✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

साज़

म
मारवा यांनी
Sat, 11/28/2015 - 16:02  ·  लेख
लेख
सर्वात अगोदर एक म्हणजे मी संगीताचा कुठल्याही प्रकारचा जाणकार नाही. दुसरं सर्व लेख आठवणींवर आधारीत त्यामुळे डळमळीत. थोडी कुठे कुठे गल्ली चुकण्याचीही शक्यता आहेच.. तर आपल्या हीन्दी सिनेमांची गाणी म्हणजे अनेक प्रतिभाशाली संगीतकारांनी योगदान दिलेला आनंद खजिना आहे. कधीही जा दार उघडा दोन चार गाणी घ्या और गम भुला दो सारे संसारके. हा आपला सर्वांचाच अनुभव. तर या विवीध गाण्यांत विवीध संगीतकारांनी अत्यंत कलात्मकतेने व कुशलतेने अनेक वाद्यांचा वापर केलेला आहे. या धाग्याचा विषय हा वाद्यांचा जिथे अप्रतिम वापर झालेला आहे त्या गाण्यांविषयी बोलणं हा. काही पुर्ण वाद्यहीन गाणीं असतात वा अतिशय कमी वाद्ये वापरलेली गाणी, अनप्लग्ड अशी यात गायकाच्या आवाजावरच भर असतो उदा. जगजीतचं गालिब अल्बम मधलं हे घ्या, रोशन जमाल-ए-यार से है अंजुमन तमाम....... ( प्रियेच्या सौंदर्याच्या तेजाने सर्व जग प्रकाशमान झालयं ) यात जवळ जवळ वाद्य नाहीचं. अतीशय हळुवार हे गाणं जगजीत गातो त्याच्या आवाजाच्या नॅचरल डेप्थ वर सहज हे तो तोलुन धरतो. अशीच एक आलापी आहे मिनीटा दोन मिनीटाची लताजींची चित्रपटाच नाव आठवत नाही पण ह्रदयनाथजींच संगीत व यारा सिली सिली गाणं आहे तोच बहुधा त्यातही असचं फ़क्त आवाजावर भर सुंदर आलापी एकदम चित्रपटात जे संगीत आहे त्याचा अर्क असल्यासारखी म्हणजे ते जणु व्हॉइस ट्रेलर, म्युझिकल ट्रेलर. एक टोरेक्स कफ़ सिरपच्या अ‍ॅड च म्युझिक बघा शेवटी की सुरुवातीला कुठेतरी अगदी छोटा असाच इन्स्ट्रुमेंटल पीस येतो तो म्हणजे जणु ट्रेड्मार्क च जगजीत च्या एक टीपीकल म्युझिकचा. तर अशी विनावाद्य गाण्याचा एक आनंद आहेच. आणि वाद्य वापरुन निर्माण केलेला दुसरा एक जो ऐकण्याची पण मजा आहे. एक फ़ार शांत सॉफ़्ट गाणं आहे रजिया सुल्ताना मधलं लताजींच हे गाणंही वाद्याचा वापरच केला नसता तरी सुंदर होतं. ऐ दिल-ए-नादान...............ऐ दिल-ए-नादान....... आरजु क्या है........ जुस्तजु क्या है आता इथे खय्याम अगदी अचुक जागा हेरुन केवळ एकच वाद्य सुरुवातीला वापरतो ते म्हणजे संतुर अत्यंत सुंदर वापर केलाय एक सुरुवातीला स्लोली एक एक प्रश्नानंतर इतका चपखल वापर की या इतक्या शांत गाण्यात इतर कुठलही वाद्य वापरल असतं तर गोंगाट झाला असता व मुळ स्वर दुखावला असता. पण संतुर उलट मस्त सुरांना साथ देत देत हळुवारपणे गाण्याचा भाव अधिक उन्नत करत जातो. मुड सेट करत जातो. हम भटकते है क्यु भटकते है.............. पुढे गाण्यात खय्याम ने एक अतीव सुंदर ये जमी चुप है................ आसमॉ चुप है...........नंतर एक नितांतसुंदर निस्तब्धता.................एक ब्युटीफ़ुल पॉज घेतलाय काही क्षणांसाठी तो फ़ारच सुंदर जमवलाय. अस क्वचितच कुठल्या गाण्यात आढळत. म्हणजे मुड ला अचुक वाद्य व शब्दां च्या अर्थप्रत्ययासाठी अचुक पॉज क्या बात है. एक गाणं आपण ऐकलच असेल हौले हौले से हवा लगती है शाहरुख अनुष्काच यात अ‍ॅकॉर्डीयन वा बॅन्डोनियम पैकी एक चा सुरेख वापर केलाय बघा. हौले हौले दोन शब्दांच्या हातात हात घेऊन दोन दोन मात्रांत तुटक तुटक मध्ये मध्ये याचा पुर्ण गाण्याभर गतिमान वापर केलेला आहे. फ़िक्र को गोली मार यार ........ हौले हौले...... मग अ‍ॅकॉर्डीयन ......हौले हौले..... पुन्हा अ‍ॅकॉर्डीयन. मस्त जमलाय. यातच एक क्युट सीन आहे. तो अनुष्का त्याच्या गालाला रंग लावते तो....... मस्तय गाणं,. हे वाद्य हार्मोनियमपेक्षा गतीच्या बाबतीत उजवं आहे, का माहीत नाही मात्र स्पीड घेणं ते हातात धरण्याच्या सोयीने जास्त स्पीड येतो का ? माहीत नाही. पण हार्मोनियमपेक्षा थोडीशी वेगळी मजा येते. एक गुलजार च्या माचिसं च फ़ेमस गाणं, दाढीवाला आणि मित्र सुंदर लोकेशनवर बसलेले..... प्रेयसीच्या आठवणी काढताहेत.... जुम्मे के जुम्मे वो सुरमे लगाती थी... कच्ची मुंढेर के तले... यात या गाण्याच्या सुरुवातीलाच एक छान पीस आहे सरोद वा मॅन्डोलीनचा निर्णय होत नाहीये पण मस्तच पीस आहे. मी एकदा तो मोबाइलवर लावलेला रींग टोन म्हणुन. तो ऐकला की हे गाणं घुमु लागत डोक्यात.. तर हा सुरुवातीचा सरोद चा वापर फ़ार सुरेख जमलाय. हे लिहायच कस गंमतच आहे पण असा टंग्न्नडन टंगन्डन ....अस काहीसं मग गाणं सुरु होतं चप्पा चप्पा चरखा चले........ चप्पा चप्पा चरखा चले...... एक दमदार गाणं आहे धुनकी की धुडकी बहुधा धुडकीच तर धुडकी धुडकी लागे या गाण्याची सुरुवातच गिटार च्या दमदार तुकड्याने होते. गायिकेचा आवाज मर्दाना आणि जोशपुर्ण आहे. इश्क दी मस्ती विच दिल जागे ना सोए ...............धुडकी धुडकी धुडकी लागे.. इश्क मे दिलडा होए फ़कीरी मांगे सबकी खैर ...... गाण्यात साधारण दोन तीन मिनींटांनतर येतो गिटार चा एक जबरदस्त पीस.........मुळ गाण्याचा जोश अजुन तीव्रतम करत करत तो गिटार चा पीस गाण्याला पुढे जोशाच्या वरच्या पायरीवर नेऊन ठेवतो. ऐकतांना मजा येते खरच. कोरस चा वापरही जोशाला पुरक असा केलाय. अजुन लगेच आठवणारी गिटार म्हणजे सेन्योरीटा सुनो सुनो कहते है हम क्या , या रीतीक, व फ़रहान अख्तर च च्या गाण्यातील गिटार चा वापरही छान आहे. गाणं जबरी आहे चाहत के दो पल भी मिल पाये. दुनिया मे ये भी कम है क्या....सेन्योरीटा सुनो सुनो सेन्योरीटा कहते है हम क्या . गिटार चा शिवहरी ने डर मध्ये वापरलेला तुकडा जादु तेरी नजर .......खुशबु तेरा.... एक गाणं जुन आहे नाचे मन मोरा मगन धिक ना धिकी धिकी .......नाचे मन मोरा मगन धिक ना धिकी गायक बहुधा मन्ना डे असावा माहीत नाही. पण गाण जे आहे त्यात तबला येतो मस्त दमदार तबला आणि सितार दोन्ही आलटुन पालटुन पुढे गाण्यात .. घिर आये बदरा............ घिर आये ...रुत है भीगी भीगी नाचे मन मोरा मगन धिक ना... धिक ना ...धिक ना धिकीधिकी. तबल्याच्या वापरासाठी मस्तच गाणं, अजुन एक आपला शोमन घई याची संगीताची जाण आणि भारतीय वाद्यांचा वापर छानच करवुन घेतलाय याने. आठवा तो अनिल कपुर राम लखन मध्ये धिना धिन ता ..... धिना धिन ता.... लाइनीत असंख्य ढोलबडवे दिसतात मग ते भव्य ढोल वाजतो धिना धिन ता . धिना धिन ता.. ए जी ओ जी लो जी सुनोजी मै हु मनमौजी ..... त्यातल नुसत ते धिना धिन ता ऐकल तरी पैसे वसुल होता त मोठ्या पडद्यावर मस्त वाटत भव्य छान ढोल बडवलेल. धिना धिन ता. घई ची च आपली जॅकी ची हिरो मधली बासरी ची ब्युटीफ़ुल ट्युन ........ घई ची च आपली ऋषी ची कर्ज मधली गिटार ची ब्युटीफ़ुल ट्युन......... घई ची आठवावी बासरी घई ची आठवावी गिटार घई चा आठवावा ढोल... मस्त वापर करतो. एक खलनायक मध्ये कोरस च्या आवाजात बॅकग्राउंडला री रा री री......... री रा रा रु..........काय मस्त वाटायच ऐकायला भव्य इफ़ेक्ट नाही ? तर एक आपलं साध सुधं गरबागुरबी वाद्य काय त माउथ ऑर्गन आणि कोणाची आठवण आली येस्स है अपना दिल तो आवारा ना जाने कीस पे आयेगा......... गाने को इव्हन गुलफ़ाम देवानंद को भारी पडता है माऊथ ऑर्गन बाजा म्हणायचो आम्ही याला माझ्याकडे होता एक ल्हानपणी. हसीनो ने पुकारा गले से ...... है अपना दिल तो आवारा ना जाने किस पे आयेगा........ मी नेहमी बोल संपण्याची वाट बघतो आपण सगळेच हो कान कसा आसुसलेला असतो तो माउथ ऑर्गन चा पीस ऐकण्यासाठी कोण होता हो ग्रेट संगीतकार दर्दींनी जरा प्रकाश टाकावा यावर. तारारारातारारा ताराराराता रा रा रा... लिहीण नाही जमत बाबा हे. सुनलो वोही ठीक है. एक प्यार का नगमा है , मौजो की रवानी है............आठवला व्हायोलीन चा पीस ? पुन्हा ऐका फ़ार मस्त जमलाय जींदगी और कुछ भी नही ..........एक प्यार का नगमा है ,......मौजो की रवानी है....... व्हायोलीन सहसा एक तर सॅड उदासी असलेल्या भाव जो आहे त्या गाण्यांना जास्त सुट करतो. किंवा मग सेन्शुअल सॉफ़्ट श्रुंगारीक गाण्यांना ....म्हणजे मला व्हायोलीन म्हटल की साधारण दोनच भाव असलेला वापर आढळतो. गाण्यापुरत बोलतोय फ़क्त म्हणजे गाण्यात असा वापर याचा सहसा करतात. बाकी वाद्य ग्रेट च आहे व त्याचा इतर ठिकाणचा वापर या लेखाचा विषय नाही. तर अजुन एक गाणं आहे ज्यात वेगळा भाव आहे पण व्हायोलीन वापरलेलं प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फ़िर क्यु डरता है दिल......... कहता है दिल रस्ता मुश्कील अनेक व्हायोलीन आणि गतिमानतेने वापर गाण्याचा मुड एनहान्स करतो. (ती एक ओळ आहे ना थाउजंड व्हायोलीन्स फ़िट टु माय पाम ) कहता है दिल रस्ता मुश्कील मालुम नही है कहॉ मंझील............. हा व्हायोलीन चा रीतसर पेक्षा वेगळा वापर वाटला. बाकी कानसेनांना अधिक गाणी माहीत असतील तीच जाणुन घ्यायचीये कृपया दाखवावीत वेगळा वेगळा वापर व्हायोलिन चा मजा य़ेइल. एक गाणं आहे सध्याचच रॉय चित्रपटातलं तु है के नही तु है के नही.......... यातली व्हीसलींग ट्युन ......ही कुठलं वाद्य वापरुन बनवलेली आहे माहीत नाही नुसत्या आवाजाने काढलेली व्हीसल शिटी वाटत नाही. कुठलतरी वाद्य वापरलेलं पण जबरदस्त सुंदर सॉफ़्ट व्हीसलींग ट्युन आहे. दिर्घ पल्ला असल्याने फ़ार प्रभावी होते. अशा अनेक चित्रपटात वापरलेल्या आहेत सध्याची ही आठवली इतकचं. ट्युन पुढे अर्जुन रामपालचा मक्ख कोरडा चेहरा, तो भावही सुसह्य होऊन जातो. आठवणीच्या भरवशावर अजुन एक राज कपुरच एक गाण आहे. तो पायाखाली आलेला कीडा हळुच उचलुन बाजुला ठेवतो....... ते गाणं किसीकी मुस्कुराहटोपे हो निसार, किसीका दर्द मिल सके तो ले उधार .....जीना इसीका नामहै ....... इथेही एक व्हीसलींग ट्युन आहे ना ? पियानो हा आपला जुन्या एकेकाळच्या मध्ययुगीन चित्रपटांच्या गाण्यातलं आवडतं वाद्य. तो हॉल ते व्हीआयपी गेस्ट यु नो बिग पार्टी सीन, एक नायिका एक व्हिलन प्राण बगैरे व्हीस्की चा ग्लास किंवा सिगार ओढणारा , आणि हिरो रीव्हर्स शहीदोवाली शैलीत हिरोइनला रडवण्याच्या आटोकाट प्रयत्नात.... पियानोवर बसलेला कॅमेराकडे नाहीतर मान खाली करुन ....मस्त गाणी जमलेली एकाहुन एक पियानो चा वापर असलेली पटकन आठवायच तर दिल के झरोके मे तुझको बिठाकर ....... ले जाउंगा.... मत हो मेरी जॉ उदास. मत हो मेरी जॉ उदास अस काहीतरी. अजुन नक्की नाही आठवत पण गीत गाता हु मै गुनगुनाता हु मै मैने हसनेका वादा किया था कभी इसलीए अब सदा मुस्कुराता हु मै.................. ये मोहब्बत के पल कितने अनमोल है ......कितने फ़ुलो से नाजुक मेरे बोल है यातही पियानो चा वापर झालाय. अशी तोंडावर असतात हो गाणी पण आठवु म्हटल तर आठवतच नाही हा एक प्रॉब्लेमच असतो. एक भजन आहे सुंदर लिरीक्स असलेलं सुरज की गर्मी से जलते हुए तनको मिल जाए तरुवर की छाया .......ऐसा ही सुख मैने ......पुढे यात मध्ये सितार चा आणि बासरी चा फ़ार सुंदर वापर येतो सितार चा तुकडा तर इतका देखणा व इतका सुटेबल आहे की क्या कहने. लहरो से लडती हुइ नाव को जैसे लहरो से लडती हुइ नाव को जैसे मिल ना रहा हो किनारा.... या ओळींची तीव्रता आर्तता ती सितार छान मॅच करते. एक एक कडव्याच्या मध्ये सितार व बासरी आलटुन पालटुन जबरदस्त इफ़ेक्ट...... एक रीमझीम गिरे सावन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम मे लगी कैसी ये अगन........ नंतर सितार चा तुकडा येतो.....हा पण सुंदर पीस.......... महफ़िल मे जैसे दिल बंध रहा है कीसी अजनबीसे. याच्या सुरुवातीला पण मला वाटत सितारनेच सुरुवात होते. पण अमिताभ पेटी वाजवतांना दाखवलाय गाण्यात नीट आठवत नाही पण सितार आहे या गाण्यात. बासरी धार्मिक गाण्यात मुबलक वापरली जाते. आणि सुट पण होते. एस. जानकी या साऊथ च्या गायिकेची एक अप्रतिम मीरा भजन्स ची कॅसेट आहे गोडवा काय म्हणावा जानकीचा साऊथची लता हे सार्थ संबोधन त्यांना वापरल जात. त्यांच्या सर्व भजनात जवळजवळ बासरीचा सुरेख वापर आहे. फ़ारच सुंदर. एक अती गोड राजस्थानी शब्द असलेलं भजन आहे म्हारा ओळगिया घर आया जी.... तन की ताप मिटी सुख पाया...... धन की धुन सुनी मोर मगन भया यातलं संगीत पण फ़ार सुंदर बासरी चा वापर. ब्युटीफ़ुल.फ़्ल्युट. आणि थोडीशी सितार.अप्रतिम. काही तर ओळखु येत नाहीत एक मराठी गाण लताजींच फ़ेमस ऐरणीच्या देवा तुझी ... ठीणगी ठीणगी असच ना.... त्यात एक ट्क्कक ट्क्क्क्क काहीतरी छान आवाज येतो गाण्याला फ़ार सुंदर मॅच केलेला ते वाद्य कुठल ? माहीत नाही का नुसत काहीतरी ट्रीक करुन आवाज उत्पन्न केलाय माहीत नाही पण ऐकायला मस्त वाटत तुझी माया राहु दे..........