कादंबरी
अखेर जगणे अशक्य होते..
रात्रंदिन मुखवट्याची झूल पांघरून,
हसणे, खेळणे, नाचणे, आनंदाने गाणे..
मुखवटा उतरायचे ठरते.
एकेक पापुद्रा गळत जातो..
आणि हे घडताना..
चीरवेदनेचा चीरआक्रोश,
रीतीभातींच्या चिरेबंदी वाड्याबाहेर
पडू शकत नाही काही...
सगळे पापुद्रे गळल्यानंतर..
मागे उरते निव्वळ निर्वात पोकळी..
मुखवटा गळताना
अस्तित्वाच्या खाणाखुणाही
केव्हा गळून जातात..
कळतच नाही.
अशक्य सुंदर!
स्वामिज्जि की महान रचनाएँ..
वाह मस्तच