Skip to main content

एक द्वाडीक कविता

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/12/2008 18:52 या दिवशी प्रकाशित केले.

तुम्ही सदरा मळवला

असं पोर्‍यानी सांगावे.

आम्ही साबु घेउन यावं

तुम्ही उगा चेकाळावे.

हे असं काय होतं बुवा ?.......

तुम्ही उगा चेकाळावे

त्यात साबणं नासावे.

आणि करुन फेस सारा

आख्खे घर पाणी पाणी

अशी दुपार कशी जावी....

तुम्ही जोर बोंबलावं

सारी झोप खोबरी

तुम्ही लाथा झाडाव्या

आम्ही उसण धरावी.

कशी जीवघेणी अदा.....

आम्ही लपत छपत

तुमची पाठ सोलावी

तुम्ही ओढत पदर

आणिबाणी जाहीर करावी.

कस्सा जीव कातावला......

( संदर्भ : रामदासांची एक लाडीक कविता https://misalpav.com/node/5271 )

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1490
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आम्ही लपत छपत

तुमची पाठ सोलावी

तुम्ही ओढत पदर

आणिबाणी जाहीर करावी.

मस्त जुळुन आल आहे..