घे हळूच जाताना
चुलीतील काही निखारे
भर हीमवर्षावातही
तरंगतात एकाकी शिकारे |
निर्वासित म्हणूनी जाताना
घे इथली थोडी माती
डोंगरातील भग्न देवळे
तुझ्या वाटेवर नजर लावती |
लपून हळूच जातांनाही
ठेव उघडे कवाड
भावना गोठलेल्या गावात
घरासही पडू दे गार |
विसरू नकोस जाताना
आहे पाठीशी पीर
थोडेसे दान देऊनी जा
वाट पाहील फकीर |
पांढ-या कच्च बर्फात
रक्तही दिसे ठसठशीत
कितीही भय पसरू दे
जा फकिरच्या कुशीत |
भय पसरविणा-या काळाचा
आहे फकिरास राग
वेशीवरच्या उजाड मारुतीस
काढू दे तुझा माग |
फार जाऊ नको दूरवर
जरी जाहलास विस्थापित
यायचे आहे परत तुला
बर्फ पडणा-या गावात |
विजयकुमार
०७.०६.२००६
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1068
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
खतरनाक लिहिलंय!
मस्तच! अगदी दमदार सर्रीयल
सुरेख!
मस्त!!
वा!