सध्या सहिष्णूपणाचे वारे वेगात वहात आहेत. तेव्हा त्या वार्याच्या झोत्यात आल्यामुळे म्हणा किंवा राजकीय सोय म्हणा पण माजी गृहमंत्री चिदंबरम म्हणाले की सलमान रश्दीच्या सॅटॅनिक व्हर्सेसवर आम्ही बंदी घातली ती एक चूक होती.
१९८८ साली सलमान रश्दीने लिहिलेल्या पुस्तकावर जगात प्रथम बंदी घालून आपल्या परमसेक्युलरतेचे आणि सहिष्णूतेचे भारताच्या तात्कालिन काँंग्रेस सरकारने अनोखे प्रदर्शन केले होते.
पण २७ वर्षे उलटल्यावर चिदंबरम अचानक पलटी मारते झाले आणि आपल्या चुकीची कबुली देते झाले. कदाचित तसे केल्याने आपल्याला सद्य भारतात उसळलेल्या असहिष्णूतेच्या तथाकथित ज्वालामुखीवर आपली पोळी शेकून घेण्याचा नैतिक अधिकार आपल्याल मिळेल ह्या दृष्टीने हा प्रयत्न असावा.
पण मला तरी हा प्रकार हास्यास्पद वाटतो. सत्ता असताना, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा अधिकार असताना शेपूट घालणे आणि वेळ गेल्यावर चूक झाली म्हणणे हा दुटप्पीपणा आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/chidambaram-ban-on-rushdi…
ता.क.: ही चिकटवलेली बातमी आहे आणि चिकटवलेल्या बातम्यांचा तिटकारा असणार्यांनी ह्या चर्चेत सहभागी न होणे उत्तम!
वर्गीकरण
वाचने
2375
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा ! पेपर टाकायला पुन्हा
चूक झाल्याची कबूली २७
जेपी