सुहास शिरवळकरांची पुस्तके आणि मी
मागे दिड-दोन वर्षांपूर्वी जेव्हा मला अंधारछाया आणि शिरवळकरांची बरीच जुनी पुस्तके मिळाली होती तेव्हाची ही गोष्ट आहे.
त्यावेळेस मला अनपेक्षितरित्या हा खजिना मिळाला होता, आणि माझ्या संग्रहात आणि माहितीत नवीन भर पडली होती. त्यावेळेस मला असे वाटत होते, की शिरवळकर कुटुंबीय आणि ठराविक ४-५ लोक सोडले तर माझ्याइतकी माहिती कोणाही जवळ नाहीये.
मी त्यांच्या ’थर्राट’ ह्या रहस्यकथेच्या १९८८ सालच्या आवृत्तीच्या शोधात काही दिवस अनेक ग्रंथालये आणि जुनी रद्दीची दुकाने पालथी घालत होतो. ह्या आवृत्तीचे वैशिष्ट्य असे आहे की, त्यात ’अमर विश्वास’ ह्या पात्राच्या जन्मकथेचा जन्म कसा झाला, हे त्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत शिरवळकरांनी सांगितले आहे. ही आवृत्ती मला आधी पुणे मराठी ग्रंथालयात वाचायला मिळालेली असल्यामुळे मला माहित होते. पुढे त्यांच्याकडे ह्या आवृत्तीची प्रत खराब झाल्यामुळे ती वाचनालयातून डिसकार्ड करण्यात आली होती.
तर ही आवृत्ती शोधताना मी सदाशिव पेठेतील लोकमान्य वाचनालयात गेलो. मी एखादे पुस्तक शोधताना समोरच्या व्यक्ती आणि ग्रंथालयाला सांगतो की, मी शिरवळकरांच्या पुस्तकांचा अभ्यास करत आहे आणि मला त्यांच्या काही पुस्तकांची गरज आहे. जर तुमच्याकडे ती प्रत उपलब्ध असल्यास ती मला पाहायला मिळेल का? जर मी तुम्हाला त्या पुस्तकाची नवीन प्रत उपलब्ध करून दिली तर जुनी प्रत तुम्ही मला देऊ शकाल का? किंवा अगदीच हे नसेल तर तुम्ही मला त्या आवृत्तीचे फोटोज् किंवा झेरॉक्स काढून घेण्यासाठी मदत करू शकाल का? ह्या सर्व गोष्टींना नकार आला तर, मी त्या ग्रंथालयाचा सभासद होतो आणि हवे असलेल्या पुस्तकाच्या प्रतीच्या झेरॉक्स काढून घेतो.
या आधी मला मी कॉलेजमध्ये असताना तिथे सभासद होण्यास गेलो असता, त्या ग्रंथालयाचा फार काही चांगला अनुभव आला नव्हता. पण ह्या वेळेस विषय वेगळा होता.
मी तिथे गेल्यावर त्यांना ’थर्राट’च्या आवृत्तीबद्दल विचारले. त्यांच्याकडे ती उपलब्ध नव्हती. पण तिथल्या चालकांना माझी माहिती मिळवायच्या गोष्टीचे कौतुक वाटले. त्यांनी विचारपूस करताना मी फार मोठ्या अभिमानाने सांगितले की माझ्याकडे ’ऑब्जेक्शन युवर ऑनर’ची पहिली प्रत आहे. अंधारछाया आहे, आणि बरेच काही! त्यांनी अंधारछायाचा विषय निघताच त्यांनी मला म्हटले, तुम्ही ’धुकं-धुकं’ पाहिले आहे का? मला धुकं-धुकं ची एकत्रित आवृत्तीची द्वितियावृत्ती माहिती होती. ती मी सांगितली. तर त्यांनी सांगितले की, ह्या धुकं-धुकंची मोठ्या आकारातील आवृत्ती होती. मला धक्काच बसला! मी मारे उगीचच अभिमानाने फुशारक्या मारत होतो की मला फार माहिती आहे. पण ह्या माहितीने माझ्यातील हवा भसकन् काढून घेतली. मी शिरवळकरांच्या माहितीचा स्त्रोत वगैरेची जी काही हवा माझ्या डोक्यात भरली होती, ती ह्या धक्क्याने पूर्णपणे निघून गेली.
मी माहिती कन्फर्म करण्यासाठी सम्राट शिरवळकरांना फोन केला , तेव्हा त्यांनीपण ह्या आवृत्तीबद्दल माहिती सांगितली. त्याला निळे कव्हर होते- ज्या कथा अंधारछायात आल्या नाहीत त्या ह्या पुस्तकात आल्या , अशी बरीच माहिती त्यांनी दिली.
