बंडुमामाची बंडुमामी
बंडुमामाची बंडुमामी
जगावेगळ बोलायची
भविष्यातल्या सोनेरी
स्वप्नांची दारे
अलगद खोलायाची
लाळ गाळत हसताना
नको तिथे
दाबायची !
सावलीसारखा इल्या
तसचं वागायचा
भिरभिरणा-या भोव-यासारखा
मागे मागे लागायचा
पंखवाला स्वप्नातला घोडा
हळूच जमीनीवर
आणून सोडायचा !
बंडुमामाची सवयच
निराळी
चिलमीचा बार भारताच
रंगायची स्वारी,
घरामागच्या छपरात
बंडुमामी कबुतरं उडवायची
अन्
बंडुमामाची गाडी
रुळावरनं घसरायची !
कुणी अक्करमाश्या
म्हटलं कि इल्या
फिदीफिदी हसायचा
तेवढ्यापुरता बंडुमामाचा
चेहरा धुरात बुडायचा
अन्
बंडुमामी परसात जाताच
जादूचा दरवाजा
बंद व्हायचा !
चिलमीच्या धुरात
बंडुमामा जळून गेला
इल्या आता ओसरीवर
एकटाच राहिला,
तोपर्यंत स्वप्नातल्या
कळ्यांची फुली झाली
अन्
बंडुमामीची रयाच गेली !
अक्करमाश्या इल्या
आता चिलमीच्या धुरात
बुडतो
कोवळ्या वयात करपलेल्या
नजरेला घेवून
मी
इल्याकडे बघत असतो !
विजयकुमार.........
०९.०९.२००९
गविराजांचा 'टोलनाक्यावरचा
जब्बरदस्त!
कुछ तो बात है यार तुम मे
हा हा
वंटास!!!
हे
+१ अशेच म्हनीतो!
क्लास!
बोकोबा
छान!
धन्यवाद मित्रानो ! नाही तर