काल पाहिली मी तिला
पावसात चिंब भिजलेली
माळुन अगणित मोती
इंद्रधनुत सजलेली..............
काल पाहिली मी तिला
पहाटेच्या धुक्यात वेढलेली
ओझरत्या स्पर्शाने तिच्या
ही हवा गुलाबी झालेली........
काल पाहिली मी तिला
चांदण्यात निजलेली
स्वप्नांच्या दुनियेत तिच्या
सारी रात्र रमलेली..............
काल पाहिली मी तिला
क्षितिजावर विसावलेली
सांज उतरुन गेल्यावरही
संधिप्रकाशात उरलेली............
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2243
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
संदर कविता
आत्ताच पाहिली मी हिला
मेनबोर्डवर चढलेली
धागा उलघडून वाचताना
कविता आवडलेली.....
वा!
समर्पक समारोप!
वर जातवेद यांचा प्रतिसादही छानच! :)
Sandy
धन्यवाद सगळ्यांचे
जात वेद
प्रतिसाद आवडला.
मस्त !!
मस्त !!
सुंदर कविता
मस्त
आवडली ....एक नंबरररररर
काल पाहिली मी तिला
तुमच्या जवळ बसलेली
हरपुन देहभान तुमच्या
मिठीत विसावलेली
मस्तय
मस्तय
सुरेख... :)
सुरेख... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-'Hegemony of Western media has to end' - Arnab Goswami at RT conference
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
आवडली
आज मी कविता पहिली
मलाही खुप आवडली:):)