टीटीक टीटीक काय आहे ते ? अजुन एक वाद्य ओळखायला कन्फ़्युज होत मला तरी अशोका सिनेमातलं एक श्रुंगारीक गाणं आहे रात का नशा अभी आख से गया नही फ़्ल्युट सारखा पण फ़्लुट नाही असा काहीतरी वेगळाच आवाज भासतो जो गाण्यात सातत्याने येतो. किंवा सध्या इतकी इलेक्ट्रॉनिक प्रगती झालेली आहे वाद्यात ते एकात एक मिक्स पण करतात फ़्लुट मध्ये क्लॅरीनेट मिक्स केलेली आहे का ? मिस्टेरीयस मस्त गुढ आवाज येतो बघायलाही छानच आहे गाणं. एक गाणं गुलाल च आरंभ है प्रचंड या गाण्याचा आरंभ खरोखरच प्रचंड आवाजाने होतो सुरुवातीला किणकीणाटा सारखा आवाज मग मस्त टीपीकल मराठा दरबार तुतारी निनादते.मग उग्र शब्द धडधड करत आदळु लागतात एक दणदणीत वॉर सॉंग आकार घेऊ लागतं यात तुतारी निनादत असते अधुन मधुन आणि शेवटी. मराठा दरबार तुतारी चा हा सर्वोत्तम उपयोग केलेला आहे. या गाण्यात पार्श्वभुमीत सतत निनादणारा ठेका पण जबरदस्त आहे. सतत चालणारा एक सुंदर दुसराच टाइपचा ठेका तबल्याचा चलते चलते यु ही कोई मिल गया था ......या गाण्यातही फ़ार सुंदर गाण्याच्या सुरुवातीपासुन ते अखेरपर्यंत फ़ार च सुंदर वापरलेला आहे. ये चराग बुझ रहे है ये चराग बुझ रहे है मेरे साथ चलते चलते........ यु ही कोइ मिल गया था सरे राह चलते चलते......... अतीव सुंदर ठेका आणि गाण्याच्या शेवटी केलेला युनिक रेल्वेच्या शीटी चा दुरवरुन येणारा आवाज रेल्वेच्या आवाजाचा असला सुंदर उपयोग करुन घेण म्हणजे क्रीएटीव्हीटीची कमालच म्हणावी. कोणी विचारही करु शकत नाही अशा मुडच्या गाण्याला ती शेवटची दुरवरुन येणारा आवाज वेगळाच इफ़ेक्ट देतो. चलते चलते फ़ार सुंदर. बॅगपाइप चा वापर झालेलं एक छान गाण ऐकलय नव्या सिनेमाच च आहे बहुतेक बॅंग बॅग कींवा एक था टायगर दोन पैकी एक नक्कीच यातील एका गाण्यात क्वचितच आपल्याकडे होणारा बॅगपाइपचा वापर सुंदर वापर केलेला आहे. तसा सिनेमात नाही मात्र एका जाहीरातीत पण दारुच्या छानच वापर आहे बॅगपाइपचा. हे गाणं कुठल कृपया सांगावे. आणि एक सध्याच्या शानदार चित्रपटाच्या एका गाण्यात एक छान वापर झालेला तो अनेक वाद्ये वापरुन बॅन्ड मध्ये असता तशी शा शानदार असे शब्द येता ते एक गाण हे. हो. साज़ की बात निकले और पंचम दा का जिक्र ना हो बहोत नाइन्साफ़ी है. पंचम दा ने सर्वात जास्त सर्वात विवीध सर्वात चमत्कारीक वाद्यांचा आवाजांचा वापर केलेला आहे. पण मला आता थांबतो मला तुमच्याकडुन हवी आहेत गाणी ज्यात विवीध वाद्ये सुंदर वापरलेली आहेत. एक गाणं फ़क्त आठवतय पिया तु अब तो आजा हे गाण प्रत्यक्ष सुरु होण्यापुर्वी जवळजवळ दोन मिनीट अनेक चित्र विचीत्र आवाज एकदम मुळ गाण्याच्या मुडपेक्षा एकदम वेगळे आवाज व मग मुळ गाणं पिया तु अब तो आजा ..........शोला सा ..... हा माणुस म्हणजे वल्लीच होता. पंचम चे फ़ॅन फ़ार अ‍ॅग्रेसीव्ह आणि पंचमसारखे थोडे चक्रम स्वीटली चक्रम असतात. चलता है अपनी अपनी पसंद अपने अपने शौक काही तक्रार नाही हं आपली. त्यांची खेचायची तर मग एस डी बर्मन च उगीचच उदाहरण दामटायचं ते कहता ता यही पंछी के बिछुड गयी सजनी आपला उगा एक बंगाली ला दुसरा बंगाली काय संबध नाही पण मग मजा येते. रहेमानी बीट्स वर काय बोलणार आपला तेवढा आवाका नाही. आपण फ़क्त कोणाकडुन ऐकुन समजुन घेतो की सांग बाबा कशी मजा आहे रहेमान ची जबरदस्त तो पण सध्या गाणी अशी पटकन आठवत नाहीयेत पण येस ताल ताल मधली गाणी मै रमता जोगी इश्क का प्याला पी आया एक पल मे सदिया जी आया. ताल ची सर्व च गाणी आश्चर्यजनक आहेत. त्यात ऐश्वर्या जेव्हा अनिल कपुरला भेटते तो त्याचा वाद्य प्रॅक्टीस चालु असते तो एक सीन आहे काय जबरदस्त संगीत आहे ते गंमत म्हणजे ते टीकात्मक दाखवलेलं आहे पण मला तोच भाग आवडला. कानसेनांनी रहेमानी बीट्स वर अधिक प्रकाश टाकावा मी आवरतो. रहेमान आणि पंचम आणि अजुन एक ओपी नय्यर तिन्ही कानसेनांवर सोपवतो ते अधिक उत्तम रीतीने सांगु शकतील की त्यांनी विवीध वाद्यांचा आवाजांचा आपल्या गाण्यात कसा सुंदर वापर केलेला आहे. वरील तिघांचे आपल्या मिपावर एकेकाचे निष्ठावान प्रेमी सापडतील. म्हणुन हे जाउच द्या. एक प्रकार थोडा असा असतो हिन्दी गाणी इन्सट्रुमेंट वर वाजवलेली हा ही एक सुंदर जमतो कधी कधी फ़ार. एक पुर्वी फ़ेमस पियानीस्ट होता इंग्लीश नाव आठवत नाही त्याची एक कॅसेट होती हिट हिन्दी गाण्यांचे पियानोवर वादन फ़ार सुंदर वाजवायचा फ़ेमस होता फ़ार एकेकाळी. बार वगैरेमध्ये ही इन्स्ट्रुमेंटल वर्षानुवर्षे ऑन डिमांड वाजवीली जात असतात. त्यात ते अभी ना जाऒ छोडके ऑल टाइम क्लासिक गाण असतच असत. माझ्याकडे काही इन्स्ट्रुमेंटल गाणी आहेत पण ती कोणाची त्याच नाव माहीत नाही त्यात तेरा जाना दिल के अरमानो का मिट जाना गाण्याच इन्स्ट्रुमेंटल रुपांतरण अतीव सुंदर जमलेलं आहे. ती कॉम्प्युटर मध्ये कोणी तरी दिलेली त्यावर अलबमच नाव नाही. सध्याचा आठवणारा एक ग्रेट म्हणजे ग्रेटेस्ट म्हणावा असा बापसे बेटा खरोखर सवाई असा म्हणजे राहुल शिवकुमार शर्मा आहाहा हा एक अफ़लातुन संतुर वादक बापाच्या चार पावलं पुढेच आणि कोणाबरोबर अल्बम तर डायरेक्ट केनी जी आपला ब्रेथलेस सॅक्सोफ़ोन वाला अल्बमच नाव नमस्ते गाणं घेतलय ये कहॉ आ गये हम युही साथ चलते चलते वाद्ये दोन प्रमुख वाद्ये संतुर आणि सॅक्सोफ़ोन परीणाम स्वर्गानुभुती. इथे धरतीवर स्वर्गाचा प्रत्यक्ष अनुभव माझ्या आयुष्यात इतक सुंदर एखाद्या गाण्याच इन्स्ट्रुमेंटल रुपांतरण मी तरी ऐकलेल नाही. आहाहा स्वर्गीय संगीत. राहुल शर्माचा एक अल्बम आहे फ़िल्मी नाही मात्र व्हाइट नावाचा हा सगळा अलबम च जादुई संगीताचा आहे. एक अजुन आहे काश्मीर नावाचां अलबम यातली इतर नाही मात्र एक आहे चार चिनारी बझार नावाचा तुकडा आहाहा काय सुंदर किती सुंदर हजार वेळा ऐकल तरी गोडवा तीळमात्र कमी होत नाही. तुम्ही एकदा चार चिनारी बझार ऐकुन बघा. अजुन एक गाण देखा एक ख्वाब तो ये सिलसीले हुए दुर तक निगाहो मे गुल खिले हुए अप्रतिम इन्स्ट्रुमेंटल रुपांतरण अद्वितीय ! अदनान सामीही एक जीनीयस वादक आहे अनेक वाद्ये तो लीलया वाजवतो त्याच्या गाण्यात ही वाद्यांचा अप्रतिम वापर असतो. पण असो आता आवरतो. कानसेनांनी जाणकारांनी शेअरींग करुन गाण्यांत केलेल्या विवीध वाद्य वापराची आणखी सौदंर्यस्थळे उलगडून दाखवावीत ही नम्र विनंती. अजुन जागा जाणुन घेणे हाच या धाग्याचा एकमात्र उद्देश बाकी पसंद अपनी अपनी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
42451 वाचन

