या वाटेवर
इथून पुढे जरा जपून.
तरबेज प्रेमी पण
हलकेच पाउल टाकतात.
दिवसाउजेडी.
रापलेले भोई पण
घाबरतात
पालखी वहायला
या वाटेवर.
ती,
फुलदाणी
तो
चंद्र
ती
शिशी
ग्राईप वॉटरची.
ते
तांबडे तावदान
तो आयना
ती काकणं
ते सगळं काही
जे फुटतं
लाखो बधीर तुकड्यात.
विकीरान्नासारखं.
ते डंख करेल टाचेखाली.
हलकेच.
साप्ताहीक भविष्यासारखं.
सहज.निर्धोक.
वरवर चाळता.
चालता ?
जरा जपून
अपूर्ण कवितांचा असह्य ठणका
पहाटेसच जोर धरतो.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5052
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
जरा
गूढ्
अनेक
थोडे स्पष्टीकरण.
फॉर्म
In reply to थोडे स्पष्टीकरण. by रामदास
रामदास -
In reply to फॉर्म by विनायक प्रभू
पहाट
In reply to रामदास - by अवलिया
ग्राईपवॉटर
In reply to थोडे स्पष्टीकरण. by रामदास
अजुन समजली नाही.
हुश्श्य!
आम्ही
In reply to हुश्श्य! by पिवळा डांबिस
:))))
In reply to आम्ही by रामदास
माझं ज्ञान तोकडं पडतंय