असेही
छान कविता !