💬 प्रतिसाद (123)

प्रतिक्रिया

एक पुर्वी फ़ेमस पियानीस्ट होता

गवि
Sat, 11/28/2015 - 16:24 नवीन
एक पुर्वी फ़ेमस पियानीस्ट होता इंग्लीश नाव आठवत नाही त्याची एक कॅसेट होती हिट हिन्दी गाण्यांचे पियानोवर वादन फ़ार सुंदर वाजवायचा फ़ेमस होता फ़ार एकेकाळी.
ब्रायन सिलास (सायलस). गिटारीत चिंटू सिंग तसाच.
  • Log in or register to post comments

येस सर धन्यवाद नाव तोंडावर होत

मारवा
Sat, 11/28/2015 - 19:14 नवीन
पण आठवत नव्हत. फार सुंदर वाजवतो हा माणुस पियानोवर आणि त्याच सिलेक्शन पण बेस्ट. माझ्याकडे हे चित्र असलेली कॅसेट होती. नंतर सापडलीच नाही. Image removed. आता नाव सापडल तर सबकुछ मिल गया http://briansilas.com/ पुनश्च धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

लेख

प्रदीप
Sat, 11/28/2015 - 16:40 नवीन
छान आहे, मला आवडणार्‍या विषयावर आहे, पण अतिशय व्हर्बोस झालेला आहे, असे मला वाटते. ह्या विषयावर बरेच काही लिहीता येईल, तूर्तास इतकेच लिहीतो: 'प्यार हुवा, इकरार हुवा' ह्या गीतात दोन मूडस वेगवेगळ्या लयींनी किती सहजपणे अधोरेखित केले आहेत! त्यातील 'तो' प्रेमाच्या सुरूवातीच्या बहराने धुंद आहे, त्याच्यात एक प्रकारचा जल्लोष संचारलाय, तेव्हा त्याच्या ओळींवरील लयही तशीच साजेशी जलद आहे. 'ती' मात्र साशंक आहे, हे जे काही नवीन होती आहे, त्याचा थरार तिला जाणवतोय, पण हे सगळे कसे निभावून नेता येईल, ह्याविषयी तिच्या मनात धाकधूक आहे. ती म्हणते 'कहता है दिल, रास्ता मुष्किल, मालूम नही है कहाँ मंझिल'.ही तिची मनस्थिती अधोरेखित करतांना तिच्या ओळींवरील लय अर्धी झालेली आहे. वाद्ये जवळजवळ नाहीतच, नुसती लताच गाते आहे, असे एक गाणे म्हणजे 'दो नैनों मे, आँसू भरे है, निंदीया कैसे समाय?'. अतिशय संथ लय, काहीही साथ नाही (अगदी लीड व्हायोलिनही नाही, तालवाद्य नाही), आणि केवळ फक्त लता गातेय! तुम्ही उल्लेखिलेला पियानो वादक वॅन्स शिप्ले.
  • Log in or register to post comments

प्रदीप जी क्या बात है

मारवा
Sat, 11/28/2015 - 19:27 नवीन
खरचं लेख अतीउत्साहाच्या भरात वेडावाकडा विस्कळीत झालाय. काय सुंदर अचुक भाव पकडलाय तुम्ही या गाण्याचा बाकी त्याचा आवाज कसा उत्साहाने ओसंडुन जातोय जणू खरयं तुम्ही जे लताजींच गाणं म्हणताय ते ऐकलेल नाही आता शोधुन ऐकतो एकदा. अनप्लग्ड गाणी पण छानचं असतात गायकाचा पुर्ण कस च लागतो मात्र त्यातही नॉन इलेक्ट्रॉनीक चा वापर अलाउड असतोच, एकदम तेही नाही नुसताच आवाज अस जर वरील गाणं आहे तुम्ही म्हणता तस तर मजा येइल. नक्की शोधुन ऐकतो. तुर्तास एक साइट सापडलीय अनप्लगड गाण्यांची कोणीतरी एक सांगितलेलं पण औरंगाबाद च्या एका मुलीने वाटत काही छान गाणी गायलीय ऐकली नाहीत नुसती माहीती मिळालीय http://www.unpluggedsongs.in/download-the-best-bollywood-hindi-unplugged-mp3-songs/ वॅन्स शिप्ले नव्हता माहीत मला ही एक नविनच माहीती मला तो ब्रायन सिलास माहीती होता. धन्यवाद सुंदर माहीतीपुर्ण प्रतिसादासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

प्रदीपजी

बोका-ए-आझम
Sat, 11/28/2015 - 20:32 नवीन
व्हॅन शिप्ले पियानो नाही, गिटार आणि व्हायोलिन वाजवायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

धन्यवाद

प्रदीप
Sun, 11/29/2015 - 06:59 नवीन
चुकीच्या दुरूस्तीबद्दल धन्यवाद. व्ही. बलसारांच्या काही रेकॉर्ड्स होत्या का पूर्वी, पियानोच्या? मारवा, येथे मी उल्लेखिलेले लताचे 'दो नैनों मे आँसू भरे है" आहे. मागे फक्त व्हिब्रोफोनचे स्ट्रोक्स आहेत, मधे हलकासा इंटर्ल्यूड आहे, इतकेच. बाकी सर्व लता गाते आहे. (मी जुन्या जमान्यातला असल्याने, अनप्लग्ड म्हणजे नक्की काय ते मला ठाऊक नाही. पण ते 'अ‍ॅड्लिब' अशा अर्थाने असेल तर हे--किंबहुना लताचे कुठलेच गाणे-- त्या संबोधनात बसत नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

प्रदीप जी लताजींच्या गाण्याच्या लिंक साठी धन्यवाद !

मारवा
Sun, 11/29/2015 - 12:50 नवीन
प्रदीप जी लिंक साठी धन्यवाद ! तस काही नाही हो फक्त इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर टाळुन कमीत कमी वाद्ये घेऊन गायचं इतकचं मला वाटतं टीव्ही वरील रीअ‍ॅलीटी सींगींग शो मध्ये एक टेस्ट गायकाची अशा प्रकारे घेण्यात येते बघितलेलं. त्यात आवाजाचा कस लागतो मात्र. लताजींच तर काय साधं बोलतं असतात तेव्हा ही ऐकत रहावसं वाटतं एखाद्या इंटरव्ह्यु मध्ये. तुम्ही जुन्या जमान्यातला एखादा व्हायोलीन आणि माऊथ ऑर्गन चा तुकडा असलेल गाणं सांगा ना आणि हो अजीब दास्ता है ये कहॉ शुरु कहॉ खतम विषयी आपल विवेचन जाणुन घ्यायला आवडेल खुप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

