Skip to main content

क्रिम पफ Swans

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 24/08/2014 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य Choux पेस्ट्रीसाठी: १/२ वाटी मैदा १/२ वाटी पाणी १/४ वाटी अनसॉल्टेड बटर २ अंडी १/४ टीस्पून मीठ १/२ टीस्पून साखर (ऑपश्नल) . पाकृ: एका नॉन-स्टीक पॅनमध्ये पाणी. मीठ व बटर एकत्र करुन गरम करायला ठेवावे. पाण्याला उकळी आली की गॅस बंद करुन त्यात मैदा घालून मिश्रण एकत्र घोटून घ्यावे. (उकड काढतो त्याप्रमाणे) मिश्रण एकत्र होऊन गोळा तयार झाला की दुसर्‍या भांड्यात ते काढावे व सतत चमच्याने हलवत रहावे. त्यात साखर घालून एकत्र करावे. . मिश्रण जरा गार झाले, साधारण दहा मिनिटांनी त्यात एक अंडे फोडून घालावे व एकत्र करावे जोपर्यंत ते एकजीव होत नाही. मग दुसरे अंडे फोडून घालावे व ते ही एकत्र करावे जोपर्यंत मुलायम मिश्रण तयार होत नाही. ओव्हन २०० डीग्री सें वर प्री-हिट करायला ठेवावा. बेकिंग ट्रेवर बेकिंग पेपर लावावा. असे दोन ट्रे तयार करावे. पायपिंग बॅगमध्ये थोडे मिश्रण भरून घ्यावे. . पायपिंग बॅगने लंबगोलासारखे आकार (Swanच्या शरीराचा आकार)काढून घ्यावे. जर शेवटी टोक आले असल्यास पाण्याच्या बोटाने ते हलके चपटे करावे. २०० डिग्री सें वर २०-२५ मिनिटे बेक करायला ठेवावे. बेक झाले की कुलिंग रॅकवर गार होण्यासाठी ठेवावे. दुसर्‍या ट्रेवर इंग्रजी आकडा 2 जरा वाकडा काढावा ( Swanच्या मानेसारखा). त्या आकड्याला डोक्यासारखे गोल आकार पाईप करुन घ्यावे व ओव्हन मध्ये २०० डिग्री सेंवर १०-१२ मिनिटे बेक करावे. . साहित्य सजावटीसाठी: १ वाटी फ्रेश क्रिम १/४ वाटी पेक्षा कमी साखर व्हॅनिला एसेन्स . पाकृ: क्रिम फेटणार ते भांडे काही तास आधी फ्रिजमध्ये गार करत ठेवावे तसेच हँड मिक्सर चे बीटर्स ही गार करत ठेवावे, असे केल्याने क्रिम लवकर फेटले जाते. भांड्यात क्रिम ओतून मिडियम स्पीडवर फेटायला घ्यावे. सॉफ्ट पीक्स आले की त्यात साखर व व्हॅनिला एसेन्स घालून थोडे घट्ट होईल इतके फेटावे. पायपींग बॅगमधून पाईप करता आले पाहीज इतके फेटावे. . असेंब्लिंगः तयार Swanच्या शरीराच्या आकराचे पफ्स घेऊन , वरून अलगद अर्धवट कापा. कापलेल्या भागाचे दोन भाग करा, म्हणजे त्याचे पंख तयार होतील. पोटाकडचा भाग जो आतून पोकळ आहे त्यात फेटलेले क्रिम भरा. अलगद पंख लावा व 2 आकड्याचा शेवटचा भाग त्यात अलगद रोवून घ्या. . सर्व्हिंग प्लेटवर ठेवून त्यावर थोडी पिठीसाखर भुरभुर्रून सर्व्ह करा Cream Puff Swans :) .

वाचने 28718
प्रतिक्रिया 60

प्रतिक्रिया

कौतुक करायला शब्द नाहीत... सलाम ह्या चिकाटी आणि सादरीकरणाला !!

