मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वाचने
150746
प्रतिक्रिया
648
मिसळपाव
प्रतिक्रिया
नशीबवान आहात राव!
In reply to धन्यवाद मित्रांनो. by Dhananjay Borgaonkar
अभिनंदन
In reply to धन्यवाद मित्रांनो. by Dhananjay Borgaonkar
जास्त फरक नाही आहे. मलातरी
In reply to अभिनंदन by मी-सौरभ
क्लासिक की थंडरबर्ड? ३५०की ५००?
आजची रपेट
म्हणजे १०० च्या वेगाने गेलात.
In reply to आजची रपेट by कैलासवासी सोन्याबापु
यस यस बिना हेलमेट काहीच नाही
In reply to म्हणजे १०० च्या वेगाने गेलात. by मोदक
नवीन हॅंडलबार
जागेवर गाडी U टर्न घेताना
In reply to नवीन हॅंडलबार by भटकंती अनलिमिटेड
यू टर्नला अजून तरी तसा त्रास
In reply to जागेवर गाडी U टर्न घेताना by मोदक
केबल्स (क्लच, अस्सेलरेटर)
In reply to यू टर्नला अजून तरी तसा त्रास by भटकंती अनलिमिटेड
सार्या केबल्स त्याच आहेत.
In reply to केबल्स (क्लच, अस्सेलरेटर) by जिन्क्स
फोटोमध्ये एक केबल
In reply to सार्या केबल्स त्याच आहेत. by भटकंती अनलिमिटेड
आपण सांगितले आणि लगेच
In reply to फोटोमध्ये एक केबल by मोदक
चांगले आहे. लैच मोठी केबल
In reply to आपण सांगितले आणि लगेच by भटकंती अनलिमिटेड
हँडल
In reply to नवीन हॅंडलबार by भटकंती अनलिमिटेड
होय. आरडीच!
In reply to हँडल by कपिलमुनी
तुम्ही अनुभवी आहातच.. तरीही
In reply to होय. आरडीच! by भटकंती अनलिमिटेड
आर डी हँडल
In reply to तुम्ही अनुभवी आहातच.. तरीही by मोदक
होय, आरडी हॅंडल क्लासिकपेक्षा
In reply to आर डी हँडल by कपिलमुनी
हे आल का मार्केटमध्ये?
In reply to नवीन हॅंडलबार by भटकंती अनलिमिटेड
काळ्या रंगातही हेच हॅंडल
In reply to हे आल का मार्केटमध्ये? by अनिरुद्ध.वैद्य
दुकानाचा नाव ? पत्ता?
In reply to काळ्या रंगातही हेच हॅंडल by भटकंती अनलिमिटेड
हँडलचा अँगल वगैरे तिथे
In reply to दुकानाचा नाव ? पत्ता? by कपिलमुनी
फोटोमध्ये ग्रीप कव्हर दिसत
In reply to हँडलचा अँगल वगैरे तिथे by भटकंती अनलिमिटेड
ग्लोव्ज वापरत असल्याने
In reply to फोटोमध्ये ग्रीप कव्हर दिसत by मोदक
होय, मला पण पावसात ग्रीप चा
In reply to ग्लोव्ज वापरत असल्याने by भटकंती अनलिमिटेड
माझी क्लासिक ३५० वायरिंग चा
माझी आवेंजर पण हाच त्रास
In reply to माझी क्लासिक ३५० वायरिंग चा by कैलासवासी सोन्याबापु
वायरिंग हार्नेस घासते आहे
In reply to माझी क्लासिक ३५० वायरिंग चा by कैलासवासी सोन्याबापु
हां उपाय करुण बाघेन. माझा
In reply to वायरिंग हार्नेस घासते आहे by भटकंती अनलिमिटेड
५०००/५५०० कार सर्व्हिसींगला
In reply to हां उपाय करुण बाघेन. माझा by बाबा योगिराज
नै ना वो....
In reply to ५०००/५५०० कार सर्व्हिसींगला by टवाळ कार्टा
जौदे...याच्साठी मला RE आवडत
In reply to नै ना वो.... by बाबा योगिराज
काय टका भौ....
In reply to जौदे...याच्साठी मला RE आवडत by टवाळ कार्टा
खिक्क
In reply to काय टका भौ.... by बाबा योगिराज
काय टका भौ....
In reply to जौदे...याच्साठी मला RE आवडत by टवाळ कार्टा
काय टका भौ....
In reply to जौदे...याच्साठी मला RE आवडत by टवाळ कार्टा
एखादा शून्य जास्ती पडलाय का ओ
In reply to हां उपाय करुण बाघेन. माझा by बाबा योगिराज
जमळ णा...
In reply to वायरिंग हार्नेस घासते आहे by भटकंती अनलिमिटेड
।हायला
In reply to जमळ णा... by बाबा योगिराज
सीट बदलायचे आहे
ब्याकरेस्ट वाली बघा आवडते का
In reply to सीट बदलायचे आहे by कपिलमुनी
फोटू
In reply to ब्याकरेस्ट वाली बघा आवडते का by वेल्लाभट
मी या पूर्वी हा प्रश्न
TB
In reply to मी या पूर्वी हा प्रश्न by मोदक
ते उंचीला कमी वाटते आहे..
