Skip to main content

संपादक मंडळ पुनर्रचना बाबत माहिती

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 23/11/2015 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दर वेळे प्रमाणे यावेळीसुध्दा मिसळपावच्या संपादक मंडळात बदल करणे अपेक्षीत आहेत. सध्या असलेल्या संपादक मंडळाने अतिशय उत्तम काम केले आहे. विशेषत: गेल्या काळात मी अन्य कामांत व्यस्त असल्यामुळे किंवा अन्य कारणाने मिपास पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. अश्या वेळी मिसळपावची अतिशय उत्तम काळजी संपादक मंडळानी घेतली. खरं तर त्यांचे आभार प्रदर्शन करून त्यांना परकं न करता मी कायम त्यांचा स्नेह व मार्गदर्शन व्यक्तिश: मला मिळत रहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज दि. २२/११/२०१५ रोजी सध्या अस्तीत्वात असलेले संपादक सदस्यं व एकूणच संपादक मंडळ आपल्या कामातून थांबतेय. यापुढे येते काही दिवस मिसळपाव वर प्रशांत आणि मी असे संपादक असू. त्यामुळे सर्व सदस्यांना सहकार्याची विशेष विनंती आहे. याकाळात सदस्यांशी संवाद साधण्यात जरा अडचण येऊ शकते. त्यामुळे सदस्यांनी मिपाच्या धोरणाप्रमाने वागणुक ठेवावी व कारवाई टाळावी अशी विनंती आहे. काही अडचण आल्यास मला किंवा प्रशांतला व्यक्तिगत निरोपाद्वारे संपर्क साधावा.

वाचने 37466
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

In reply to by भाऊंचे भाऊ

औपचारिकता आहे की प्रांजळपणा हे समजून घेणा-याला नक्कीच समजेल.

नीलकांत भाऊ, नोंद घेतलेली आहे तुम्हांस अन प्रशांतजींस खुप खुप शुभेच्छा माजी संपादक मंडळास मनःपूर्वक शुभेच्छा अन मंडळी तुमचे खुप खुप आधार , आता फ़क्त संपादन कार्यातून मोकळीक मिळाल्यामुळे जरा भारी भारी साहित्य मेवा आम्हाला द्याल अशी अपेक्षा अन पुलेशु

इतकी महत्त्वाची जबाबदारी विश्वासाने देणाऱ्या नीलकांत यांचे आभार. आणि आजी माजी भावी संपादकांना शुभेच्छा!

महितिबद्दल आभार मालक नविन लोक लौकर नेमा. रच्याकने: नविन संपादक कोण कोण असणार यावर सट्टा सुरु करावा का?

In reply to by मी-सौरभ

मी चुकुन सट्टा ऐवजी कट्टा असे वाचले. नविन संपादक मंडळात कोण असणार यावर सविस्तर चर्चा (!) करण्यासाठी एक कट्टा होऊन जाऊ द्या. वाचताय ना मुवि.

अनेक लेखक त्यातले बहुतांश हौशी, त्यामुळे होणा-या चुका सुधारण्यासाठी करावा लागणारा संपर्क; यावेळी प्राकर्षाने जाणवले ते म्हणजे सदैव मदतीसाठी तत्पर असलेले; वेगवेगळे उपक्रम यशस्वीपणे राबवणारे जुने संपादक मंडळ नेहमीच लक्षात राहिल. सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार. सर्वांना सरसकट निवृत्त करायचा आपला धोरणात्मक निर्णय असेल त्याला विरोध नाही परंतु नव्याजुन्याचा मेळ घालून जर नवे मंडळ करता आले तर अधिक आवडेल अशी सूचना मात्र निलकांत, आपल्याला जरुर करेन.

