माझी मैत्रीण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
कोणताही पूर्वग्रह न ठेवता हा लेख वाचावा .मी ५० /१०० प्रतिसादांसाठी (ट्यार्पी) लिहिलेले नाही.यामध्ये कोणतीही झैरात/झायारात/जाहिरात करण्याचा हेतू /उद्देश नाही. बाकी आपल्या अनुभवांचे अर्थातच स्वागत आहे.
माझी मैत्रीण ,जिने मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट आणि कठीण प्रसंगात मला साथ दिली ,आधार दिला, मला समजून घेतेलं आणि माझी खूप काळजी घेतली ती आमच्या प्यांटवाल्यांची आई ,अर्थातच माझ्या सासूबाई. :)
अतिशय प्रेमळ ,नेहमी गोड बोलणाऱ्या ,कोणालाही कधीही न दुखावणार्या अशा माझ्या सासूबाई, सौ.सुमती. जेंव्हा माझ लग्न ठरलं होत तेंव्हाच मला त्यांच्या स्वभावाची प्रचीती आली होती.त्याचं आयुष्य एका खेड्यात गेल. त्यांनी नेहमीच प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारली .कधीही कोणती तक्रार नाही अगदी नशिबाविषयी सुद्धा .मला त्यांची सगळ्यात आवडणारी गोष्ट ,त्या कायम हसतमुख असतात . :)
माझ्या लग्नानंतर ८ दिवसात माझे वडील खूप आजारी पडले.त्यांची अञ्जिओप्लास्टी करावी लागली. ज्या क्षणी मला फोन आला त्या वेळी त्या माझ्या बरोबर घरी होत्या . फोनवर बोलत असताना मी रडू लागले .मला त्या वेळी काहीच समजत नव्हते.फोन संपल्यावर मी एकच वाक्य बोलले ,बाबांना अडमिट दवाखान्यात भरती केलाय.मी जाऊ का? त्या मला लगेच म्हणाल्या तू एकटी जाऊ नकोस ,मी पण येते. मग मी आवरलं आणि त्या दुधानी भरलेला कप घेऊन आल्या कारण सकाळची वेळ होती ,माझे सासरे आणि माझे अहो नुकतेच ऑफिस गेले होते आणि आमचा नाश्ता झाला नव्हता . माझी इच्छा नसताना मला जबरदस्ती घ्यायला लावलं .मी अर्धा कप घेतलं आणि त्यांना अर्धा कप
दिल.त्या दिवसांमध्ये त्यांनी मला जो आधार दिला तो मी कधीही विसरणार नाही .
त्या घटने नंतर ७ - ८ महिन्यातच माझे वडील गेले .तेंव्हा १५ दिवस त्या माझ्याबरोबर माझ्या माहेरी राहिल्या .माझ्या आईची काळजी घेतली, अगदी आईच्या हातात जेवणाच ताट दिल ,समजूत घालून थोडस खायला लावलं .स्वताच्या सुनेच्या आईशी , आपल्या विहिणीशी इतक्या प्रेमाने वागणारी स्त्री मी तरी पहिल्यांदा पहिली .
त्यांनी माझ्यासाठी जे केल ते त्याची परतफेड होऊ शकणार नाही असे मला वाटते .
मागच्या मे महिन्यात त्या एका गंभीर आजाराने त्रस्त होत्या .आता त्या आजारातून पूर्णपणे बर्या झाल्या आहेत . त्या अशाच हसतमुख राहाव्यात आणि मला त्यांचा सहवास जास्तीत जास्त मिळावा हीच भगवंताकडे प्रार्थना करते.तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वाद आमच्या पाठीमागे असतील अशी मी अशा करते .
सासू सुना ह्या मायलेकी होऊ शकणार नाहीत कदाचित पण चांगल्या मैत्रिणी निश्चित होऊ शकतात. प्रत्येक घरामध्ये जर अशी मैत्री झाली तर बर्याचश्या समस्या कमी होतील. नवऱ्याच मन जिंकायचं असेल तर आधी त्याच्या माणसांना आपलंस कराव ,त्यांना जिंकाव हे मी माझ्या अनुभवातून शिकले आहे. माझ्या सगळ्या मैत्रीणीना मी हेच सांगेन कि सासूशी मैत्री करा ,तुमचा संसार सुखाचा होईल.
माझे विचार मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पूर्ण लेखामधून आपल्याला वाटेल तसा अर्थ काढून लेखाचा मूळ विषय बदलवू नये ही विनंती . शेवटी
I am responsible for what I say ,not for what U understand. :)
प्रतिक्रिया
धन्यवाद ...पिरा...उलट आमच जमत
शांत (गदाधारी?) पिरा शांत
ओक्के..
छान लिहिलंय!
स्वाती ठकार
जिंदगी किसी अपने को ढुंढती
छान लिहिलाय लेख
जाता जाता, दिव्यश्रीताई,
सगळ्या वाचकांचे आभार.
सकाळचे मुक्तपीठ
राम्राम...कसे आहात सगळे? ओळख
बस कर पगली! अब रूलायेगी क्या!
Pagination