Skip to main content

ती धावली ...... (विडंबन)

लेखक दमामि यांनी रविवार, 29/11/2015 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना प्रसंग कुठलाही असो ,दूध उतू जाण्याचा, ट्रेन वा बस पकडण्याचा , कुत्रा मागे लागण्याचा किंवा व्यायामाचा. जेव्हा बायका (विशेषत: वजनदार बायका .) धावतात तेव्हा तो देखावा अगदी हृदयंगम वगैरे असतो यावर कुणाचे दुमत नसावे. ( गज़लेचे वजन शेवटच्या शेरात असल्याने प्रेरणेत नसूनही तो घुसडला आहे, त्या बद्दल संदीपजींची माफी) "टनाची" होती बंदी, ती धावली कुणा वाटे न का संधी? ती धावली.... ढग एक नाराज झाला होता त्याचीच होती रुंदी, ती धावली.... श्वान धराया धावला जेव्हा भयकारी मग आक्रंदी, ती धावली.... गर्जना काही ऐकल्या मैत्रिणींच्या मनानी पडली तटबंदी, ती धावली.... डळमळले भूमंडळ कुणी काही म्हणेना का माझी प्रिय बासुंदी ,ती धावली....
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2839
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कसली ही मस्त बासुंदी! भारीच! आवडली!

शेवटचा शेर असा बदलता आला तर बघा: तळमळे भू, तीला साहवेना, जेव्हा माझी बासुंदि ती धावली. तुमच्या म्हाकाव्यात माझी ठीगळं बरं का.. ;-)