आणि नव्या येणार्‍या संपादकांना शुभेच्छा. मध्यंतरीच्या काळात डु.आयडींचा जो ढळढळीत सुळसुळाट वाढला होता त्यावर अंकुश ठेवण्यात नवीन संपादक मंडळास यश येवो असे चिंतितो. कितीही वेळा काढले तरी पुन्हा पुन्हा उगवणारे हे बेशरमाचे झाड समूळ उपटून टाकले जाईल ह्याची खात्री आहे. तसेच, काही मंडळींची मेंबरशीप रिक्वेस्ट महिनेच्या महिने पेंडींग राहून उडवलेले डु.आयडींचे कर्तेधर्ते काही दिवसातच नव्या अवतारात समोर कसे काय येतात हे गौडबंगाल सोडवण्यातही यश येवो. धन्यवाद

हे संस्थल माहिती व विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी पदरमोड करून नीलकांत यानी मोफत उपलब्ध करून दिले आहे तसेच इथे मोफत इ मेल ची ही सोय व्यनि या नावाने सुरू आहे.मी कसा दुसर्याला लोळवतो पहा हे चार चौघाना दाखविण्या ची ही जागा नव्हे.हे एकदा सांगून ज्याना कळत नाही त्याना त्याना बाहेरचा रस्ता निर्दयपणे दाखविण्यात आला तर संपादक मंडळ नामक कुणाची गरज पडणार नाही व्यनि चा उपयोग करून अशा खोडसाळ पणाला नीलकांत यांचे निरिक्षणाखाली आणता येउ शकते .

जुन्या संपादक मंडळाचे आभार! असं काम स्वीकारून ते इतका काळ चालवण्याचं कठीण काम पार पाडल्याबद्दल अभिनंदन! नवीन संमंस आगाऊ शुभेच्छा! असा धागा काढून या निर्णयाची नीट माहिती देऊन सर्व मिपाकरांवर असा विश्वास टाकल्याबद्दल नीलकांत यांचेही आभार. कितीही भांडणं आणि वाद-विवाद असले तरी आम्ही मिपाकर एक आहोत, त्यामुळे हा विश्वास सार्थ ठरवूच.

आख्ख्या संपादक मंडळाने काम करणं एकाच वेळी थांबवण्यासारखं नक्की काय झालं?

जाणार्‍या संपादक मंडळाच्या सदस्यांचे मनापासून आभार. नवीन संपादकांसाठी बार आपण खूपच वर नेऊन ठेवला आहेत. धन्यवाद.

एकदम झाल्याचा एक फायदा अपेक्षित आहे. सर्व संपादक हे मिपावरच्या सर्वात लोकप्रिय लेखकांपैकी आहेत. संपादकमंडळात गेल्यावर ते सर्वजण सुप्तावस्थेत गेल्यासारखे झाले आहेत. ते आता लिहिते होतील ही अपेक्षा व त्यांना विनंती.

पारदर्शकता आवडली. मिपा प्रगल्भ संस्थळ आहे ह्याची काही लोकांना प्रचीती येईल अशी आशा. या संक्रमणकाळात मिपाच्या बरोबर राहूच. मावळत्या संपादकमंडळाने उत्तम कामगिरी केली. नवीन संमंदेखील तीच परंपरा कायम ठेवेल अशी खातरी आहे. एक शंका - केवळ संपादक मंडळ स्थगित झाले की साहित्य संपादक मंडळही स्थगित आहे?

In reply to by एस

साहित्य संपादक तसे नवीनच आहेत, त्यामुळे त्यात काही बदल सध्या नाहीये. ते त्यांचे काम करत आहेत.

नोंद घेण्यात आली आहे. नवीन संपादक मंडळाने जे काही काळाने रुजु होईल त्यांनी अभ्याकडुन टी शर्ट सदस्यांना कसे मिळ्तील ते पहावे. ( ह. घ्या. )

तू घाबरू नको टका, आता संपादक मंडळच नसणार.नीलकांत कात्री घेऊन बसणार दर सोमवारी.सर्वच धाग्यांना आणि प्रतिसादांना "संपादन" बटण असणार आहे.आपणच सुधरा आठ दिवसात नाहीतर "Access denide"!पहायला व्हा तयार.

यंत्रणा आणि व्यवस्था म्हणले की नियमित कालावधीनंतर बदल हां अवश्यंभावी असतो. मिपाच्या संपादकमंडळाचा अनुभव नेहमी चांगलाच राहिलेला आहे. (एखादा अपवाद सोडल्यास "चपला घाला आणि चालु लागा" काळातही) सो, माहितीबद्दल आभार. जुन्या संपादक मंडळाचे आभार आणि येणाऱ्या नव्या चमुचे मन:पूर्वक स्वागत, शुभेच्छा !