व्हायोलीन आणि माऊथ ऑर्गन

प्रदीप
Mon, 11/30/2015 - 20:28 नवीन
ह्या दोघांचे सोलो असलेले एखादे गाणे मलातरी आता पटकन आठवत नाही. तुम्हाला आठवते आहे का? नुसत्या व्हायोलीनची सोलो असलेली अनेक गाणी सांगता येतील. माऊथ ऑर्गन ह्या वाद्याविषयी मला काही खास प्रेम नाही, खरे तर. 'है अपना दिल तो आवारा' व 'दोस्ती' मधील 'राही मनवा दुख की चिंता' ह्या दोन गाण्ञांमधे ह्याचा सोलो आहे. 'दोस्ती' च्या ह्या गाण्यासाठी लक्ष्मीकांत- प्यारेलाल ह्यांच्यासाठी आर. डी. बर्मनने तो वाजवलेला आहे. मी व्यक्तिशः शंकर- जयकिशनचा वेडा फॅन आहे. पण 'दिल अपना ..' तील इतर गाणी मला 'अजीब दास्तॉ..' पेक्षा अधिक आवडतात, विशेषत" 'दिल अपना'( त्यातील खास शंकरच्या स्टाईलचे भारदस्त ऑर्केस्ट्रेशन, ज्यात चेल्लोज व व्हायोलीन्स आहेत, तसेच अब्दुल करीमचा वजनदार ठेका आहे, आणि लता गातेय), 'मेरा दिल अब तेरा ऑ साजना'( ह्यात अब्दुल करीमने ढोलकची कम्माल केलीय), व 'मेरा दिल अब तेरा' (लताची सुरूवातीची तान बेहद्द खूष करणारी) ही तीन गाणी. त्यामानाने, 'अजीब दास्तॉ..' ठीक, ठीक. (माझी मते !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

प्रदीप जी cello च ना जो तुम्ही म्हणताय ?

मारवा
Mon, 11/30/2015 - 22:14 नवीन
त्यातील खास शंकरच्या स्टाईलचे भारदस्त ऑर्केस्ट्रेशन, ज्यात चेल्लोज व व्हायोलीन्स आहेत, क्या बात है प्रदीपजी हा cello हे वाद्य जर तुम्ही याचाच उल्लेख केलेला आहे तर युवराज या चित्रपटात तु मेरी दोस्त है या गाण्यात ए आर रहेमान ने सेल्लो वापरलेलं आहे. सेल्लो हे व्हायोलीन शी अधिक जवळ आहे अस वाटत. तुम्ही ऐकली आहे का या चित्रपटाची गाणी फार सुंदर संगीत आहे. तुम्ही जो दिल अपना चा म्हणाला त्या चित्रपटाची गाणी आता नीट कान देऊन ऐकतो या जागा माहीत नव्हत्या धन्यवाद प्रदीपजी अनेक धन्यवाद माझी गाडी अजीब दास्ता वर च अटकलेली होती.... जीम रीव्ह्ज जी कॉपी आहे असा ही एक मतप्रवाह या गाण्याबाबत आहे पण तो ऐकुन पाहीला तेवढा काही पटला नाही. अगोदर ऐकला नसेल तर युवराज ट्राय करा सर सेल्लो साठी खास. तुम्ही जुने आहात म्हणुन एक जुनाच प्रश्न सुमन कल्याणपुर यांच्याकडे लतांजीच्या इतकचं पोटेन्शीयल होतं या मताशी तुम्ही सहमत आहात का ? आणि सी एच आत्मा व सैगल यात काय साम्य फरक तुम्ही दोन गायकांकडे कस बघता ? कृपया विवेचन करावे अती उत्सुक वाचण्यासाठी पुनश्च धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

छान लेख

कविता१९७८
Sat, 11/28/2015 - 16:59 नवीन
छान लेख
  • Log in or register to post comments

फारच सुंदर लिहिलंय.

पद्मावति
Sat, 11/28/2015 - 18:03 नवीन
फारच सुंदर लिहिलंय. असंख्य वेळा ऐकलेली ही गाणी. त्यातले सौंदर्य, बारकावे तुम्ही अफाट अचूकतेने उलगडून दाखविले आहेत. आता ही गाणी नव्याने ऐकाविशी वाटत आहेत. केवळ अप्रतिम!
  • Log in or register to post comments

मारवाजी

बोका-ए-आझम
Sat, 11/28/2015 - 18:33 नवीन
माचिसमधल्या ' चप्पा चप्पा चरखा तले ' मध्ये रबाब या अफगाणी वाद्याचा उपयोग केलेला आहे. हे वाद्य सरोदसारखंच असतं.
  • Log in or register to post comments

बोकोबा सही यार

मारवा
Sat, 11/28/2015 - 19:34 नवीन
रबाब आहे माहीत नव्हतं मला सरोदच वाटत होतं. हा एक तुम्ही म्हटल्यावर शोध घेतला तर नविनच माहीती मिळाली बघा. रबाब म्हणे गुरु नानक यांच आवडत वाद्य होत. सरोद व रबाब च्या फरकावरील टीपण असे आढळले. The present day Sarod, came into vogue through an evolutionary process. Its predecessor, the ancient Rabab, was played in the Mughal court of Emperor Akbar. It is a six stringed instrument with its lower gut string used as a resonator. The founder of the Sikh faith, Guru Nanak, favored this instrument. The guru's closet disciple, Bhai Ramdass, usually strummed on it and it is believed that the guru poured out his immortal devotional hymns to the sounds of the melodious Rabab. The high point of difference between the Rabab and the Sarod is that the Sarod is endowed with an extra dose of melody and this is due to the inclusion of a metal chest plate across the front rod of the instrument. The fingerboard is thus a steely glide. As gut strings would create a dull sound effect on a steel surface, it necessitated the introduction of metal strings of variable thickness. या गाण्याचा व्हीडीओ एकदा काळजीपुर्वक बघायला हवा. हा घुमणारा आवाज मात्र सरोद मध्येपण काढता येतो. धन्यवाद बोकोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

लेख एक नंबर मस्त झालाय. चवीने

बॅटमॅन
Mon, 11/30/2015 - 16:11 नवीन
लेख एक नंबर मस्त झालाय. चवीने वाचला पाहिजे. रच्याकने रबाबचा उत्तम वापर हैदर पिच्चरमधील बिस्मिल या गाण्यात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

मस्त ....

मुक्त विहारि
Sat, 11/28/2015 - 19:05 नवीन
झक्कास... फारच सुंदर लिहिलंय.
  • Log in or register to post comments

मारवासाहेब. फार सुंदर विषयाला

मांत्रिक
Sat, 11/28/2015 - 20:28 नवीन
मारवासाहेब. फार सुंदर विषयाला सुरुवात केलीयेत. आता मोबल्यावर असल्याने टंकणे जमत नाही. पण लिहायचंय भरपूर. तुमच्या व्हायोलीनविषयी शंकांना पण येथेच उत्तरे देईन.
  • Log in or register to post comments

आर.डी.बर्मनजींची एक मुलाखत मी ऐकली होती

बोका-ए-आझम
Sat, 11/28/2015 - 20:42 नवीन
तेव्हा त्यांनी ' दम मारो दम ' च्या सुरूवातीचा तो ' घों ' असा आवाज कसा मिळवला ते सांगितलं होतं. एका घराच्या चिमणीत दोन मोठे भुंगे अडकले होते. तेव्हा त्यांनी तो आवाज रेकाॅर्ड केला आणि नंतर amplify केला. नशेत चूर हिप्पींसाठी तो perfect बसतो. गाण्याच्या सुरूवातीला जेव्हा तो वाजतो आणि लगेच पुढे psychedelic संगीत आणि गाणं संपता सञपता आशाजींच्या आवाजात ' श्श!' हे आख्खं गाणं हेच एक narcotic drug आहे!
  • Log in or register to post comments

दंडवत घे बोक्या!

