माह्या मायेचं कारटं
जाई खळ्यात मळ्यात
गाऊनी अभंग
खेळी शेणात शेणात
माह्या मायेचं कारटं
चाले हसत रुसत
भाळूनी चंद्राला
शोधी आभाळ आभाळ
माह्या मायेचं कारटं
सुटे ऊन्हात रानात
शोधीत पाण्याला
होई छप्पर छप्पर
माह्या मायेचं कारटं
निजे सुखात दु:खात
होऊनी भाकरी
जाई थापत थापत
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4294
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा फिदा झाहलो
+१
In reply to वा वा फिदा झाहलो by पालीचा खंडोबा १
माऊली. आज मिपा झाली पंढरी
क्या बात है !
+१
In reply to क्या बात है ! by मितान
__/\__
वाहवा!
उत्तम
मस्त
क्या बात है भाऊ....!!!!!!
बहिणाबाईञ्च्या वळणाने जाणारी कविता
+111
In reply to बहिणाबाईञ्च्या वळणाने जाणारी कविता by चांदणे संदीप
मस्तच...
छान!
छान कविता.आवडली.
जव्हेरगंजभौ...