In reply to by सस्नेह

हेच म्हणतो.. पहिल्याच फोटोला डोळे वासलेच.. सलाम तुमच्या चिकाटीला...:)

जबरा कलाक्रुती...(आता ह्याला काय पाकक्रुती म्हणणार?) बादवे, हा प्रकार खायचा पण असतो का? इतका सुंदर दिसत आहे की, असे वाटते, नुसते बघत रहावे.

In reply to by प्यारे१

बाकी ते Swan म्हणजे बघा आपलं राजहंस की वो! एका तळ्यात होती बदके गाण्यातलं.

साष्टांग नमस्कार तुला!!!! बापरे.....काय पाककृती, प्रेझेंटेशन आणि चिकाटी!!!!!!!!!! नुसते बघत रहावेसे वाटतात - खायची हिम्मतच होणार नाही. :-) ___/\___

निशब्द ! तुम्ही नक्की काय करता पाकृ की कलाकारी? माझं मत : दोन्हीही... आणि दोन्हीही उच्च प्रतिच्या !!!

In reply to by दिपक.कुवेत

चक्क तूला धडकी भरली (गोड) बघून !!!! तू तर डिझर्ट किंग आहेस ;) प्रतिसादासाठी धन्यवाद रे __/\__

ताई, हातांचा फोटो पाठवा. देव्हार्‍यात लावून दर्शन घेईन म्हणते रोज!

पाककलेसोबत आपली चित्रकलाही सुंदर असावी असे निरीक्षण नोंदवतो, त्याशिवाय असे सुबक आणि प्रमाणबद्ध हंस करता येणं शक्य नाही.

हे खायचं सुध्दा असतं का? हे असले प्रकार फक्त लग्नामध्ये रुखवतात शोभेच्या वस्तु म्हणुन करतात अशी आत्तापर्यंत माझी समजूत होती. बाकी पाकृ आणि फोटो बघितले, आवडले इ. इ.

एखाद्या कलेत कुणि किती निपुण असावे याला काहि मर्यादा??? कसलं जबरी सादरीकरण...आणि किती प्रचंड हौस म्हणावी हि. शब्द सुचत नाहित तारीफ करायला.

या व्यतिरिक्त करू काय शकणार म्हणा, अशी इतकी अफाट सुंदर कलाकुसर निर्माण करणं शक्य नाहीच, आणि (तुम्ही प्रत्यक्ष भेटून हे समोर ठेवल्याखेरीज) हे खाणंही नशिबात नाही :-(

साष्टांग दंडवताच्या स्मायलीची उणीव भासते आहे!

एकतर या विभागात कधी डोकावत नाही मी, उगा डोक्याला भुंगे लागतात, आणि मग एनोने काम भागत नाही. वर जे काही केलयं त्यासाठी साक्षात दंडवत __/\__!! तुमचा पत्ता द्या हो, येईन म्हणतो ;)

हे खायचं? हॅ:! उद्या एखादा मोनालिसाच्या चित्रात चण्याची पुडी करू म्हणायचा अशाने!

पेकिंग डक बनवायला जमतं का तुम्हांला? किंवा इथे कुणालाही? असेल तर रेसिपी टाका अगदी सुरुवातीपासून.

ना हात को आया ना मुह को लगाया, असल काही झालय. वो असल्या तोंडाला पाणी येणारे खाद्य् पदार्थांचे फोटो नाका ना वो टाकू. दुकानात बसल्या बसल्या नूस्त पोट आणि तोंड खवळत.

हंस मस्तच.. क्लास! हे कसे सुटले होते नजरेतून? स्वाती

माईंड झिणझिणिंग आहे हे ! कसलं खतरनाक दिसतंय आणि ते एवढं कलाकुसरीने करणं म्हणजे... क्लासच ! क्लासच. तुमचं भारी कौतुक आहे ! एक से एक पदार्थ आणत असता आमच्यासमोर. क्या बात है ! क्या बात है !

अतिशय नजाकतीने आणि मेहनतीने केलेली कलाकृती. यदाकदाचित पुढ्यात आलीच तर खाऊन मोडतोड होईल म्हणून खाववणारच नाही बहुतेक.