मांत्रिक
Sat, 11/28/2015 - 20:47 नवीन
दंडवत घे बोक्या! खतरा वाचन आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

होगा तुमसे प्यारा कौन मधला चालत्या ट्रेन चा इफेक्ट साठी

मारवा
Sat, 11/28/2015 - 22:56 नवीन
होगा तुमसे प्यारा कौन मधला चालत्या ट्रेन च्या इंजिनाचा आवाजाचा इफेक्ट साधण्यासाठी एका पॉलिश पेपरवर दुसरा पॉलिश पेपर घासुन निर्माण केलेला आवाज वापरल्याचा किस्सा आमचा फेवरीट आहे. तुम्ही सांगितलेला पण जबरदस्त किस्सा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

होमी मुल्लन

प्रदीप
Sun, 11/29/2015 - 07:01 नवीन
हे असले तर्हतर्हेचे आवाज काढण्यात माहीर होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

मस्त लेख

एक एकटा एकटाच
Sat, 11/28/2015 - 21:09 नवीन
मस्त लेख आर.डी. च चुरा लिया है तुमने जो दिल को मधली गिटार ही जबरदस्त
  • Log in or register to post comments

ढोल ताश्याचा गाण्यात अगदी

एक एकटा एकटाच
Sat, 11/28/2015 - 21:11 नवीन
ढोल ताश्याचा गाण्यात अगदी चपखल वापर केलाय तो अजय अतुलनी देवा श्री गणेशा देवा मोरया मोरया ही गाणी ऐकताना भारावून जायला होत.
  • Log in or register to post comments

ढोल ताश्याचा चपखल वापर

नया है वह
Tue, 12/01/2015 - 19:39 नवीन
सर्जा मधील गाणं मी कट्यातुन चालुन थकले. या गाण्यामधे एक मस्त जागा आहे ताश्याचा चपखल वापर केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच

लेख आवडला. नीले नीले अंबर पर

रातराणी
Sat, 11/28/2015 - 21:25 नवीन
लेख आवडला. नीले नीले अंबर पर मधली गिटार मस्त आहे. नवीन गाण्यातलं आता जब तक है जान मधलं छल्ला आठवतंय. त्यातही गिटार छान वापरलीये. जब वी मेट मधलं तुमसेही हे पण छान जमलंय. रांझनामधलं तू मून शुदि हे पण आवडतं. त्यातला आवाज त्या गाण्याच्या शब्दांसाठी पर्फेक्त आहे.
  • Log in or register to post comments

नीले नीले अंबर पर हा तर गिटार चा क्लासिक पीस !

मारवा
Sat, 11/28/2015 - 21:49 नवीन
नीले नीले अंबर पर मधली गिटार मस्त आहे. शत प्रतीशत सहमत.
  • Log in or register to post comments

मोह मोह के धागे मधली बासरीपण

रातराणी
Sun, 11/29/2015 - 14:11 नवीन
मोह मोह के धागे मधली बासरीपण राहिली प्रतिसादात लिहायची. ते गाणच अप्रतिम जमून आलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

एक असेच धन्नों की आखों में

सटक
Mon, 11/30/2015 - 23:33 नवीन
एक असेच धन्नों की आखों में (किताब चित्रपट)) आहे.. guitar flanging वापरून एकसलग ट्रेनचा आवाज वाजत रहातो...पुन्हा RD..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

वा!!!मज़ा आया!!

दमामि
Sun, 11/29/2015 - 07:26 नवीन
वा!!!मज़ा आया!!
  • Log in or register to post comments

साज

जयन्त बा शिम्पि
Sun, 11/29/2015 - 10:05 नवीन
संपुर्ण लेख सावकाश वाचतो, पण त्या अगोदर एक छोटासा प्रतिसाद .... हम भटकते है ..... क्युं भटकते है , यातील क्षणभरचा पॉज मलाही खुप आवडतो. अस्साच एक पॉज गझल गायक गुलाम अली च्या " दिलमे एक लहर सी उठी है अभी , कोई ताजा हवा चली है अभी " यात घेतला जातो. गायकाचा आवाज आणि वाद्ये एकदम थांबून जातात, आणि त्यानंतर गुलाम अली चा सुंदर आलाप , बस्स , सुनते रहीये ! लाजबाब ! ! तेव्हढा आलाप ऐकण्यासाठी , मी तेव्हढाच भाग पुन्हा पुन्हा ऐकतो .
  • Log in or register to post comments

कानसेनांनी रहेमानी बीट्स वर

अभ्या..
Sun, 11/29/2015 - 13:16 नवीन
कानसेनांनी रहेमानी बीट्स वर अधिक प्रकाश टाकावा
कानसेन वगैरे व्हायची आमची लायकी नाही पण रहेमानच्या बीटसचा मी भयानक पंखा. 'बॉम्बे' चित्रपटात 'दिल हुवा है दिवाना, झूम उठा है मस्ताना' हे गाणे आहे. त्यात गाण्याची सुरुवात मन्शा कोर्याला स्वामीसाहेबांना ते बाप बनायची शुभवार्ता देते तेथून होते. त्याचा आनंद हे गाणं असं पकडतं की क्या कहने. पहिले कडवे संपेपर्यंत तिची डिलीव्हरी वेळ आलेली असते. (जान्हवीला सांगा रे कुणीतरी) त्या मधल्या म्युझिक पीसमध्ये हॉस्पिटलचा तणाव, चेहर्‍यावर काळजी घेतलेला स्वामी अन अचानक त्या गंभीर म्युझिक सोबत बाळाचा पहिला ट्यांहा ऐकू येतो. पुढच्या बीटस हाच ट्यांहा उचलतात. त्या आवाजाचेच बीटस बनून म्युझिकचा टेंपो बदलतो. मशीदीतल्या अजानला अन क्लासिकल हिंदुस्थानी ला जवळचा रहमानचा आलाप दोन बाळांचे आगमनाचे स्वागत करतो. सिंप्ली ग्रेट. पुढच्या दीड कडव्यात मुले ७-८ वर्षाची होऊन आईबापासोबत मस्त हल्लागुल्ला करीत असतात. मस्ट वॉच हल्लागुल्ला
  • Log in or register to post comments

वाह !

मारवा
Mon, 11/30/2015 - 13:45 नवीन
वाह ! काय सुंदर जागा पकडलीय मजा आ गया अरविंद स्वामी इतका देखणा नट पुन्हा नाही बघितला कुठल्याच सिनेमात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बाँबेमधली कहना ही क्या

बोका-ए-आझम
Mon, 11/30/2015 - 16:11 नवीन
आणि तू ही रे ही दोन्हीही अफलातून गाणी आहेत. कहना ही क्या मध्ये कोरसने होणारी सुरुवात, मध्ये चित्राचा लिटरली कापत जाणारा आवाज, कहना ही क्या या ओळीवर एकदम मंद झालेलं संगीत आणि नंतरचा सगळा सूफी कोरस आणि हार्मोनियमच्या आवाजासह पहिल्या कडव्याची सुरुवात - लाजवाब! तू ही रे तर हरिहरनच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी एक. निव्वळ अप्रतिम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बाँबेमधली सगळीच गाणी मस्त.

बॅटमॅन
Mon, 11/30/2015 - 16:22 नवीन
बाँबेमधली सगळीच गाणी मस्त. केहना ही क्या तर काय गाणं आहे, च्यायला.....लैच भारी. ते ज्या ठिकाणी शूट झालंय तो मदुरैचा तिरुमलै नायकर पॅलेस आहे. इरुवर या प्रख्यात तमिळ पिच्चरमधले काही जब्राट शीन्स तिथे चित्रित झालेले आहेत. इतरही अनेक पिच्चरमध्ये त्याचे चित्रण झालेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

शत प्रतीशत सहमत कोरस साठी विशेषत:

मारवा
Mon, 11/30/2015 - 17:06 नवीन
आणि नंतरचा सगळा सूफी कोरस आणि हार्मोनियमच्या आवाजासह पहिल्या कडव्याची सुरुवात - लाजवाब! ते गाणं ऐकतांना त्या कोरससाठी कान आसुसलेला असतो नेहमीच. कोरस चे काही गाण्यात फार सुंदर वापर झालेले आहेत. एक पटकन आठवणार म्हणजे बघा हमपे ये किसने हरा रंग डाला या देवदास च्या गाण्यात एक तराना येतो आठवला ? काय सुंदर आहे ना तुमतुम तना तुम तुम ता ......... दुसरं म्हणजे पीके मध्ये चार कदम चलदो ना साथ मेरे या क्युटेस्ट रोमँटीक गाण्यात ते होडीत बसलेले चार जण एक कोरस मध्ये गातात तो....... तिसरा म्हणजे थोडा गाण्याचा नाही म्हणता येत भाग पण एक एकदम जबरदस्त इफेक्ट म्हणुन तो सरकार मध्ये बहुधा अभिषेक बच्चन चा त्यात तो पार्श्वभुमीत येतो गोविंदा गोविंदा गोविंदा मग एक कुठलासा संस्कृत मंत्राचा तुकडा सगळं कोरस मध्ये अफलातुन बसवलय त्याने मूळ कथानकाची तीव्रता अधिकच वाढत जाते अतिशय प्रभावी वापर जमवलाय. कोरस अनेक गाण्यांत विविध प्रकारे फार सुंदर वापरलेला. सध्या आठवु म्हटल तर आठवत नाही मात्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कोरस साठी रेहमान एक नंबर.

