काळोखाच्या साम्राज्यातून जन्म घेत असते पहाट क्षणो क्षणी
प्रकाशाला गिळून पुन्हा एकदा पुढे सरकतो अंधार क्षणो क्षणी
अविश्वासाच्या भिंती फोडून अवतरतो विश्वास क्षणो क्षणी
विश्वासाचा बळी घेऊन पुन्हा 'मी' म्हणतो अविश्वास क्षणो क्षणी
दुखा:च्या खोल खायीतून वर येत असते सुख: क्षणो क्षणी
सुख:च्या या संथ जालावर दुखा:चे हि तरंग उठती क्षणो क्षणी
मृत्यूच्या विराट मुखातून जन्म घेत असते जीवन क्षणो क्षणी
जीवन हे पुन्हा एकदा देई मृत्यूस आमंत्रण क्षणो क्षणी
अजय सरदेसाई (मेघ)
19/09/1994 9:00 AM
https://www.blogger.com/blogger.g?blogID=7958438753236139750#editor/tar…
| लेखनविषय: |
|---|
वाचने
993
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेवटच्या दोन ओळी खासच!
शेवटच्या दोन ओळी खासच!
क्षणो क्षणी हे खुप वेळा आलयं,
क्षणो क्षणी हे खुप वेळा आलयं,
त्याऐवजी मनोमनी, रानोरानी, कानोकानी वगैरे टाकता आलं असतं तर अजुन मजा आली असती!!!!
पानोपानी
In reply to क्षणो क्षणी हे खुप वेळा आलयं, by जव्हेरगंज
पानोपानी राह्यल की वो जव्हेरभौ!
वनोवनी चाललं असतं का?
In reply to पानोपानी by चांदणे संदीप
वनोवनी चाललं असतं का?