In reply to TB by कपिलमुनी
असा तयार करून घ्या
In reply to ते उंचीला कमी वाटते आहे.. by मोदक
!
बाब्बौ....टॉरस अज्जून आहे का
In reply to ! by आबा
नाही ना, विकली वडीलांनी ४-५
In reply to बाब्बौ....टॉरस अज्जून आहे का by टवाळ कार्टा
आर्र्र....व्हिंटेज बाईक आहे
In reply to नाही ना, विकली वडीलांनी ४-५ by आबा
गप्पे. टॉरस हायेत अजून ७-८
In reply to आर्र्र....व्हिंटेज बाईक आहे by टवाळ कार्टा
नक्को....पोरीपेक्षा जास्त
In reply to गप्पे. टॉरस हायेत अजून ७-८ by अभ्या..
ही गाडी खरच चांगली आहे. पण
In reply to गप्पे. टॉरस हायेत अजून ७-८ by अभ्या..
माझी रॉयल एन्फ़िल्ड.. Model Year : 1992
माझी रॉयल एन्फ़िल्ड..Model Year : 1990
In reply to माझी रॉयल एन्फ़िल्ड.. Model Year : 1992 by आसिफ
अभिनंदन!
In reply to माझी रॉयल एन्फ़िल्ड..Model Year : 1990 by आसिफ
मस्त !
In reply to माझी रॉयल एन्फ़िल्ड.. Model Year : 1992 by आसिफ
होय !!
In reply to मस्त ! by कपिलमुनी
मी पण !
फोटो मस्त हैत
In reply to मी पण ! by आर्बि२३९९
सुंदर फोटो.
In reply to मी पण ! by आर्बि२३९९
५०० लवकर मिळत होती म्हणून :)
In reply to सुंदर फोटो. by मोदक
माझ्या क्लासीक ३५० ला अॅलॉय
पहिले मिफुस (मित्रत्वातील फुकट सल्ला)
अलॉय व्हील्सच्या बिलकुल नादी लागू नका!
कारणे खालीलप्रमाणे 1 गाडी वजनदार आहे उगा प्लॅस्टिक नाही 2 ऑफरोडिंग करण्यात खूप अडचणी येतात अन बंधने येतात 3 मायक्रोक्रॅक्स डेव्हलप होतात रिम्स मध्ये, त्या कुठल्याक्षणी कसा दगा देतील भरवसा नसतो, आमच्या एका मित्राने ओरिजिनल नामांकित कंपनीचे फिन रिम्स (कडबा कटर प्रमाणे 2 फिन्स असणारे) घातले होते, गाडी ग्रामीण भागात खूप फिरे, गाडीचा आस म्हणजेच होल्डिंग पिन का काय म्हणतात त्याच्याजवळ बारीक क्रॅक झाल्या होत्या एकदा जोरात खड्डा आला तर पुढली राम 2 तुकडे झाली अन गडी फेकला गेला ते त्याच्याच डेंटिन्गपेंटिंग मध्ये काही हजार गेले, तस्मात सांभाळून मिफुस समाप्त आता तुमचे प्रश्न १) ट्युबलेस टायर्स आणि साधे टायर्स वेगळे असतात का? (बहुदा असावेत) - होय वेगळे असतात. २) ट्युबशिवाय नुसते टायर्स अॅलॉय व्हील्स ला बसवले तर चालतात का? का काही अडचण येवू शकते? -असे बसवलेले कधीच ऐकले नाहीत ३) माझी गाडी एकदाच पंक्चर झाली आहे आणि त्यावेळी सहा सात इंची खिळा वेडावाकडा घुसला होता. त्यामुळे टायरला जे नुकसान झाले आहे त्यामुळे तो टायर ट्युबलेस म्हणून वापरता येईल का? -चालत असल्यास बसवायला हरकत नाही, झालेल्या भगदाडास जर puncture curing epoxy solution (मिळते बाजारात ट्यूबलेस टायरचं puncture काढायच्या किट मध्ये) भरून सांधता आले तर तेच टायर वापरता येईल अवांतर, लद्दाखहुन आला आहात तेव्हा जमल्यास टायरं बदलूनच टाका असे सुचवतो अतिअवांतर लद्दाखचे पुढले भाग लवकर टाका हि विनंती अजून किती वेळ करावी ते सांगा मालक जराधन्यवाद बापु. हे असले पण रिम
In reply to पहिले मिफुस (मित्रत्वातील फुकट सल्ला) by कैलासवासी सोन्याबापु
मला वाटते ही सिक्सटीन स्पोक्ड
In reply to धन्यवाद बापु. हे असले पण रिम by मोदक
ह्याचा
In reply to धन्यवाद बापु. हे असले पण रिम by मोदक
जावईबोआ आमचा एक मित्र 2 पाती
In reply to ह्याचा by अनिरुद्ध.वैद्य