अभ्या..
Mon, 11/30/2015 - 17:18 नवीन
कोरस साठी रेहमान एक नंबर. तिरुडा तिरुडा, साथिया अन गुरु, सगळीकडे मस्त कोरसचा वापर. काही काही अनवट शब्दांचे गुलजारजी कडून लिहून घेतेलेले कोरस. अप्रतिम एकदम. गाण्यांपेक्षा रेहमान जास्त आवडतो पार्श्वसंगीतात. इतके विलक्षण प्रयोग केलेत त्याने पार्श्वसंगीतात की बस्स. दुर्दैवाने आपल्याकडे ते ऐकणारे दर्दी कान खूप कमी. गाण्यांचा जेवढा बोलबाला होतो तेवढा पार्श्वसंगीताचा नाही. गुरु मधला एक शॉट. मनोज जोशी अ‍ॅटॅक येऊन अंथरुणावर आहे. बारकेबच्चन त्यांना तुर्कीमधल्या आठवणी सांगून जोषात आणताहेत. लगेच हळूच सुरुवात होऊन वाजणारे 'माइय्या माइय्या' चे माइल्ड सूर. माईंड ब्लोईंग राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

अभ्या भौ जमेगी अपनी

मारवा
Mon, 11/30/2015 - 19:47 नवीन
गुलजारजींचे अनवट शब्द कितीतरी वेगळेच शब्द वापरतो हा माणुस छैय्या छौय्या पटकन आठवणारा पार्श्वसंगीता चा प्रभावी वापर मुळ प्रसंगाची तीव्रता अनेकपटीने वाढवतो. एक उदाहरण आठवणीच्या भरवशावर म्हणजे श्याम बेनेगलचा निशांत बहुधा ज्यात गिरीश कर्नाड च्या बायकोला मोहन आगाशे व त्याचे गुंड पळवुन नेतात तेव्हा एक इतकं भयंकर भीषण अस म्युझिक पार्श्वभुमीवर असतं म्युझिक नाही म्हणता येत पण आवाज अतीविचीत्र अती असंबद्ध आवाज त्यात वापरलेला आहे तो प्रसंग मुळात अगदी भयंकर त्यात त्या विचीत्र अतीवीचीत्र आवाजाच्या पुनरावर्तनाने तो प्रसंग अक्षरशः अंगावरच येतो. या सिनेमानंतर एकदा श्याम बेनेगलला मुंबईत एका वृध्दाने एकदा रस्त्यात अडवुन खडसावलेलं की तुला असं आम्हाला अस्वस्थ इतकं अस्वस्थ करुन सोडण्याचा काहीच अधिकार नाही अस तो म्हणालेला बेनेगल म्हणतात दॅट वॉज ग्रेट कॉम्प्लीमेंट आय एव्हर रीसीव्ड. एक जाने भी दो यारोत शेवटच्या क्लायमॅक्स च्या सीनला नसिर आणि वासवानी जेव्हा चालत जातात कैद्याच्या ड्रेस मध्ये तेव्हा पार्श्वभुमीत वाजणारं गाणं हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन मनमे है विश्वास पुरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन. इतकं तीव्र सटायरीकल सीन इतक अचुक निवडलेलं गाणं मंत्रमुग्ध होऊन आपण पाहतच राहतो. एक हम सिनेमात अमिताभ नंतर शांत झालेला असतो स्वभावाने पुर्वाश्रमीचा अमिताभ त्याने दडपुन टाकलेला असतो एकदा त्या सुनेचा की भाभीचा शोध घेतांना तिच्या फोटोवर ड्रायव्हर काहीतरी कॉमेंट करतो. त्यावर मग तो खवळुन त्याला एका विशीष्ट शैलीत मारायला धावतो तेव्हाचं पार्श्वभुमीत वाजणार संगीत उग्र आक्रमक ते संगीतच पुढील प्रसंगाची कल्पना स्पष्ट देतं मस्त संगीत आहे ते कुशलतेने वापरलेल एक भुत पिक्चर होता राम गोपाल वर्माचा त्यात साऊंड जो काय वापरलेला काय सुंदर नुसता आवाजाने भय उत्पन्न करणं म्हणजे काय त्याच उदाहरण नुसती बेल दाराची वाजणं पण कीती भयावह असु शकतं ग्रेट होता जो कोणी साऊंड वापरणारा होता त्यात. एक लास्ट ऑफ द मोहीकन मध्ये शेवटच्या सीन मध्ये तो इंडीयन जेव्हा पाठलाग करत जातो दिर्घ पाठलाग एका अदभुत निसर्गाच्या पार्श्वभुमीवर तेव्हा मला वाटत तो बॅगपाइप का कोणतं पारंपारीक वाद्य वापरलेलं काय प्रभावी सीन होऊन जातो तो त्या पाठलागाचा भव्य दिव्य सीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अजून एक कोरस साठीचे गाणे

अभ्या..
Mon, 11/30/2015 - 20:10 नवीन
अजून एक कोरस साठीचे गाणे चित्राच्या आवाजात. चित्रपट 'मे माधम'. हिरॉईन आपली सोकु. या गाण्यातले वेंकटेश सुप्रभातमची आठवण करुन देणारे म्युझिक, स्ट्रेट बीट्स, घटमची परफेक्ट साथ अन चित्रासाठी ऐकाच. पिक्चरायक्झेशन भंगार आहे. बीटस साठी अजून एक. सपने मधील 'हू लाला ला' एक वाचनात आलेला किस्सा. खरा खोटा रेहमान जाणे. एक ईंग्लिश हॉर्न वाजवणारा आर्टिस्ट रेहमानकडे कामासाठी भेटत होता. हे वाद्य वाजवणारे दुर्मिळ्च. रेहमानकडे वेळ नसायचा. एक दिवस वेळ मिळाल्यावर त्याला ३ तास नुसते वाटेल ते मनासारखे वाजवू दिले. चांगली घसघशीत रक्कम देऊन बोळ्वण केली. थोड्या दिवसाने एका गाण्यात ईग्लिश हॉर्नची अशी सुरावट होती जी त्या कलाकाराने वाजवलेली नव्हती. सारी रेकॉर्डिंग अन सिस्टिम जनरेटेड म्युझिकची रेहमानी करामत. रेहमान असा पण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

त्या मूळ कलाकाराला काही

यशोधरा
Wed, 12/02/2015 - 13:11 नवीन
त्या मूळ कलाकाराला काही क्रेडीट मिळाले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नाही. त्या तीन तासाचे मिळाले

अभ्या..
Wed, 12/02/2015 - 13:21 नवीन
नाही. त्या तीन तासाचे मिळाले तेवढेच पैसे. तेवढ्या रेकॉर्डिंगवर रेहमानला आता कुठेही कशीही इंग्लिश हॉर्न ची सुरावट क्रिऐट करता येईल आणि त्याचे क्रेडिट मूळ कलाकार मागूच शकणार नाही कारण ते त्याने वाजवलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून

संदीप डांगे
Wed, 12/02/2015 - 14:17 नवीन
तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून नवीनच सुरावट तयार करणे अशक्य वाटते. सॉफ्टवेअरची करामात असेल तर सॉफ्टवेअरमधे इन्ग्लिश हॉर्न असलाच पाहिजे कारण शक्यतो सगळ्याप्रकारचे वाद्यसंगित सॉफ्टवेअरमधे मिळते. आजकाल सिन्थेसायझरमधे तर इतके इनोवेशन झाले आहे की बास. फिन्गरबोर्ड हा एक अत्याधुनिक सिंथेसायझर रेहमान कडे आहे. त्यात शेकडो वाद्ये संग्रहित असतात. ऐकुया इन्ग्लिश हॉर्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

संदीप जी सहमत आहे.

मारवा
Wed, 12/02/2015 - 18:20 नवीन
तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून नवीनच सुरावट तयार करणे अशक्य वाटते हे अवघडचं वाटतं फार फिन्गरबोर्ड हा एक अत्याधुनिक सिंथेसायझर रेहमान कडे आहे. त्यात शेकडो वाद्ये संग्रहित असतात. अत्यंत सहमत नविन आधुनिक सिंथेसायझर मध्ये असलेला विविध वाद्य आवाजांचा संग्रह आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. व मिक्स साऊंड म्हणजे एखादा बासरी क्लॅरीनेट मिक्स करणे अशा असंख्य सुविधा देखील त्यात असतात. असा सिंथेसायझर व त्यांचे फन्क्शन्स समजुन घेणं वापरणं फार पुढची पायरी झाली समजण्यासाठी आपल्या सारख्या सामान्यांना एक फंक्शन ओरीएंटेशन कोर्स करावा लागेल असेल एखादा तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संदीप जी सहमत आहे.

