Skip to main content

ती सावली

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 29/11/2015 01:27 या दिवशी प्रकाशित केले.

उन्हाची होती बंदी ती सावली
कुणाची होती संधी ती सावली

ढग एक नाराज झाला होता
त्याचीच होती रुंदी ती सावली

सूर्य धराया धावला जेव्हा
भयकारी मग आक्रंदी ती सावली

गर्जना काही ऐकल्या मशालींच्या
मनाची होती तटबंदी ती सावली

लेखनविषय:

वाचने 2407
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

डांगेभाऊची सावली !!
आम्हालाबी भावली !!

अखिल मिपा जेपी सत्कार महांमंडळ, चिमण हटेला गँग यांच्या संयुक्त विद्यमाने "चोरोळी पेक्षा चारोळीत आट्पा" अभियान अंतर्गत मिपा साहित्य साक्षरता आणि कळ निवारण मोहिमेचा एक कार्यक्रम.