ह्या सर्व प्रकारानंतर मला ओशाळल्यासारखे झाले. मी बाकीच्यांना ज्या फाजील आत्मविश्वासाने फुशारक्या मारत होतो, त्या बंद झाल्या. आजही कधी माझ्यातला गर्व उसळून आलाच तर हा प्रसंग आठवतो, आणि मी सोडावॉटर बॉटलच्या फेसासारखा लगेच निवळतो.
हे सर्व सांगायचे कारण म्हणजे , मी काही पुस्तके मिळवत होतो. अजूनही मिळवत आहे. सुगंधा काकू, सम्राट शिरवळकर, साकेत लायब्ररी, पुणे नगर वाचन मंदिर, रद्दीची दुकाने, जुन्या पुस्तकांची दुकाने, समीर, प्रभाकर, आठवले यांसारखे जुने पुस्तक विक्रेते, मनोज शेडबाळकर, मंदार गोरे, रमा नाडगौडा, सागर भंडारे, भारत बुक हाऊस यासारख्या अनेक सु.शि.प्रेमींनी मला कशाचीही अपेक्षा न धरता मदत केली आहे. अजूनही करत आहेत. मी यांच्या कधीही ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही, हे मला माहित आहे!
आणि हो-
मला अजूनही काही पुस्तके हवी आहेत. आपल्या कोणाकडे असल्यास ती आपण मला देऊ शकता का, हे कळवा. याबद्दल त्या पुस्तकाचा मोबदला, रक्कम अथवा तिची नवीन कॉपी मी तुम्हाला देऊ शकतो. कृपया ह्याबद्दल विचार करावा.
पुस्तकांची नावे खालीलप्रमाणे-
दुनियादारी- पहिली आवृत्ती,
कोवळीक- पहिली आणि दुसरी आवृत्ती
मुक्ती- पहिली आणि दुसरी आवृत्ती
प्राक्तन- पहिली आवृत्ती
तलखी- पहिली आणि दुसरी आवृत्ती
गढूळ- पहिली आवृत्ती
धुकं-धुकं- पहिली आवृत्ती
तलाश- पहिली आवृत्ती
जाई- पहिली आवृत्ती
क्षणोक्षणी- पहिली आवृत्ती
थरारक- पहिली आवृत्ती
पहाटवारा- पहिली आवृत्ती
कल्पान्त- दुसरी आवृत्ती
पाळंमुळं- पहिली आवृत्ती
बाल वाड्:मय- गर्वहरण, मूर्खांचा पाहुणचार, बक्षीस, मठ्ठ आज्ञाधारक
नभोनाट्य/ एकांकिका: हात तिच्या, मानवाय तस्मै नम:, आवर्तन, मास्टर प्लॅन, जस्ट हॅपनिंग ह्यांच्या मासिकांमध्ये प्रकाशित झालेल्या काही प्रती असल्यास कळवणे
शिरवळकरांच्या सर्व रहस्यकथांच्या एकदम जुन्या प्रती १९७३-१९८० पर्यंतच्या असल्यास कळवावे. ह्यातील कुठल्याही प्रतीसाठी नवीकोरी पुस्तकाची प्रत आपणांस मिळेल अथवा जर तुम्हाला त्याची काही रक्कम हवी असल्यास तीदेखील मिळेल.
कृपया कळवणे.
संपर्क- ८९५६८६८३३२, पुणे
अनेक अनेक धन्यवाद!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शिरवळकरांची एक कादंबरी
अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व
कादंबरीची थोडक्यात रूपरेषा सांगाल का?
झाडांच्या मुळात एकवेगळे विश्व
ते नारायण धारपांचे पुस्तक असावे.
बरोबर,चुकले माझे, .
कादंबरी चे नाव हवे आहे.
नक्की नाही आठवत पण बहुतेक 'अट्टल' आहे.
वाह ये बात! तुम्हाला शुभेच्छा
जर पुस्तके मिळाली तर नक्कीच खूप मोठी मदत होईल. यादी आहे माझ्याकड
इथे दिलीत तर आभारी असेन.
सुशिंच्या पुस्तकांची अद्ययावत यादी खालीलप्रमाणे-
धन्यवाद!
यादी पाहता जाणवून गेलं की मी
अरे वा! समग्र यादी! अनेकानेक
अविस्मरणीय अनुभव
..
शुभेच्छा.
धन्यवाद
फार छान धागा आहे
ऑनलाइन पिडिएफ स्वरुपात उपलब्ध आहेत का ?
ऑनलाईन पीडीएफ उपलब्ध नाहीयेत. पण...
तुम्ही एका हळव्या कोपऱ्याला
तुम्ही म्हणता ती ’ताशर’ ही कादंबरी नसून ...
तुमच्या
आज आपल्या लाडक्या सु.शिं.चा