मारवा
Wed, 12/02/2015 - 18:21 नवीन
तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून नवीनच सुरावट तयार करणे अशक्य वाटते हे अवघडचं वाटतं फार फिन्गरबोर्ड हा एक अत्याधुनिक सिंथेसायझर रेहमान कडे आहे. त्यात शेकडो वाद्ये संग्रहित असतात. अत्यंत सहमत नविन आधुनिक सिंथेसायझर मध्ये असलेला विविध वाद्य आवाजांचा संग्रह आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. व मिक्स साऊंड म्हणजे एखादा बासरी क्लॅरीनेट मिक्स करणे अशा असंख्य सुविधा देखील त्यात असतात. असा सिंथेसायझर व त्यांचे फन्क्शन्स समजुन घेणं वापरणं फार पुढची पायरी झाली समजण्यासाठी आपल्या सारख्या सामान्यांना एक फंक्शन ओरीएंटेशन कोर्स करावा लागेल असेल एखादा तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संदीप जी सहमत आहे.

मारवा
Wed, 12/02/2015 - 18:21 नवीन
तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून नवीनच सुरावट तयार करणे अशक्य वाटते हे अवघडचं वाटतं फार फिन्गरबोर्ड हा एक अत्याधुनिक सिंथेसायझर रेहमान कडे आहे. त्यात शेकडो वाद्ये संग्रहित असतात. अत्यंत सहमत नविन आधुनिक सिंथेसायझर मध्ये असलेला विविध वाद्य आवाजांचा संग्रह आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. व मिक्स साऊंड म्हणजे एखादा बासरी क्लॅरीनेट मिक्स केलेला अशा असंख्य सुविधा देखील त्यात असतात. असा सिंथेसायझर व त्यांचे फन्क्शन्स समजुन घेणं वापरणं फार पुढची पायरी झाली समजण्यासाठी आपल्या सारख्या सामान्यांना एक फंक्शन ओरीएंटेशन कोर्स करावा लागेल असेल एखादा तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संदीप जी सहमत आहे.

मारवा
Wed, 12/02/2015 - 18:21 नवीन
तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून नवीनच सुरावट तयार करणे अशक्य वाटते हे अवघडचं वाटतं फार फिन्गरबोर्ड हा एक अत्याधुनिक सिंथेसायझर रेहमान कडे आहे. त्यात शेकडो वाद्ये संग्रहित असतात. अत्यंत सहमत नविन आधुनिक सिंथेसायझर मध्ये असलेला विविध वाद्य आवाजांचा संग्रह आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. व मिक्स साऊंड म्हणजे एखादा बासरी क्लॅरीनेट मिक्स केलेला अशा असंख्य सुविधा देखील त्यात असतात. असा सिंथेसायझर व त्यांचे फन्क्शन्स समजुन घेणं वापरणं फार पुढची पायरी झाली समजण्यासाठी आपल्या सारख्या सामान्यांना एक फंक्शन ओरीएंटेशन कोर्स करावा लागेल असेल एखादा तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संदीप जी सहमत आहे.

मारवा
Wed, 12/02/2015 - 18:21 नवीन
तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून नवीनच सुरावट तयार करणे अशक्य वाटते हे अवघडचं वाटतं फार फिन्गरबोर्ड हा एक अत्याधुनिक सिंथेसायझर रेहमान कडे आहे. त्यात शेकडो वाद्ये संग्रहित असतात. अत्यंत सहमत नविन आधुनिक सिंथेसायझर मध्ये असलेला विविध वाद्य आवाजांचा संग्रह आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. व मिक्स साऊंड म्हणजे एखादा बासरी क्लॅरीनेट मिक्स केलेला अशा असंख्य सुविधा देखील त्यात असतात. असा सिंथेसायझर व त्यांचे फन्क्शन्स समजुन घेणं वापरणं फार पुढची पायरी झाली समजण्यासाठी आपल्या सारख्या सामान्यांना एक फंक्शन ओरीएंटेशन कोर्स करावा लागेल असेल एखादा तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संदीप जी सहमत आहे.

मारवा
Wed, 12/02/2015 - 18:22 नवीन
तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून नवीनच सुरावट तयार करणे अशक्य वाटते हे अवघडचं वाटतं फार फिन्गरबोर्ड हा एक अत्याधुनिक सिंथेसायझर रेहमान कडे आहे. त्यात शेकडो वाद्ये संग्रहित असतात. अत्यंत सहमत नविन आधुनिक सिंथेसायझर मध्ये असलेला विविध वाद्य आवाजांचा संग्रह आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. व मिक्स साऊंड म्हणजे एखादा बासरी क्लॅरीनेट मिक्स केलेला अशा असंख्य सुविधा देखील त्यात असतात. असा सिंथेसायझर व त्यांचे फन्क्शन्स समजुन घेणं वापरणं फार पुढची पायरी झाली समजण्यासाठी आपल्या सारख्या सामान्यांना एक फंक्शन ओरीएंटेशन कोर्स करावा लागेल असेल एखादा तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संदीप जी सहमत आहे.

मारवा
Wed, 12/02/2015 - 18:22 नवीन
तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून नवीनच सुरावट तयार करणे अशक्य वाटते हे अवघडचं वाटतं फार फिन्गरबोर्ड हा एक अत्याधुनिक सिंथेसायझर रेहमान कडे आहे. त्यात शेकडो वाद्ये संग्रहित असतात. अत्यंत सहमत नविन आधुनिक सिंथेसायझर मध्ये असलेला विविध वाद्य आवाजांचा संग्रह आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. व मिक्स साऊंड म्हणजे एखादा बासरी क्लॅरीनेट मिक्स केलेला अशा असंख्य सुविधा देखील त्यात असतात. असा सिंथेसायझर व त्यांचे फन्क्शन्स समजुन घेणं वापरणं फार पुढची पायरी झाली समजण्यासाठी आपल्या सारख्या सामान्यांना एक फंक्शन ओरीएंटेशन कोर्स करावा लागेल असेल एखादा तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संदीप जी सहमत आहे.

मारवा
Wed, 12/02/2015 - 18:22 नवीन
तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून नवीनच सुरावट तयार करणे अशक्य वाटते हे अवघडचं वाटतं फार फिन्गरबोर्ड हा एक अत्याधुनिक सिंथेसायझर रेहमान कडे आहे. त्यात शेकडो वाद्ये संग्रहित असतात. अत्यंत सहमत नविन आधुनिक सिंथेसायझर मध्ये असलेला विविध वाद्य आवाजांचा संग्रह आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. व मिक्स साऊंड म्हणजे एखादा बासरी क्लॅरीनेट मिक्स केलेला अशा असंख्य सुविधा देखील त्यात असतात. असा सिंथेसायझर व त्यांचे फन्क्शन्स समजुन घेणं वापरणं फार पुढची पायरी झाली समजण्यासाठी आपल्या सारख्या सामान्यांना एक फंक्शन ओरीएंटेशन कोर्स करावा लागेल असेल एखादा तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संदीप जी सहमत आहे.

मारवा
Wed, 12/02/2015 - 18:23 नवीन
तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून नवीनच सुरावट तयार करणे अशक्य वाटते हे अवघडचं वाटतं फार फिन्गरबोर्ड हा एक अत्याधुनिक सिंथेसायझर रेहमान कडे आहे. त्यात शेकडो वाद्ये संग्रहित असतात. अत्यंत सहमत नविन आधुनिक सिंथेसायझर मध्ये असलेला विविध वाद्य आवाजांचा संग्रह आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. व मिक्स साऊंड म्हणजे एखादा बासरी क्लॅरीनेट मिक्स केलेला अशा असंख्य सुविधा देखील त्यात असतात. असा सिंथेसायझर व त्यांचे फन्क्शन्स समजुन घेणं वापरणं फार पुढची पायरी झाली समजण्यासाठी आपल्या सारख्या सामान्यांना एक फंक्शन ओरीएंटेशन कोर्स करावा लागेल असेल एखादा तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संदीप जी सहमत आहे.

मारवा
Wed, 12/02/2015 - 18:23 नवीन
फिन्गरबोर्ड हा एक अत्याधुनिक सिंथेसायझर रेहमान कडे आहे. त्यात शेकडो वाद्ये संग्रहित असतात. अत्यंत सहमत नविन आधुनिक सिंथेसायझर मध्ये असलेला विविध वाद्य आवाजांचा संग्रह आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. व मिक्स साऊंड म्हणजे एखादा बासरी क्लॅरीनेट मिक्स केलेला अशा असंख्य सुविधा देखील त्यात असतात. असा सिंथेसायझर व त्यांचे फन्क्शन्स समजुन घेणं वापरणं फार पुढची पायरी झाली समजण्यासाठी आपल्या सारख्या सामान्यांना एक फंक्शन ओरीएंटेशन कोर्स करावा लागेल असेल एखादा तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा